Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
दहावी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दहावी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी 11. गोष्ट अरुणीमाची

दहावी मराठी 11. गोष्ट अरुणीमाची



कृती १ : (आकलन कृती)

• पुढील कृतींतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा :

(i) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

- धाडसी वृत्ती 

------------------------------------------

(ii) भाईसाब यांनी दिलेला सल्ला अरुणिमाने शिरोधार्य मानला.

  - वडीलधाऱ्या व्यक्ती चा आदर

--------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

(१) आकृती पूर्ण करा : 

• अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती

  - फूटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.

    - खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

-----------------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

(१) कोण ते लिहा :

(iii) फूटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन 

 - आरुणिमा

 ----------------------------------

 (iv) सर्वांत मोठा मोटिव्हेटर 

 - स्व:च 

--------------------------------------

(vii) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला 

 - बचेंद्री पाल 

--------------------------------     

(viii) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे

 - भाईसाब

-------------------------------------

(२) अरुणिमाविषयी उठलेल्या पुढील अफवांबद्दल तुमचं प्रतिक्रिया लिहा : 

(i) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. 

- समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरत तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.

----------------------------------------------------

(ii) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते, म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. 

 - अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

• (१) 'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते,' याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. 

  उत्तर: खरे सांगायचे तर कोणीही शिवाजी महाराज बनू शकत नाही, लोकमान्य टिळक बनू शकत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा बनू शकत नाही. त्यांच्याइतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नाही. कारण त्या महान विभूती होत्या. 

           मग आपण काहीही करायचे नाही काय ? आपण काहीच करू शकत नाही काय ? खरे तर कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी खासियत असते. एखाद्याला नृत्य आवडते. एखादयाला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला त्यांतील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. त्यात कुणाला मुक्त वाव दिला पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. 

-------------------------------------------------------

(२) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. 

उत्तर : आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. जे ध्येय उराशी बाळगलेले असते, त्याला अनुसरूनच आपण वागत असतो. प्रत्येक कृती करताना आपल्याला आपले ध्येय स्पष्टपणे लक्षात असेलच असे नाही. तरीही आपण आपल्या त्या ध्येयानुसारच कृती करीत असतो, हे नक्की. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत-नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

-----------------------------------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

 

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०८, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,७.गवताचे पाते

                        गवताचे पाते गवताचे पाते



हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.

झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. 

पट...पट...पट...

त्यांचा तो पट...पट...असा कर्णकटू आवाज...

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. 

गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले,

‘‘पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड 

स्वप्नांचा चुराडा झाला की!’’

पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून 

मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची 

कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या

तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!’’ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि

धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या

जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. 

थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा

त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती...पट पट असा आवाज 

करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, ‘काय ही हिवाळ्यातली पानं! 

जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज...छी छी छी! माझ्या साऱ्या गोड 

गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!


रूपक कथेचा भावार्थ;

अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्यया

कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची 

चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे; पण झाडावरून गळून 

पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा

आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते.

मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या 

बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून 

घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय?

...आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय

करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते! बाह्य स्वरूप कितीही बदलले, तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत 

असलेली दिसते अाणि पिढीतील अंतर कायम राहते. 

दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून त्याचे सुखदु:ख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची 

प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर यादोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल 

होईल का?


'गवताचे पाते' या रूपक कथेवरील ऑनलाइन चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा





वरील उतारा वाचा आणि दिलेल्या सुचना नुसार कृती करा

कृती-१

आकृत्या पूर्ण करा:

i)पानाची स्वभाव वैशिष्टये:

१) पान उच्च पदाचा खोटा अभिमान वाढते खोटा अभिमान वाढते .

२)गवत पात्याला शूद्र मानते.


ii) गवताच्या पात्या साठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह समूह शब्द समूह 

चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक चिमुकले


(२) नावे लिहा:

 (i) झाडावरून गळून पडणारी -पिकलेली पाने

(ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे -गवतपाते

(ii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा-चिडखोर बिब्बा

 (iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारे-वसंतऋतु

 (v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी-गळणारी पाने


कृती २ : (आकलन कृती) 

(१) रिकाम्या चौकटी भरा : 

(i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना -उच्च पदाचा खोटा अभिमान

(ii) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे- गवतपाते

 (iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी -वडील पिढी

(iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी-तरुण पिढी


रूपक कथेची वैशिष्ट्ये 

रूपककथा आकाराने लहान

आशयसमृद्धी 

सूचकता →

 नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता

 वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.


 गवतपात्याची स्वभाववैशिष्ट्ये 

निवांत झोपता येणे आणि झोपेत सुखस्वप्ने पाहणे हेच सर्वोच्च सुख, गवतपाते मानते.

 सुखस्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते. 

चिडखोर. 

गळणारे पान व गवतपाते यांच्यात एकच जीवनरस आहे, हे वास्तव गवतपाते समजून घेत नाही. 


(३) (i) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.

 (ii) अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,' असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'सुद्धा केला नव्हता. 

iii) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.


कृती ३ : (व्याकरण कृती) 

(१) पुढील शब्दांच्या अर्थछटा व्यक्त करणारे शब्द लिहा : (प्रत्येकी ४) 

उत्तरे

(१) (i) कर्णकटू: कर्कश, भसाडा, कर्णकठोर, बेसूर. 


(ii) कटकट कटकट, पिटपिट, किरकिर, भुणभुण. 

(iii) चिडखोर चिडका, चिडचिडा, चिरचिरा, रागीट. 

(iv) चिमुकला: चिमणा, चिटुकला, सानुला, चिमुरडा. 

(v) क्षुद्र: क्षुल्लक, क.पदार्थ, कस्पटासमान, हीन.


 (२) मोठा आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.

(२) (i) घडामधुडुम (ii) दणदणाट (ii) खणखणाट (iv) घणघणाट


 (३) मंजूळ आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.

(३) (1) रुणझुण (ii) छुमछुम (iii) कुहू कुहू (iv) किलबिल,



 (४) पुढील शब्दांसाठी तुमच्या मते, योग्य अशी प्रत्येकी दोन विशेषणे लिहा:

(i) थंडी : गुलाबी, झोंबरी. (ii) ऊन रणरणते, दाहक. 

(ii) पाऊस : मुसळधार, रिमझिम, 


 (५) पुढील नामांसाठी पाठातील विशेषणे शोधा

(i) फळे: पिकलेली (iii) आंबा गोड (६) १. (i) समाप्ती x शेवट (ii) संगीत (iv) मंत्र:संजीवक


(६) पुढील गटांमधील (ii) संगीत (iv) मंत्र कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? 

१. (i) आरंभ x अखेर , उदय×अस्त

(ii) सुरुवात x सांगता, समाप्ती×शेवट

उत्तर-समाप्ती×शेवट


२. (i) राग x प्रेम , संताप× माया

(iii) कोप x ममता , तिडिक × रोष

उत्तर-तिडिक × रोष


३.(i) असत्य x सत्य 

(ii) लबाडी× प्रामाणिकपणा

(iii) फसवेगिरी x प्रतारणा

(iv) खरेपणा xखोटेपणा 

उत्तर- फसवेगिरी x प्रतारणा


कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

(१) तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाववैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. उत्तर : तरुण पिढीचे नेहमी असेच असते. आत्ता या क्षणी जे दिसते, वाटते, तेच खरे. वर्तमानकाळ हाच खरा. उद्या-परवा कायहोईस ते महत्वाचे नाही. जे जे वाटते ते ते उत्स्फूर्तपणे कराते वडील पिवीलाहे असे वागणे पटत नाही. आणि म्हणून तरुणांना वडील पिडी अडथळाच वाटतो त्यांची कटकट वारे वडील पितीला वाटते की, तरुण पिढी फक्त मोजमजा करण्यात मुखविलासात लोळण्यात पन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ तरुणांना कळलेला नसतो. मात्र, आपण तरुण असताना काय करीत होतो, हे प्रोवांना आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घ्यायचा का तयारी नसते. नेमके हेच आता तरुण असलेल्यांच्या बावतोतही वडील पिडीविरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आईबाबा होतात े ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात, म्हणजे येरे म मागल्या।' असे असूनही कोणीही वास्तव शोधण्याचा प्रयत्न कों नाही. (२) माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असते, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर : माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आमच्या शेजारच्या वासंती काकू त्यांच्या मुलीला सातच्या आत घरात यायला लावतात. "तुम्ही मैत्रिणी कसल्या ग एवढ्या गप्पा मारता हो त्यांचा प्रश्न असतो. माझी आजी सांगते, "ही वासंती संध्याकाळी मैत्रिणी गप्पा मारताना आईने घरी बोलावले की भडकवायची" है दृश्य सगळ्याच घरांत दिसते. आपल्या मुलाने सकाळी लवका उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत करावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत. वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईवाबांना वाटते. पण या आईबावांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी परलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते बारंवा (३) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते? उत्तर : मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते "आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिच्या म्हणातात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण

মिच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वत:च बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता तुम्हाला दूरदरचा परिसर उंचावरून दिसतो भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुमाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हाला वाटते. पण आजोबा. आम्ही आत्ता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उदयाचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला स्वतःच्या प्रकृतीला जपा. (४) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुन्लेखन करा. उत्तर : हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली, पट पट.. पट. त्यांचा तो पट. पट पट असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून घरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा आजोबा, केवड्याने पडला। लागलंबिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे? "छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?" "काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप बेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार? असे का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही।" हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या


चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला पाते संताने कुडकुडत होते ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागलं, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडावर पाने सळसळत होती पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पाहत होती। ते गवताचे पाते लगयगीने उठले स्वत शौच पुटपुटले आज दुसरे आजोबा खाली आता वाटतं. चला बसा पटापट यायला हव एखादया आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित। (५) पुढे दिलेल्या रूपककधेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. (ही रूपककथा पाठयपुस्तक पृष्ठ क्र. २६ वर पाहावो ) (टीप: रूपक कथेचा भावार्थ परीक्षेकरिता समाविष्ट केलेला असल्याने तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा.) उत्तर संपूर्ण जीवनाचे मर्म सांगणारी रूपककथा आहे हो लहान रोपट्याला आपण शेजारच्या वृक्षाप्रमाणे उंच भल्य व्हावे असे वाटत असते लहान असल्यामुळे त्याला भव्यता लाभत नाही दुबळेपणा, क्षुद्रपणा पदरो येतो. मोठेपणाचे सुख लाभत नाही म्हणून रोपटे शेजारच्या उंच वृक्षाकडे स्वतः मोठे होण्याची इच्छा व्यक्त करते. लहान लहान झाडेसुद्धा सुंदर असतात हे वास्तव उंच वृक्ष रोपट्याला समजावून सांगू पाहतो. रोपट्याला ते पटत नाही. उंच वाढणे हे सुद्धा सुंदर असते, ही रोपट्याची समजूत असते वृक्षाला तेवढ्यात कुन्हाड घेऊन येणारा लाकूडतोड्या दिसतो म्हणजे मोठ्या वृक्षाचा मृत्यू चालून येत होता. उंच व मोठा असल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला होता. रोपाला कोणीही हात लावत नाही लहानपणातच सुख असते. मोठेपणात यातना असतात. हे येथे लक्षात येते. तसे पाहिले तर रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र असते मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पेसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणान्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बगला बांघलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून पेतो दारावर पहारेकरी ठेवतो यावा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०७, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,६ वस्तू (कविता)

                               वस्तू                              



वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नाही कदाचित, पण तत्या मन असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड आनंदी होतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान दयावा त्यांना. वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून नंतरच्या काळातही. निष्कासित न होण्याची हमी दया. वस्तूंनाही  स्वच्छ राहण्याची आवड असते, हे हातांना लक्षात ठेवा. वस्तूंना जपावे, लाड करावे त्यापुढे. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा.

कवितेचा भावार्थ :

वस्तू कशा हाताळाव्या व कशा जपाव्यात, हे सांगताना कवी म्हणतात - कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. (वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो.) कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. (वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात.) खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा दयावा, बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान दयावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. (त्यांना तुमच्याबरोबरच राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाहीत.) फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन दया. (त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते.) वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जिवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत. (एखाद्या लहान गोजिरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे.) कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप दयायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. 


प्रश्न. पुढील कवितेच्या सूचनांनुसार कृती करा : 

कृती १ : (आकलन कृती) 


*(१) आकृत्या पूर्ण करा :

 (1) वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये 

१)सेवक असतात

2)स्वच्छता आवडते

3)माणसासारखे लाडावणे


2) वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी-आपला स्नेह

उत्तर-जीव ,मन

(२)(i) नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा -कृतज्ञतापूर्ण निरोपाचा

(ii) शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क -


 (३) (i) वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की वस्तू प्रचंड सुखावतात. 

(ii) आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही, याची वस्तूंना हमी दयावी.


कृती-2

आकृती पूर्ण करा

(१) कवींनी वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप 

वस्तू खावतात, वस्तू सेवक असतात. लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. 


(२) कारणे लिहा

 (i) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत; कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. 

(ii) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.


 (३)योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

 (i) वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते. 

(ii) वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी दया.


कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

(१) वस्तूंनाही असते आवड तुमचा दृष्टिकोन सांगा. स्वच्छ राहण्याची' याबाबत 

उत्तर : द. भा. पामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात. हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूता परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखादया लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांपोंचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे', म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची' या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे. *(२) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली, ते लिहा. नमुना उत्तर : माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली, त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोप्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वया गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी घडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले. ०(३) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल, ते सांगा. उत्तर : आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. स मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्यान मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित मातो विखुरली गेली. मी सोवतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले.तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू! तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विदघार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात- असे समजावून सांगितले तो मला 'सॉरी' म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.


 रसग्रहण 

 प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा : 'वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.' 

उत्तर : आशयसौंदर्य : 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे. 

काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

 भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.


(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २३)

 कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा

कंदील : फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?

विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज विजेरी उरली नाही.

कंदील : असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.

 विजेरी : ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.

 कंदील : हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो! 

विजेरी : तू तर उगाच मिणमिणता. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कसा लखलखतो मी! कंदील : अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो. तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.

विजेरी : तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस! कंदील : माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे. आता तुझी गरज नाही. विजेरी : हो. पण काळ बदलला. कंदील : असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये!




मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०६, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,५.वसंतहृदय चैत्र

             वसंतहृदय चैत्र



             महत्त्वाचे मुद्दे 

या पाठात चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखिकांनी आस्वादक भाषेत सादर केले आहे. फाल्गुन, चैत्र व वैशाख या तीन महिन्यांत वसंताचे अस्तित्व जाणवत असले, तरीही वसंत ऋतूचे मनोहारी दर्शन चैत्रातच घडते. विविध वृक्षांच्या आधारे लेखिकांनी चैत्राचे सौंदर्यमाहात्म्य वर्णिले आहे. १. पिंपळाचे झाड : याला फुटणारी पालवी गहिऱ्या गुलाबी रंगाची असते. सर्व पाने आल्यावर गुलाबी रंग तांबूस गुलाबी बनतो. उन्हात झळाळतो. मधुमालतीच्या वेलीची नवीन पालवी गुलाबी रंगाची असते. पिंपळाला बिलगलेल्या मधुमालतीची पाने आणि पिंपळाची पाने यांच्या एकत्र दर्शनाने गुलाबी व तांबूस गुलाबी या रंगांचे लावण्य नजरेस पडते.
२. घाणेरी : घाणेरीची फुले रंगीबेरंगी असतात. विविध रंगांचा उत्सव झाडावर साजरा होत असतो. गुजरात-राजस्थान यांसारख्या रखरखीत प्रदेशात घाणेरी रंगांचा उत्सव मांडते. ३. माडाचे झाड : बारमहा हिरवे राहणारे आणि बारमहा फळ देणारे झाड. याची फुले बिनवासाची असतात. टणक असतात. पण स्पर्श मात्र सुखावणारा असतो. ४. कडुनिंबाचे झाड : फुलांचे निळसर तुरे येतात. याचा सुगंध सामान्यतः रात्री जाणवतो. ५. करंजाचे झाड : याचा गंध कडवट व उग्र असतो. फूल मात्र अलौकिक असते. करंजीच्या आकाराची पांढऱ्या हिरव्या रंगाची कळी नखाएवढी असते. फुललेल्या फुलात नाजूक, सुंदर, निळीजांभळी कळी असते. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते. ६. आंब्याचे झाड : पौष महिना संपता संपता आंब्याला मोहर येतो. चैत्रात कैऱ्या आकाराला येतात. कैऱ्या जून होऊ लागल्या की पाने झडू लागतात. पण त्याच वेळी नवीन पालवीसुद्धा फुटते. वसंताच्या उत्तर काळात आंबे पिकू लागतात. ७. फणस : सदोदित टवटवीत असणारे झाड. या झाडाच्या अंगभर फळे लटकत असतात. या झाडाला फुले येत नाहीत. हिरवे कोके येतात. त्यातून पुढे फणसाचे फळ आकाराला येते. अशा प्रकारे चैत्र रूपरसगंधांनी भरलेला व भारलेला असतो. याचा सर्व प्राणी-सृष्टीवर आनंददायी प्रभाव पडतो. पक्ष्यांची घरटी याच काळात उभी राहतात. पक्षी अंडी घालतात. पिल्ले जन्माला येतात. सर्वत्र नवनिर्मिती चालू असते. सर्व वातावण मोहक असते. भारून टाकते. हे सर्व कोठून येते? कसे निर्माण होते? याचे रहस्य मानवी बुद्धीला समजून येणे अशक्य असते. निसर्गाच्या मुळापर्यंत जाणे त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आपण फक्त निसर्गाच्या सहवासाचा आनंद घ्यावा.



            वसंतहृदय पाठावरील चाचणी      सोडवण्यासाठी येथे क्लिक करा




उतारा क्र-१
फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात
मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी
सुंदर रीतीने वर्णन केले आहे :
जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी ।।
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन
तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्यतर आहेच; पण फळांचेही रूप
दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.
चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची
झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत
उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून
शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी
नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने
चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले
आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार
हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात
आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे
दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी
बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली
आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि
नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत.
सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या
गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यांत एखादे गुलाबी, शेंदरी व पिवळा, पिवळा आणि
जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या
रंगांचे वर्णन करावे? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत; पण
निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा
वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांत वृक्षवनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला
भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या
अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो; पण गुजरातीत ‘चुनडी’ असे सुंदर व
यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर
काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले.
भडक विशाेभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची
मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी
शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे
मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते

कृती-१

वसंत ऋतुतिल महीने कोणते?
फाल्गुन, चैत्र ,वैशाख

चैत्राला दिलेली दोन नावे कोणती?
१)वसंतात्मा २) मधुमास

१)पिंपळ व मधुमालती यांचे मनोहारी दर्शन
पिंपळाला अर्ध्यापर्यंत वेढून करणाऱ्या मधुमालतीच्या गुलाबी गेंदांनी आणि पिंपळाच्या तांबूस पानांनी वनश्री डवरलेली होती.
२)मधुमालती व पिंपळ यांची हिरवी फळे दाटीवाटीने फांदयांना लगडलेली होती.

घाणेरिची कोणतीही दोन वैशिष्ट्ये
१)उग्र गंध
२)दोन रंगाची फुले


(२)-रिकाम्या चौकटी पूर्ण करा
 (i) वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना-चैत्र
 (ii) गच्च फुलापानांनी डवरलेली व मधुरसाने भरलेल्या फळांनी लगडलेल्या वनश्रीचा महिना -चैत्र
(ii) गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवणारे झाड-पिंपळ
 (iv) गडद गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली वेल चैत्र चैत्र पिंपळ -मधुमालती



 (३) वसंत हा ऋतुचक्रातील पहिला ऋतू. निसर्गातील सर्व जन्मांची, निर्मितीची, सर्जनाची सुरुवात या ऋतू पासून होते. त्यामुळेच सणासुदीला नटूनथटून तयार व्हावे, तसा निसर्ग आनंदोत्सवासाठी सिद्ध होतो. वृक्षवेलींवर नवनवी, कोवळी, टवटवीत पालवी पसरते. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा पानापानांतून वाहत असतात. असंख्य फुले आपल्या अंगाखांद्यावर अनेक रंग लेवून सादर होतात. मधुर फळे झाडाझाडांवर डोलत असतात. मधुर रसाचा सुगंध वातावरणात भरून राहतो. वसंताच्या या उत्सवाची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये हा उत्सव टिपेला पोहोचतो आणि वैशाखात वसंत पायउतार होत असतो. म्हणजे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रात होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.

कृती-2

१)साम्यभेद लिहा
पिंपळ
(i) पिंपळ हे झाड आहे.
(ii) पानांचा रंग गडद गुलाबी व तांबूस गुलाबी असतो.
(iii) लालगुलाबी पानांनी पिंपळ डवरलेला असतो.
 (iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात.

मधुमालती:
(i) मधुमालती ही वेल आहे.
(ii) पानांचा रंग गुलाबी असतो.
(ii) गुलाबी पाने वेलीवर खच्चून भरलेली असतात.
 (iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात.

(२) निसर्गातील भडक रंगांबाबतचे लेखिकांचे मत लिहा.
उत्तर- एरवी भडक व विसंगत वाटणारे रंग निसर्गाच्या दुनियेत विशोभित दिसत नाहीत. ते एकमेकांची शोभा वाढवतात.


(३) लेखिकांच्या मते, भारतीय रंगाभिरुचीचे मूळ कुठे आहे, ते लिहा.
उत्तर- गुजरात-राजस्थानात घाणेरी मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने तेथील लोकांच्या वस्त्रप्रावरणात गडद रंगांचा प्रभाव जाणवतो.


 (४) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडांची नावे लिहा:
(i) गुलाबी गेंद -मधुमालती
(ii) तांबूस रंगाची कोवळी पालवी :पिंपळ
(iii) दुरंगी फुले -घाणेरी


कृती-३(व्याकरण कृती)
संधी सोडवा
 (i) रंगाभिरुची=रंग+अभिरुचि
 (ii) नामाभिधान =नाम+अभिधान
(iii) वसंतात्मा रंग = वसंत + आत्मा

(२) (i) कु - कुकर्म, के वचन
(ii) सु - सुभाषित, सुवास.

 वाक्यात उपयोग करा
 (i) आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याची पताका नाचवतच मानसी घरात शिरली.
(ii) नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्याने कमावलेली संपत्ती सर्वांच्याच डोळ्यात भरत होती.
(iii) गांधीजींचे आवाहन शिरोधार्य मानून दुर्गा भागवत यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली.


कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) • राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या त ने भडक रंगाचे लेखिकांना उमगलेले रहस्य तुमच्या शब्दांत समजावून सांगा. उत्तर : राजपुताना हा प्रदेश म्हणजे रखरखीत वाळवंटच. नजर जाईल तिथपर्यंत हिरवागार, डेरेदार वृक्ष दिसतच नाही. असलीच तर कुठे कुठे खुरटी झुडपे असतात. त्यामुळे या परिसरातील माणसे निसर्गाच्या सुंदर रूपांच्या दर्शनासाठी तहानलेली असतात. अशा स्थितीत या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात ती घाणेरीची झाडे. अनेक गडद रंगांच्या फुलांनी ही झाडे डवरलेली असतात. सुंदर निसर्गरूपांसाठी आसावलेल्या मनांना या रंगांनी आकर्षित केले नसते तरच नवल. म्हणून या परिसरातील माणसांच्या वस्त्रप्रावरणात, विविध प्रकारच्या सुशोभनात भडक रंगाचा आढळ मोठ्या प्रमाणात होतो. खरेतर, निसर्गाच्या सान्निध्यात सतत वावरणाऱ्यांना विविध रंगांची ओढ असतेच. शहरी भागात राहणारी माणसे मुक्त निसर्ग दर्शनाला मुकतात. ती बहुतांशी कृत्रिम वातावरणात राहतात. म्हणून त्यांच्या वस्त्रप्रावरणात, सुशोभनात फिक्या रंगांचा प्रभाव असतो. ही माणसे या फिक्या रंगांच्या निवडीला उच्च अभिरुची समजतात. थोडक्यात, माणसांच्या रंगांविषयीच्या अभिरुचीमध्ये त्यांच्या अवतीभोवतीच्या निसर्गाच्या रूपाचा प्रभाव खूप असतो.


उतारा-2
तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात.
पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा; पण फाल्गुन लागला,
की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे
वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या
वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून
वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत
या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक; पण
झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून
घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार
नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. आत तशाच
रंगांच्या केसरांची दाटी. तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज
राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखाएवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते!
शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम
वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक
असते. अगदी नखाएवढी कळी; करंजीच्याच आकाराची, पांढरी, हिरवी; पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत
एक निळी-जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणूकाही टोपडे घातलेला
बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो.

कृती-१
प्रश्न. पुढील उतारा सूचनांनुसार कृती करा : वाचा कृती १ : (आकलन कृती) * (१) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा :
(i) निळसर फुलांचे तुरे -कडुनिंबाचे झाड
(ii) कडवट उग्र वास-करंजाचे झाड
 (iii) तीन पाकळ्यांचे फूल- माडाचे झाड

योग्य जोड्या जुळवा
(i) भुरभुरणारे जावळ - माडाच्या लोंब्या (ii) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी - करंजाची कळी

कृती-2
नावे लिहा
 (i) बारमहा फळे धरणारे झाड  : माड (ii) रात्रीच्या वेळी मनोरम सुगंध देणारे झाड : कडुनिंब

(२) पुढे काही झाडांची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यांतील चुका दुरुस्त करून योग्य वैशिष्ट्ये लिहा :
 (i) कडुनिंबाचे झाड : निळसर फुलांचे तुरे. कडवट उग्र वास. पांढरी-हिरवी कळी करंजीच्या आकाराची.
(ii) करंजाचे झाड : माथ्यावर फिक्या रंगाचे जावळ भुरभुरत असते. फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळा-जांभळा असतो. तिच्या डोक्यावर वर्तुळाकार लाल टोपी असते.
(ii) माडाचे झाड : बारमहा हिरवेगार असते. वसंतऋतूत फळे धरतात. नारळाची फुले सुगंधी व मुलायम असतात. ही फुले कधी तीन पाकळ्यांची सुद्धा असतात.

ऊत्तर- (i) कडुनिंबाचे झाड : निळसर फुलांचे तुरे त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी मनाला खूप सुखावणारा असतो.
(ii) करंजाचे झाड : फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळाजांभळा असतो. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते.
(iii) माडाचे झाड : बारमहा हिरवेगार असते. बारमहा फळे धरतात. नारळाच्या फुलांना गंध नसतो. ती टणक असतात. या फुलांना तीन पाकळ्या असतात.

कृती-३ (व्यकरण कृती)
१)चतुर+य=चातुर्य असे आणखी दोन शब्द लिहा.
(१) सुंदर + य = सौंदर्य
(२)समान+य=सामान्य

पिवळा+सर=पिवळसर असे आणखी दोन शब्द लिहा.
(१ )काळा + सर = काळसर
(२)लाल+सर= लालसर


कृती-४ स्वमत (अभिव्यक्ति)

कती ४ । (१ / अभिन्यती) (१) तुम्ही अनुभवलेला 'चेन्र' तुमच्या शब्दात वर्णन करा. जाता । वेगवेगळे वात आणि त्यामची वेगवेगळी रूपे, त्यांचे विग शहरात कपी दिसत नाहीत, शहरातील वातावरण तसे निरंगी, फिकत व अनुभवायचा असेल, तर गावीच गेले पाहिजे. आम्ही अनेकदा सहलीला गेलो आहोत, पण गावी गेल्यावर निसर्गाचा जो सहवास लागतो, त्याचा आनंद अवर्णनीय असतो. सुदैवाने माझे काका आमच्या गावी राहतात. यामुळे वसंत ऋतूत गावी जाण्याचे भाय आ्हाला लाभते, तिथे गेल्यावर मन मोहित होऊन जाते. जे कपीही जाणवलेले नसते, ते सौंदर्य तिथे दिसते. कोणीही समजावून न सांगता दिसते. आता हे चापयाचे झाड पाहा. खास्तविक, त्या झाडाच्या रूपात आकर्षक म्हणावा असा एकही घटक नाही. पण तोच पांढरा चाफा फुलांनी डवरल्यावर पाहा, मन लोभावतेच, आपण नकळत वाकून जमिनीवर पडलेले फूल चालतो. पाकळ्यांवर हात फिरवतो. आतडोकावून पाहतो चिमूटभर हळद पूड अलगद सोडलेली असावी, तसा पिवळा रंग तिथे शोभून दिसतो गडद पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांनी डवरलेली सारंगी तर पाहतच राहावी सूर्याचा प्रकाश पड़ताच, ती फुले पूर्ण उमलतात. सारे रान सुगंधाने भरून जाते जिकडे पाहावे तिकडे कोवळी कोवळी हिरव्या रंगांची पाने आणि शेकडो रंगछटा लेवून बसलेली फुले! निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो हे मला आमच्या गावी कोकणात पाहायला मिळते. मी तर ठरवलेच आहे. मोठा झालो की कोकणातच कायम राहायचे.

 (२) वसंतत्रतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा. उत्तर : आम्ही एकदा आमच्या गावी गेलों होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको. फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. त्याने आम्हांला थांबले. स्वत: झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ- मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.


उतारा -३
चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या-फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषाअखेरीपासूनच
मोहोरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत
असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की
नाहीत ते पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज
दिसते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर
चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत
असतात; पण झाड रूक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला
पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात.
माघातले मोहोरांच्या झुबक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर
की आताचे,हे सांगणे कठीण आहे.

कृती-१

 प्रश्न. पुढील सूचनांनुसार कृती करा : कृती १ : (आकलन कृती)
 (१) रिकाम्या चौकटी भरा :
(i) आंब्याला मोहोर येण्याचा सुरुवातीचा काळ-पौषअखेर
 (ii) फणसाला कोके येतात ते महिने-पौष व माघ
 (iii) आंब्याचे झाड मोहोरांच्या झुबक्याने भरून जाते तो महिना - काळाकबरा
(iv) पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड -फणस

(२) जोड्या लावा
(i)फुलाऐवजी कोके येतात ते झाड- फणस
(ii) कोकिळाचे कूजन चालते ते झाड-आंबा
 (iii) चैत्राची रूपरसगंधमय शोभा पूर्णत्वाला नेणारी-पक्ष्यांची घरटी
 (iv) पक्ष्यांच्या घरट्यांचा रंग -काळाकबरा
(v) लांबलचक देठ -कैऱ्याचे गोळे

कृती २ : (आकलन कृती) *(१) पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
 (i) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
(१) (i) चित्रलिपी ही खूप बारीक बारीक कलाकुसर असलेले सुंदर चित्र वाटते. मात्र, ही लिपी थोडीशी कळते, पण खूपशी कळतच नाही. अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग थोडासा कळतो आणि न कळलेला भाग विराट असतो. विविध सुंदर आकारातील पक्ष्यांची घरटी निसर्गाच्या या चित्रलिपीचा भाग बनतात. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो. म्हणून लेखिकांना ही घरटी निसर्गाच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे वाटतात.


 (ii) माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.
(ii) निसर्गाचे विराट रूप आपल्या चिमुकल्या मनात मावतच नाही. तरीही ते विराट रूप न्याहाळण्याची मनाची ओढ नष्ट होत नाही. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यातला आपणही एक घटक असतोच. म्हणून एखादे लोभसवाणे दृश्य, ते चिमुकले असले तरी, मनाला खिळवून ठेवते. त्या चिमुकल्या रूपातही विराट निसर्गाचे, अल्पस्वरूप का होईना, दर्शन घडते. हे अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो. तो अफाट निसर्गाच्या दर्शनाचा आनंद देऊन जातो.


(२) चूक की बरोबर ते लिहा :
(i) चैत्रात फणस फुलांनी डवरतो. -चूक
(ii) फणसाला चैत्रात नव्या पालवीचे घोसच्या घोस येतात. -चूक
(iii) निसर्गाचा विराट आविष्कार डोळ्यात न मावणारा असतो.-बरोबर
(iv) चिमुकल्या निसर्गदृश्यात निसर्गाच्या विराट आविष्काराचे दर्शन घडते.- बरोबर

कृती-३
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
(१) 'निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास मानवी बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते', या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत असल्यास त्याचे स्पष्टीकरण करा.
उत्तर : या विराट निसर्गापुढे माणूस टिंबाएवढासुद्धा नाही.आपली सूर्यमालिका, तिच्याभोवती फिरणारे पहा सगळी अंतरे आपल्याला ठाऊक आहेत. आपल्या सूर्या पिकाचे दया पन्ना लाख पटींनी मोठ्या आकाराचे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आपल्या आकाशगंगेत असे लहानमोठे अब्जावधी सारे आहेत आणि अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. आपल्यापासून सर्वात जवळची आकाशगंगा आणि तिच्यातील सर्वात जवळचा तारा आपल्यापासून पाचशे कोटी प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ही गोष्ट झाली सर्वात जवळच्या आकाशगंगेची. त्याहीपुढे अब्जावधी आकाशगंगा आहेत. किंबहुना किती आकाशगंगा त्यापुढे आहेत, हे सांगता येणे अशक्य आहे. कारण हे विश्व अमर्याद आहे. त्याला अंत नाही. म्हणून माणूस कधीही हे संपूर्ण विश्व ओलांडू शकणार नाही. संपूर्ण विश्व पाहिलेच नाही, तर त्याचे स्वरूप कळणार कसे? म्हणजे हे विश्व माणसाच्या आवाक्यात कदापिही येणार नाही. माणसाला माहीत झालेल्या विश्वाच्या पलीकडे अनंतापर्यंत हे विश्व पसरले आहे. माणूस स्वतः निसर्गापुढे क्षुद्र आहेच, पण त्याला ज्ञात झालेले विश्व सुद्धा या अनंत पसरलेल्या विश्वापुढे क्षुद्रच आहे. म्हणूनच निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास माणसाच्या बुद्धी चिमुकले विश्व असमर्थ असते, हे मला मनोमन पटते.

(२) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर : चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी ड वरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतु ऐन भरात आला असता वसंत ऋतूचे उत्फुल्ल दर्शन चैत्रामध्ये घडते त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडणे टाकली हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात, पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिन्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाची किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषण चित्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

 (३) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून उत्तर : चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्य न्हाऊन निघते. अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात.
सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी घरातील रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपी वाटते. राज्यनिर्मितीचे रहस्य शोधत बसण्यापेक्षा या चित्रलिपी चे वाचन करण्यातच लेखिकांचे मन रममाण होताना दिसते. आपण वाचन करताना विरामचिन्हांच्या जागी क्षणभर थबकतो. तसेच इथे प्रत्येक घरटे पाहताना विस्मयचकित होतो. निसर्गाचा चमत्कार पाहून अचंबित होतो. निसर्गाच्या इतक्या विलक्षण निर्मितीचे दर्शनघडल्यामुळे आपण आनंदाने मोहरून जातो. आपली नजर पुढे जातच नाही, मन तिथेच काही क्षण रेंगाळत राहते. लेखिकांना ही घरटी म्हणजे विरामचिन्हे वाटतात. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. ही घरटी निसर्गाचे रहस्य कळण्याचा आनंद देतात. अशी ही घरटी आपल्याला गुंगवून ठेवतात. आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेतात, म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०५, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,४.उत्तमलक्षण

              उत्तमलक्षण


श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।






कवितेचा भावार्थ:
उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात - श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. । १ ।।
पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. । २ ।। लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।। जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥। काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥ सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥६॥ कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥ स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ॥८।। सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ॥ ९ ॥ अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।

स्वाध्याय:

श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।

(१) (i) आकृत्या पूर्ण करा : |संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
(१) अपकीर्ती सांडावी.
(२) सत्कीर्ती वाढवावी.
(३) सत्याची वाट दृढ धरावी.


ii) कधीही करू नयेत अशा गोष्टी
i)पुण्यमार्ग सोडू नये.
ii)पैज किंवा होड लावू नये.
iii)कुणावरही आपले वोझे लादू नये. iv)असत्याचा अभिमान बाळगू नये.


(२) चौकटी पूर्ण करा :
 (i) संत रामदास सावधान होण्यास सांगतात ते
(ii) संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात
(iii) अंगी बाणावी अशी
(iv) प्रस्तुत ओव्या या ग्रंथामधून घेतल्या आहेत.

२)
i)संत रामदास सावधान होण्यास सांगतात ते -श्रोते
(ii) संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात -उत्तम गुण
(iii) अंगी बाणावी अशी-सर्वज्ञपणाची खूण
 (iv) प्रस्तुत ओव्या या ग्रंथामधून घेतल्या आहेत-श्रीदासबोध

 कृती २ : (आकलन कृती) (१) शब्दजाल पूर्ण करा : (6)
(i) जाऊ खाऊ घेऊ नये
१)वाट विचारल्याशिवाय जाऊ नये.
२)फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. ३)पडलेली वस्तू घेऊ नये.


 (१) (iii) सभेमध्ये हे करू नये.
-१)लाजू नये
-(२) बाष्कळपणे बोलू नये

२)पुढील व्यक्तीशी  कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
तोंडाळ(i) तोंडाळासी भांडू नये
संत-सत्संग खंडू नये


(३) पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी, ते लिहा : गोष्टी
(i) आळस -आळसात सुख मानू नये.
(ii) परपीडा-परपीडा करू नये.
 (iii) सत्यमार्ग -सत्यमार्ग सोडू नये.



 (४)असत्य विधान ओळखा :
 (i) संतसंग सोडू नये.
(ii) अपकार घेऊ नये.
(iii) व्यापकपण सांडू नये.
(iv) खोटेपणाच्या पंथाला जाऊ नये.
उत्तर- असत्य विधान-अपकार घेऊ नये.

(५)तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा
 नमुना उत्तर :
गुण :
(i) मी रोज व्यायाम करतो. (ii) मी खोटे बोलत नाही. (iii) मी आईला कामात मदत करतो.
दोष:
i)मला चटकन राग येतो
ii) मी ताटात अन्न टाकतो.
iii)माझे अक्षर चांगले नाही.


कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'सभेमध्ये लाजों नये। बाप्कळपणे योलों नये" ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर : 'उत्तम लक्षण' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत, त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात - सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी वालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळ पणे बोलू नये उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

 (२) अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची। या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
 उत्तर : संत रामदासांनी 'उत्तमलक्षण' या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे. संत रामदास म्हणतात - लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरले सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे. •


(३) आळसे सुख मानूं नये, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
 उत्तर : उत्तमलक्षण या ओव्यामप्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळम हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे. आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नासतो! या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे पड्विकार जातात. त्यात आळस' हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्यअंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

 पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :
'जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये। पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥
 उत्तर : आशयसौंदर्य : 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे. काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये. भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. 'तोडू नये, जोडू नये, सोडू नये' अशा सोप्या यमक यांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०३, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,३.आजी कुटुंबाचं आगळ

          आजी कुटुंबाचं आगळ







माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राह्यचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गांेदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवाकाका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न्चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न्ग्लास घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणनू सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचाकुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिलाती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न्आमची आई जेवायला वाढा यचीकिंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसताबसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असाे की धान्यनिवडायचं असो, सगळ्या िमळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पाव्हायच्या. सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. 


वरील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा

कृती एक
१)विधाने पूर्ण करा
(१) (i) स्वत:च्या कपाळावरचे गोंदण दिसू नये, म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे.
(ii) वर्ष-दीड वर्षाने जन्मणाऱ्या वासरांमध्ये एकाआड एक खोंड नक्की असे, म्हणून दावणीला कायम कपिलीचे बैल असत.
(i) सुनांनी चहा करून पिऊ नये, म्हणून ढाळजेतून सोप्या येऊन आजी सक्त पहारा करायची.

पुढील मुद्द्याच्या आधारे आजीचे चित्र रेखाटा:
(२) (i) आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
(ii) आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.
(iii) आजीचे सौंदर्य : आजीचे वय आता सत्तर वर्षांचे होते. उन्हापावसामुळे आजीची त्वचा रापली होती. पण तिचा मूळ गोरा वर्ण लपत नव्हता. तिचे दात मोत्यांसारखे चमकत होते. विशाल कान व धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा आला नव्हता.

(iv) आजीचे राहणीमान त्या काळात इकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.


(३) चूक की बरोबर सांगा :
(i) राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची.
(ii) आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते.
(iii) सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची.
(३) (i) बरोबर (ii) बरोबर (iii) चूक.


कृती २:
विधाने पूर्ण करा
(१) (i) मुलांनी भरपूर खावे-प्यावे व त्यांची आबाळ होऊ नये, म्हणून आजी त्यांना धपाटे घालून घालून खायला घाली.
(ii) प्रत्येक सुनेला प्रत्येक काम आलेच पाहिजे असा आजीचा आग्रह होता, म्हणून ती रोटेशनप्रमाणे काम बदलत जाई.
(iii) मुलांना दूध प्यायला देण्याबाबत सुना आपपरभाव करतील अशी भीती आजीला वाटे, म्हणून ती मुलांना गोठ्यातच दूध प्यायला लावी.

(२) पुढीलपैकी चुकीची वाक्ये दुरुस्त करून बरोबर वाक्ये व दुरुस्त केलेली वाक्ये पुन्हा लिहा :
(i) दुपारची कामे आटोपून आजी ढाळजेत यायची.
(ii) गाईने पान्हा सोडला की वासराला सोडायचे.
(ii) आजीच्या घरी एक गावरान गाय होती.
उत्तर-
(२) (i) दुपारच्या कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची.
(ii) गाईने पान्हा सोडला की वासराला धरून ठेवायचे.
(iii) आजीच्या घरी एक गावरान गाय होती.


कृती ३ : (स्वमत / अभिव्यक्ती)

*(१) आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं, या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा
उत्तर : आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपार पर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी दाळजेत यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्र सारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

(२) तुलना करा/साम्य लिहा
आगळ : वाड्याचे संरक्षक कवच आजी : कुटुंबाचे संरक्षक कवच
उत्तर : हा उतारा वाचत असताना प्रश्न पडतो की, आजीला आगळेची उपमा दयावी की आगळेला आजीची उपमा दयावी. मुळात आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा दार उघडताना ती भिंतीत आरपार ढकलावी लागे आणि दार बंद करताना, भिंतीत ढकललेली आगळ घडीला घरून ओढावी लागे हे खूप ताकदीचे व अवघड काम होते. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते प्रस्तुत उताऱ्यातील आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबातील सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते .

(३) आगळ लावण्याची/टाकण्याची पद्धत समजावून सांगा.
उत्तर : आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता. त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कड़ी बसले होते. त्या कडीला करून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते. दरवाज्याच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिं्तींत दोन कोनाडे केलेले असतात. त्यांपैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जाईल इतका खोल असतो. कहीला धरून आगळ कोनाड्यात पूर्ण ढकलली की दरवाजा उघडता येतो. दरवाजे बंद करते वेळी, कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरुन ओतून बाहेर काढली जाते आणि ते टोक दुसऱ्या भिंतीच्या कोन्यात अडकवले जाते. अशा तऱ्हेने आगळ बसवली की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही.

(४) दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पक कृती सांगा.
उत्तर : कधी कधी बैठ्या खेळांऐवजी मुले वेगवेगळ्या कल्पक कृती करीत असत. एखाद्या वेळी सरपणातली लाकडे काढून विटीदांडू किंवा भोवरे तयार करीत बसत. भिंगऱ्या तयार करण्यासाठी घेतलेला लाकडाचा तुकडा दगडावर घासून घासून त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करीत. हे मोठे कष्टाचे काम असे. चुलीची काजळी लागून लागून काळ्या कुळकुळीत बनलेल्या खापऱ्या पाटीवर घासून घासून पाठीला काळा कुळकुळीत रंग आणण्याचा प्रयत्न करीत बसत. बैलगाड्या बनवण्यासाठी ज्वारीची ताटे वापरीत. लाल माती आणून बैल बनवत बसत. गोल आकाराचे गोटे जमवून ते सर्व बाजूंनी दगडावर घासून घासून त्याने छान गोल आकार दयायचा प्रयत्न करीत बसत. अशा अनेक कल्पक कृती करण्यात मुले दंग होत.

(५) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर : या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तीवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.
या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचा अर्थ कुटुंबातील सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

(६) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर : ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.





गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

ऑक्टोबर ०१, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,2.बोलतो मराठी



परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको : ‘‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’’
नवरा : ‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून 
आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात 
रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ 
जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा
माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती 
वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, 
शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार 
देणे’ हा अर्थयात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ‘खस्ता खाणे’ मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, 
हे माहीत आहे ना? तसेच ‘कंठस्नान घालणे’ हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे 
गळ्याखालून ‘अंघोळ घालणे’, असा शब्दश: अर्थ नाही. ‘खांद्याला खांदा लावणे’ (सहकार्य करणे) आणि ‘खांदा देणे’ 
(प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. 
अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. ‘अक्कलवान’ म्हणजे हुशार; पण 
‘अकलेचा कांदा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच 
आपल्याला कळणार नाही.
क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा
गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे 
(सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा
अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना
धन्यवाद’ असे म्हणायला हवे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे 
इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक 
भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर 
भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन 
अर्थ कळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का?

कृती-१
भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय 
i)योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे
(ii) क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे 

उताऱ्यात निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार
i) शब्दाचा मूळ अर्थ (वाच्यार्थ)
ii) मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ (लक्ष्यार्थ) 

iii)भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग i)क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे .
ii) मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न वापरणे 
iii)शब्दकोश वापरणे

(२) विनोद करणाऱ्या नवऱ्याने पुढील वाक्याचा लावलेला अर्थ लिहा : तुम्हांला मी उत्तप्पा बनवू का? 
उत्तर-मी तुमचे उत्तप्यामध्ये रूपांतर करू का?


(३) कधी कधी वाक्यातून विपरीत अर्थ व्यक्त होतो, त्यामागील कारण लिहा.
उत्तर- मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला सारुन त्या शब्दाला असलेला परभाषेतला अर्थ घेऊन वाक्य तयार केली जातात, त्यामुळे विपरीत अर्थ व्यक्त होतो. 


कृती-2
कृती २ : (आकलन कृती) 
(१) उताऱ्याच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा : 
(i) हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -बनवणे
 (ii) मराठी भाषेची श्रीमंती-मराठी ढगांचे शब्दप्रयोग
 (iii) मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -मारणे
(iv) मराठी भाषेची खास शैली-वाक्यप्रचार
 (v) एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम- अर्थाचा अनर्थ


 (२) हल्ली आढळून येणाऱ्या आपल्या लोकांच्या दोन चुकीच्या भाषिक सवयी सांगा.
उत्तर- (i) वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे शब्द वापरात असताना, त्या कृतींसाठी केवळ एकच शब्द योजला जातो. (ii) गरज नसताना अन्य भाषांतील शब्दांचा वापर केला जातो.

 कृती-३ (व्याकरण कृती)
 (१) वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे तुम्हांला माहीत असलेले क्रियापद सोदाहरण लिहा. (फक्त ४ अर्थछटा)
उत्तर-  (i) महापालिकेने एकाच दिवसात तीनशे बेकायदेशीर बांधकामे पाडली.
 (ii) छपरावर वाळत घातलेले पापड कावळ्यांनी खाली पाडले. 
(iii) चक्कीवरून दळण आणताना गोपू पीठ पाडत पाडतच घरी आला
 (iv) विरोधी पक्षाच्या उमेदवाराने मंत्र्याला प्रचंड बहुमताने पाडले.

 (२) 'वाटणे' हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या अर्थांची दोन वाक्ये तयार करा.
उत्तर- (i) मी केलेल्या त्या चुकीची मला लाज वाटली. (वाटणे : भावना जाणवणे) (ii) पास झाल्याबद्दल रश्मीने पेढे वाटले. (वाटणे : देण्याची कृती)


 कृती-४ (स्वमत / अभिव्यक्ती)
 (१) भाषा सतत बदलत असते, याची कारणमीमांसा द्या. 
उत्तर : एखाद्या परिसरात, एकमेकांमध्ये सहज मिसळता येईल अशा अंतरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते. तशी ती स्थिर असतेसुद्धा. मात्र, प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणाच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. जसजसा लोकांचा विकास होतो, तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते. आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ नांदतात. एकमेकांत मिसळतात. या वेगवेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतो. प्रत्येक भाषा अशी बदलत राहते. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. तीत सातत्याने बदल होत राहतो. काळ बदलतो, तशी लोकांची जगण्याची रीत बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात. जुने शब्द लोप पावतात. नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषांमधील शब्द-संकल्पना स्थानिक भाषेत सामावले जातात. स्थानिक भाषेतील शब्द-संकल्पना अन्य भाषांमध्ये शिरतात. अशा प्रकारे प्रत्येक भाषा प्रत्येक क्षणी बदलत असते. 

(२) 'स्वत:च्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय', हे विधान समजावून सांगा.
 उत्तर : माणसाला एकमेकांशी पाण्याचा महत्त्वाचा धागा म्हणजे भाषा होय. माणूस दुसऱ्याशी बोलतो म्हणजे तो दुसऱ्याजवळ आपले मन प्रकट करीत असतो. प्रत्येक भाषा म्हणजे ती बोलणाऱ्याच्या मनाचा आरसा असते. म्हणूनच कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्यांचे जीवन, त्यांची संस्कृती होय. एखादया भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचा सन्मान करणे असते. स्वत:च्या भाषेचा सन्मान आपण कसा करणार? सर्वांत प्रथम म्हणजे मी माझी स्वत:ची भाषा उत्तम रितीने आत्मसात करीन माझे सर्व विचार, भावना माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. माझ्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेत राहीन. भाषा चांगल्या रितीने आत्मसात करण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्ती कोश यांसारख्या कोशांचा वेळोवेळी मनापासून उपयोग करीन. यामुळे माझे माझ्या भाषेवरील प्रभुत्व वाढेल. अशा प्रकारे स्वत:च्या भाषेवरील प्रभुत्व वाढवणे म्हणजे त्या भाषेचा सन्मान करणे होय.