Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी,भूगोल,२.स्थान व विस्तार


          २.स्थान व विस्तारप्रश्न १..कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा व पुन्हा लिहा : (प्रत्येकी १ गुण)

(१) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक..... नावाने ओळखले जाते. (लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, पोर्ट ब्लेअर)

(२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट प्रकाराची आहे.

(लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय)

(३) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

(चिली - इक्वेडोर, अर्जेंटिना बोलिव्हिया, कोलंबिया - फ्रेंच गियाना, सुरीनाम - उरुग्वे)

(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा या देशाशी संलम्न आहे.

(बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ)

(५) .... ही भारताची राजधानी आहे.

  (यानम, नवी दिल्ली, दीव, चंदीगढ)

(६).............ही ब्राझीलची राजधानी आहे.

(बाहिया, ब्राझीलिया, रोन्डोनिया, रोराईमा)

उत्तरे : (१) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते.

 (२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकाराची आहे.

(३) दक्षिण अमेरिका खंडातील चिली-इक्वेडोर हे दोन ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा बांग्लादेश या देशाशी संलग्न आहे.

(५) नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.

(६) ब्राझीलिया ही ब्राझीलची राजधानी आहे.प्र. २. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा : (प्रत्येकी १ गुण)

(१) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

उत्तर : योग्य.

(२). भारताच्या मध्यभागातून मकरवृत्त गेलेआहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त गेले आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा खुप कमी आहे.

उत्तर : अयोग्य

दुरुस्त विधान : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा
 खुप जास्त आहे.


(४) ब्राझील देशाला पॅसिफिक या महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.

(६) भारताच्या नैऋत्य दिशेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : भारताच्या वायव्य दिशेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(६) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.

उत्तर : योग्य.प्र. ३.पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका। वाकयात उत्तरे लिहा : (प्रत्येकी १ गुण)

(१) भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?

उत्तर : भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.

(२) ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?

उत्तर : ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे.

(३) ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात?

उत्तर : ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षवृत्ते जातात.

(४) भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर : भारतात एकूण ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.प्र.५.पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी २/३ गुण)

(१) भारताकडे एक 'नरुण देश' म्हणून पाहिले जाते.
उत्तर : (१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. (२) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे. (३) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून, भारताकडे तरुण देश' म्हणून पाहिले जाते.

(२) ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.
उत्तर :
(१) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

(२) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते

(३) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जातेप्र६- थोडक्यात उत्तरे लिहा ।(प्रत्येकी ४ गुण

(१) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड दयावे लागले काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्घांना सामोरे जावे लागले.

(२) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.

(३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. (४) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले.(२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंद्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?

उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :

(१) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे

(२) ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.

(३) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.

(४) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.(३) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा

उत्तर : (अ) भारत : (१) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७०६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५ अक्षावरील इंदिरा पॉइंट' हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.

(२) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.

(ब) ब्राझील : (१) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे. (२) रेखावृत्तीय विस्तार ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.(४) ब्राझील देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्य:स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या

उत्तर : (१) ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजाची राजवट होती या देशास ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले .

(२) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट हो १९८५ पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.

(३) विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यांतून हा देश सावरला आहे.

(४) जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सक्ष्य:स्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते.(५) भारताचे स्थान व विस्तार यांविषयी माहिती लिहा.

उत्तर : (१) भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे.

(२) भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार ८०४ उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८०७ पूर्व रेखावृत्त ते ९७०२५' पूर्व रेखावृत्त आहे.

(३) भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. या त्यांच्या समूहामधील ६°४५' अक्षावरील स्थान 'इंदिरा पॉइंट' म्हणून ओळखले जाते. हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. (४) भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.

(६) ब्राझीलचे स्थान व विस्तार यांविषयी माहिती लिहा.

उत्तर : (१) ब्राझीलचा विस्तार उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचे स्थान आहे.

(२) ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.

(४) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते.प्र.७ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण)

(१) भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सदय स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या.

उत्तर : (१) भारतात सुमारे दीड शतके ब्रिटिशांची राजवट होती.

(२) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले.

(३) स्वातंत्र्प्राप्तीपासून, म्हणजेच १९४७ पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.

(४) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्घांना व अनेक प्रांतांतील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले.

(५) विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे.

(६) भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

(७) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे.

(८) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक 'तरुण देश म्हणून पाहिले जाते.(२) भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात?

उत्तर : भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा केल्याचे पुढील फायदे होतात :

(१) प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते.

(२) प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते.

(३) प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन होते.

(४) प्रदेशातील पर्यावरणाच्या व्हासावरील उपायांचा विचार करता येतो.

(५) प्रदेशातील विविध घटनांचा क्रम लक्षात येतो व त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येते.

(६) प्रदेशातील नैसर्गिक दुर्घटनांना/आपत्तींना अधिक सक्षमपणे तोंड देता येते.

(७) प्रादेशिक असमतोलाची कारणे शोधता येतात व त्यानुसार उपाययोजनांचा विचार करणे शक्य होते.

(८) प्रदेशातील भविष्यातील घटनांचा किंवा समस्यांचा अंदाज बांधता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा