Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी, भूगोल,१.क्षेत्रभेट स्वाध्याय


                    क्षेत्रभेट

शेत

प्र.१.पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा : (प्रत्येकी १ गुण) (१) क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.
उत्तर : योग्य.
(२) क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते. उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते.
(३) क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय.
उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : क्षेत्रभेट म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल होय.
(४) प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रांतील लोकांच्या उपजीविकेच्या साधनांत फरक पडतो.
उत्तर : योग्य.
(५) विविध क्षेत्रांतील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो.
उत्तर : योग्य.


२ पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी १ गुण)
(१) क्षेत्रभेट म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय.

(२) क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते?
उत्तर : क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.

(३) क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल?
उत्तर : क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने आम्ही क्षेत्रातील पिकांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, मातीची, दगडांची, वनस्पतींची, घराची छायाचित्र काढून.

(४) क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल?
उत्तर : क्षेत्रभेटीदरम्यान आम्ही प्रत्यक्ष निरीक्षणातून, मुलाखत व प्रश्नावली तंत्राचा वापर करून आणि क्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती मिळवू.

(५) विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबीवरून लक्षात येतो?
उत्तर : विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक विविध क्षेत्रांतील वनस्पती, घराची रचना, लोकांचे पोशाख, लोकांच्या आहारातील पदार्थ इत्यादी बाबींवरून लक्षात येतो.
आग्रा किल्ला


प्र.थोडक्यात उत्तरे लिहा :
(१) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. (प्रत्येकी ४ गुण)
उत्तर : क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते :
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
(४) भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते.

(२) क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? उत्तर : क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने पुढील गोष्टींची काळजी घेऊ :
(१) क्षेत्रभेटीदरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहू व ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांची यादी बरोबर ठेवू.
(२) क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे पालन करू.
(३) क्षेत्रभेटीदरम्यान स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची सखोल व अचूक माहिती मिळवू.
(४) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रातील मालमत्तेचे व तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याविषयी खबरदारी घेऊ.

(३) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?
उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ :
(१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुरबीण इत्यादी.
(२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे (३) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
(४) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

(४) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर : क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील करू :
(१) क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. प्रकारे
(२) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खादयपदार्थांची वेष्टने, उरलेले खादयपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.
(३) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू.
(४) संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू,

(५) क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल?
उत्तर : क्षेत्रभेटीचा अहवाल पुढील मुद्द्यांच्या आधारे तया करू:
(१) प्रस्तावना.
(२) क्षेत्रभेटीचे महत्त्व व उद्दिष्टे.
(३) संबंधित क्षेत्रातील प्राकृतिक रचना, नद्या, तलाव, हवामान, पर्जन्यमान, उदयोग, पिके, प्राणी, वनस्पती, घरे व घरांची रचना, वाहतुकीच्या सोयी, लोकसंख्या, लोकांचा आहार, पोशाख, संस्कृती इत्यादी बाबींविषयीच्या माहितीचे संकलन व माहितीचे चित्रांच्या, छायाचित्रांच्या, तक्त्यांच्या, आलेखांच्या साहाय्याने सादरीकरण.
(४) निष्कर्ष, आभार प्रदर्शन व संदर्भसूची.

नदीकिनारा

 प्र.४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण) (१) चर्चा करा : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.
१) तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल?
किंवा
समजा, शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हांला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल? उत्तर : क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू :
(१) ठिकाणनिश्चिती:
(१) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे.
(२) उदा., नदीकिनारा, समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. (२) हेतूनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे.
(२) उदा., थंड हवेच्या ठिकाणास व समुद्रकिनाऱ्यास भेट देऊन या दोन ठिकाणांतील हवामानांतील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी.
(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता : (१) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे,
(२) उदा., कारखान्यास भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाने/ व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.
(४) प्रश्नावली निर्मिती:
(१) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे,
(२) उदा., शेतास भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे :
१.तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे ?
२. शेतातील पिकांची नासधूस होऊ नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेता?
३. तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धत वापरता? इत्यादी.

नोंद विदयार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार क्षेत्रभेटीच्या तयारीत/तपशीलवार नियोजनात बदल करू शकता

(२) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर : कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली
(१) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(२) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते?
(३) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती?
(४) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते?
(५) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?
(६) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो?
(७) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते?
(८) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

२ टिप्पण्या:

  1. 'क्षेत्रभेटी तून कोणती माहिती मिळवाल ?' या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही . या बाबत तुम्ही दखल घ्याल अशी आशा !

    उत्तर द्याहटवा