Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
मराठी व्याकरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी व्याकरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ मे, २०२२

रविवार, ३ एप्रिल, २०२२

एप्रिल ०३, २०२२

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ-2



उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे - श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारही येतातच .



उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे- येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे .



ऊसाच्या पोटी कापुस -
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.



ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये .
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.


एका माळेचे मणी -
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे .



एका हाताने टाळी वाजत नाही- दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .



एक ना घड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.


ऐकावे जनाचे करावे मनाचे.
लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे .



एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी-
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.



एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये -
दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.



एका पिसाने मोर (होत नाही) थोड्याशा यशाने हुरळून जाणे.



एका खांबावर द्वारका
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.


एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.



एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.


एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत .
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.



ऐंशी तेथे पंचायशी
अतिशय उधळेपणाची कृती.



ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार
मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात.



ओळखीचा चोर जिवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.



ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो /शेंडी तुटो की तारंबी तुटो कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.



ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे? - सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे.



औट घटकेचे 
अल्पकाळ टिकणारी गोष्ट.



करावे तसे भरावे
जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.



कर नाही त्याला डर कशाला ? - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे?



करीन ते पूर्व - मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.



करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते.
काही गोष्टी केल्यातरी नुकसान होते नाही केल्यातरी नुकसान होते.



करून करून भागला, देवध्यानी लागला
भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.



कणगीत दाणा तर भील उताणा गरजेपुरते जवळ असले, की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.



कधी तुपाशी तर कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही.



कशात काय नि फाटक्यात पाय- वाईटात आणखी वाईट घडणे.



काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही.



काडीचोर तो माडीचोर.
एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.



काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती
क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो.



का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ -
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.



कानात बुगडी, गावात फुगडी
आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.



काल मेला आणि आज पितर झाला- अतिशय उतावळे पणाची वृत्ती.



काकडीची चोरी फाशीची शिक्षा अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.



काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.



कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते पूर्वग्रह दुषीत दृष्टी असणे.



काशीत मल्हारी महात्म्य -नको तेथे नको ती गोष्ट करणे.



  कानामागून आली अन् तिखट झाली - श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.



कामापुरता मामा
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.



कावळा बसला अन् फांदी तुटली परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.



काखेत कळसा गावाला वळसा - जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.



काप गेले नि भोके राहिली वैभव गेले अन् फक्त त्याच्या खुणा राहिल्या.



कावळ्याच्या शापाने गाय मरत नहीं. क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.



काळ आला; पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.



कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मुर्खपणा करणे,



कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.



कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे
मूळचा स्वभाव बदलत नाही.



कुडी तशी फोडी देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.



कुह्राडीचा दांडा गोतास काळ - स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.



केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.



केस उपटल्याने का मढे हलके होते ? - जेथे मोठ्या उपयांची गरज असते तेथे छोट्या उपयांनी काही होत नाही.



केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले.
एखाद्या गोष्टीचा लाभ घेतांना गंमत वाटते, मात्र पैसे देतांना जीव मेटाकुटीस येतो.



कोळसा उगाळावा तितका काळाच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.



कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूष होतात.



कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी.
चूक एका शिक्षा दुसऱ्यालाच.



कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी. महान गोष्टींबरोबर क्षुद्राची तुलना करणे.



खऱ्याला मरण नाही
खरे कधीच लपत नाही.



खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते-
खर्च करणाऱ्याचा खर्च होतो, तो त्याला मान्यही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.



खाऊ जाणे तो पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.



खाण तशी माती आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.



खायला काळ भईला भार
निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.



खाई त्याला खवखवे
जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.



खाऊन माजावे टाकून माजू नये पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.



खोटघाच्या कपाळी गोटा
खोटेपणा, वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.



गरज सरो, वैद्य मरो
एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.



गळ्यात पडले झोंड हसून केले गोड गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. 



गची बाधा झाली गर्व चढणे.



गरजेल तो पडेल काय
केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही.



गरजवंताला अक्कल नसते.
गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.



गर्वाचे घर खाली-
गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.



गळ्यातले तुटले ओटीत पडले नुकसान होता होता टळणे.



गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो



गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.



गाढवाला गुळाची चव काय ?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.



गावंढ्या गावात गाढवीण सवाशीण जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते.



गाढवाच्या पाठीवर गोणी
एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही; तर तिचा फायदा घेता यायला हवा.



गाढवाने शेत खाल्ले, ना पाप, ना पुण्य अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते.



गाव करी ते राव ना करी
श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.


गुरुवार, ३१ मार्च, २०२२

मार्च ३१, २०२२

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ-1



असतील शिते तर जमतील भूते-
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला, की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.


असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ -दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो. 


अडला हरी गाढवाचे पाय घरी-
एखाद्या बुद्धिमान माणसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. 


अति शहाणा त्याचा बैल रिकामा-
जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे मुळीच काम होत नाही.


  अति तिथे माती-
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. 


अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे- दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे. 


अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज- गरजवंताला अक्कल नसते.


अंगावरचे लेणे, जन्मभर देणे-
दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.


अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण- मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःख दायक असतात. 


अंधारात केले पण उजेडात आले -

कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.


अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे- नावमोठे लक्षण खोटे


अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तिर्था- अशक्य कोटीतील गोष्ट .


अति झाले अन् आसू आले-
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. 


अति परिचयात अवाज्ञा -

जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. 


अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे- कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच


अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास-

 अन्न न खाणे पण त्यात मन असणे.


अपापाचा माल गपापा-
लोकांचा तळतळाट करुन मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. 


अर्थी दान महापुण्य

गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. 

आईची माया अन् पोर जाईल वाया

फार लाड केले तर मुले बिघडतात.


आधी पोटोबा मग विठोबा -प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे.

 
आपलेच दात आपलेच ओठ-
आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.


आयत्या बिळावर नागोबा-
एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. 


आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.


आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
-

 ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. 


आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- 

मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. 


आंधळं दळतं कुत्र पीठ खातं-

एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. 


आंधळ्या बहिऱ्यांची गाठ - एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे. 


अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी ? -

चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे.


अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.

आपला हाथ जगन्नाथ -

आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते.


असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा

अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. 


अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का? - कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.

 
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप -अतिशय उतावळेपणाची कृती.


अति खाणे मसणात जाणे -
अति खाणे नुकसान कराक असते.


अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी- मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. 


अवचित पडे, नि दंडवत घडे - स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.


अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे - एकमेकींच्या अगदी विरूद्ध बाजू.


अंथरूण पाहून पाय पसरावे -
आपली ऐपत, बकूब पाहून वागावे.
अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टीपेक्षा तिच्या आनुषांगिक गोष्टींचा बडेजाव.


आपली पाठ आपणास दिसत नाही. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.


आजा मेला नातू झाला
एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट.


आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा घडणे, विचार करणे.



आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.


आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाणपण नसते.


आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.


आधीच मर्कट तशातही मद्य प्याला आधीच करामती व त्यात मद्य प्राशण केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.


अडक्याची अंबा, आणि गोंधळाला रुपये बारा -मुख्य गोष्टी पेक्षा अनुषांगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे .


आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी- रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.


आयजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.


आग खाईल तो कोळसे ओकेल
जशी करणी तसे फळ


आठ पूरभय्ये नऊ चौबे
खुप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धीमान पुरेसे


आधणातले रडतात व सुपातले हसतात
संकटतात असतांनाही दुसऱ्याचे दुःख पाहूण हसू


इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.


इच्छी परा ते येई घरा आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतीतो तेच आपल्या वाट्याला येणे येते.


इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते-
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.


इन मिन साडे तीन
एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.


ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. निर्माण होते.


आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे - स्वत च्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न् ठेवण्याची वृत्ती असणे.


इन मिन साडे तीन
एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.


ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो
जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.


उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार ज्ञान कमी दिखावा जास्त.


उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.


उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. - उथळ पाण्याला खळखळाट फार ज्ञान कमी दिखावा जास्त.


उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.


उठता लाथ बसता बुक्की
प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उडत्या पाखराची पिसे मोजणे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.


उतावळी बावरी (नवरी) म्हाताऱ्याची नवरी
अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.


उद्योगाचे घरी रिद्धि सिद्धी पाणी भरी जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.


उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले
फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे.


उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे 

अतिशय हालाखिची स्थिती.


उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम.


उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास चांगले पीक येते. 


उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला ?
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.


उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती ? - जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.


उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.


उधारीची पोते, सव्वा हात रीते- उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.


शनिवार, १२ जून, २०२१

गुरुवार, १० जून, २०२१