Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

इयत्ता सातवी इतिहास व नागरिक शास्त्र, 3. धार्मिक समन्वय

                  ३.धार्मिक समन्वय








स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे  

इतिहास  3 - धार्मिक समन्वय 


१) श्री बसवेश्वर : कर्नाटक; मीराबाई : राजस्थान (मेवाड).

(२) रामानंद : उत्तर भारत; चैतन्य महाप्रभू : पूर्व भारत (बंगाल).

(३) चक्रधर : महाराष्ट्र; शंकरदेव : आसाम.

(४) बसवेश्वर : कन्नड भाषेत उपदेश; चक्रधरस्वामी : मराठी भाषेत उपदेश.

(५) नायनार : शिवभक्त; अळवार : विष्णुभक्त.

(६) गुरुगोविंदसिंह : शिखांचे दहावे गुरू, गुरुनानक: शिखांचे पहिले गुरू.

तक्ता  पूर्ण करा

चळवळ    १. भक्ती चळवळ 

प्रसारक   (१) महाकवी सूरदास (२) तुलसीदास (३) मन्मथ स्वामी(४) कबीर (५) मीराबाई

 ग्रंथ     (१) सूरसागर  (२)  रामचरितमानस  (३) परमरहस्य  (४) कबीर -दोहावली  (५) पदे-भक्तिरचना

चळवळ     महानुभाव पंथ

प्रसारक    चक्रधरस्वामी

 ग्रंथ   चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिले ग्रंथ : (१) म्हाइंभट -लीळाचरित्र (२) महदंबा -धवळे (३) नरेंद्र-रुक्मिणीस्वयंवर  (४) केशोबास -सूत्रपाठ व दृष्टांतपाठ

चळवळ    शीख धर्म

प्रसारक   गुरुनानक

 ग्रंथ         गुरुग्रंथसाहिब

प्रश्न  ओळखा पाहू :

उत्तरे

(१) दक्षिण भारतात भक्तिसंप्रदायाचा पाया घालणारे   -  रामानुज

(२) गुजराती भाषेचे आद्य कवी             -नरसी मेहता

(३) भक्तिरचना लिहिणाऱ्या मेवाडच्या राजघराण्यातील स्त्री-संत   - मीराबाई

(४) लिंगायत विचारधारा कर्नाटक प्रांतात रुजवणारे संत  -      श्री बसवेश्वर

(५) 'गुरुग्रंथसाहिबा' या ग्रंथात समाविष्ट असणाऱ्या रचनांचे कर्ते  गुरुनानक, संत नामदेव,कबीर व चैतन्य महाप्रभू

(६) सुफी संत - ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती शेख निजामुद्दीन अवलिया

(७)  कृष्णभक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लीम संत संत रसखान

कृष्णभक्तीचे महत्त्व सांगणारे संत

नर  चैतन्य महाप्रभू ,   शंकरदेव , रसखान  नरसी मेहता,  मीराबाई ,  सूरदास

भक्ती चळवळीने दिलेल्या शिकवणुकीरतील मूल्ये   -   समानता   भूतदया  माणुसकी  करुणा  ईश्वरप्रेम

प्रश्न . का ते सांगा

(१) भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले.

उत्तर : भारतीय समाजात भाषा व धर्म यांची विविधता असल्याने, भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे.

(२) मध्ययुगात भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली.

उत्तर : मध्ययुगात भारतात महत्त्व आलेल्या भक्तिमाग्गात समानतेला महत्त्व आले. अधिकारभेदांना महत्त्व  नसल्याने धार्मिक समन्वयाला चालना मिळाली.

(३) निरनिराल्या भक्तिपंथांमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला मदत झाली.

उत्तर : मध्ययुगात उदयास आलेल्या भक्तिपंधांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश केल्याने  प्रादेशिक भाषाच्या विकासाला मदत झाली

(४) चक्रधरांमुळे मराठी भाषेचा विकास झाला,

उत्तर : चक्रधरांनी संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेत विपुल ग्रंथनिर्मिती झाली त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला.

(५) शीख समाज गुरुग्रंथसाहिब लाच गुरू मानू लागला.

उत्तर : शिखाचे दहावे गुरू गुरुमोविंदसिंग यांनी 'गुरुखंधसाहिब' यांनाच आपल्यानंतर गुरु मानावे, अशी आज्ञा दिल्यामुळे शीख समाज या धर्मग्रंथालाच आपला गुरू मानू लागला.

प्रश्न. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(१) मध्ययुगात भारतात निर्माण झालेल्या विविध पंथांनी कोणत्या गोष्टींवर भर दिला?

उत्तर : मध्ययुगात भारतात निर्माण झालेल्या विविध पंथांनी ईश्वरभक्ती आणि धार्मिक-साप्रदायिक समन्वयावर अधिक भर दिला

(২) भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कशाला महत्त्व होते ?

उत्तर : भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कर्मकांड आणि ग्रह्मज्ञान यांना अधिक महत्त्व होते.

(३) हरिहर स्वरूपातील मू्तीचा अर्थ कोणता होतो ?

उत्तर : हरि' म्हणजे शिव व 'हर' म्हणजे विष्णू, हे दोन्ही एकच आहेत. हा 'हरिहर' स्वरूपातील मूर्तीवरून अर्थ होतो

(४) रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला?

उत्तर : ईश्वर सर्वासाठी आहे, तो कोणताही भेदभाव करीत नाही, असा रामानुजांनी समाजाला उपदेश केला

(५) बंगालमधील लोक भक्ती चळवळीत का सहभागी झाले ?

उत्तर : चैतन्य महाप्रभू यांनी लोकांना कृष्णभक्तीचे महत्त्व पटवून दिल्याने, बंगालमधील सर्व जातींचे आणि पंथांचे लोक मोठया प्रमाणात भक्ती चळवळीत सहभागी झाले.

(६) संत मीराबाईधी भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात?

उत्तर : संत मीराबाईधी भक्तिगीते समाजाला भक्ती. सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देतात.

(७) कायकवे कैलास' या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ काय होतो ?

उत्तर : कायकवे कैलास' या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ श्रम हाच कैलास' असा होतो.

(८) महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते होते ?

उत्तर : विदर्भातील 'ऋदधिपूर' हे महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान होते.

(९) विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याबर गुरुनानकांच्या लक्षात कोणती गोष्ट आली?

उत्तर : विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यावर गुरुनानकांच्या लक्षात आले की, भक्तिभावना सगळीकडे सारखीच असते

(१०) सुफी पंथाचे भारताला कोणते फायदे झाले?

उत्तर : सुफी पंथामुळे भारतात हिंदू-मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले व सुफी संगीत परंपरेने भारतीय संगीतात मोलाची भर पडली.

प्रश्न  थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) गुरुनानकांनी आपल्या अनुयायांना कोणती शिकवण दिली?

उत्तर : शीख धर्मचि संस्थापक गुरुनानक यांनी आपल्या अनुयायांना पुढील शिकवण दिली - (१) सर्वाशी सारखेपणाने वागावे. (२) भक्तिभावना सर्वत्र सारखीच असते. (३) हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य असावे. (४) प्रत्येकाचे आचरण शुदध असावे

(२) भक्ती चळवळीविषयी थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर : भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाला. शिवभक्त नायनार व विष्णुभक्त अळवार या भक्ती चळवळी दक्षिण भारतात मध्ययुगात प्रभावी होत्या. रामानुज आणि अन्य आचा्यांनी भक्ती चळवळीचा पाया पक्का केला. या चळवळीनी ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा, समानता या मूल्यांची शिकवण समाजाला दिली.

(३) सुफी पंथाची शिकवण सांगा.

उत्तर : सुफी पंथाने लोकांना पुढील शिकवण दिली - (१) सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करावे. (२) परमेश्वर प्रेममय असून प्रेम व भक्ती या मार्गानीच त्याच्यापर्यंत पोहोचता येते. (३) परमेश्वराचे चिंतन करावे. (४) साधेपणाने राहावे

प्रश्न   लिहिते व्हा : (कारणे लिहा.)

(৭) संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

उत्तर : (१) भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही. (२) सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला. (३) तीर्थकषेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. (४) हिंदू व मुस्लीम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

(२) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.

उत्तर : (१) संत बसवेश्वरांनी जातिभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. (२) आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. (३) त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातींतील स्त्री-पुरुष सहभागी होत असत. (४) संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.

(३) सामान्य लोक भक्ती चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

उत्तर : (१) संतांनी आपले विचार सामान्य जनतेला समजतील अशा लोकभाषेतून मांडले, त्यामुळे ते लोकांना जवळचे वाटले. (२) रसाळ पद्थरचनेद्वारे सोप्या भाषेत केलेला संतांचा उपदेश लोकांना आवडला. (३) संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्य लोकांना आचरण्यासही सोपा होता; त्यामुळे फार मोठया प्रमाणात स्त्री व पुरुष भक्ती चळवळीत सहभागी झाले.

(४) गुरुनानकांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली.

उत्तर : (१) गुरुनानकांनी लोकांना सर्वांशी सारखेपणाने वागण्याची शिकवण दिली. (२) प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा सल्ला दिला. (३) हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचा उपदेश केला. या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाल्यामुळे त्यांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा