Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
सातवी इतिहास व नागरिकशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सातवी इतिहास व नागरिकशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

सप्टेंबर २७, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास व नागरिक शास्त्र, 7. स्वराज्याचा कारभार

         स्वराज्याचा कारभार




प्रश्न  ओळखा पाहू :

उत्तरे

(१) आठ खात्यांचे मंडळ            -  अष्टप्रधान मंडळ

(२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते   - हेर खाते

(३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग  -  सिंधुदुर्ग

(४) किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा  -   कारखानीस

(५) जमीन महसुलाची व्यवस्था पाहणारा अधिकारी  -  अण्णाजी दत्तो

(६) पायदळ आणि घोडदळाचा प्रमुख      -    सरनोबत

(७) शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख  -       मायनाक भंडारी व दौलतखान

(८) शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले     -  राजगड, प्रतापगड, पावनगड

शिवरायांची लष्करी व्यवस्था

पायदळ,   हवालदार जुमलेदार

घोडदळ, शिलेदार,   बारगीर

तक्ता पूर्ण करा 

उत्तरे :

प्रधानाचे नाव -   पद   -  काम 

1] मोरो त्रिंबक पिंगळे

प्रधान

राज्यकारभार करणे व प्रदेशाची व्यवस्था पाहणे.

2] रामचंद्र नीळकंठ मुजुमदार

अमात्य

राज्याचा जमाखर्च पाहणे. 

3] अण्णाजी दत्तो

सचिव

सरकारी आज्ञापत्रे तयार करणे.

4] दत्ताजी त्रिंबक वाकनीस

मंत्री

पत्रव्यवहार सांभाळणे.

5] . हंबीरराव मोहिते

सेनापती

सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे.

6]   रामचंद्र त्रिंबक डबीर

सुमंत

परराज्यांशी संबंध ठेवणे.

7] निराजी रावजी

न्यायाधीश

न्यायदान करणे.

8] मोरेश्वर पंडितराव

पंडितराव

धार्मिक व्यवहार पाहणे.

शिवरायांनी व्यापारवाढीस चालना देण्याची कारणे

नवनवीन गरजेच्या वस्तू राज्यात येतात.

राज्याची  भरभराट होते.

संपत्तीत भर पडते

वस्तूंची मुबलकता वाढते.

व्यापार वाढतो.

शिवरायांनी बांधलेले जलदुर्ग

सिंधुदुर्ग , पद्मदुर्ग

शिवरायांनी किल्ल्यांवर नेमलेले अधिकारी

कारखानीस

किल्लेदार

सबनीस

महाराजांच्या घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत

नेतोजी पालकर

प्रतापराव गुजर

हंबीरराव मोहिते

प्रश्न  (थोडक्यात उत्तरे लिहा.)

(१) शिवरायांच्या घोडदळाच्या रचनेविषयी माहिती लिहा.

उत्तर : (१) शिवरायांच्या लष्करात पायदळाबरोबरच घोडदळ हा महत्त्वाचा विभाग होता. (२) घोडदळात  अधिकार्यांच्या श्रेणी होत्या. 'सरनोबत' हा घोडदळाचा सर्वोच्च अधिकारी होता. (३) या दलात शिलेदार आणि बारगीर असे दोन प्रकारचे घोडेस्वार होते. (४) शिलेदाराकडे स्वत:चा घोडा व स्वत:ची हत्यारे असत; तर बारगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे मिळत असत शिलेदारांपेक्षा बारगिरांची संख्या जास्त असे.

(२) मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते?

उत्तर : (१) किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे. (२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे. (३) किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारूगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे.

(३) शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था कशी केली होती ?

उत्तर : शिवरायांनी मोठा खर्च करून स्वराज्यातील सुमारे ३०० किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती केली होती. धान्याची कोठी आणि युद्धसाहित्य यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमला होता. किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी नेमून किल्ल्यांची चोख व्यवस्था ठेवली होती.

(४) शिवरायांच्या हेर खात्याविषयी माहिती लिहा.

उत्तर : शत्रूच्या हालचाली वेळेत माहीत व्हाव्यात आणि स्वराज्याचे संरक्षण व्हावे; या हेतूने शिवरायांनी हेर खाते सुरू केले. या खात्याचा प्रमुख बहिजी नाईक शत्रूची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. हे खाते अतिशय कार्यक्षम होते. सुरतेच्या मोहिमेपूर्वी बहिजींनी तेथील खडान्खडा माहिती आणली होती.

का ते सांगा 

(१) शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.

उत्तर : शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला. (१) या विस्तारलेल्या प्रदेशक कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. (२) तसेच, स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.

(२) शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले.

उत्तर : (१) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिन्याचे सिद्दी, सुरत व राजापूरचे इग्र] यांचे वर्चस्व यात आणत असत. (२) या अडथळांस पायबंद घालपे आणि या शत्रूंपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे, या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले.

(३) शिवकालीन खेडी स्वयंपूर्ण होती.

उत्तर : शेती हा शिवकालीन खेड्यांचा मुख्य व्यवसाय होता शेतीला पूरक असणारे व्यवसाय गावात चालत असत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करीत असत. स्थानिक लोकांच्या गरजा गावातच भागवत्या जात असत शेतकरी शेती उत्पन्नातील काही बाटा या कारागिरांना देत असत. अशा रितीने शिवकालीन खेडी स्वयंपूर्ण होती.

(४) बाहेरील प्रदेशातून स्वराज्यात येणार्या मिठावर शिवरायांनी मोठी जकात बसवली.

उत्तर : (१) स्वराज्यातील उदयोगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. (२) पोर्तुगीज प्रदेशातून स्वराज्यात मिठाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्याने स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत असे. (३) पो्तुगिजांकडून येणार्या मिठावर मोठी जकात बसदली तर ते मीठ महाग होऊन आयातीत घट होईल व स्थानिक मिठाची विक्री वाढेल. या विचाराने कोकणातील मीठ उदघोगाला संरक्षण देण्यासाठी शिवरायांनी बाहेरील प्रदेशांतून स्वराज्यात येणान्या मिठावर मोटी जकात बसवली

प्रश्न  तुमच्या शब्दांत लिहा : (थोडक्यात माहिती लिहा.)

 शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण.

उत्तर : शेती हा खेडयातील मुख्य व्यवसाथ असल्याने शिवाजी महाराजांनी शेतक-यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक पुढील घोरण ठरवले - (१) जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकार्याची   नेमणूक केली. (२) ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या (3) पडीक जमीन   लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले (४) अतिवृष्टी, अवर्षण वा प्रदेश उद्ध्यस्त केल्यास शेतसारा व अन्य करांत सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकरांना बैलजोडया, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे  पुरवण्याची  व्यवस्था केली.

(२) शिवराय : एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते 

उत्तर : शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला  शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उददेश होता. शेतीबरोबरच व्यापार-उदघोगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाच्या अधिकार्यांना शिक्षा दिल्या. संकटकाळात प्रजेला मदत केली. शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते. तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते

(३) शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ.

उत्तर : स्वराज्याचा कारभार सुरीत चालावा म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकप्रसंगी अष्टप्रधान मंडळाची नि केली. राज्यकारभाराची आठ खात्यांनध्ये विभागणी करून प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. गुण व कर्तृत्व पाहन राजांनी अष्टाप्रधानांची नेमणूक केली. या मंत्र्यांना वेतन व जहागिरी न देता रोख पगार दिला. हे मंत्री महाराजांना जबाबदार असत त्यांची नेमणूक आणि पदावरून दूर करण्याचा अधिकार राजांना  होता 


सप्टेंबर २७, २०२०

इयत्ता सातवी इतिहास व नागरिक शास्त्र, 3. धार्मिक समन्वय

                  ३.धार्मिक समन्वय








स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे  

इतिहास  3 - धार्मिक समन्वय 


१) श्री बसवेश्वर : कर्नाटक; मीराबाई : राजस्थान (मेवाड).

(२) रामानंद : उत्तर भारत; चैतन्य महाप्रभू : पूर्व भारत (बंगाल).

(३) चक्रधर : महाराष्ट्र; शंकरदेव : आसाम.

(४) बसवेश्वर : कन्नड भाषेत उपदेश; चक्रधरस्वामी : मराठी भाषेत उपदेश.

(५) नायनार : शिवभक्त; अळवार : विष्णुभक्त.

(६) गुरुगोविंदसिंह : शिखांचे दहावे गुरू, गुरुनानक: शिखांचे पहिले गुरू.

तक्ता  पूर्ण करा

चळवळ    १. भक्ती चळवळ 

प्रसारक   (१) महाकवी सूरदास (२) तुलसीदास (३) मन्मथ स्वामी(४) कबीर (५) मीराबाई

 ग्रंथ     (१) सूरसागर  (२)  रामचरितमानस  (३) परमरहस्य  (४) कबीर -दोहावली  (५) पदे-भक्तिरचना

चळवळ     महानुभाव पंथ

प्रसारक    चक्रधरस्वामी

 ग्रंथ   चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिले ग्रंथ : (१) म्हाइंभट -लीळाचरित्र (२) महदंबा -धवळे (३) नरेंद्र-रुक्मिणीस्वयंवर  (४) केशोबास -सूत्रपाठ व दृष्टांतपाठ

चळवळ    शीख धर्म

प्रसारक   गुरुनानक

 ग्रंथ         गुरुग्रंथसाहिब

प्रश्न  ओळखा पाहू :

उत्तरे

(१) दक्षिण भारतात भक्तिसंप्रदायाचा पाया घालणारे   -  रामानुज

(२) गुजराती भाषेचे आद्य कवी             -नरसी मेहता

(३) भक्तिरचना लिहिणाऱ्या मेवाडच्या राजघराण्यातील स्त्री-संत   - मीराबाई

(४) लिंगायत विचारधारा कर्नाटक प्रांतात रुजवणारे संत  -      श्री बसवेश्वर

(५) 'गुरुग्रंथसाहिबा' या ग्रंथात समाविष्ट असणाऱ्या रचनांचे कर्ते  गुरुनानक, संत नामदेव,कबीर व चैतन्य महाप्रभू

(६) सुफी संत - ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती शेख निजामुद्दीन अवलिया

(७)  कृष्णभक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लीम संत संत रसखान

कृष्णभक्तीचे महत्त्व सांगणारे संत

नर  चैतन्य महाप्रभू ,   शंकरदेव , रसखान  नरसी मेहता,  मीराबाई ,  सूरदास

भक्ती चळवळीने दिलेल्या शिकवणुकीरतील मूल्ये   -   समानता   भूतदया  माणुसकी  करुणा  ईश्वरप्रेम

प्रश्न . का ते सांगा

(१) भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले.

उत्तर : भारतीय समाजात भाषा व धर्म यांची विविधता असल्याने, भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे.

(२) मध्ययुगात भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली.

उत्तर : मध्ययुगात भारतात महत्त्व आलेल्या भक्तिमाग्गात समानतेला महत्त्व आले. अधिकारभेदांना महत्त्व  नसल्याने धार्मिक समन्वयाला चालना मिळाली.

(३) निरनिराल्या भक्तिपंथांमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला मदत झाली.

उत्तर : मध्ययुगात उदयास आलेल्या भक्तिपंधांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश केल्याने  प्रादेशिक भाषाच्या विकासाला मदत झाली

(४) चक्रधरांमुळे मराठी भाषेचा विकास झाला,

उत्तर : चक्रधरांनी संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेत विपुल ग्रंथनिर्मिती झाली त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला.

(५) शीख समाज गुरुग्रंथसाहिब लाच गुरू मानू लागला.

उत्तर : शिखाचे दहावे गुरू गुरुमोविंदसिंग यांनी 'गुरुखंधसाहिब' यांनाच आपल्यानंतर गुरु मानावे, अशी आज्ञा दिल्यामुळे शीख समाज या धर्मग्रंथालाच आपला गुरू मानू लागला.

प्रश्न. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(१) मध्ययुगात भारतात निर्माण झालेल्या विविध पंथांनी कोणत्या गोष्टींवर भर दिला?

उत्तर : मध्ययुगात भारतात निर्माण झालेल्या विविध पंथांनी ईश्वरभक्ती आणि धार्मिक-साप्रदायिक समन्वयावर अधिक भर दिला

(২) भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कशाला महत्त्व होते ?

उत्तर : भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कर्मकांड आणि ग्रह्मज्ञान यांना अधिक महत्त्व होते.

(३) हरिहर स्वरूपातील मू्तीचा अर्थ कोणता होतो ?

उत्तर : हरि' म्हणजे शिव व 'हर' म्हणजे विष्णू, हे दोन्ही एकच आहेत. हा 'हरिहर' स्वरूपातील मूर्तीवरून अर्थ होतो

(४) रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला?

उत्तर : ईश्वर सर्वासाठी आहे, तो कोणताही भेदभाव करीत नाही, असा रामानुजांनी समाजाला उपदेश केला

(५) बंगालमधील लोक भक्ती चळवळीत का सहभागी झाले ?

उत्तर : चैतन्य महाप्रभू यांनी लोकांना कृष्णभक्तीचे महत्त्व पटवून दिल्याने, बंगालमधील सर्व जातींचे आणि पंथांचे लोक मोठया प्रमाणात भक्ती चळवळीत सहभागी झाले.

(६) संत मीराबाईधी भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात?

उत्तर : संत मीराबाईधी भक्तिगीते समाजाला भक्ती. सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देतात.

(७) कायकवे कैलास' या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ काय होतो ?

उत्तर : कायकवे कैलास' या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ श्रम हाच कैलास' असा होतो.

(८) महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते होते ?

उत्तर : विदर्भातील 'ऋदधिपूर' हे महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान होते.

(९) विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याबर गुरुनानकांच्या लक्षात कोणती गोष्ट आली?

उत्तर : विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यावर गुरुनानकांच्या लक्षात आले की, भक्तिभावना सगळीकडे सारखीच असते

(१०) सुफी पंथाचे भारताला कोणते फायदे झाले?

उत्तर : सुफी पंथामुळे भारतात हिंदू-मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले व सुफी संगीत परंपरेने भारतीय संगीतात मोलाची भर पडली.

प्रश्न  थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) गुरुनानकांनी आपल्या अनुयायांना कोणती शिकवण दिली?

उत्तर : शीख धर्मचि संस्थापक गुरुनानक यांनी आपल्या अनुयायांना पुढील शिकवण दिली - (१) सर्वाशी सारखेपणाने वागावे. (२) भक्तिभावना सर्वत्र सारखीच असते. (३) हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य असावे. (४) प्रत्येकाचे आचरण शुदध असावे

(२) भक्ती चळवळीविषयी थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर : भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाला. शिवभक्त नायनार व विष्णुभक्त अळवार या भक्ती चळवळी दक्षिण भारतात मध्ययुगात प्रभावी होत्या. रामानुज आणि अन्य आचा्यांनी भक्ती चळवळीचा पाया पक्का केला. या चळवळीनी ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा, समानता या मूल्यांची शिकवण समाजाला दिली.

(३) सुफी पंथाची शिकवण सांगा.

उत्तर : सुफी पंथाने लोकांना पुढील शिकवण दिली - (१) सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करावे. (२) परमेश्वर प्रेममय असून प्रेम व भक्ती या मार्गानीच त्याच्यापर्यंत पोहोचता येते. (३) परमेश्वराचे चिंतन करावे. (४) साधेपणाने राहावे

प्रश्न   लिहिते व्हा : (कारणे लिहा.)

(৭) संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

उत्तर : (१) भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही. (२) सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला. (३) तीर्थकषेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. (४) हिंदू व मुस्लीम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

(२) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.

उत्तर : (१) संत बसवेश्वरांनी जातिभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. (२) आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. (३) त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातींतील स्त्री-पुरुष सहभागी होत असत. (४) संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.

(३) सामान्य लोक भक्ती चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

उत्तर : (१) संतांनी आपले विचार सामान्य जनतेला समजतील अशा लोकभाषेतून मांडले, त्यामुळे ते लोकांना जवळचे वाटले. (२) रसाळ पद्थरचनेद्वारे सोप्या भाषेत केलेला संतांचा उपदेश लोकांना आवडला. (३) संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्य लोकांना आचरण्यासही सोपा होता; त्यामुळे फार मोठया प्रमाणात स्त्री व पुरुष भक्ती चळवळीत सहभागी झाले.

(४) गुरुनानकांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली.

उत्तर : (१) गुरुनानकांनी लोकांना सर्वांशी सारखेपणाने वागण्याची शिकवण दिली. (२) प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा सल्ला दिला. (३) हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचा उपदेश केला. या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाल्यामुळे त्यांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट ०८, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास,१.इतिहासाची साधने (ऑनलाईन चाचणी)

       १.इतिहासाची साधने

प्रश्नोत्तरे
प्रश्न १. गटांतील वेगळा शब्द शोधून लिहा (१) भौतिक साधने, लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने
(२) स्मारके, नाणी, लेणी, कथा
(३) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या मिथके
उत्तरे : (१) अलिखित साधने (२) कथा (३) मंदिरे (४) तवारिखा

प्रश्न २. म्हणजे काय?
 (१) इतिहास
उत्तर :भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीरपणे दिलेली माहिती, म्हणजे 'इतिहास' होय
(२) इतिहासाची साधने.
उत्तर : ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो, त्या पुराव्यांनाच 'इतिहासाची साधने असे म्हणतात
(३) ताम्रपट.
उत्तर : तांब्याच्या पत्र्यांवर कोरलेल्या लेखांना, आज्ञाना वा निवाड्यांना 'ताम्रपट' असे म्हणतात
 (४) शिलालेख
 उत्तर : दगडावर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख' असे म्हणतात.
(५) बखर.
उत्तर : 'बातमी' या अर्थाच्या 'खबर' या शब्दावरून तयार झालेल्या इतिहासवजा लेखनप्रकाराला बखर असे म्हणतात.

'इतिहासाची साधने'या पाठावरील चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

 https://forms.gle/Th8N4DpJJ6QrmYf36

प्रश्न 3. लिहिते व्हा :
(एका वाक्यात उत्तरे लिहा.)
(৭) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
उत्तर : स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ (स्मृतिशिळा) थडगे, विजयस्तंभ, विजयकमानी इत्यादींची समावेश होतो.

 (२) 'तवारिख' म्हणजे काय?
 उत्तर : 'तवारिख' म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे

३) इतिहासलेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात?
उत्तर इतिहासलेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती, त्याचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे त्यांचे असतात

(४) पत्रव्यवहार व राज्यकर्त्यांची चरित्रे यांवरून आपल्याला कोणती माहिती मिळते?
 उत्तर : पत्रव्यवहार व राज्यकर्त्यांची चरित्रे यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था तसेच राजकीय संबंध यांची माहिती मिळते.
 (५) इमारतीमध्ये कोणत्या प्रकारच्या वास्तूंचा समावेश होतो?
उत्तर : इमारतीमध्ये राजवाडे, मंत्र्यांची निवासस्थाने, राणीवसा, सामान्य माणसांची घरे या वास्तूचा समावेश होतो.

 (६) कोणत्या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले आहेत? उत्तर चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले.

 (७) बखरीतून आपल्याला कोणती माहिती मिळते?
उत्तर : बखरीतून आपल्याला त्या काळातील सांस्कृतिक जीवन, भाषाव्यवहार, तत्कालीन राजकीय घडामोडी तसेच सामाजिक परिस्थिती यांची माहिती मिळते.

 (८) कवी परमानंदांनी कोणते शिवचरित्र लिहिले?
उत्तर : कवी परमानंदांनी संस्कृत भाषेत 'श्रीशिवभारत' हे शिवचरित्र लिहिले.

(९) मध्ययुगीन भारतावर लिखाण करणाऱ्या पाश्चात्त्य इतिहासकारांची नावे लिहा.
उत्तर : ग्ॅट डफ, रॉबर्ट आर्म, एम. सी. स्प्रेंगल या पाश्चात्त्य इतिहासकारांनी मध्ययुगीन भारतावर लिखाण केले.

प्रश्न ६. संकल्पना स्पष्ट करा :
(१) भौतिक साधने.
उत्तर : पूर्वीच्या काळातील माणसाची वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्परसंबंधांचे माहिती मिळते. प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना 'इतिहासाची भौतिक साधने' असे म्हणतात.

२)लिखित साधने. उत्तर : मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिह ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सणसमारंभ, खाण्या पदार्थ इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्याला 'इतिहासाची लिखित साधने' असे म्हणतात.

(३) मौखिक साधने.
उत्तर : लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यान्पिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेत असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला 'इतिहासाची मौखि साधने' असे म्हणतात.

प्रश्न ७. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा?
उत्तर : ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी, केव्हा व का लिहिला यांची छाननी करावीच लागते सापडलेल्या वस्तूचे चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनाशी व्या पडताळून घ्यायला हव्यात असे केले नाही, तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील. म्हणून ऐतिहासिक साथनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते, असे मला वाटते.

 प्रश्न ८. सांगा पाहू
(१) नाणी इतिहास कसा सांगतात?
उत्तर- इतिहासाच्या भौतिक साधनांतील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात -(१) नाण्यावरील चित्रातून त्या काळात कोण राज्यकर्ता होता, त्याचा काळ कोणता होता यांची माहिती प्याचे होते. (२) त्या काळातील धार्मिक संकल्पना, लिपी, भाषा यांचा बोध होतो (३) नाण्यांच्या धातूवरून त्या काळात वेश प्रचलित असणारे धातू, आर्थिक व्यवहार व आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते (४) नाण्यांवरील नक्षी, चित्रे यांवरून तत्कालीन कलेची प्रगती समजते (५) नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते.

 (२) ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते?
उत्तर : ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला - (१) त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते मोडी (२) कलेचा दर्जा समजतो (३) त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते (४) त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान कसे होते, हे माहीत होते.

प्रश्न ९. तुमचे मत लिहा : (कारणे लिहा.) (৭) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर : दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख असे म्हणतात राजानी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यांतील घटना व तारखाच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो .

(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात
 उत्तर : ओव्या, मिथके, लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठातराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात

(३) बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.
उत्तर :(१) इतिहासलेखनात साधनांची विश्वसनीयता आणि लेखकाचा निःपक्षपातीपणा आवश्यक असतो (२) बखरीत अनेकदा अतिशयोक्त आणि आलंकारिक वर्णन असते शिवाय (३) अनेक बखरी घटना घडून गेल्यावर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने, त्या ऐकीव माहितीवर लिहिल्या गेल्या आहेत, म्हणून बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.

(४) इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते? उत्तर : इतिहास लेखन एकदा करून चालत नाही, कारण भूतकाळातील घटनाचे अखंडपणे सशोधन चालू असते संशोधनाची नवी नवी साधने उपलब्ध होत असतात. त्यावरून नवी माहिती समोर येते. पूर्वीच्या माहितीचे संदर्भ बदलले जातात. त्यामुळे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करावे लागते.

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट ०१, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास ना. शास्त्र,६,मुघलांशी संघर्ष

              मुघलांशी संघर्ष




प्रश्न . शोधा म्हणजे सापडेल :

(१) शिवरायांनी तयार करवून घेतलेला फारसी - संस्कृत शब्दकोश-

राज्यव्यवहारकोश

(२) त्र्यंबकगड जिंकून घेणारा -

 मोरोपंत पिंगळे

(३) वरणी-दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार -

दाऊदखान

(४) इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण-

सुरत

(५) दक्षिण मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजीराजांनी नेमलेला मुख्य कारभारी -

रघुनाथ नारायण हणमंते

(६) तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय-

सरस्वती महाल.


प्रश्न  योग्य पर्याय निवडा :

(१) चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार याने शायिस्ताखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला -

फिरंगोजी नरसाळा 

(२) शायिस्ताखानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे  केली?

बंगालमध्ये

(३) सुरतेच्या स्वारीच्या वेळी या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले- 

इनायतखान 

(४) आग्याहून परत येताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते ?

मथुरेत

(५) 'मऱ्हाटा पातशाह येव्हढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असे राज्याभिषेकाच्या

घटनेचे वर्णन आपल्या बखरीत कोणी केले आहे ?

 कृष्णाजी अनंत सभासद

(६) पुरंदरच्या किल्ल्याला दिलेरखानाने वेढा दिल्यावर पराक्रमाची शर्थ करणाऱ्या कोणाला वीरमरण आले ?

 मुरारबाजी देशपांडे,

प्रश्न  पुढील घटना कालानुक्रमे लिहा :

उत्तरे 

(१) शायिस्ताखानाची स्वारी

२) लाल महालावर छापा

(३) पुरंदरचा तह

(४) आगऱ्याहून  सुटका

५) राज्याभिषेक

(६) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम

आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले

कर्नाळा, सिंहगड, रोहिडा, पुरंदर, लोहगड, माहुली

शिवरायांनी पाडलेली नाणी

सोन्याचा होन, तांब्याची शिवराई

शिवरायांच्या संदर्भात रायगडावर घडलेल्या घटना

राज्याभिषेक

३ एप्रिल १६८० रोजी निधन

भारतातील धर्मकृत्यांच्या दोन परंपरा

वैदिक पद्धती, तांत्रिक पद्धती

प्रश्न .आपल्या भाषेत थोडक्यात उत्तरे लिहा.

1] पुरंदरच्या तहानंतर शिवाजीराजांनी कोणती व्यापक योजना तयार केली ?

उत्तर : पुरंदरच्या तहाने  मुघलांना दिलेले किल्ले व  प्रदेश मिळवण्यासाठी शिवाजीराजांनी पुढ़ील व्यापक योजना तयार केली- (१) जय्यत तयारीनिशी निरनिराळया किल्ल्यांवर सैन्य पाठवून ते किल्ले जिंकायचे. (२) त्याच वेळी दख्खनमध्ये मुघच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे.

(२) मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन महाराजांनी कोणकोणत्या बाबी केल्या?

उत्तर : पुरंदरच्या तहानंतर     महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक होऊन पुढील बाबी केल्या (१) मुघलाच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. (२) मुघलांच्या ताब्यातील अनेक किल्ले जिंकून घेतले. (३) दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. (४) मोरोपंत पिंगळे यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला.

(३) शिवरायांनी स्वराज्याला जोडलेल्या जिंजी किल्ल्याचा भविष्यात कोणता उपयोग झाला?

उत्तर : १६७७ साली हाती घेतलेल्या दक्षिण मोहिमेत शिवरायांनी तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून घेतला होता. पुढे औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून बसला. रायगडावरील त्याच्या स्वारीच्या वेळी छत्रपती राजाराम यांना सुरक्षिततेसाठी तेथून हलवावे लागले. त्या वेळी त्यांनी जिंजी किल्ल्याचाच आश्रय घेऊन स्वराज्याचा कारभार चालवला. अशा तऱ्हेने उपयोग झाला.

प्रश्न  कारणे लिहा :

(१) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.

उत्तर : (१) शिवरायांकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशाहाने मोठी फौज पाठवली. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. (२) मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. (३) परिस्थिती मोठी कठीण होती. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून 'पुरंदरचा तह' केला.

(२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

उत्तर : (१) मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. (२) मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दयावा लागला होता. (३) हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुधलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

(३) शिवाजी महाराजांनी शायिस्ताखानाविरुद्ध धाडसी बेत आखला.

उत्तर : (१) शायिस्ताखानाने शिवरायांच्या महालात  तळ ठोकला होता. (२) त्याच्या फौजा पूण्याच्या आसपासच्या प्रदेशाची लूट करून मोठी हानी करीत असत (३) त्याचा प्रजेच्या  नीतीधैर्यावर परिणाम झाला होता 

4] शायिस्तारखानाने आपला मुक्काम औरंगाबादला हलवला

उत्तर : (१) शायिस्ताखान लाल महालात दोन वर्षे तळ ठोकून बसल्याने शिवरायांनी त्याच्याविरुद्ध एक धाडसी बेत आखला ५ एप्रिल १६६३  रोजी लाल महालावर छापा घातला यात    खानाची बोटे तोडली या मानहानीमुळे शायिस्तारखानाने आपला मुक्काम औरंगाबादला हलवला

(५) शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीने औरंगजेब बादशाहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला.

उत्तर : (१) शायिस्ताखानाच्या स्वारीमुळे स्वराज्याचा बराबसा प्रदेश उदध्यस्त झाला होता. ते नुकसान भरून काढण्यासाठी शिवरायांनी मुधलांच्या सुरतेवर हल्ला केला. (२) हे शहर बादशाहाला सर्वात जास्त प्रिय होते. (३) आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार्या सुरतमधून महाराजांनी प्रचंड संपत्ती लुटून नेली. त्यामुळे औरंगजे बादशाहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला

प्रश्न  तुमच्या शब्दांत लिहा : (थोडक्यात माहिती लिहा.)

(१) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.

उत्तर : आपल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळण्यासाठी शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करवून घेण्याचे निश्चित केले. ६ जून १६७४ या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकप्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. 'होन' व 'शिवराई' ही दोन नाणी पाडली. राजपत्रांवर 'क्षत्रयकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती' असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली.

२] आग्याहून सुटका.

उत्तर : औरंगजेबाने शिवाजीराजांचा दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. अशा वेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले. नजरकैदेतून  सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार करून, त्याप्रमाणे शिताफीने ते निसटले. आग्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले. अशा रितीने शिवाजीराजांनी मोठ्या धैर्यनि आणि कौशल्याने  स्वतःची सुटका करून धेतली.

(३) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम.

उत्तर : ऑक्टोबर १६७७ मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी मैत्रि तह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळूूरु. होसकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला तमिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकले. तंजावरचे राजे व्यंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्याकार्यात सहभागी होण्याचाही राजांनी प्रयत्न केला.

(४) शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी.

उत्तर : तीस वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर निर्माण झालेल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळावी. म्हणून शिवरायांनी स्वत स राज्याभिषेक करवून घेण्याचे ठरवले. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पंडित गागाभट्टांना बोलावून धेतले. रत्नजडित असे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. विविध प्रांतांतून श्रेष्ठ विदवानांना, राज्यकत्यांना आमंत्रित केले सोन्याचा 'होन' आणि तांब्याची 'शिवराई' ही खास नाणी पाडली. अशा रितीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली.

(५) पुरंदरचा तह.

उत्तर : (१) जून १६६५ मध्ये मिर्झाराजे  जयसिंग आणि शिवाजीराजे यांच्यात झालेल्या तहाला 'पुरंदरचा तह' असे म्हणतात. (२) या तहानुसार शिवरायांनी मुघलांना २३ किल्ले व त्यांच्या सभोवतालचा चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. (३) आदिलशाहीविरुद्ध लढण्यासाठी राजांनी मुघलांना मदत करण्याचे आश्वासन दिले. (४) मुघलाच्या स्वारीमुळे होणारी भूप्रदेशाची आणि सैन्याची हानी टाळण्यासाठी महाराजांनी मुघलांशी हा तह केला.

ऑगस्ट ०१, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास व ना शास्त्र,५.स्वराज्यस्थापना

             ५.स्वराज्यस्थापना



महत्वाचे मुद्दे:
१, शहाजीराजे :
(१) शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील एक मातम्यर सरदार होते. 
(२) पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ असणारे शहाजीराजे तलवार व भाला चालवण्यात पटाईत होते.

 २.निजामशाहीचा पाडाव:
 (१) निजामशाही जिंकण्यासाठी मुघलांनी हाती घेतलेल्या मोहिमेला विजापूरच्या आदिलशहाने सहकार्य केले. 
(२) मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये, या भावनेने शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध करूनही ते त्यात अपयशी ठरले. (३) इ. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव झाला

 ३, आदिलशाहीत सामील
 (१) निजामशाही संपुष्टात आल्यावर शहाजीराजे आदिलशाहीत सामील झाले. (२) पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने शहाजीराजांकडेच ठेवला, 
(३) कर्नाटकातील बंगळूरू व त्याच्या आसपासचा प्रदेशही त्यांना जहागीर म्हणून मिळाला
 (४) शहाजीराजांनी महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू येथील मोठा प्रदेश मिळवून आपला दरारा निर्माण केला. 
४. शिवरायांचा जन्म 
(१) शके १५५१, फाल्गुन वद्ध तृतीया म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म झाला.
 (२) पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला 

५. स्वराज्य संकल्पक :
 (१) परकीय सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापन करावे, ही शहाजीराजांची तीव्र इच्छा होती.
(२) शिवरायांना उत्तम राजा बनण्यासाठी सर्व प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी बंगळूरू येथे केली होती
 (३) म्हणूनच शहाजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' असे म्हणतात.

६. वीरमाता जिजाबाई
(१) सिंदखेडराजा येथील सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या जिजाबाई कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीति होत्या, (२) विविध विद्यांबरोबरच लष्करी शिक्षण त्यांना लहानपणीच मिळाले होते.
 (३) प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या न्यायनिवाडेही करीत असत.

 ७.शिवरायांवर संस्कार
 (१) जिजाबाईंनी शिवरायांना स्वराज्यस्थापनेच्या कार्यात मार्गदर्शन केले (२) उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली. (३) चारित्र्य, सत्यप्रियता, धैर्य, निर्भयता, स्वराज्याचे स्वप्न इत्यादी गुणांचे संस्कार केले.

८. मावळप्रांती स्वराज्यस्थापनेला सुरुवात :
(१) शिवरायांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील प्रदेश म्हणजेच 'बारा मावळचे खोरे' होय
(२) हा प्रदेश डोंगराळ, दयाखोऱ्यांचा आणि दुर्गम होता. (३) अशा अवघड प्रदेशाचा कौशल्याने उपयोग करून शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेला सुरुवात केली.

९.शिवरायांचे सवंगडी
(१) शिवरायांनी लोकांत विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली.
(२) त्यांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात येसाजी कंक, जिवा महाला, नन्हेकर देशपांडे बाजीप्रभू देशपांडे अशा अनेक सवंगड्यांनी सहकार्य केले.

१०. स्वराज्याची राजमुद्रा
(१) स्वराज्याचे ध्येय स्पष्ट करणारे वचन कोरलेली संस्कृत भाषेतील राजमुद्रा तयार (२) 'शहाजींचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी आधिराज्य गाजवते असा या वचनाचा अर्थ आहे
 (३) या वचनातून शिवरायांची वडिलांबाबतची कृतज्ञता, हे स्वराज्य निश्चितपणे वाढत  राहण्याचा विश्वास स्वराज्याला सर्वांचा आदर मिळण्याची खात्री आणि लोककल्याण हा हेतू या गोष्टी प्रकट होतात .

११. किल्ल्यांचे महत्त्व
 (१) किल्ल्यांमुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असल्याने, शिवकाळात किल्ल्यांना विशेष महल होते (२) शिवरायांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहाच्या ताब्यात असल्याने ते मिळवण्याचे धोरण निश्चित झाले (
३) शिवरायांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
 (४) मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बाधणी करून त्याचे नाव 'राजगड' ठेवण्यात आले. हीच स्वराज्याची पहिनी राजधानी झाली.

१२ विरोधकांचा बंदोबस्त
 (१) जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत अशा काही आदिलशाही सरदारांचा स्वराज्यस्थापनेस विरोध होता
(२) या विरोधकांचा शिवरायांनी पुरता बंदोबस्त केला.
(३) १६५६ मध्ये शिवरायांनी जावळीवर स्वारी करून हा प्रदेश व रायगड किल्ला जिंकला.
(४) जावळीच्या खोऱ्यात त्यांनी प्रतापगड किल्ला बांधला.

 १३ आरमार उभारणी
(१) शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी जिकली
(२) पश्चिम किनारपट्टीवर सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांची ठाणी होती
 (३) या सत्तांशी टक्कर दयायची असेल तर प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची जाणीव होऊन शिवरायानी आरमार उभारणीकडे लक्ष दिले

१४ अफजलखानाचे पारिपत्य:
 (१) शिवरायांनी आपले अनेक किल्ले जिंकल्याने आदिलशाहीचा कारभार पाहणारी बड़ी साहेबीण अस्वस्थ झाली होती
 (२) तिने शिवरायाचे पारिपत्य करण्यासाठी अफजलखानास पाठवले
 (३) १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्याने शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले.

 १५ सिद्दी जोहरची स्वारी:
 (१) अफजलखानाच्या पारिपत्यानंतर शिवरायांनी आदिलशाहीचे वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकू घेतले (२) खेळणा या किल्ल्यास राजानी 'विशाळगड' असे नाव दिले
(३) आदिलशाहाने शिवरायांचा बदोबस्त करण्यासाठी सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास पाठवले.
४)सिद्दीबरोबर रुस्तुम-इ-जमान बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हे सरदार होत
(५) सिद्दी आदिलशाह ने सलाबत खान हा किताब दिला .

१६ पन्हाळाचा वेळा :
(१) शिवराय पन्हाळ्यावर होते सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला
(२) पाच महिने झाले तरी वेढा उठत नव्हता नेतोजी पालकरने सिद्दीच्या सैन्यावर बाहेरून हल्ला केला पण तो अयशस्वी ठरला
(३) शिवरायांनी सिद्दीशी बोलणी सुरू कैल्यामुळे येठ्यामध्ये शिथिलता आली (४) याचा फायदा घेऊन वेढ्यातून सुटण्याची योजना राजानी तयार केली.

 १७. वेश्यातून सुटका :
(१) शिवा काशिद या शिवरायासारख्या दिसणाऱ्या तरुणाने राजाधी वेशभूषा करून तो पालखीत बसला
(२) त्याची पालखी राज्दिडी दरवाजातून बाहेर पडली त्याच वेळी शिवराय व त्यांधे निवडक सैन्य अवघड वाटेने गडाखाली उतरले.

 १८. बाजीप्रभूचे बलिदान:
 (१) वेढ्यातून सुटून शिवराय विशाळगडाकडे निघाले
 (२) सिद्दीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केल्यामुळे त्याला रोखण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपाडे याच्यावर सोपवली
(३) गजापूरजवळील धोडखिडीत बाजीप्रभूने सिद्दीच्या सैन्यास रोखून पराक्रमाची शर्थ केली
(४) या संघर्षात बाजीप्रभूला वीरमरण आले पण शिवाजीराजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले .

१९ आदिलशाहीशी तह:
(१) मुघल बादशाहा औरंगजेब याने शास्ताखानास दक्षिण स्वारीवर पाठवले (२) शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली
(३) शिवरायाचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता
(४) एकाच येळी दोन बलाढ्य शत्रूशी लढणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशाहीशी तह केला
 (५) या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला आदिलशाहास परत दयावा लागला




ऑगस्ट ०१, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास व ना. शास्त्र,४.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

          ४.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र


१ प्रश्नोत्तरे 
प्रश्न १. शोधून लिहा
 (१) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक -सिददी
(२) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार-संत ज्ञानेश्वर
 (३) संत तुकारामांचे गाव-देहू
(४) भारुडाचे रचनाकार -संत एकनाथ
 (५) बलोपासनेचे महत्त्व सागणारे- रामदास स्वामी

 (६) स्त्री-संताची नावे -संत सोयराबाई संत निर्मळाबाई सत मुक्ताबाई संत जनाबाई संत कान्होपात्रा संत बहिणाबाई सिऊरकर

प्रश्न २ योग्य पर्याय निवडा:
 (१) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा व वसईत यानी राज्य स्थापन केले होते (अ) इंग्रजांनी (ब) इंचांनी (क) पोर्तुगीजांनी (ड) फ्रेंचानी 
(२) सर्वांत लहान परगणा कोणता होता? (अ) पुणे (ब) इंदापूर क) चाकण (ड) शिरवळ 
(३) महाराष्ट्रात या साली मोठा दुष्काळ पडला होता (अ) इ स १६०० (ब) इ स १६३० (क) इ स १६१० (ड) इ स १६४० (४) महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र हे होते (अ) देहू (ब) आळदी (क) पैठण (ड) पंढरपूर 
(५) समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली? (अ) संत ज्ञानेश्वरांनी (ब) संत एकनाथांनी (क) रामदास स्वामींनी (ड) संत नामदेवानी 

उत्तरे : (१) पोर्तुगिजानी (२) शिरवळ (३) इ. स १६३० (४) पंढरपूर


प्रश्न 3रा. पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते ओळखा : (9) 'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले
 (२) 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी'
(३) 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा'
(४) 'कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी
(५) संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली?'
 (६) जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी'

प्रश्न 4-म्हणजे काय? (१) बुद्रुक परगण्यांची नावे उत्तर : मूळ गावाला 'बुद्रुक' असे म्हणतात (२) बलुतं. शिरवळ उत्तर : गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित जी सेवा देतात, त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्याना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो, त्याला 'बलुतं' असे म्हणतात (३) वतन. उत्तर : वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे 'वतन' होय (४) टोपकर. उत्तर : व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या पोर्तुगीज, इग्रज, डच व फ्रेंच या युरोपियनाना त्याच्या शिरस्त्राणांवरून 'टोपकर' असे म्हणत (५) खुर्द. उत्तर : मूळ गावाच्या जवळ नवीन गाव वसल्यास दोन्ही गावे स्वतंत्र आहेत, हे दर्शवण्यासाठी नवीन गावाला खुर्द असे म्हणतात.
न ७. पुढील अधिकारी व्यक्तींची कामे कोणती होती, ते लिहा : (१) पाटील. उत्तर : (१) गावचा प्रमुख या नात्याने गावातील तटे सोडवणे (२) गावात शांतता निर्माण करणे ) लोकांना जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहित करणे (२) कुलकर्णी. उत्तर : (१) पाटलाच्या कामात मदत करणे (२) जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे (३) शेटे-महाजन. उत्तर : (१) गावात पेठ वसवण्याचे काम करणे (२) पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजन करीत असत (४) देशमुख. उत्तर : (१) परगण्यातील पाटलाचा प्रमुख (२) परगण्यातील तटे सोडवून शांतता प्रस्थापित करणे (३) परगण्यातील शेतीचे उत्पन्न वाढवणे (४) परचक्र, दुष्काळ अशा अडचणीत रयतेचे म्हणणे सरकारकडे माडणे (५) देशपांडे. उत्तर : (१) परगण्यातील कुलकर्त्यांचा प्रमुख (२) परगण्यातील जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे (३) रयत व सरकार यांच्यातील दुव्याचे काम करणे

प्रश्न 5-. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : * (৭) दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते ? उत्तर : (१) दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्कील होत असे (२) अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत. (३) पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे (४) गावात राहणे कठीण होऊन लोकाना परागदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे.
१६३० साली महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे प्रजेवर कोणते परिणाम झाले? उत्तर : इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे प्रजेवर पुढील परिणाम झाले - (१) धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने कुटुः उद्ध्वस्त झाली. (२) गुरे-ढोरे मेली. (३) शेती-व्यवसाय आणि उद्योगधंदे बुडाल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार बट पडले (४) लोक देशोधडीला लागले (३) संतांनी समाजाला कोणती शिकवण दिली? उत्तर : सतांनी समाजाला पुढील शिकवण दिली - (१) परमेश्वरापुढे सर्व समान आहेत, हा समतेचा संदेश दिला (२) लोकाना माणुसकी व मानवताधर्माची शिकवण दिली (३) सर्वांवर प्रेम करावे, एकत्र येऊन एकजुटीने राहावे (४) वर्ण व जातीचा अहकार बाजूस सारून सर्व माणसे 'परमेश्वराची लेकरे' या स्वरूपात पाहण्याची शिकवण दिली (४) संतांनी केलेले कार्य लिहा. उत्तर : संतांनी पुढील कार्य केले - (१) समाजात लोकजागृती घडून आली. (२) संकटाच्या काळी कसे वागावे या संतांच्या उपदेशामुळे लोकाना मोठा मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. (३) समाजात झालेल्या धर्माच्या अवनत अवस्थेत धर्माचा खरा अर्थ सांगून संतानी लोकांचे रक्षण केले. (४) सर्वसामान्याच्या भाषेत लोकांना उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले.

प्रश्न 6. लिहिते व्हा : (कारणे लिहा.)
(१) सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती.
उत्तर : (१) सतराव्या शतकाच्या प्रारभी महाराष्ट्रात निजामशाह, आदिलशाह व मुघल यांनी मोठा सत्ताविस्तार केला होता. (२) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले सिद्दी वसाहत करून होते. (३) युरोपातील फ्रेंच, डच, ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्यात बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा चालू होती. (४) या सर्व सत्तात वर्चस्वासाठी सतत आ संघर्ष चालू असे, त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती

2)वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे
उत्तर : (१) परगण्यातील महसूल गोळा करण्याचे काम करणारे वतनदार रयतेकडून अधिक रक्कम गोळ (२) वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे. करीत असत. (२) आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून सरकारकडे कमी महसूल देत किंवा देण्यास विलंब करीत असत. (३) परचक्र, दुष्काळ अशा परिस्थितीत रयतेच्या तक्रारी सरकारकडे मांडण्याचे काम योग्य रितीने करीत नसत, यामुळे वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे.

३-संत तुकारामांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या गेल्या
उत्तर : (१) संत तुकारामांनी लोकांना भक्तीची शिकवण देतानाच समाजातील दांभिकतेवर आणि अधश्रद्धावः कडक शब्दात टीकाही केली. (२) त्यानी भक्तीला नीतीची - आचरणाचीही जोड दिली (३) ते करीत असलेल्या लोकजागृतीस समाजातील कर्मठ लोकांनी विरोध केला (४) तुकारामांना मुळात अभग रचण्याचा अधिकारच नाही प्रश्न, आ नशिबावर वाईट लो साधू-स अशा स (३) संत तुकारामांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या गेल्या . असा दावा करून त्याच्या अभगाच्या वया या कर्मठ लोकानी इंद्रायणी नदीत बुडवल्या.

 प्रश्न 7-. तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा :
(१) संत नामदेव.
उत्तर : वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला. पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबांची समाधी बांधली. त्यांची विपुल अभंगरचना प्रसिद्ध आहे त्यांची काही पदे 'गुरुग्रंथसाहिब' या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत.

*(२) संत ज्ञानेश्वर. उत्तर : संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली सामान्याना आचरता येईल, असा आचारधर्म सागितला. त्यानी 'भगवद्गीता' या सस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ, तसेच. 'अमृतानुभव' या ग्रथाची रचना केली लोकानी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी 'पसायदान" मागितले

 (३) संत एकनाथ.
 उत्तर : महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यानी अभग, भारुडे, गौळणी अशी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली त्यानी 'भावार्थ रामायणात' लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तीविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही, असे ते सांगत परमेश्वरप्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वत च्या आचरणाने दाखवून दिले. इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली आहे ते खऱ्या अर्थनि लोकशिक्षक होते .

(४) संत तुकाराम.
उत्तर : संत तुकारामांची विपुल अभगरचना त्यांच्या 'गाथे'त संग्रहित केलेली आहे. त्यांचे अभग समजायला अतिशय सोपे आहेत. समाजातील दांभिकतेवर आणि अधश्रद्धावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. दीनदुबळ्यामध्ये देवत्व शोधण्यास सांगितले त्यांनी अभंगांद्वारे लोकजागृती केली कर्मठ लोकाच्या विरोधाला धैर्यने तोंड दिले त्यांच्या शिष्य आणि सहकाऱ्यांत विविध जाती-जमातीच्या लोकांचा समावेश होता

(५) रामदास स्वामी.
उत्तर : रामदासांनी 'दासबोध', 'मनाचे श्लोक', 'करुणाष्टके' असे विपुल साहित्यलेखन केले. साहित्याच्या माध्यमातून त्यानी लोकजागृती आणि समाजसंघटन केले समर्थ संप्रदाय स्थापन करून रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. लोकांना बलोपासनेचे महत्त्व पटवून देऊन लोकचळवळीचे व लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले.