Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
दहावी इतिहास व राज्यशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दहावी इतिहास व राज्यशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ७ जानेवारी, २०२४

जानेवारी ०७, २०२४

dahavi- itihas ९ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

                   ९ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन



पुढील संकल्पना स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
(१) अभिलेखागार.

उत्तर : (१) प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे 'अभिलेखागार' होय. (२) जे दस्तऐवज संग्रहालये वा ग्रंथालये यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारांमध्ये केले जाते. (३) हे दस्तऐवज शासनाला, संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिक- दृष्ट्या ग्रंथालये आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते. (४) अभिलेखागारांतील कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात.

--------------------------------------------------------------------------

(२) कोश.
 उत्तर : (१) शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय. (२) कोशवाङ्मयात ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केलेली असते. (३) शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे 'कोश' होय. (४) अचूकपणा, वस्तुनिष्ठता व अद्ययावतता हे कोशवाङ्मयाचे गुणविशेष आहेत. (५) उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे, हे कोशवाङ्मयाचे उद्दिष्ट असते. कोशात सत्याला व वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाजजीवनाचा आरसा असतात.
--------------------------------------------------------------------------

(३) शब्दकोश.
 उत्तर : (१) शब्दांच्या अर्थाच्या कोशाला 'शब्दकोश' असे म्हणतात. (२) वाचकांना शब्दांचा अर्थ सहजपणे समजावा व त्यांच्या शब्दांचा संग्रह वाढावा, या उद्देशाने शब्दकोशांची निर्मिती केली जाते.. (३) शब्दकोशात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती या बाबी दिलेल्या असतात. (४) शब्दकोश हे एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी अशा तिन्ही प्रकारचे असतात. (५) सर्वसंग्राहक शब्दकोश, परिभाषाकोश, विशिष्ट शब्दकोश, व्युत्पत्तिकोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी वाकप्रचार संग्रह कोश असे शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार आहेत.
--------------------------------------------------------------------------

(४) विश्वकोश.
उत्तर : (१) 'विश्वकोश' म्हणजे असा ग्रंथ की, ज्यात विश्वातील सर्व ज्ञान विषयानुरूप साररूपात एकत्र केलेले असते. (२) विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे एक मुख्य साधन मानले जाते. (३) विश्वकोशातील माहिती संशोधनपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते. (४) विश्वकोशाचे सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषययावरचे असे दोन प्रकार पडतात. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश असे विश्वकोश हे सर्वसंग्राहक कोश होत. तर भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश असे विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले विश्वकोश हे विशिष्ट विषयपर कोशात मोडतात.

--------------------------------------------------------------------------

(५) सूची वाड्मय.
 उत्तर : (१) 'सूची' म्हणजे यादी. सूची वाड्मयात ग्रंथाच्या अखेरीस विशिष्ट विषयावरील किंवा विशिष्ट कालखंडातील ग्रंथ, घटना, स्थळे, व्यक्ती, कागदपत्रे यांची सूची वा यादी दिलेली असते. (२) ही सूची बहुधा अकारविल्हे असते, त्यामुळे वाचकाला ती सहजतेने उपयोगी पडते. (३) ऐतिहासिक साधनांच्या सूचिग्रंथात विशिष्ट कालखंडातील व्यक्तींची नावे, शिलालेख, ताम्रपट, नाणी इत्यादींची यादी दिलेली असते. (४) वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेली 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' किंवा शंकर गणेश दाते यांनी तयार केलेली 'मराठी नियतकालिकांची सूची' असे सूची वाङ्मय प्रसिद्ध आहे. (५) सूचिग्रंथ हे इतिहासाच्या अभ्यासकाला ऐतिहासिक साधने म्हणून फार उपयोगी पडतात.

--------------------------------------------------------------------------
(६) चरित्रकोश.
 उत्तर : (१) समाजातील सर्व घटकांसाठी ज्या व्यक्तींचे कार्य प्रेरणादायी ठरले, अशा व्यक्तींची समग्र चरित्रे ज्या कोशात संग्रहित केलेली असतात, त्या कोशाला 'चरित्रकोश' असे म्हणतात. (२) चरित्रकोशातील माहितीमुळे अभ्यासकाला ऐतिहासिक काळातील आणि पौराणिक काळातील समाजबांधणी आणि सामाजिक संबंध कसे होते, हे कळते. (३) इतिहास संशोधकालाही चरित्रकोश उपयुक्त ठरतात. (४) एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर चरित्रकोश निर्मितीला सुरुवात झाली. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश हा र. भा. गोडबोले यांचा कोश भारतातील सर्व प्रादेशिक भाषांतील पहिला चरित्रकोश आहे.

--------------------------------------------------------------------------
(७) संस्कृती कोश.
 उत्तर : (१) एखादया समाजातील वा राष्ट्रातील धर्म, पंथ- उपपंथ, संस्कृती, रूढी, परंपरा यांचे सर्वांगीण वर्णन ज्या कोशात दिलेले असते, त्या कोशाला 'संस्कृती कोश' असे म्हणतात.(२) संस्कृती कोशामुळे विशिष्ट भागावर नांदत असलेल्या संस्कृतीवर प्रकाश पडतो. (३) आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला परिपूर्ण ज्ञान होते. विशिष्ट संस्कृतींमधील रूढी, परंपरा, धार्मिक-सामाजिक विचार, तत्त्वज्ञान, राहणीमान इत्यादींविषयीची माहिती संस्कृती कोशात दिलेली असते. (४) विविध संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना संदर्भ म्हणून संस्कृती कोश उपयुक्त ठरतात.

--------------------------------------------------------------------------

 (१) स्थल कोश. (प्रत्येकी २ गुण)
  उत्तर : (१) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. (२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. (३) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी 'प्राचीन भारतीय स्थलकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारशी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. (४) स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

--------------------------------------------------------------------------

2) विश्वकोश.
उत्तर : (१) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्ह यांनी १९६० साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ स्थापना केली. (२) मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी म विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता. (३) या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० प्रसिद्ध झाले आहेत.. (४) मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत..

--------------------------------------------------------------------------

 (३) संज्ञा कोश.
 उत्तर : (१) कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की, त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंध उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद वजागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. (8) ते संग्रहालय TR (9) नात (२) वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये; म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना 'संज्ञा कोश' असे म्हणतात. (३) संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण उत्तर मध्ये झाले. दर्भ (२) या म्युि येथे ठेव णून खनिजे, नमुने वै नक झाल्या, याचीही माहिती दिलेली असते. (४) म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते.
--------------------------------------------------------------------------

(४) सरस्वती महाल ग्रंथालय,
 उत्तर : (१) सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले. (२) व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. (३) या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. करण्या उ भेटोच्य एक य त्याचा राहिल इंडिय य ती (४) हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले..

--------------------------------------------------------------------------

५) लुव्र संग्रहालय,
 उत्तर : (१) अठराव्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लु संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या. (२) जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची याने रेखाटलेले 'मोनालिसा' चे चित्रही या संग्रहालयात आहे. (३) नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांतून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे. (४) सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे ३ लाख ८० हजारांहून अधिक कलावस्तू आहेत.
 
--------------------------------------------------------------------------

(६) ब्रिटिश संग्रहालय.
उत्तर : (१) अठराव्या शतकात लंडन येथे ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना झाली. (२) सर हॅन्स स्लोअन या निसर्गशास्त्रज्ञाने राजा दुसरा जॉर्ज याला दिलेल्या ७१ हजार वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंत अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने यांचा समावेश आहे. (३) इंग्रजांनी आपल्या जगभरातील वसाहतींमधून आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष या संग्रहालयात ठेवल्याने, येथील वस्तूंची संख्या वाढत जाऊन आजमितीस ही संख्या ८० लाख एवढी झाली आहे.

--------------------------------------------------------------------------
(७) नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी
, उत्तर : (१) अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे इ.स. १८४६ मध्ये 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी' हे संग्रहालय स्थापन झाले. (२) स्मिथसोनियन इन्स्टिटयूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली या म्युझियमचे काम चालते. हे नैसर्गिक इतिहासाचे संग्रहालय आहे. (३) प्राणी, वनस्पती, कीटक यांचे हजारो अवशेष व जीवाश्म येथे ठेवलेले आहेत. मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष ठेवले आहेत. खनिजे, दगड, शंख-शिंपले आणि पुरावस्तू यांचे बारा कोटींहून अधिक नमुने येथे संग्रहित केलेले आहेत. (४) हजारों पुरातत्त्व संशोधक या पुरावस्तूंचा अभ्यास व संशोधन करण्याचे काम येथे करीत असतात.

--------------------------------------------------------------------------
(८) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.
 उत्तर : (१) इंग्लंडचे राजे प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत- भेटीच्या स्मृत्यर्थ मुंबईतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी १९०४ साली एक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. १९०५ साली त्याची पायाभरणी होऊन १९२२ साली संग्रहालयाची इमारत उभी राहिली. संग्रहालयाला 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, ऑफ वेस्टर्न इंडिया' असे नाव देण्यात आले. (२) १९९८ साली या संग्रहालयाचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे झाले. (३) इंडो-गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आला. हे संग्रहालय कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागले आहे. (४) बौद्ध, जैन, हिंदू देवता यांची शिल्पे, नेपाळ, तिबेट आणि भारतात सापडलेल्या धातूंच्या व दगडी मूर्ती, भांडी, शस्त्रे इत्यादी प्राचीन वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. सुमारे पन्नास हजार पुरावस्तू येथे संग्रहित केलेल्या आहेत.
--------------------------------------------------------------------------


(९) भारतीय प्राचीन चरित्रकोश.
 उत्तर : (१) रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ साली 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश' प्रकाशित केला. (२) भारतीय प्रादेशिक भाषांतील हा पहिला चरित्रकोश मानला जातो. (३) या कोशात मनूपासून, महाभारतकालीन अशा प्राचीन व्यक्ती आणि स्थळे यांचे त्यांनी वर्णन केले आहे. (४) भारतवर्षात होऊन गेलेले प्रख्यात लोक, त्यांच्या स्त्रिया व त्यांचा धर्म, देश व त्यांच्या राजधान्या, त्यांतील नदया व पर्वत या पुत्र, सर्वांची माहिती व इतिहास या चरित्र कोशात दिलेला आहे.

--------------------------------------------------------------------------
(१०) भारतीय संस्कृती कोश.
 उत्तर : (१) पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या प्रदीर्घ काळात 'भारतीय संस्कृती कोशा'चे दहा खंड प्रसिद्ध केले. (२) या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास यांची माहिती दिलेली आहे. (३) महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण-उत्सव, पारंपरिक विचार, रूढी-परंपरा या सर्वांची दखल या कोशात घेण्यात आलेली आहे. (४) विविध ललितकला, पारंपरिक वस्तू, सण, देवता यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचकांना, अभ्यासकांना आणि इतिहासलेखनालाही हे कोश उपयुक्त ठरतात.
--------------------------------------------------------------------------

 प्र. ६ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
 (१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

   उत्तर : (१) ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात; तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते. (२) हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. (३) ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात. (४) इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी; म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात.

--------------------------------------------------------------------------

 (२) इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते
 . उत्तर : (१) इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. (२) प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. (३) प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते. (४) या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
--------------------------------------------------------------------------

(३) अभिलेखागारातील विश्वासार्ह मानली जातात. 'कागदपत्रे ऐतिहासिकदृष्टा स्पष्ट करा
 उत्तर : (१) प्राचीन दस्तऐवज, कागदपत्रे, अभिलेखागारांमध्ये ठेवण्यात येतात. या कागदपत्रांचे जतन करणे हे अभिलेखागारांचे काम असते. (२) अभिलेखागारांमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नाही. (३) ही कागदपत्रे सुरक्षित ठेवणे व त्यांत कोणताही बदल न करता ती शासनाला किंवा अधिकृत व्यक्तींना हवी तेव्हा उपलब्ध करून देणे, हे अभिलेखागार व्यवस्थापनाचे काम असते. त्यामुळे अभिलेखागारात ठेवलेली कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात.
 
--------------------------------------------------------------------------

 (४) प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते.
 उत्तर : (१) कोशांमुळे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचून त्याची जिज्ञासापूर्ती होते. (२) कोशांमधून ज्ञान, माहिती व संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. (३) कोश संशोधक व अभ्यासकांना त्यांच्या विषयाचे पूर्वज्ञान व माहिती देतात; त्यामुळे त्यात भर घालण्याची प्रेरणाही कोश देतात. (४) कोशवाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात, म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते..

--------------------------------------------------------------------------
(५) कोशांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात.
 उत्तर : (१) कोशांमध्ये गतकाळातील घटना, व्यक्तींचे क शब्दांचे अर्थ इत्यादी माहिती दिलेली असते. परंतु काळाच्या गतीबरोब ज्ञानाचाही विस्तार होत असतो. (२) नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येऊन नवीन शब्दांची भर पहले (३) नव्याने आलेली माहिती, ज्ञान, संकल्पना यांची भाषेत पडत जाते. (४) नवीन संशोधनामुळे भूतकाळातील घटनांचे संदर्भही बदल्य असतात. हे सर्व बदल, शब्द व माहिती कोशांमध्ये आली नाही. तर ते कालविसंगत ठरतात. म्हणून नव्या ज्ञानाची भर घालून को अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागता किंवा पुरवण्या काढाव्या लागतात.

--------------------------------------------------------------------------
(७) इतिहासाच्या साधनार्थ आपण जतन केले पाहिजे

उत्तर : (१) इतिहासाच्या साधनांच्या आधारेच वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जातो. ल न करता करून देणे. (3) लेखागारात वर्गीक र्ह मानली प्रक्रिय (२) या साधनांचा अन्वयार्थ लावूनच ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला जातो. न त्याची पद्धतीने (३) ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करूनच तत्कालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते. (४) या साधनांच्या आधारेच देशाची वैज्ञानिक, आर्थिक प्रगती कळू शकते. इतिहासाची साधने हा देशाचा ऐतिहासिक ठेवा असल्याने, त्यांचे आपण जतन केले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------

(१) मौखिक साधनांचे जतन व संवर्धन कसे करता येते ? असते.
उत्तर : मौखिक साधन हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. मौखिक साधनांचे जतन व संवर्धन पुढीलप्रकारे करता येते चे कार्य, (१) लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. तीबरोबर (२) मिळालेल्या साहित्याचा अन्वयार्थ लावणे. (३) या साहित्याचे वर्गीकरण करून विश्लेषण करणे. भर पडते. भाषेत पर (४) संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे.

--------------------------------------------------------------------------

जानेवारी ०७, २०२४

dahavi- itihas ८-पर्यटन आणि इतिहास

                    ८-पर्यटन आणि इतिहास

पुढील संकल्पना स्पष्ट करा
: (१) पर्यटन (प्रत्येकी २ गुण) 

उत्तर : (१) दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'पर्यटन' होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे 'पर्यटन' होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. (२) पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. (३) आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधांमुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. विसाव्या शतकात तर पर्यटनाकडे 'आधुनिक उद्योग' म्हणूनच पाहिले जाते. (४) स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला
-----------------------------------------------------------------------

(२) धार्मिक पर्यटन,
 उत्तर : (१) तीर्थयात्रेच्या हेतूने केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटन' होय. धार्मिकस्थळे, यात्रा, उत्सव, धार्मिक संमेलने, नदद्या- सागर यांत स्नान करून पुण्य मिळवणे या कारणांसाठी केलेला प्रवास धार्मिक पर्यटनात मोडतो. (२) हिंदू धर्माच्या उत्थानासाठी शंकराचार्यांनी केलेला प्रवास, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धाने आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला प्रवास, सेंट झेव्हिएर व अन्य ख्रिश्चन अनुयायांनी केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटनच होय. (३) महाराष्ट्रभरातून दरवर्षी पंढरपूर, शिर्डी येथे पदयात्रा करीत दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास म्हणजेही धार्मिक पर्यटनच होय. (४) गुरुनानकदेव, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी, तसेच बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चीनमधून भारतात आलेला श्वांग यांच्या भारतभ्रमणातून धार्मिक पर्यटनच पाहायला मिळते. युआन
 -----------------------------------------------------------------------


(३) वारसा मुशाफिरी (हेरिटेज वॉक).
 उत्तर : (१) ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला 'वारसा मुशाफिरी' (हेरिटेज वॉक) असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालसारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो, त्याला 'हेरिटेज वॉक' असे म्हणतात. (२) इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे, ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते. (३) अनेक हौशी संघटना गडकिल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात. पुणे-मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुशाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. (४) अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात.
-----------------------------------------------------------------------

(४) सांस्कृतिक पर्यटन.
 उत्तर : (१) भारताला विविध ललितकलांचा वारसा लाभलेला आहे. ठिकठिकाणी ललित महोत्सव साजरे होत असतात. या महोत्सवांसाठी केल्या जाणाऱ्या पर्यटनाला 'सांस्कृतिक पर्यटन' असे म्हणतात. (२) ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, एखादया स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास समजून घेण्यासाठी त्या स्थळाला भेट देणे हे सांस्कृतिक पर्यटन होय. (३) दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्यांच्या परंपरा समजून घेण्यासाठी केलेले पर्यटन, विविध भागांतील सण-उत्सवांच्या पद्धती पाहण्यासाठी केलेले पर्यटन हे सांस्कृतिक पर्यटनातच मोडते. (४) अनेक ठिकाणी होणाऱ्या नृत्य, संगीत महोत्सवात भाग घेण्यासाठी किंवा प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी केलेल्या पर्यटनाचा समावेशही संस्कृतिक पर्यटनात होतो.

-----------------------------------------------------------------------

प्र. टिपा लिहा •
(१) पाच परंपरा (प्रत्येकी २ गुण)

 उत्तर : (१) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला, (२) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लागली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते, (३) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत. (४) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
 
-----------------------------------------------------------------------

  (२) मार्को पोलो.
 उत्तर : (१) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. (२) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला. (३) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. (४) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविदधा यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

-----------------------------------------------------------------------
(३) कृषी पर्यटन.
 उत्तर : (१) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय. (२) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. (३) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे. (४) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझाएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.


(५) बता
उत्तर : (१) आजच्या मोरोक्को या देशात टॅन्जियर शहरात फेब्रुवारी १३०४ रोजी इब्न बतुता जन्माला आला. इस्लामी जगतार्थ प्रदीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील तो महान प्रवा होता. (२) एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास न करण्याचे धोरण ठेवून दक्षिण व पश्चिम आफ्रिका, दक्षिण व पूर्व युरोप, मध्य व आग्नेद आशिया आणि भारतीय उपखंड या प्रदेशांत त्याने प्रवास केला. (३) मुहम्मद तुघलकाच्या दरबारी न्यायाधीश म्हणून त्याने काम केले व त्याचा दूत म्हणून तो चीनमध्ये गेला होता.(४) या प्रवासाचे वर्णन त्याने 'रिहला' या पुस्तकात लिहून ठेवले आहे. मध्ययुगाचा इतिहास आणि समाजजीवन समजून घेणाऱ्या अभ्यासकांना बतुताचे हे लेखन उपयोगी पडते. प्रवासाविषयी बतुता आपल्या ग्रंथात म्हणतो की, 'प्रवास तुम्हांला आश्चर्याने मुग्ध करतो व नंतर गोष्टी घडाघडा बोलायला भाग पाडतो. '
----------------------------------------------------------------------

(६) गेरहार्ट मर्केटर..
उत्तर : (१) गेरहार्ट मर्केटर हा डच नकाशाशास्त्रज्ञ होता व भूगोलवेत्ता होता. (२) त्यानेच प्रथम जगाचा नकाशा व पृथ्वीच्या गोलाचे आरेखन केले. भिंतींवर टांगण्याचे मोठे व लहान आकाराचे नकाशे तयार केले.. (३) नकाशासाठी वापरला जाणारा 'Atlas' हा शब्द त्यानेच प्रथम वापरला व तो रूढ झाला. त्याने खगोलशास्त्रीय व वैज्ञानिक उपकरणेही तयार केली. (४) त्याने तयार केलेल्या जगाच्या नकाशांमुळे युरोपातील भू-शोधमोहिमांना गती मिळाली.

-----------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
 (१) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

 उत्तर : (१) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे. (२) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे. (३) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात.. (४) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.
-----------------------------------------------------------------------

  (२) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
  उत्तर : भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे; कारण - (१) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. (२) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. (३) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. (४) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे..
-----------------------------------------------------------------------

(३) 'माझा प्रवास' हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
 उत्तर : (१) विष्णुभट गोडसे यांनी १८५७ च्या दरम्यान महाराष्ट्र ते उत्तरेतील अयोध्यापर्यंत जो जाता-येता प्रवास केला, त्याचे वर्णन 'माझा प्रवास' या प्रवासवर्णनपर पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले आहे. (२) १८५७ साली भारतात ब्रिटिशांविरुद्ध जो पहिला स्वातंत्र्यलढा लढला गेला, तो काळ व त्या घटना विष्णुभटांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यामुळे या लढ्यातील बारीक सारीक घटना त्यांनी टिपल्या होत्या. (३) यांतील अनेक घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. हा स्वातंत्र्यसंग्राम आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील या पुस्तकात त्यांनी मांडले आहेत. (४) एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही या पुस्तकातून आपल्याला समजते. 'माझा प्रवास' हे पुस्तक विष्णुभटांनी अनुभवलेल्या घटनांतून तयार झालेले असल्याने ते तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
 
-----------------------------------------------------------------------
 (४) वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
 उत्तर : (१) भारतात पाश्चात्त्यांच्या वैदयकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. (२) नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकियांना वाटते. (३) भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येतात. (४) योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे, असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
-----------------------------------------------------------------------

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. 

उत्तर : ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना पर्यटक भेटी देतात. या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. (१) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. (२) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात. (३) घोडागाडी, रिक्षावाले अशा वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. (४) पर्यटक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोदयोग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो. थोडक्यात, पर्यटनस्थळे तेथील स्थानिक लोकांच्या उपजीविकेची साधने बनतात.

-----------------------------------------------------------------------
पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा : (प्रत्येकी ३ गुण) 

(१) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?
 उत्तर आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे - (१) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. (२) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. (३) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. (४) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
 
-----------------------------------------------------------------------

 (२) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती कशी होते ?
उत्तर : पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर पुढीलप्रमाणे रोजगारनिर्मिती होते (१) पर्यटनस्थळांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते. (२) पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते, त्यामुळे स्थानिक हस्तोदयोग व कुटीरोद्योगांचा विकास होतो. (३) स्थानिक खाद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो. (४) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात. प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक (गाईड) असे नवे रोजगार निर्माण होतात.
-----------------------------------------------------------------------

 (३) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?
 उत्तर : आपला परिसर कसा आहे, हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात (१) परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत. त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात. (२) समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल. (३) गांडूळ प्रकल्प, शून्य कचरा प्रकल्प, सोलर वीज प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील.
-----------------------------------------------------------------------

(४) बॉमस कुकचे कार्य थोडक्यात लिहा.
 उत्तर : (१) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामुदायिक सहलींचे व्यावसायिक तत्त्वावर आयोजन प्रथम थॉमस कुक याने केले. (२) ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वेने ही सहल नेऊन त्याने यशस्वी केली. त्यानंतर त्याने देशा-विदेशांत अनेक सहली आयोजित केल्या. (३) सहलींसाठी नवेनवे उपक्रम केले. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वी केली. पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. लोकांना परवडेल अशा दरात व सहज सोपा असा प्रवास घडवला. (४) थॉमस कुकच्या प्रयत्नांमुळे आधुनिक पर्यटन सुरू झाले.
-----------------------------------------------------------------------

(५) 'क्रीडा पर्यटन' म्हणजे काय ?
उत्तर : (१) खेळांमध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे 'क्रीडा पर्यटन' होय. विसाव्या शतकात क्रीडा पर्यटन हा नवा प्रकार उदयास आला आहे. (२) स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरत असतात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल व हॉकी स्पर्धा दरवर्षी होतात.. (३) विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होतात. दर चार वर्षांनी विविध देशांत एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या जातात, हिमालयीन कार रॅली, महाराष्ट्र व हिंद केसरी कुस्तीस्पर्धा अशाही स्पर्धा होतात. (४) या स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू, मार्गदर्शक, पंच, स्पर्धांचे आयोजक आणि प्रेक्षक या सर्वांचे होणारे पर्यटन क्रीडा पर्यटनात मोडते.
-----------------------------------------------------------------------

(६) धार्मिक पर्यटनाचे फायदे लिहा.
 उत्तर : तीर्थस्थळांना भेटी देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या धार्मिक पर्यटनाचे पुढील फायदे होतात (१) जगभरात विखुरलेले लोक धार्मिक उत्सवप्रसंगी एकत्र येतात. (२) परस्परांशी आलेल्या संबंधातून त्यांच्यात आपुलकी निर्माण होऊन एकात्मतेची भावना टिकून राहते.. (३) धार्मिक स्थळांना महत्त्व येऊन तेथे लोकोपयोगी कामे केली जातात. (४) अशी स्थळे विकसित झाल्याने स्थानिक व्यवसाय वाढून तेथील लोकांचे राहणीमान सुधारते व तेथील परंपरांचे, संस्कृतीचे जतन होते.
-----------------------------------------------------------------------
(७) महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे कोणती, ते लिहा.
उत्तर : महाराष्ट्रात पुढील पर्यटनस्थळे आहेत. (१) लेणी - अजिंठा, वेरूळ, धारापुरी (एलिफंटा), कार्ले, भाग इत्यादी. (२) प्रार्थनास्थळे - पंढरपूर, शिर्डी, शेगांव, कोल्हापूर, तुळजापूर, पैठण, आळंदी, जेजुरी, नांदेडचे गुरुद्वारा, मुंबईचे माऊंट मेरी चर्च इत्यादी. (३) थंड हवेची ठिकाणे - पाचगणी, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, खंडाळा. (४) धरणे - कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, भंडारदरा इत्यादी. (५) अभयारण्ये - ताडोबा, दाजीपूर, सागरेश्वर इत्यादी. (६) नैसर्गिक - जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले पश्चिम घाटातील कास पठार.

-----------------------------------------------------------------------
(८) पर्यटन वाढावे म्हणून महाराष्ट्रात कोणते प्रयत्न झाले ? 

उत्तर : पर्यटन वाढावे म्हणून महाराष्ट्रात पुढील प्रयत्न झाले (१) महाराष्ट्र सरकारने १९७५ साली 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'ची स्थापना केली. (२) या महामंडळातर्फे राज्यातील ४७ पर्यटनस्थळी पर्यटक निवासांची सोय केली गेली. त्यात चार हजारांहून अधिक पर्यटकांच्या निवासाची सोय होते. (३) सरकार आणि खाजगी व्यावसायिकांनी नव्याने पर्यटनस्थळे निर्माण करून ती विकसित केली किंवा आहेत ती पर्यटनस्थळे विकसित केली. (४) पर्यटक वाढावेत म्हणून पर्यटनस्थळी सोयीसुविधा वाढवल्या. स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या. माहिती पत्रके, अनुबोधपट तयार केले.
-----------------------------------------------------------------------
(२) भिलार गावाला 'पुस्तकांचे गाव' असे का म्हटले जाते ? 

उत्तर : (१) भिलार गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांना वाचता यावीत, यासाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. (२) या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो.. (३) महाराष्ट्र शासनाने वाचकांना आनंद मिळावा म्हणून व वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तके अनेक लोकांच्या घरी ठेवलेली आहेत. म्हणून भिलार गावाला 'पुस्तकांचे गाव' असे म्हटले जाते.
-----------------------------------------------------------------------
(३) पुस्तकांच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत ?
 उत्तर : भिलार येथे गावकऱ्यांच्या घरी ठेवलेल्या पुस्तकांत संतवाङ्मय, बालसाहित्य, कथा-कादंबरी, कविता, आत्मचरित्रे, स्त्री-साहित्य व क्रीडासाहित्य अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.
-----------------------------------------------------------------------

 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण)

  (१) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
 उत्तर : पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत (१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. (२) खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उदयोग, (३) हस्तोदयोग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. (४) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग. (५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. (६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात..
-----------------------------------------------------------------------

(२) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
 
 उत्तर : पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार - (१) ऐतिहासिक पर्यटन पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.(२) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. (३) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
-----------------------------------------------------------------------

(३) वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.
उत्तर : पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात - (१) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात.. (२) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो. (३) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. (४) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. (५) हस्तोद्योग, कुटीरोद्योग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. (६) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. (७) विविध प्रकारचे लोक, भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. (८) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते. (९) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. (१०) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो.
-----------------------------------------------------------------------
(४) पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा
. उत्तर : पर्यटनामागे अनेक हेतू वा प्रेरणा असतात. त्या पुढीलप्रमाणे (१) ऐतिहासिक वास्तू, किल्ले तसेच उत्खननात सापडलेली गावे-शहरे पाहणे... (२) प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, संग्रहालये पाहणे. (३) विविध तीर्थस्थळांना भेटी देणे. (४) समुद्रकिनारे, घनदाट जंगले, हिमशिखरे, नद्यांचे संगम, कासपठारासारखी वैशिष्ट्यपूर्ण पठारे, फ्लॉवर ऑफ व्हॅलीसारख्या दन्य पर्वत अशा निसर्गरम्य स्थळांचा अनुभव व आनंद घेणे. (५) निरनिराळ्या औदयोगिक प्रकल्पांना भेटी देणे. (६) औषधी वनस्पती पाहणे, संशोधन करणे, वैदयकीय उपचार घेणे अशा आरोग्यपूरक कारणांसाठी पर्यटन करणे. (७) फळबागा, शेती संशोधन, शेती प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प आदींसाठी केलेले कृषी पर्यटन. (८) खेळांच्या निमित्ताने केले जाणारे क्रीडा पर्यटन. (९) नृत्य, संगीत, महोत्सव यांत भाग घेणे वा प्रेक्षक म्हणून जाणे हे सांस्कृतिक पर्यटन, (१०) याशिवाय फिल्म फेस्टिव्हल, चित्रपट चित्रीकरण, विज्ञान संमेलने, आंतरराष्ट्रीय परिषदा, संवाद, पुस्तक प्रदर्शने, साहित्य संमेलने इत्यादी निमित्तानेही लोक पर्यटन करीत असतात.
-----------------------------------------------------------------------

(५) ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय पाहिजेत ?
उत्तर : ऐतिहासिक वास्तू या प्राचीन इतिहासाची साधने तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे, म्हणून त्याचे जतन आपण पाहिजे. त्यासाठी पुढील उपाय केले पाहिजेत (१) किल्ले, लेणी इत्यादी वास्तूंत खडकांतून झिरपणाऱ्या पाण्याम वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. (२) वास्तूंवर वाढणारी झाडे-झुडपे वेळीच समूळ नष्ट करावीत (३) उष्णता-दमट हवा यांमुळे वास्तूंची हानी होते. नवीन तंत्रज्ञान वापरून ही हानी टाळावी. (४) समुद्रात किंवा समुद्रालगत असणाऱ्या प्राचीन वास्तूंची खाऱ्या पाण्यामुळे व हवेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजन कराव्यात. (५) पर्यटकांनी या वास्तू कशा स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. (६) वास्तूंवर नावे कोरणे, त्यांची नासधूस करणे असल्या गोष्टी टाळाव्यात. (७) मानवी विध्वंसनापासून वास्तूंचे जतन होण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत. (८) ऐतिहासिक वास्तूंचे जतन का करायचे, याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे. (९) धरणांत किंवा अन्य प्रकल्पांत पाण्याखाली जाणाऱ्या वास्तू वेळीच अन्यत्र हलवाव्यात. (१०) या वास्तूंच्या जतनासाठी शासनाबरोबरच नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी व उदयोजकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत मिळते.

-----------------------------------------------------------------------

जानेवारी ०७, २०२४

dahavi- itihas 6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

     ६ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास





पुढील संकल्पना स्पष्ट करा 
 (१) दशावतारी नाटक 
 उत्तर : (१) हिंदू धर्मात मानलेल्या विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित नाटकांना 'दशावतारी नाटके' असे म्हणतात. (२) दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीनेही बोलतात. (३) नाटक चांगले वठण्यासाठी नाटकाच्या सुरुवातीस सूत्रधार विघ्नहर्त्या गणपतीला पदयातून आवाहन करतो. (४) ही नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील 'लोकनाट्य' या काराचाच हा एक भाग आहे.
------------------------------------------------------------------------

भजन
. उत्तर : (१) टाळ, मृदंग किंवा पखवाज आणि पेटी या वादयांच्या स्थीत परमेश्वराच्या गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना मूहिकरीत्या गाणे, यास 'भजन' असे म्हणतात.(२) भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. (३) भजन हा गायनपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय किंवा मुगम संगीताचा प्रकार असतो. (४) भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन असे दोन प्रकार आहेत. उभ्याने न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे म्हणजे चक्री भजन तर देवभक्ताची भूमिका घेऊन संवादस्वरूपात भजने म्हणणे हे सोंगी भजन होय.
------------------------------------------------------------------------

(३) भारूड.
उत्तर : (१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे 'भारूड' होय. भारुडे ही पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असतात. लौकिक व्यवहारांवर आध्यात्मिक व नैतिक रूपके रचणे म्हणजे 'भारूड' होय. (२) भारुडांत नाट्यात्मकता आणि विनोद असल्याने भारूड हा पचनाप्रकार लोकप्रिय झाला. (३) भारुडांची रचना गेयतापूर्ण असल्याने ती लोकसंगीतावर गायला सोपी असतात. (४) संतांनी भारूड रचनेतून लोकशिक्षण केले.
------------------------------------------------------------------------

कीर्तन :
 उत्तर : (१) गायन, वादन, नृत्य व विनोद यांच्या साहाय्याने ईश्वराचे गुणवर्णन व त्याच्या लीलांचे कथन केला जाणारा लोककलेचा एक प्रकार म्हणजे 'कीर्तन' होय. (२) श्रोत्यांच्या चित्तांत सर्व रसांच्या द्वारे भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते. (३) कीर्तनाचे 'पूर्वरंग' व 'उत्तररंग' असे दोन भाग असतात. पूर्वरंगात नमन, अभंग व त्याचे निरूपण असते; तर उत्तररंगात पौराणिक आख्यान असते. (४) कीर्तनाने धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक ऐक्याचे, दोष- दिग्दर्शनाचे व लोकशिक्षणाचेही कार्य केले. (५) कीर्तनाचे नारदीय किंवा हरिदासी कीर्तन आणि वारकरी कीर्तन अशा दोन परंपरा आहेत.

------------------------------------------------------------------------
(५) अनुबोधपट व वृत्तपट (डॉक्युमेंटरीज). 
(३) खेळ, किल्ले, प्रदेश, प्राणिजगत अशा विविध गोष्टींची माहिती देणारे वृत्तपट तयार होतात. (४) अनुबोधपट व वृत्तपट ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत..उत्तर : (१) ज्या चित्रपटांमधून समाजाला प्रेरणा मिळेल, शिकवण मिळेल अशा छोट्या फिल्म्स्‌ला 'अनुबोधपट' असे म्हणतात; तर ज्या फिल्म्समधून स्थळांची, प्रसंगांची माहिती दाखवली जाते त्यांना 'वृत्तपट' वा 'माहितीपट' असे म्हणतात. (२) भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे नेते, सामाजिक समस्या, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील अनुबोधपट लोकशिक्षणाचे कार्य करतात.
------------------------------------------------------------------------
टिपा लिहा (प्रत्येकी २ गुण)
(१) मनोरंजनाची आवश्यकता.

 उत्तर : (१) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. (२) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. (३) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. (४) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.

------------------------------------------------------------------------

 (२) मराठी रंगभूमी.
 उत्तर : (१) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे 'मराठी रंगभूमीचे जनक' होत. (२) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.. (३) 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. (४) मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले..

------------------------------------------------------------------------
(३) रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.  उत्तर : रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत- (१) रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्ला- गार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. (२) चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत.

------------------------------------------------------------------------
(४) मनोरंजनाची साधने,

उत्तर : मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य असल्याने प्राचीन काळापासूनच त्याने मनोरंजनाची अनेक निर्माण केली. (१) प्राचीन व मध्ययुगीन भारतात उत्सव, सण-सोहळे, खेळ. नाच-गाणे ही मनोरंजनाची साधने होती. (२) बदलत्या काळाप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांतही बदल गेले. टीव्ही, मोबाइल, व्हिडिओ गेम्स, चित्रपट अशी आधुनि काळातील मनोरंजनाची साधने आहेत. (३) लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, नाटके, दशावतारी खेळासारख प्रहसने, पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके अशीही मनोरंजनाची सा उपलब्ध असतात. (४) विविध प्रकारचे खेळ, छंद, पर्यटन आणि आपल्या जिवलगांशी मनमुराद गप्पा मारणे ही सुद्धा मनोरंजनाचीच साधने आहेत. व्यक्तीचे वय, आवड आणि आर्थिक स्थिती यांप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांत बदल होतात.
------------------------------------------------------------------------

5) लळित.
उत्तर : (१) कोकण-गोवा या परिसरात आढळणारा लळित मान् एक पारंपरिक नाट्यप्रकार आहे. नवरात्रासारख्या उत्सवाची सांगत या लळिताने होते. उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे, असे तिच्या दरबारात अठरापगड जातींची सोंगे येऊन मागणी मागता यालाच 'लळित' असे म्हणतात. (२) लळितांतून राम-कृष्ण यांच्या कथा सादर होतात. (३) गावाच्या भल्यासाठी तसेच समाज सदाचरणी व्हावा म्हणून उत्सवदेवतेला मागणे मागितले जाते. (४) लळितांचा समावेश नारदीय कीर्तनपरंपरेत होतो. आधुनिक मराठी रंगभूमीला लळितांची पार्श्वभूमी आहे.
------------------------------------------------------------------------

(६) कीचकवध. (माहीत आहे का तुम्हांला ? पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४३)
उत्तर : (१) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी 'कीचकवध' संगीत नाटक स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिले. हे रूपकात्मक नाटक होते. (२) महाभारतातील कीचकवधाच्या घटनेवर हे नाटक आधारलेले असले तरी नाटककाराचा तेवढाच उद्देश नव्हता, तर त्यातून ब्रिटिश राजवटीवर सूचक टीका करणे, हाही नाटककाराचा हेतू होता. (३) नाटकातील प्रत्येक पात्र तत्कालीन वृत्तीच्या रूपकात सादर केले होते. द्रौपदी म्हणजे असाहाय्य भारत, युधिष्ठिर म्हणजे मवाळपक्ष तर भीम म्हणजे जहालपक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन अशा रूपकांत प्रेक्षक हे नाटक पाहत असत. (४) जहाल आणि मवाळ हे तत्कालीन काँग्रेसमधील दोन अंतर्गत गट होते. या नाटकामुळे जनतेत ब्रिटिश साम्राज्याबद्दल चीड निर्माण करण्याचे कार्य केले.
------------------------------------------------------------------------

(७) नटसम्राट. (माहीत आहे का तुम्हांला ? 
उत्तर : (१) प्रसिद्ध नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक 'नटसम्राट' १९७० साली रंगभूमीवर आले. इंग्रजी नाटककार शेक्सपिअर याच्या 'किंग लिअर' या नाटकावर 'नटसम्राट' हे नाटक आधारित आहे. (२) या नाटकाचा शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र गणपतराव जोशी व नानासाहेब फाटक या त्या काळात गाजलेल्या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वांतून शिरवाडकरांनी साकारले आहे. या दोन नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वांच्या रंगछटा या पात्रात मिसळलेल्या आहेत. (३) या नाटकातील शोकांतिका एका वृद्ध झालेल्या नटाची आहे. आपले सर्वस्व आपल्याच मुलांना देऊन त्यांच्याकडून अपमानित झालेल्या पित्याचे दुःख यात आहे. ज्याने एके काळी उत्तमोत्तम भूमिका करून रंगमंच गाजवला, त्या नटश्रेष्ठाची ही शोकांतिका आहे. (४) या नाटकाने नाट्यलेखनात आणि रंगमंचावरील प्रयोगदर्शनात एक नवा इतिहास निर्माण केला.
------------------------------------------------------------------------

(८) तमाशा (लोकनाट्य).
 उत्तर : (१) पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या शब्दाचा अर्थ 'चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य' असा होतो. (२) लोककला आणि अभिजात कलाप्रकारांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजनाचा कलाप्रकार अठराव्या शतकात महाराष्ट्रात चांगलाच लोकप्रिय झाला. (३) तमाशाचे 'संगीत बारी' आणि 'ढोलकीचा फड' असे दोन परंपरागत प्रकार आहेत. संगीत बारीत लावण्या व संगीत यांच्या तालावर नृत्य केले जाते. ढोलकीचा फड या प्रकारात गण म्हणजेच गणेश वंदन, गवळण, बतावणी व नंतर वग म्हणजेच वगनाट्य सादर केले जाते. (४) 'विच्छा माझी पुरी करा' किंवा 'गाढवाचं लग्न' अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाट्ये खूप गाजली.
------------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
* (१) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर : (१) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. (२) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यामा तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. (३) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. (४) त्या वेळची केशभाषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोज करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काव्यानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि ज्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

------------------------------------------------------------------------
(२) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
 उत्तर : संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली. (१) या भारुडांमध्ये नाट्यात्मकता होती. (२) भारुडांच्या विषयांत विविधता होती. (३) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. (४) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे तो गायली जात असत. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
 
------------------------------------------------------------------------
(३) बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो.
 उत्तर : (१) मनोरंजनात बाहुल्यांचा खेळ या महत्त्वपूर्ण खेळाचा प्राचीन काळापासून समावेश आहे. (२) मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस, इजिप्त येथे झालेल्या उत्खननांत मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. या बाहुल्या कठपुतळी- प्रमाणे वापरल्या जात असाव्यात. (३) पंचतंत्र, महाभारत अशा प्राचीन ग्रंथांतही या खेळाचा उल्लेख आहे. (४) महाभारतात चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणून सूत्र बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे. यावरून बाहुल्यांचा खेळ हा सार्वत्रिक आणि प्राचीन खेळ आहे, हे सिद्ध होते.

------------------------------------------------------------------------
(४) विष्णुदास भावे यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
 उत्तर : (१) मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यांतून झाला. लळिते आणि लोकनाट्ये यांत मराठी नाटकांची बीजे रोवली गेली. (२) १८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'सीतास्वयंवर' या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील कथानकावरही त्यांनी नाटक रचले. (३) गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत. (४) नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.

------------------------------------------------------------------------
(५) ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
उत्तर : (१) ऐतिहासिक नाटकाची संहिता, त्यातील पात्रांचे संवाद कालसुसंगत होण्यासाठी लेखकाला इतिहासाची जाण असणे आवश्यक असते.(२) नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा इत्यादी तपशील अचूक असणे महत्त्वाचे असते. (३) ऐतिहासिक नाटकांतून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र रंगवताना इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे असते. (४) ऐतिहासिक नाटकाची भाषा व अभिव्यक्त करायची संस्कृती. यांचे ज्ञान होण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
------------------------------------------------------------------------

(१) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची खानी का आहे?
उत्तर : (१) भारतात चलत्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला. (२) भारतातील पहिला लघुपट तयार करून तो १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. (३) दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला. (४) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून 'भारतीय चित्रपटसृष्टीची जननी' अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.

------------------------------------------------------------------------
 (२) पोवाडा म्हणजे काय, हे स्पष्ट करा
 उत्तर : (१) पडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.. (२) पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार असून, तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. (३) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. (४) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो. (५) दरवारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
------------------------------------------------------------------------


(४) यांचे स्वरूप कसे असते?
उत्तर : (१) दशावतारी नाटक हे विष्णूच्या दहा अवतार आधारित असते. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा साहाय्याने ही नाटके सादर केली जातात. (२) देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. (३) नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून, काही संवाद नवी प स्वयंस्फूर्तीने बोलतात. (2 (४) महाराष्ट्रातील लोकनाट्याचाच हा एक प्रकार आहे. शेत उत्त पीकपाणी आल्यावर सुगीच्या दिवसांत कोकण व गोवा येथे दशावता नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात.. सादर

------------------------------------------------------------------------

(५) कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टी असतात ?
 उत्तर : कीर्तनकार होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्य असते. (१) कीर्तनकार बहुश्रुत असावा. म्हणजे त्याचा अनुभव असला पाहिजे. (२) पौराणिक आणि सामाजिक विषयांसंबंधी त्याला चांगले असावे. (३) कथानिरूपणाची शैली, प्रभावी वक्तृत्व आणि विनोदाची जोड हे गुण त्याच्याकडे असावेत. (४) गायन, वादन, मुद्राभिनय, नृत्य यांकडे त्याचे असावे. कीर्तनाची पद्धत, पोशाख अशा गोष्टीही त्याने घेतल्या पाहिजेत.
------------------------------------------------------------------------
(७)संदर्भात वि. ज. कीर्तने यांनी केलेले कार्य
 उत्तर : (१) विष्णुदास भावे यांनी प्रथम 'सीतास्वयंवर' हे नाटक रंगभूमीवर आणले. परंतु सुरुवातीच्या या नाटकांना लिखित संहिता नव्हती. त्यातील गोते जरी लिहिलेली असली, तरी संवाद उत्स्फूर्त असत, (२) वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक रंगभूमीवर आणले. (३) या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुद्रित स्वरूपात, संहिता असलेले पहिले नाटक होते. (४) या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली.
 ------------------------------------------------------------------------
 (८) रंगभूमीशी कोणकोणते घटक संबंधित असतात ?
 उत्तर : रंगभूमीवर विविध ललितकला व्यक्ती वा समुदायाकडून सादर होत असतात. रंगभूमीशी पुढील घटक संबंधित असतात : (१) नाट्यसंहिता व ती लिहिणारे लेखक, नाट्य दिग्दर्शक व कलावंत. (२) रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व त्यांचे साहाय्यक. (३) नृत्य व संगीत पार्श्वसंगीत देणारे कलाकार. (४) नाट्यप्रयोगाचा प्रेक्षकवर्ग व नाटकाची समीक्षा करणारे समीक्षक.

------------------------------------------------------------------------
चित्रपटांचे प्रकार कोणते, ते लिहा. (माहीत आहे का तुम्हांला ? 
 उत्तर: चित्रपटांचे स्वरूप, हेतू, आकार इत्यादींवरून विविध प्रकार पडतात. हे प्रकार पुढीलप्रमाणे - - (१) वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धिपट असे मर्यादित हेतू असणारे लघुपट असतात. (२) व्यंगपट, कथापट, विनोदी चित्रपट असा एक प्रकार होतो. (३) शैक्षणिक चित्रपट, सैनिकी चित्रपट, माहितीपट असे माहितीवजा असणारे चित्रपट असतात. (४) आशयावरून सामाजिक, पौराणिक, राजकीय, मनोरंजनपर असा चित्रपटांचा एक प्रकार केला जातो. (५) साहसी (स्टंट) चित्रपट, चरित्रपर चित्रपट, असा एक प्रकार आहे. (६) अॅनिमेशन केलेले (कार्टून) छोट्या मुलांसाठी असलेले चित्रपट असाही एक प्रकार आहे. सुरुवातीस मूकपट होते, तर आता सर्व बोलपट आहेत.
------------------------------------------------------------------------

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (४ गुण) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ४१ कीर्तनाच्या नारदीय करत असत.
(१) संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून कोणते कार्य केले ?
उत्तर : संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जातिभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक दोषांवर निरूपण करून प्रबोधनाचे कार्य केले.
------------------------------------------------------------------------

(२) कीर्तनाचा 'पूर्वरंग' व 'उत्तररंग' म्हणजे काय ?
उत्तर : कीर्तनाचा 'पूर्वरंग' म्हणजे कीर्तनाच्या सुरुवातीस म्हटले जाणारे नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण आणि 'उत्तररंग' म्हणजे नमन आणि निरूपणानंतर एखादे आख्यान सांगणे होय.

------------------------------------------------------------------------

 (३) राष्ट्रीय कीर्तनाचे स्वरूप स्पष्ट करा.
  उत्तर : (१) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कीर्तनातून समाजप्रबोधन आणि देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला गेला. या कीर्तनांनाच 'राष्ट्रीय कीर्तन' असे म्हटले गेले. (२) ही कीर्तने नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केली जात असत. (३) नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांच्या आधारे राष्ट्रीय कीर्तनातून समाजप्रबोधन केले जाते. (४) वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी राष्ट्रीय कीर्तनाची सुरुवात केली.
------------------------------------------------------------------------


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण) (९) बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगून, या खेळाची माहिती लिहा.
 उत्तर : (१) बाहुल्यांच्या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत. राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला 'कठपुतली' असे म्हणतात. या बाहुल्या प्रामुख्याने लाकडी असून त्यावर कापड व कातडे यांचा वापर केला जातो. दाक्षिणात्य बाहुल्या आकाराने मोठ्या असतात. (२) राजस्थानी पद्धतीत ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगांवर भर असतो; तर दाक्षिणात्य पद्धतीत पौराणिक प्रसंगांना प्राधान्य असते. (३) लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर बाहुल्या बनवण्यासाठी केला जातो. (४) कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. बाहुल्यांना काळ्या धाग्याने जोडून प्रेक्षकांना न दिसेल अशा पद्धतीने कलाकार बोटांच्या हालचालींनी बाहुल्यांना नाचवत असतो. सूत्रधार बोलेल त्याप्रमाणे बाहुल्यांची हालचाल व नृत्य होते.(५) लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा कल्पकतेने वापर केला जातो. बाहुल्यांचे छाया-बाहुली, हात-बाहुली, काठी बाहुली व सूत्र - बाहुली असे प्रकार आहेत. उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा अनेक राज्यांत कठपुतळीचा खेळ कलावंत सादर करीत असतात.
 ------------------------------------------------------------------------

(२) भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा.
 उत्तर : भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल पुढीलप्रमाणे झाली. (१) चलत्चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले. (२) भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे; कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट तयार केला.(३) पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व भारतात केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट तयार त्यांनी पुढे अनेक अनुबोधपटही तयार केले. प्रक्रि (४) आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने-कॅमेरा केला. त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजि असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटाम राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला. (५) कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रण निर्मात्या: तर कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणान्य पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतूनही चित्रपटनिर्मि झाली. (६) प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तार राजकमल प्रॉडक्शन, नवकेतन, आर. के. स्टुडिओज अशा कंपन्यांन उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. १९६१ ते १९८१ हा काळ भारतीय चित्रपटांचे 'सुवर्णयुग' मानला जातो.

------------------------------------------------------------------------
जानेवारी ०७, २०२४

dahavi-itihas v rajyashastra ५ भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने

                                  ५ .भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने






पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
(१) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
  उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण (१) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. (२) लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. (३) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.
-----------------------------------------------------------------------

(२) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण - (१) जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या. (२) यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी, म्हणजेच डाव्या उग्रवादयांची चळवळ सुरू झाली. (३) परंतु, मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकार- विरोधात हिंसक कारवाया करू लागली, पोलिसांवर हल्ले करू लागली. हिंसेलाच अधिक महत्त्व आले. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
-----------------------------------------------------------------------

 (३) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण - (१) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते. (२) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो. (३) बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.(३) शासनव्यवहारात जनतेचा सहभाग वाढतो. (४) त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते, लोकशाही शासनपद्धतीत सत्तेच्या विकेंद्रीकरणाला खूप महत्त्व असते.
-----------------------------------------------------------------------

(२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण.
उत्तर : (१) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते. (२) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. (३) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात. (४) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते.
-----------------------------------------------------------------------
थोडक्यात टिपा लिहा (प्रत्येकी २ गुण)
 (१) डावे उग्रवादी.

 उत्तर : (१) भूमिहीन यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली. (२) या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या 'विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते. (३) सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.. (४) शेतकरी आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.
 
-----------------------------------------------------------------------

  (२) भ्रष्टाचार.
 उत्तर : (१) कायदयानुसार, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात. (२) भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो, असे नाही; तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. (३) अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच. (४) भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत प्रस्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरोल लोकांचा विश्वास उडू शकतो.

-----------------------------------------------------------------------

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी २ गुण)
(१) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
उत्तर : भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे (१) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. (२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. (३) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. (४) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे
-----------------------------------------------------------------------

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम ?
 उत्तर : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात. (१) राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते. (२) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते. (३) दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो. (४) सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.

-----------------------------------------------------------------------

(३) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?
 उत्तर : राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात - योजना नवाद रणाचे रीकरण आव्हाने (१) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.. (२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. (३) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते. (४) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.
 -----------------------------------------------------------------------

(४) वाढत्या भ्रष्टाचाराचे कोणते परिणाम होतात ?
उत्तर : भ्रष्टाचार वाढत गेल्यास, त्याचे पुढील परिणाम होतात. (१) राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर भ्रष्टाचार वाढून सरकारची कार्यक्षमता कमी होते.(२) सरकारी कामे पूर्ण होण्यास बराच विलंब होतो. (३) सार्वजनिक सोई व सुविधा यांची गुणवत्ता घसरते. (४) वाढत्या घोटाळ्यांमुळे लोकशाही व्यवस्थेबद्दल लोकांत अविश्वासाची आणि असमाधानाची भावना निर्माण होते. (५) लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडून देशात अराजक माजू शकते..
-----------------------------------------------------------------------

(५) जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?
उत्तर : जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत (१) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे. (२) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे. (३) केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे. (४) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.

-----------------------------------------------------------------------

(६) लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे
 उत्तर : लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी पुढील सुधारणांची आवश्यकता आहे. (१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता ही मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. (२) सामाजिक संस्थांना स्वायत्तता देऊन सर्व समाजघटकांचे सामीलीकरण करणे. (३) सर्व नागरिकांचे सक्षमीकरण करणे. (४) निष्पक्षपाती निवडणुका, स्वतंत्र न्यायालये यांची तरतूद करून जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही निर्माण करणे.
 -----------------------------------------------------------------------


(७) लोकशाही मजबूत होण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना राबवल्या आहेत ?
 उत्तर : लोकशाही मजबूत होण्यासाठी भारताने पुढील उपाययोजना राबवल्या आहेत (१) सत्तेचे विकेंद्रीकरण. (२) सत्तेत वाटा मिळण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांना व महिलांना आरक्षण. (३) शासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, ग्राम समृद्धी योजना असे अनेक उपक्रम राबवले जातात. (४) समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांचा संविधानाने केलेला स्वीकार.
-----------------------------------------------------------------------

तुमचे मत मांडा : (प्रत्येकी २ गुण) (९) शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास कार्य होईल, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर : शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास पुढील गोष्टी होतील, असे मला वाटते- (१) शासनाच्या सार्वजनिक धोरणांत बदल होऊन ते व्यापक होईल. (२) समाजातील सर्व घटकांत सुसंवाद निर्माण होऊन, सत्तेवर न आलेल्यांशीही वैचारिक देवाणघेवाण होईल. (३) शासनाच्या कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचारासारख्या समस्या कमी होतील. (४) व्यापक जनहिताच्या योजना आखल्या जाऊन कोणत्याही घटकाला आपल्यावर अन्याय होतो आहे किंवा दुर्लक्ष होत आहे असे वाटणार नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही निर्माण होईल.
-----------------------------------------------------------------------


(२) बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा झाल्यास, कोणात्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील ? 
 उत्तर : (१) लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या मार्गाने संसद आणि विधिमंडळे या लोकशाही संस्था अस्तित्वात येतात. या संस्थांमार्फत 'सरकार' ही संस्था निर्माण होते. (२) स्थानिक कारभार करण्यासाठी स्थानिक शासनसंस्था निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वात येतात. (३) लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना संविधानाद्वारे स्वातंत्र्य, न्याय, समता इत्यादींबाबत अधिकार मिळतात. (४) या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायसंस्था असतात. बिगर लोकशाही व्यवस्थेत या संस्था नसतात व असल्या तरी त्यांना अधिकार नसतात. म्हणून अधिकार असणाऱ्या अशा संस्था निर्माण कराव्या लागतील.
 
-----------------------------------------------------------------------

(३) लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का ? 
उत्तर : (१) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक असते. (२) पक्षाचा अध्यक्ष, खजिनदार, सचिव या पदांच्या दर तीन वर्षांनी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून निवडणुका घ्याव्या लागतात. अन्यथा त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करतो.(३) या निवडणुकांमुळे पक्षावर एकाच व्यक्तीचे नियंत्रण राहत नाही. (४) त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही टिकून राहते. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात.

-----------------------------------------------------------------------

(४) आर्थिक सुधारणा स्वीकारूनही चीनमध्ये एकाच पक्षा वर्चस्व कसे ? 
उत्तर : (१) १९४९ मध्ये चीनमध्ये साम्यवादी राज्यक्रांती झाली. चीनच्या साम्यवादी पद्धतीत 'कम्युनिस्ट' या एकाच पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. (२) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षांतर्गत निवडणुकांद्वारे निवड होते. (३) चीन स्वतःला लोकशाही राज्य म्हणवून घेतो; परंतु तेथे कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय हुकूमशाहीच आहे. (४) चीनने देशात आर्थिक सुधारणा स्वीकारल्या; तसेच जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्वही स्वीकारले. परंतु ही चीनची आर्थिक नीती झाली. लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांना मिळणारे अधिकार मात्र 'चिनी नागरिकांना नाहीत.

-----------------------------------------------------------------------

(५) तुम्हांला काय वाटते?  राजकारणात घराणेशाही असावी का ?
 उत्तर : (१) लोकशाही व्यवस्थेत घराणेशाहीला स्थान नसते. (२) लोकशाहीत जनतेकडून निवडलेले प्रतिनिधी विशिष्ट कालमर्यादेत राज्यकारभार करतात. अपात्र किंवा अकार्यक्षम प्रतिनिधींना जनता पुन्हा निवडून देत नाही. (३) एकाच कुटुंबाच्या हाती सत्ता असेल तर लोकशाहीचा संकोच होतो. सामान्य जनतेला सत्तेत वाटा मिळत नाही. (४) घराणेशाहीत अकार्यक्षम व्यक्ती निर्माण झाल्यास जनतेचे अहित होईल; म्हणून राजकारणात घराणेशाही नसावी, असे मला वाटते.

-----------------------------------------------------------------------
जानेवारी ०७, २०२४

dahavi-itihas v rajyashastra 3-राजकीय पक्ष

 3-राजकीय पक्ष  





प्र. २ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी २ गुण)
 (१) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून करतात.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण- (१) राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनाप पोहोचवण्याचे कार्य करतात. (२) शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहित जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. (३) या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
--------------------------------------------------------------------------

  (२) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
   उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण- (१) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात; म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात. (२) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करोत असतात. (३) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.
------------------------------------------------------------------------

(३) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण- (१) १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न 'मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.(२) पक्षांचा आपापला कार्यक्रम भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले (३) १९७७ च्या जनता पक्षाचा प्रयोग कल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण खोटा ठरला आहे.
---------------------------------------------------------------------------

 (४) 'शिरोमणी अकाली दल' हा राष्ट्रीय पक्ष आहे.
  उत्तर : हे विधान चूक आहे; कारण- (१) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्य निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देश असतो. (२) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो. (३) शिरोमणी अकाली दल हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
--------------------------------------------------------------------------

पुढील संकल्पना स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
 *(१) प्रादेशिकता
.
 *उत्तर : (१) भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. (२) भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते. (३) प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. (४) आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात
 
------------------------------------------------------------------------

(२) राष्ट्रीय पक्ष

 उत्तर : राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत- (१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा (२) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक. किंवा (३) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------

(३) प्रादेशिक पक्ष.
उत्तर : (१) विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना 'प्रादेशिक पक्ष' असे म्हणतात. (२) या पक्षांचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी, असा या पक्षांचा आग्रह असतो. (३) आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत. (४) प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून होत आहे.
--------------------------------------------------------------------------

थोडक्यात टिपा लिहा : (प्रत्येकी २ गुण) ए च पक्ष
 (१) पक्षपद्धती

 उत्तर : (१) ज्या देशात दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता असते आणि अन्य पक्षांचे अस्तित्व नसते किंवा त्यांचा प्रभाव नसतो त्या पद्धतीला 'एकपक्षीय पद्धती' असे म्हणतात मीन- मध्ये ही पद्धती अस्तित्वात आहे. (२) काही देशांत दोन पक्ष प्रभावी असतात व ते आलटून- पालटून स्वतंत्रपणे सत्तेवर येतात. तेव्हा त्या पद्धतीला द्विपक्ष पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती अमेरिका, इंग्लंड येथे आहे. (३) जेथे अनेक पक्ष अस्तित्वात असून ते एकमेकांशी सत्तास्पर्धा करतात, सर्वांचा कमी-अधिक राजकीय प्रभाव असतो; अशा पद्धतीला 'बहुपक्षीय पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती भारतात आहे. (४) बहुपक्षीय पद्धतीमध्येच लोकशाही विकसित होते.
 
--------------------------------------------------------------------------
 (२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
 उत्तर : (१) १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. (२) भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी सर्वसमावेशक अशी एक चळवळ, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरुवातीचे स्वरूप होते. (३) या संघटनेत विविध विचारसरणींचे गट स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्देशाने एकत्र आलेले होते. (४) स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा पक्ष चार दशके एक प्रभावी पक्ष म्हणून केंद्र व राज्यांत सत्तेवर होता. त्यानंतर या पक्षाचा प्रभाव कमी होत २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तो केंद्र सत्तेतून बाहेर फेकला गेला.
-----------------------------------------------------------------------------

(३) भारतीय कम्युनिस्ट पक्ष,
उत्तर : (१) १९२५ साली स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला आहे. (२) हा पक्ष मजूर, कष्टकरी वर्ग यांच्या हितासाठी काम करतो. (३) या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध असून, कामगारांचे हित पाहणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. (४) पक्षात झालेल्या वैचारिक मतभेदातून १९६२ साली या पक्षात फूट पडून बाहेर पडलेल्या नेत्यांनी 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा'ची स्थापना केली

------------------------------------------------------------------------
. (४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
. उत्तर : (१) १९९९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. (२) लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये हा पक्ष महत्त्वाची मानतो. (३) स्थापनेनंतर हा राष्ट्रीय पक्ष युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) गटात सामील झाला.

-------------------------------------------------------------------------

(५) तृणमूल काँग्रेस,

 उत्तर : (१) १९९८ मध्ये ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस २०१५ पक्षाची स्थापना झाली. (२) भारतीय निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय पक्ष म्हणून २०१६ साली या पक्षाला मान्यता दिली. (३) लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करणे ही या पक्षाची धोरणे आहेत. (४) सध्या  पश्चिम बंगाल या राज्यात हा पक्ष सत्ताधारी आहे.
 -------------------------------------------------------------------------

(६) शिवसेना.
उत्तर : (१) महाराष्ट्रात १९६६ साली शिवसेना हा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला. (२) मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे ही या पक्षाची उद्दिष्टे आहेत. (३) महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावाला या पक्षाचा विरोध आहे. (४) १९९५ साली भारतीय जनता पक्षाशी युती करून हा पक्ष महाराष्ट्रात तर १९९८ ते २००४ पर्यंत केंद्रात सत्तेत सहभागी होता. २०१४ पासून पुन्हा हा पक्ष केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत सहभागी आहे.
--------------------------------------------------------------------
(क) शिरोमणी अकाली दल,
उत्तर : (१) १९२० मध्ये पंजाब राज्यात शिरोमणी दलाची स्थापना झाली. (२) पंजाबमधील हा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. (३) धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास हा प्राधान्य देतो. (४) पंजाबमध्ये हा पक्ष अनेक वर्षे सत्तेत होता. केंद्रातील एनडीए सरकारसोबत तो सध्या सत्तेत सहभागी आहे.
----------------------------------------------------------------------

 (८) द्रविड मुन्नेत्र कळघम.
 उत्तर : (१) तमिळनाडूतील जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे १९४४ मध्ये जस्टीस पार्टी द्रविड कळघम असे राजकीय पक्षात रूपांतर झाले. (२) १९४९ मध्ये या पार्टीतून एक गट फुटून त्याने द्रविड मुन्ने कळघम हा पक्ष स्थापन केला. १९७२ मध्ये त्यातील एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. (३) तमिळ अस्मिता जोपसण्याचे काम या प्रादेशिक पक्षाने केले. (४) सामान्य जनतेच्या हितासाठी या पक्षाने अनेक योजना राबवल्या आहेत. सर्व स्तरांवरील मतदारांचा पाठिंबा या पक्षाला मिळाल्याने दीर्घकाळ तो तमिळनाडूच्या व काही काळ केंद्रा आघाडीतही सत्तेत होता.
--------------------------------------------------------------------------
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्र. (प्रत्येकी २ गुण) भारतीय
 * (१) राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

 * उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे- (१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.. (२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. (३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो. (४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. (५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
-------------------------------------------------------------------------
 * (२) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत ?
 * उत्तर : भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले- (१) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. (२) १९७७ साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.

---------------------------------------------------------------------------
(३) 'पक्षाचा जनाधार कशास म्हणतात ?
 उत्तर : (१) प्रत्येक पक्ष विशिष्ट विचारसरणी स्वीका स्थापन होत असतो. (२) सार्वजनिक प्रश्नांबाबतही राजकीय पक्ष विशिष्ट भूमिका के असतात. (३) आपली विचारसरणी आणि सामाजिक प्रश्नांबाबतची भूमि हे पक्ष विविध कार्यक्रमांतून लोकांपर्यंत नेत असतात. (४) त्यांची भूमिका व विचारसरणी योग्य वाटली तरच लोक पक्षांना पाठिंबा देतात. या पाठिंब्यालाच 'पक्षाचा जनाधार' म्हणतात.
---------------------------------------------------------------------------
 (४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा
 . उत्तर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत- (१) धर्मनिरपेक्षता आणि सर्वांगीण विकास साधणे. (२) दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी स हक्क आणि व्यापक समाजकल्याण हे उद्दिष्ट गाठणे. (३) लोकशाही समाजवाद अस्तित्वात आणणे. (४) आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांज विश्वास.
---------------------------------------------------------------------------
(५) भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करा
उत्तर : १९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाची भूमिका (१) प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे जतन करणे, (२) बलशाली व वैभवसंपन्न असा भारत निर्माण करणे, (३) देशाच्या आर्थिक सुधारणांवर भर देऊन भारताचा विकास करणे.
---------------------------------------------------------------------------

(६) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची धोरणे स्पष्ट करा.
उत्तर : १९६२ साली स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पुढील धोरणे आहेत- (१) धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. (२) समाजवादी सत्ता प्रस्थापित करणे, हे या पक्षाचे ध्येय आहे. (३) कामगार, शेतकरी, शेतमजूर या कष्टकऱ्यांच्या हितांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. (४) साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे.
-------------------------------------------------------------------
(७) बहुजन समाज पक्ष कोणत्या उद्दिष्टांनी स्थापन झाला ? 
उत्तर : बहुजन समाज पक्ष पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थापन झाला- (१) समाजवादी विचारसरणी अस्तित्वात आणणे. (२) बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे. (३) दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य या बहुजन समाजांचे हित साधणे.
---------------------------------------------------------------------
(२) प्रादेशिक पक्ष कोणत्या बाबतीत आग्रही असतात ?
 उत्तर : प्रादेशिक पक्ष पुढील बाबतींत आग्रही असतात- (१) आपल्या प्रदेशातील समस्यांना प्राधान्य दिले जाऊन प्रदेशाचा विकास व्हावा. (२) प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या जाव्यात. (३) प्रदेशाची सत्ता त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. (४) प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशातील रहिवाशांनाच अग्रक्रम व प्राधान्य दयावे
--------------------------------------------------------------------------
. (१) प्रादेशिक पक्षांच्या स्वरूपात कोणते महत्त्वपूर्ण बदल दिसतात ?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळापासून अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक याच्या स्वरूपात पुढील बदल झालेले दिसतात- (1) स्वातंत्र्योत्तर काळात प्रादेशिक अस्मितांमधून द्रविडस्थान, वॉलस्थान यांसारख्या फुटीर चळवळी होऊन स्वतंत्र देश निर्माण प्रयत्न प्रादेशिक पक्षांकडून झाले.(२) त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिका बदलून स्वतंत्र राज्यांऐवजी राज्याला अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. (३) त्यानंतरच्या काळात आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या राज्यातील रहिवाशांना राज्यात व केंद्रात सत्ता मिळावी, अशी भूमिका प्रादेशिक पक्ष घेऊ लागले. (४) ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांनी फुटीरतेची मागणी सोडून आत्ता स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली आहे. येथील प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय प्रवाहात येऊ लागले आहेत.
-----------------------------------------------------------------------
(१०) आसाम गण परिषदेची उद्दिष्टे लिहा.
 उत्तर : १९८५ साली स्थापन झालेल्या आसाम गण परिषदेची पुढील उद्दिष्टे आहेत (१) आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे. (२) आसामच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. (३) आसामातील निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. (४) आसामच्या सर्वांगीण विकासासाठी १९८५ साली सरकारशी वाटाघाटी करून 'आसाम करार' करण्यात आला.
---------------------------------------------

(११) प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत ?
उत्तर : प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष लागू केले आहेत- (१) लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६ टक्के मते आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक किंवा (२) विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान ३ टक्के जागा किंवा विधानसभेत किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक आहे.
---------------------------------------------

 (१२) राजकीय पक्ष कोणती कामे करतात ?
 उत्तर : राजकीय पक्ष पुढील कामे करतात- (१) आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात. (२) सत्ता मिळाल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. (३) जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे व योजना जनतेपर्यंत नेतात. (४) शासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात.
---------------------------------------------
आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल?
• उत्तर : आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, त्याविरोधात विरोधी पक्षनेता म्हणून मी पुढील बाबी करीन- (१) सभागृहात सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरीन. सरकारच्या कामातील त्रुटी, सरकारचे दुर्लक्ष या बाबी दाखवून देईन.. (२) आरोग्य क्षेत्रात सरकारने काय केले नाही व काय करायला पाहिजे याबाबत वृत्तपत्रांतून लेख लिहून लोकांना जागृत करीन. (३) वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देऊन सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढीन. (४) जनतेला जागृत करण्यासाठी सभांचे, मोर्चाचे आयोजन करून जनआंदोलन उभारीन.
----------------------------------------------------------------------

आधुनिक काळात विहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल ?
 उत्तर : पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर पुढील बाबी केल्या पाहिजेत असे मला वाटते- (१) सर्व राजकीय पक्ष कायदयाने रद्द करावेत. (२) राज्यकारभाराबाबत लोकांनीच निर्णय घ्यावेत व त्यासाठी लोकशिक्षण करावे. (३) निर्णय घेण्यासाठी लोकांची क्षमता वाढवावी व त्यासाठी त्यांना राजकीय शिक्षण द्यावे. (४) समाजाचा आणि जे नेतृत्व करू पाहतात त्यांचा नैतिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे. (५) प्रत्यक्ष लोकशाही पद्धत आणावी, त्यासाठी लोकशाहीस आवश्यक असणारा मानवी स्वभाव तयार होणे आवश्यक आहे. (६) लोकसमित्या स्थापन कराव्यात. (७) शासनव्यवस्थेत विकेंद्रीकरणावर भर द्यावा. या सर्व बाबी करणे वाटते तेवढे सोपे नसून व्यावहारिकही नाही.
---------------------------------------------------------------------------
  • वर्तमानपत्रातील या बातम्यांवरून काय समजले ? 
(अ) सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार!
  • उत्तर : (१) सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.(२) विरोधी पक्ष जागृत आहेत व ते सामाजिक प्रश्न सोडवण्या आपापले मतभेद विसरून एकत्र आले आहेत. (३) सत्ताधारी पक्षाची अडवणूक करून सामाजिक प्रश्न सो हे विरोधी पक्षांचे कामच असते. (४) ते काम हे पक्ष एकत्रितपणे करीत असल्याचे या बातमीतून जाणवते. (ब) सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. उत्तर : (१) आपला पक्ष सामान्य जनतेत लोकप्रिय व्हावा व त्याचा प्रभाव खोलवर रुजावा म्हणून प्रत्येक पक्ष विविध मार्गांनी प्रयत्न करीत असतो. (२) ग्रामीण भागात प्रसारमाध्यमे मर्यादित असल्याने त्या जनतेशी थेट संवाद साधणे हा सत्ताधारी पक्षाचा यामागे एक हेतू असावा. (३) ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाने संवादयात्रांचे आयोजन केल्याचे जाणवते. सामान्य जनतेच्या अडचणी, भावना व मते समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असते. सत्ताधारी पक्षच हा संवाद साधत असल्याने, लोकांमध्येही सरकारबद्दल विश्वास निर्माण होतो. (४) सत्ताधारी पक्ष आपली कर्तव्ये योग्य तऱ्हेने पार पाडत असल्याचे या बातमीवरून जाणवते. सरकार आपल्याबाबतीत संवेदनशील आहे, या जाणिवेतून जनतेत सरकारविषयी विश्वसनीयता वाढीस लागेल.

-----------------------------------------------------------------------

जानेवारी ०७, २०२४

dahavi- itihas v rajyashastra ४ सामाजिक व राजकीय चळवळी

               ४ सामाजिक व राजकीय चळवळी



पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी २ गुण)
  (१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
   उत्तर : हे विधान बरोबर आहे;

   कारण - (१) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. (२) सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात. (३) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. (४) शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
------------------------------------------------------------------------

 (२) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
 उत्तर : हे विधान चूक आहे

; कारण - - (१) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. (२) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. (३) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
------------------------------------------------------------------------
(३) 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
उत्तर : हे विधान बरोबर आहे;

कारण (१) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. (२) भेसळ वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, 3) वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड दयावे लागते. (३) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६) साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी (ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
------------------------------------------------------------------------

(५) चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाि असतो. आज
हे विधान बरोबर आहे

 कारण - (१) चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले असते. (२) लोकांच्या प्रश्नांशी निगडित असणाऱ्या चळवळीसच लोक देतात. (३) लोकांच्या हिताच्या समस्या निवडून निश्चित कार्यक्रम ठरवून धारे जनसंघटन करण्याची गरज असते. यासाठी कोणतीही वळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो.
 
------------------------------------------------------------------------
(६) डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने जाते.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे;

 कारण (१) राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी - पुनरुज्जीवित केल्या. (२) 'तरुण भारत संघ' ही संघटना स्थापून शेकडो गावांमध्ये म्हणजे मातीचे बंधारे घालून नदया अडवल्या. (३) देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नदया वित करणे अशा मोहिमा राबवल्या. (४) डॉ. राणा यांनी देशभर ११ हजार 'जोहड' बांधले. सतत || वॉ केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना 'भारताचे जलपुरुष' या ओळखले जाते.
------------------------------------------------------------------------

पुढील संकल्पना स्पष्ट करा : (२ गुण)
  चळवळ.
  उत्तर : (१) एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात; तेव्हा तिला 'चळवळ' असे म्हणतात. (२) चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात.. (३) सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठीच चळवळी होतात असे नाही; तर शासनाच्या काही निर्णयांना वा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी होतात. (४) धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता, वाईट प्रथा-परंपरा इत्यादी विविध विषयांतील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात.

-----------------------------------------------------------------------

थोडक्यात दिया लिहा :
(१) आदिवासी चळवळ  प्रारंभापासूनच जंगली 

उत्तर : (१) आदिवासी उदरनिर्वाह करणारा समाज आहे. (२) ब्रिटिशांनी आदिवासीच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोड, संथाळ, मुंडा यांसारख्या आदिवासीनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते. (३) स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. (४) वनजमिनींवरील त्यांचे हक्क, वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत.

------------------------------------------------------------------------
(२) कामगार चळवळ.
 उत्तर : (१) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उदयोग सुरू झाले. या औदयोगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. (२) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. (३) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. (४) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

------------------------------------------------------------------------

(१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा,
उत्तर : (१) पर्यावरणाचा हास ही केवळ भारताचीच नव्हे; तर जागतिक समस्या बनली आहे. (२) पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या. (३) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत. (४) 'चिपको' सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, 'नमामि गंगे' सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, वैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.
------------------------------------------------------------------------
(२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
 उत्तर : (१) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. (२) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. (३) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.. (४) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
 ------------------------------------------------------------------------

(३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री-चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

  उत्तर : स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या (१) स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा. (२) स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे.(३) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. (४) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

------------------------------------------------------------------------

(४) 'चळवळी'ची वैशिष्टये स्पष्ट करा. 

उत्तर : (१) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो. (२) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते.. (३) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते. (४) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात. (५) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीचा निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.
------------------------------------------------------------------------

(५) चळवळींमधून कोणते प्रश्न हाताळले जातात ?
उत्तर : सार्वजनिक प्रश्नांमधून चळवळी उभ्या राहतात. हे प्रश्न सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकतात. (१) नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, स्वातंत्र्य अशा प्रश्नांसाठी राजकीय चळवळी होतात. (२) किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता, रोजगार, स्वदेशीचा वापर अशा आर्थिक प्रश्नांवर चळवळी होतात. (३) समाजातील अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता, भेदभाव अशा सामाजिक प्रश्नांवर चळवळी होतात. (४) भाषेवरील प्रदेशावरील अन्यायाविरोधात, स्वच्छता, पर्यावरण, शुद्धीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती अशा विविध प्रश्नांवरही चळवळी होतात.

------------------------------------------------------------------------
(६) कामगार चळवळीच्या प्रमुख मागण्या कोण आहेत? 

उत्तर : पुढील प्रश्न सोडवले जावेत, या कामगार प्रमुख मागण्या आहेत (१) कंत्राटी कामगार पद्धती व अस्थिर रोजगार.. (२) आर्थिक असुरक्षितता व कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता. (३) कामाचे अमर्याद तास आणि अनारोग्य. (४) कामगार कायदयांचे संरक्षण नसणे.
------------------------------------------------------------------------

(७) स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदललेले उद्देश सांगा.
 उत्तर : (१) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायकारक प्रथा नष्ट करून सुधारणा करणे हा स्त्रियांच्या चळवळीचा व राजकीय चळवळी(२) स्वातंत्र्योत्तर काळात संविधानाने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समानाधिकार दिले. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांना समाजात समान वागणूक दिली जात नव्हती. (३) त्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे, हे स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट बनले. (४) स्त्रियांना माणूस म्हणून दर्जा मिळावा, त्यांना समान हक्क मिळावेत हे स्त्री-चळवळीचे उद्देश आहेत.
------------------------------------------------------------------------

(८) स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्री-विषयक कोणत्या प्रश्नांची दखल घेतली गेली ?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात देशात विविध ठिकाणी झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने पुढील स्त्रीविषयक प्रश्नांची दखल घेतली गेली (१) स्त्रियांचे आरोग्य व त्यांचे शिक्षण. (२) स्त्रियांचे स्वावलंबन व त्यांचे सक्षमीकरण. (३) स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता.. (४) माणूस म्हणून मिळणारा दर्जा व त्यांची प्रतिष्ठा.

------------------------------------------------------------------------
(९) विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हायचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशात कोणत्या सक्रिय चळवळी झाल्या ? 

 उत्तर : विविध कारणांनी विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून कधी अल्पकाळ, तर कधी दीर्घकाळ चळवळी केलेल्या आहेत. (१) 'नर्मदा बचाव आंदोलन' ही सर्वात गाजलेली चळवळ. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांतील धरणग्रस्तांनी ही चळवळ २८ वर्षे चालवली आहे. (२) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबा धरण विस्थापितांनी ३२ वर्षे पुनर्वसनासाठी चळवळ केली. (३) दहशतवादाने विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचा पुनर्वसनासाठीचा लढा आजही चालू आहे. (४) नियोजित मुंबई-नागपूर महामार्ग किंवा पुरंदरमधील नियोजित विमानतळ यामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी आंदोलने केली. देशभर अशी अनेक आंदोलने वा चळवळी चालू असतात. 

------------------------------------------------------------------------

(११) शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाने कोणत्या योजना राबवल्या आहेत ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १४)
उत्तर : शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांपैकी काही योजना पुढीलप्रमाणे - (१) राष्ट्रीय कृषी विकास योजना (२) राष्ट्रीय अन्न संरक्षण व शेती विपणन पायाभूत सुविधा योजना (३) शेती फलोत्पादन योजना (४) एकात्मिक शेती योजना (५) जलयुक्त शिवार योजना (६) इंदिरा गांधी निराधार व शेतमजूर महिला अनुदान योजना (७) भूमिहीन शेतमजूर सबळीकरण व स्वाभिमान योजना (८) पीक विमा योजना इत्यादी. (टीप : या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाठात मजकूर दिलेला नाही.)
------------------------------------------------------------------------

(१२) 'कोणत्याही एक निश्चित विचारसरणी असते 'हे विधान स्पष्ट करा. (चर्चा करा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १२)
 उत्तर : (१) एखादा समाजहिताचा प्रश्न घेऊन चळवळी होत असल्या तरी प्रत्येक चळवळीमागे एक निश्चित विचारसरणी असते. (२) बालविवाह, हुंडा पद्धती अशा प्रथांविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळींमागे सामाजिक विचारांचे भान असते. (३) 'बेटी बचावो, बेटी पढावो', महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यासाठी होणाऱ्या चळवळीमागे सामाजिक समता, अन्यायपीडितेला संरक्षण हा विचार असतो. (४) स्वच्छता अभियान, चिपको आंदोलन, वृक्ष संवर्धन अशा चळवळी पर्यावरण संरक्षणासाठी तसेच मानवसेवा, संरक्षण यासाठीही केल्या जातात. लोकशाही, समता, बंधुत्व, मानवता अशा मूल्यांवर या चळवळींचा विश्वास असतो. अशा रीतीने प्रत्येक चळवळीमागे व्यापक विचारसरणी असते.
------------------------------------------------------------------------

तुमचे मत मांडा: (प्रत्येकी २ गुण)

 (१) विविध चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास स अधिक वाढेल, असे तुम्हांला वाटते का?
उत्तर : (१) विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत समाजात विविध चळवळी होत आलेल्या आहेत. या चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास त्यांचा प्रभाव अधिक वाढेल, असे मला वाटते, (२) सहकार्यामुळे समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठीचे खात्रीलायक उपाय शोधणे सोपे जाईल.. (३) परस्पर सहकार्यामुळे मनुष्यबळ विभागले जाणार नाही. कामाचे विभाजन होऊन श्रमशक्ती वाचेल. चळवळी अधिक प्रभावी परिणाकारक होतील. (४) समस्या याही एकमेकींशी निगडित असतात. एकीतून दुसरी समस्या निर्माण होते. म्हणूनच चळवळींनी परस्परांना सहकार्य करावे.

------------------------------------------------------------------------
 (२) भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्दयांबाबत आहेत ? 
 उत्तर: अनेक कारणांमुळे लोकांचे देशांतर्गत स्थलांतर होत असते. बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन गंच्या चळवळी उभ्या राहतात. त्यातील प्रमुख मुद्दे
 (१) भूमिपुत्रांच्या रोजगारांवर गंडांतर येते
 .(२) जमिनी बळकावल्या जातात.
 (३) जागांच्या किमती वाढतात.
 (४) भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावून घेतले जातात.
  (५) भूमिपुत्रांच्या भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण होते.
  (६) भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारीबरोबरच राजकीय प्रभावी कमी होतो

------------------------------------------------------------------------