Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
आठवी सामान्य विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवी सामान्य विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २० डिसेंबर, २०२०

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट १३, २०२०

इयत्ता आठवी, सामान्य विज्ञान,4. धाराविद्युत आणि चुंबकत्व

    4. धाराविद्युत आणि चुंबकत्व


प्रश्न 1 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा : 
(1) विद्युतप्रवाह, विद्युतप्रभार व वेळ (कालावधी) यांच्या SI एककांमधील संबंध सांगा. 
उत्तर :1 ampere = 1 coulomb/1 second. 
 (2) कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र कशाचे बनवलेले असते?
 उत्तर : कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र ग्रॅफाईट चे बनवलेले असते.

 (3) धातूमध्ये विद्युतप्रवाह कोणत्या कणांच्या वहनामुळे वाहतो?
 उत्तर : धातूमध्ये विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉन्सच्या वहनामुळे वाहतो.

(4) बॅटरी म्हणजे काय?
 उत्तर : बॅटरी म्हणजे जास्त विभवांतर मिळवण्यासाठी केलेली विद्युतघटांची एकसर जोडणी होय.

 (5) सौरघट म्हणजे काय? 
उत्तर : सौरघट म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय.

 (6) निकेल-कॅड्मिअम घटाचे एक वैशिष्ट्य सांगा. 
उत्तर : निकेल-कॅड्मिअम घट पुन्हा प्रभारित करता येतो. 

(7) धाराविद्युतच्या चुंबकीय परिणामावर ज्याचे कार्य आधारित आहे अशा एका उपकरणाचे नाव सांगा.
 उत्तर : विद्युत घंटा.
 

ऑगस्ट १३, २०२०

इयत्ता आठवी, सामान्य विज्ञान,2.आरोग्य व रोग

            2.आरोग्य व रोग


प्रश्न 1- एक ते दोन वाक्यांत उत्तरे लिहा : (1) संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम कोणकोणते? 
उत्तर : दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक व प्राणी यांसारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत. 

(2) असंसर्गजन्य रोगांची या पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हांला सांगता येतील? 
उत्तर : दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश (अल्झायमर), उच्च रक्तदाब, अर्धशिशी (मायग्रेन) इत्यादी.

 (3) मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? 
उत्तर : अयोग्य जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार विहार, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त मानसिक ताण तणाव, संप्रेरकांचे अनियमित स्वणे इत्यादी मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत. 

(4) डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो व तो कसा पसरतो? 
उत्तर : डेंग्यू हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1, 2 या विषाणूंमुळे होतो. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो.

 (5) स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारणे लिहा ?
उत्तर : स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा ए (H1N1) या विषाणूंमुळे होतो. त्याचा वाहक डुक्कर असतो, संसर्ग डुकरामुळे तसेच माणसाद्वारे होतो. या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून आणि नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होतो.

(6) स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती?
 उत्तर : स्वाईन फ्लूची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत: धाप लागणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, घसा खवखवणे,. खूप ताप येणे आणि शरीर दुखणे. 

(7) एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा कोणात सापडला? 
उत्तर : एच आय व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला.

 (8) अर्बुद म्हणजे काय?
 उत्तर : अनियंत्रित पेशी विभाजनामुळे निर्माण होणाऱ्या कर्करोगाच्या पेशी समूह किंवा गाठ दुर्दम्य अर्बुद म्हणतात. 

(9) हृदयाची कार्यक्षमता कशी कमी होते? उत्तर : हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्याचा पुरवठा जेव्हा अपुरा होतो तेव्हा हृदयाची कार्यक्षमता कमी होते. 

(10) हृदयरोगावरील कोणकोणते उपचार आहेत?
 उत्तर : अॅन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, स्टेंटस् टाकणे, पेसमेकर बसवणे आणि हृदय प्रत्यारोपण हे हृदयरोगावरील उपचार आहेत. 


11) पंतप्रधान जनऔषध योजना म्हणजे काय? ही योजना कधी सुरू करण्यात आली?
उत्तर : 1 जुलै 2015 ला भारत सरकारने पंतप्रधान जन-औषध योजना जाहीर केली. या योजनेच्या अंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात.

(12) नेत्रदान कधी करता येते? याचा फायदा कोणता?
 उत्तर : कोणीही मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतो. आपल्या मृत सुहृद चे नेत्र नेत्रपेढीत पोहोचवल्यानंतर एखादया अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते.

प्रश्न 2- पुढील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा:
(1) डेंग्यू.
 उत्तर : डेंग्यू हा रोग एडीस या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो, फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन-1, 2 या विषाणू अशा डासामार्फत प्रसारित होतो. जेथे जेथे 26
पाणी साचून राहण्याची शक्यता असते, तेथे या डासांची पैदास होणार नाही ही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. एडीस डासाचे वास्तव्य मानव निर्मित टाक्यांत आणि स्वच्छ पाण्यात असते. त्यामुळे असे पाणी त्वरित काढून टाकावे किंवा झाकून ठेवावे. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा देखील डेंग्यू पासून रक्षण करण्याचा उपाय आहे. CYD-TDV किंवा डेंगवाक्सिया नावाची लस डेंग्यूवर उपाय म्हणून 2017 मध्ये तयार करण्यात आली आहे. परंतु तिचा अद्याप सुरक्षित वापर सुरू झालेला नाही.

 (2) कर्करोग.
उत्तर : कर्करोगजन्य पदार्थांचा आपल्याशी संपर्क न येऊ देणे हा महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी अशा कर्करोगास आमंत्रण देणाऱ्या पदार्थांपासून नेहमीच दूर राहावे. किरणोत्सार देखील कर्करोगकारक असतात. त्याचा संपर्क येऊ देऊ नये. आहारावर योग्य नियंत्रण ठेवणे, योग्य व्यायाम आणि मानसिक संतुलन ठेवणे हे आवश्यक उपाय आहेत. काही प्रकारच्या कर्करोगासाठी (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) लस उपलब्ध आहे.

 (3) एड्स.
उत्तर : रक्तपराधन करतांना अगोदर रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. वापरलेल्या सुया, सिरींजेस इत्यादी पुन्हा वापरू नयेत, रक्तावाटे एड्स रोग निर्माण करणारे HIV शरीरात जातात. त्यामुळे एड्सच्या प्रतिबंधासाठी या दक्षता घेणे आवश्यक आहे. असुरक्षित लैंगिक संबंध हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे एड्सच्या प्रतिबंधासाठी अशा बाबतीत कोणताही धोका पत्करू नये.

प्रश्न 3- महत्त्व स्पष्ट करा :
 (1) संतुलित आहार.
 उत्तर : ज्या आहारात सर्व पोषद्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही प्रकारचे रोग टाळता येतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी रोगांवर नियंत्रण मिळवता येते. शरीरातील सर्व कार्ये सुरळीत होतात आणि त्यामुळे आरोग्य राखले जाते.

(2) व्यायाम/योगासने.
उत्तर : व्यायाम आणि योगासने यांनी शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो. शरीराची लवचिकता राखली जाते. मानसिक ताण-तणाव कमी व्हायला मदत होते. निद्रानाश, संधिवात, अपचन अशा विकारांना काबूत ठेवता येते. व्यायामामुळे माणसे व्यसनांपासून दूर राहतात. योगासनांनी शरीरातील संप्रेरके, विकरे यांचे प्रमाण नियंत्रित राहते. श्वासावर नियंत्रण करून अनेक व्याधी दूर ठेवता येतात.
(3) जेनेरिक औषधे.
उत्तर : जेनेरिक औषधे ही सर्वसाधारण व्यक्तींना परवडतील अशी सामान्य औषधे असतात, ज्या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंटशिवाय केले जाते, त्यांना जेनेरिक औषधे असे म्हणतात. जेनेरिक औषधे बॅन्ड औषधांप्रमाणेच असतात. त्यांचा दर्जा देखील तसाच चांगला असतो. जेनेरिक औषधांतील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळतो. त्यामुळे अशा औषधांच्या संशोधनावरील खर्च वाचतो. म्हणून औषध बॅन्ड औषधांपेक्षा बरीच स्वस्त असतात.

(4) रक्तदान.
 उत्तर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. कारण त्यामुळे एखादयाचे प्राण वाचू शकतात. एका रक्तदात्याच्या एक युनिट रक्तामुळे एका वेळेला किमान तीन रुग्णांची गरज पूर्ण होते. रक्तातील तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तबिंबिका वेगळ्या करता येतात. त्यामुळे ज्या रुग्णाला जशी आवश्यकता असते त्याला तसा पुरवठा करता येतो. रक्त कृत्रिम पद्धतीने बनवता येत नाही. त्यामुळे रक्तदान हाच पर्याय रक्त मिळवण्यासाठी असतो. एखाद्या सुदृढ व्यक्तीने एका वर्षात चारदा रक्तदान केले तर 12 रुग्ण बचावले जातात.

 (5) हृदयरोगावर प्राथमिक उपचार. उत्तर : ज्या वेळी एखाद्या हृदयविकारामुळे हार्ट अॅटेंक येतो, त्या वेळी अतिशय जलद गतीने त्याला योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचा जीव वाचू शकतो. सर्वप्रथम 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवावी. रुग्ण शुद्धीवर आहे का ते तपासावे. त्याची नाडी किंवा हृदयाचे ठोके तपासल्यावर हे लक्षात येईल. त्याला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्धपद्धतीने कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट (C.O.L.S.) दयावा. यात रुग्णाच्या छातीवरदाब देऊन एका मिनिटाला 100 ते 120 वेळेला छातीच्या मध्यभागी दाब द्यावा. अशा दाबाची गती मिनिटाला किमान 30 वेळा असावी. यालाच हृदयरोगावरील प्राथमिक उपचार म्हणतात. याने डॉक्टरी मदत मिळण्याअगोदर रुग्णाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न करता येतात.