Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २१ एप्रिल, २०२४

एप्रिल २१, २०२४

Words of A parts-6

Vocabulary -Words of A


 adverse - ॲडव्हर्स = विरुद्ध, प्रतिकूल

adversity - ॲडव्हर्सिटी = संकट, विपत्ती, दुर्भाग्य

advertise - ॲडव्हर्टाइझ = जाहिरात करणे, देणे
advertisement - ॲडव्हर्टाइझमेन्ट = जाहिरात
advice - ॲडव्हाइस‌ = सल्ला, उपदेश
advisable - ॲडव्हइजेबल = योग्य, उचित, सल्ला देण्याजोगा, इष्ट, शहाणपणाचा
advise - ॲडव्हइज सल्ला देणे, उपदेश करणे
advisory - ॲडव्हायजरि = सल्लागार मंडळ
advocacy - ॲडव्होकसि = वकिली
advocate - ॲडव्होकेट‌ = वकील
aerial - एरिअल = रेडिओची किंवा टेलिव्हिजनची हवेतील तार, वायूसबंधीत, अंतरिक्षासंबंधी, आकाशातून आलेला
aerobatics - एरोबॅटिक्स = विमानाचे कौशल्य, कसरत
aerodrome - एरोड्रोम = विमानतळ
aeronaut - एरॉनॉट = वैमानिक
aeroplane - एरोप्लेन = विमान
aesthetics - ईस्थेटिक्स् = सौंदर्यशास्त्
afar - अफार = दूरवरून, दूर
afeard - अफिअर्ड = घाबरलेला, भिलेला
affair - अफेअर = घटना, लफडे, भानगड, काम, बाब
affect - अफेक्ट = परिणाम करणे, गहिवरणे
affection - अफेक्शन = प्रेम, ममता
affectionate - अफेक्शनेट = प्रिय, प्रेमळ, मायाळू
affidavit - ॲफिडेव्हिट = शपथपत्र, शपथ घेऊन दिलेली माहिती, जबानी
affiliate - ॲफिलिएट = संबंधी करणे, जोडणे, संलग्न करून घेणे affinity - ॲफिनिटी = जिव्हाळा
affirm - ॲफर्म = जोराने निग्रहपूर्वक सांगणे
affirmation - ॲफर्मेशन = दृढकथन
affirmative - ॲफर्मेटिव्ह = होकारार्थी, निर्णायक
affix- ॲफिक्स = जोडून टाकणे, चिकटावणे
afflict - ॲफ्लिक्ट् = शारीरिक किंवा मानसिक पीडा देणे, दुःख देणे
afflicted - ॲफ्लिक्टेड = पिडीत, पिडलेला, व्यथित
affliction - अफ्लिक्शन = पीडा, दुःख, क्लेश, क्लेशाचे कारण.  
agree - ॲग्री = संमती देणे, होकार, मान्यता देणे
agreement - ॲग्रीमेंट = समती, करार, होकार
agricultural - ॲग्रीकल्चरल = शेतीचा
agriculture - ॲग्रीकल्चर = शेती
agriculturist - ॲग्रीकल्चरिस्ट = शेतकरी, शेती करणारा
ah, aha - आ, आहा =  हा! आहाहा । अरेरे। असे उद्‌गार
ahead - अहेड = पुढे, सामोर
ahem - अहेम = लक्ष वेधण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी केलेली घसा खाकरण्याची क्रिया
aid - एड = मदत करणे, मदत
aids - एड्स् = एक प्रकारचा असाध्य रोग
ail - एल = दुखणे, शारिरीक, मानसिक आजार
ailment - एलमेन्ट = विकृती, आजार
aim - एम = नेम धरणे, महत्वकांक्षा असणे
aimless - एमलेस = ध्येयरहित
air - एअर = हवा
airborne - एअरबोर्न = विमानाने बाहून नेलेली वस्तू, माल, हवेतून पसरणारा जंतू
air brake - एअरब्रेक = कोंडलेल्या हवेच्या दाबावर कार्य करणारा, चालणारा बैंक
aircraft - एअरक्राफ्ट = विमान

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

एप्रिल १८, २०२४

Words of A part-5

 


adherence - ॲडहिअरन्स = चिकटून असणे

adhesive - ॲडसिव्ह = चिकटणारा, चिकट
adhoc - ॲडहॉक = विशिष्ट कामापुरता असलेला अथवा स्थापलेला, तदर्थ
adjacent - ॲडजेसन्ट = जवळचा, शेजारचा
adjective - ॲडजेक्टिव्ह = विशेषण
adjectival - ॲडजेक्टाइवाल = विशेषणाचा
adjoin - ॲडजॉइन = लागून असणे, जवळ असणे
adjourn - ॲडजर्न = तहकूब करणे
adjournment - ॲडजर्नमेंट = तहकुबी, स्थगन
adjudge - ॲडजज = निर्णय देणे
adjudication - ॲडज्यूडिकेशन = निर्णय, निवाडा 
adjudicator - ॲडज्यूडिकेटर = न्यायनिवडा करणारा
adjust - ॲडजस्ट = सोयीचे करून घेणे, तडजोड करणे
afford - ॲफोर्ड = परवडणे, सवड असणे
affront - अफ्रन्ट = तोडावर उघड अपमान करणे, उपमर्द करणे . उपमर्द
afraid - अफ्रेड = भयभीत, भ्यालेला
after - आफ्टर = पाठीमागे, नंतर
aftercare - आफ्टरकेअर = उपचारानंतर घ्यावयाची काळजी
aftereffect - आफ्टरइफेक्ट = नंतरचा होणारा परिणाम
aftermath - आफ्टरमाथ = नंतरचा परिणाम
afternoon - आफ्टरनून = तीसरा व चौथा प्रहर, दुपार पासून ते सायंकाळ पर्यंत
afterthought - आफ्टथाॅट‌ = मागाहून सुचलेली कल्पना, विचार, पाश्चातबुद्धी
afterwards - आफ्टरवर्डझ = मागाहून, नंतर
again - अगेन = पुन्हा, परत, परत एकदा
against - अगेन्स्ट = विरुद्ध, समोर, सन्मुख
age - एज = आयुष्य, वय, युग, कालखंड
aged - एजिड = वृद्ध, म्हातारा, वयस्कर
ageless - एजलेस = कधीही न कोमेजणारा
age long - एजलॉग = युगानुयुगे चालणारा
agency - एजन्सि = विशिष्ट सेवा पुरवणारी संस्था, साधन, माध्यम
agenda - अजेन्डा = सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय, विषयपत्रिका
agent - एजन्ट = प्रतिनिधी, दलाल, गुमास्ता, मुनिम, साधन, कारण
aggravate - ॲग्रव्हेट = अधिक वाईट, गंभीर करणे
aggravation - ॲग्रव्हेशन = वृद्धि, वाढ
aggregate - ॲग्रिगेट = एकूण, एकत्रित केलेले
aggressive - ॲग्रेसिव्ह =  कुरापत काढणारा, आक्रमक, भांडखोर, प्रथम हल्ला करणारा
aghast - अधास्ट = घाबरलेला, भ्यालेला, विस्मित
agile - ॲजाइल = चपळ, वेगयान, चलाख
agility - ॲजिलिटि = चपळता, वेगवानता, चलाखी
agitate - ॲजिटेट = खळबळ उडविणे, मन वेधणे
agitation - ॲजिटेशन  प्रक्षुब्धता, चळवळ
agitator - ॲजिटेटर = चळवळ करणारा, आंदोलन करणारा
agnostic - ॲग्नॉस्टिक = अज्ञेयवादी, व. अज्ञेयवादा संबंधी
ago - ॲगो‌ = पूर्वी, अगोदर, मागे
agonize - ॲगनाइझ = तीव्र वेदना देणे
agonizing - ॲगनाइझिंग = तीव्र वेदना देणारा
agony - ॲगनि =तीव्र वेदना, दुःख, यातना
agrarian - अग्रेरिअन = शेतीसंबंधी, जमिनीसंबंधी
adverb - ॲडव्हर्ब = क्रियाविषेशण
adverbial - ॲडव्हर्बिअल = क्रियाविशेषणा संबंधी

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

एप्रिल ११, २०२४

Words of A part-4

 


acorn - एकॉर्न = ओक वृक्षाचे फळ

acquaint - ॲक्वेन्ट = ओळख करून देणे

acquaintance - ॲक्वेन्टन्स = परीचीत, ओळखीची व्यक्ती

acquainted - ॲक्वेन्टेड = परिचित

acquire - ॲक्वायर = मिळविणे, प्राप्त करणे 

acquisition - ॲक्विझिशन = संपादन, प्राप्ती

acquit - ॲक्विट = निर्दोष ठरविणे

acre- एकर = एक एकर जमीन

acreage - एकरिज = शेतीचे एकरातील क्षेत्रफळ 

acrid - ॲक्रिड = तिखट, झणझणीत 

acridity -  ॲक्रिडिटि = तिखटपणा

acrimonious - ॲक्रिमोनिअस = खवचट, कटू

acrimony -  ॲक्रिमनि = खवचटपणा

acrobat - ॲक्रोवेंट = डोंबारी, दोरीवरील कसरत करणारी व्यक्ती

acronym - ॲक्रोनिम = बनलेला नवा शब्द 

across - अक्रॉस = ओलांडून, पलीकडे

act - ॲक्ट = काम, कृती, कार्य प्र. कृत्ती करण कार्य

action - ॲक्शन = क्रिया, कृती, 

actionable - ॲक्शनेबल = फिर्याद करण्यास योग्य, फिर्यादकरण्याजोगा

activate - ॲक्टिव्हेट = क्रियाशील करणे 

active - ॲक्टिव्ह = चपळ, उत्साही

activity - ॲक्टिव्हिटी = चपळाई, सक्रियता

actor - ॲक्टर = अभिनेता, नट

actress - ॲक्ट्रेस = नटी, अभिनेत्री

actual - ॲक्च्युअल = खरा, वास्तविक, सत्य 

actually - ॲक्च्युअलि = खरोखर, वास्तवात

actuary - ॲक्च्युअरि = विमाशास्त्रज्ञ, विमाशास्त्रात पारंगत असलेला

actuate - ॲक्च्युएट = गती देणे, प्रेरणा देणं

acupuncture - ॲक्यूपंक्चर = शिरेत सुई टोचण्याचा इलाज

acute - ॲक्यूट = तीक्ष्ण, कुशाग्र, तीव्र, चलाख

acuteness - ॲक्युटनेस = तीव्रता, तीक्ष्णता

adamant - ॲडमन्ट = कठीण वस्तू, वज्र, हटवादी, दुराग्रही, आग्रही

adamantine - ॲडमॅन्टइन् = वज्रासारखा कठीण

adapt - ॲडॅप्ट = अनुकूल बनविणे, सोयीचे करणे

adaptable - ॲडप्टेवल = बदलू शकणारा, जुळवून घेणारा

adaptability - ॲडेप्टॅबिलिटि = संयोजकता, जुळवून घेण्याची क्षमता

adaptation - ॲडप्टेशन = जुळवणी, बदल, अनुकूलन

add - ॲड = मिळविणे, मिसळणे, अधिक करणे 

addendum - ॲडेन्डम् = पुरवणी

adder - ॲडर = एक प्रकारचा विषारी साप 

addict -  ॲडिक्ट = व्यसनी, छंदी मनुष्य

addicted - ॲडिक्टेड = व्यसनी, छंदी

addition - ॲडिशन् = नड, मिसळ, बेरीज

additional - ॲडिशनल = अधिक, जादा, जास्त, अतिरिक्त 

addle - ॲड‌ल = सडलेला, कुजलेला 

address - ॲड्रेस = उद्देशून बोलणे किंवा लिहणे, पत्ता, भाषण, पत्रावरील पत्ता, राहण्याचे स्थळ

addressee - ॲड्रेसी = ज्याच्या नावावर पत्र लिहावयाचे आहे ती व्यक्ती.

adequacy - ॲडिक्वसी = पुरतेपणा

adequate - ॲडिक्वेट = पुरेसा

adhere - ॲडहिअर = चिकटून राहणे, विलगणे

रविवार, ७ एप्रिल, २०२४

एप्रिल ०७, २०२४

Vocabulary words of A part-3

 




absurdity - अबसर्डिटी = मुर्खपणा, असमंजसपणा 

abundance - अबन्डन्स = विपुलता, पुष्कळ

acclamation - ॲक्लेमेशन =जयजयकार

accommodation - ॲकॉमडेशन = राहण्याची सोय 

accompaniment - ॲकम्पनिमेन्ट = बरोबर असणारी वस्तू, व्यक्ती 

accompany अकम्पनि = बरोबर जाणे, साथ करणे 

accomplice - अकॉम्प्लिस = सहअपराधी, गुन्हा करण्यास मदत करणारी व्यक्ती, गुन्ह्यातील साचीदार 

accomplish -अकॉम्प्लिश =प्राप्त करणे

accomplished - अकॉम्प्लिशड = गुणसंपत्र, चतुर, तडीस नेलेले कार्य

abundant - अबन्डन्ट‌ = अधिक, विपुल, पुष्कळ

abuse - अब्यूज = दुरूपयोग करणं

abusive - अव्यूसिक = निदायुक्त 

abyss -‌‌ अबिस = अत्यंत खोल विवर, खोल गर्ता

acacia - अकेशिया = बाभळीचे झाड

academic - अकॅडेमिक = शालेय, शैक्षणिक

academy - अकैडमी = प्रबोधिनी

accomplishment - अकॉम्ल्पिशमेन्ट = गुणवत्ता,सिद्धी,सिद्धता

accord - अंकॉर्ड = सर्वानुमते, जमणे, जुळणे

accordance - ॲकॉर्डन्स = मेळ, ऐक्य 

according - ॲकॉडींग = च्या अनुमार 

accordingly - ॲकॉडिंग्लि = तदनुसार

accelerate - ॲक्सेलरेट = गती देणे

acceleration - ॲक्सेलरेशन = गतिवृद्धी

accent  -ॲक्सेन्ट = शब्दावर दिलेला जोर

accept -  ॲक्सेप्ट = स्विकार करणे, कबूल करणे

acceptable - ॲक्सेप्टेबल = स्विकारणीय

acceptance - ॲक्सेप्टन्स = स्विकार

account - अकाउन्ट = खाते 

accountable - अकाउन्टेबल = जबाबदार, कारण विचारले जाण्यायोग्य

accessible -ॲक्सेसिबल = सुगम, सुकर वाट

access - ॲक्सेस = प्रवेश मार्ग, वाट 

accident - ॲक्सिडेन्ट = आकस्मिक घडणारी घटना, अपघात, दुर्घटना, वाईट घटना

accountant - अकाउन्टन्ट = हिशेष, जमा खर्च ठेवणारा, फडणवीस 

accretion - ॲकेशन = अभिवृद्धी, वाढ

accumulate - ॲक्यूम्युलेट = एकत्र करणे, साठवणे

accumulation - अक्युम्युलेशन = संचय, जमा

accuracy - ॲक्युरसि = अचूकता, तंतोतंतपणा

acclaim - ॲक्लेम = जयघोष करून स्वागत करणे 

accurate - ॲक्यूरेट = तंतोतंत, बरोबर, विनयुक 

accursed - ॲकर्सड = अभागी, शापीत, तिरस्कारणीय

accuse - ॲक्यूझ = दोष देणे, आरोप करणे

accused - ॲक्युझड = दोषी, आरोपी

accustom - ॲकस्टम = परिचित करणे, सवय लावणे

ache - एक = एकसारखे दुखत राहणे

achievement - अचीव्हमेन्ट = मिळवलेला पराक्रम, प्राप्त केलेले यश 

achromatic - ॲक्रोमॅटिक = रंगहीन

acid - ॲसिड = आंबट क्षार 

acidity - ॲसिडीटी = आम्लपित्त

acknowledge - ॲकनॉलेज = मान्य करणे, उपकार मानणे

acne -  ॲक्नी = तारुण्यातील चेहऱ्यावरील पुटकुळ्या, फोड


■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

**************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

एप्रिल ०४, २०२४

Words of A -2

 



aback - अबैक = थक्क होऊन मागे, पाठीमागे 

abacus - अबॅकस = संख्या शिकविण्याची गोट्यांची चौकट

 abandon - अबॅन्डन = टाकणे, त्याग करणे, सोडून देणे

abase - अबेस = बदनामी करणे, मानहानी करणे 

abasement - अबेसमेन्ट = अनादर, मानहानी 

abbess - ॲबेस = मठस्वामिनी स्त्री 

abbot - ॲबट् = मठाधिपती पुरुष 

abbreviation - ॲब्रीव्हिएशन = संक्षेप, संक्षीप्त रुप 

abdicate - ॲब्डिकेट = हक्क सोडून देणे 

abdomen -ॲब्डोमेन = पोट, उदर

abdominal - ॲब्डॉमिनल = पोटाचा, पोटासंबंधी

abduct - ॲब्डक्ट् =   जबरीने पळवून नेणे 

aberration ॲबरेशन = नितिभ्रष्टता 

abashed - अबॅश्ट = लाजलेला, लज्जित झालेला

abate - अबेट = कमी होणे, कमी करणे

abbey - ॲबे = मठ

abetment - अबेटमेन्ट = गुन्ह्याला मदत, वाईट कामाला केलेली मदत

abhor - ॲबहॉर = अत्यंत तिरस्कार करणे, धिक्कारणे

abide - अवाइड = वस्ती करणे, राहणे

ability - ॲबिलिटि = योग्यता, क्षमता, सामर्थ्य

abject - ॲबजेक्ट = नीच, हलका, क्षुद्र, कंगाल

abjure - ॲबजुअर = शपथपूर्वक त्याग करणं

ablaze - ॲब्लेझ = पेटलेला, प्रज्वलित झालेला, आग लागलेला

able - एबल = समर्थ, लायक, निपुण, योग्य

able-bodied - एबलबॉडिड = धट्टाकट्टा, धडधाकट

ably - एबलि = कुशलतेने, समर्थपणे

abnormal -  ॲबनॉर्मल = वाजवीपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त

aboard - अबोर्ड = गलबतावर

abode - ॲबोड = निवासस्थान, वसतिस्थान

abolish - ॲवॉलिश = नष्ट करणे, रद्द करणे

abolition - ॲवॉलिशन = रद्द, नाश करणे

abominate - ॲबॉमिनेट = फार द्वेष करणे

abortion - ॲबॉर्शन = गर्भपात, निष्फळता

abound - अबाउन्ड = विपुल असणे

above - अबोव्ह = च्या वर, वरती, पलिकडे 

abridge - अब्रिज = छोटा करणे, कमी करणे 

abridgement - अब्रिजमेन्ट = सार, सारांश, संक्षिप्त 

abroad - अब्रॉड = परदेशांत, देशाबाहेर

abrupt - ॲब्रप्ट= आकस्मित, एकदम 

absence - अँचसेन्स = अनुपस्थिती, गैरहजेरी 

absent - ॲबसेन्ट = गैरहजर, अनुपस्थित, विचारमग्न 

absent minded - ॲबसेन्ट माइन्डेड = लक्ष

 नसलेला absentee - ॲबसेन्टी = गैरहजर मनुष्य

absolute - ॲब्सलूट = संपूर्ण, परिपूर्ण, निखलास

absolutely - ॲब्सलूटलि = सम्पूर्णपणे, पूर्णपणे 

absorb - ॲब्सॉर्ब = अंगात मुरवून किंवा शोषून

 घेणे absorbant - ॲब्सोंर्वन्ट= शोषून घेणारा 

absorption -  ॲब्सॉर्शन = शोषण, तन्मयता 

abstain - ॲबस्टेन = वर्ज्यकरणे, दूर राहणे

abstract - ॲबस्ट्रॅक्ट = अमूर्त, संक्षेप, गोषवारा 

abstruse - ॲबस्ट्रूस = जटिल, गूढ, गहन 

absurd - ॲब्सर्ड = अयोग्य, हास्यास्पद


■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

**************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.


सोमवार, १ एप्रिल, २०२४

एप्रिल ०१, २०२४

4 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

         4 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना -

 देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना... 

 

• श्लोक 

• - राजपत्नीः गुरोर्पत्नी मित्रपत्नी तथैव च । पत्नीमाता स्वस्य माता पंचैते मातरः स्मृता ।।

 राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी, आपल्या पत्नीची माता आणि स्वतःची माता अशा पाच माता सांगितल्या आहेत. 


→ चिंतन 

ज्या ठिकाणी युक्ती व शक्ती एकत्र झाली तेथे ऋद्धीसिद्धी निश्चित वास करतात. नुसत्या शक्तीने अगर नुसत्या युक्तीने नेहमी काम भागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड पराक्रम करून स्वशक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन केले. परंतु अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाच्या ताब्यातील लालमहालावरील हल्ला व अग्र्याहून सुटका या सर्व प्रसंगात त्यांनी युक्तीचाही वापर केला.



कथाकथन

 'स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर' संगीताच्या दुनियेत अक्षरकीती मिळविलेले सात अक्षरांचे बनलेले 'लता मंगेशकर' हे नाव पृथ्वीतलावर जन्माला आलेले संगीतातील मूर्तिमंत सप्तस्वरच होत असे म्हटले तर त्यात मुळीच अतिशयोकी नाही. जन्माने आणि कमाने त्या लाडक्या कन्या आहेतच, परंतु केवळ भारतातच नव्हे तर अखिल जगतात या नावामागे असलेल्या नैसर्गिक मधुर आवाजाने पराक्रम आहे. 'गांधार स्वर घेऊनच तू जन्माला आली आहेस, तू नाव उज्वल करशील.' असे त्यांचे वडील मास्टर दीनानाथ यांनी त्यांच्या बालपणी भविष्य त्यांनी आपल्या भावी आयुष्यात अक्षरशः खरे करून दाखविले.. कन्येचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर या ठिकाणी झाला. आपल्या पित्याकडून त्या अवघ्या सहाच्या वर्षापासून गाण्याची तालीम घेत होत्या. लहानपणापासून बुद्धी तल्लख असल्याने लतादीदी आपल्या वडिलांच्या गाण्याचे अनुकरण गोड, चपळ, धारदार आणि वळणदार करू लागल्या. तसेच बालसुलभ अभिनय चातुर्यही त्यांच्या अंगी असल्यामुळे तत्कालीन नाटकातून त्यांनी छोटो भूमिका केल्या. मास्टर दीनानाथांची स्वत:ची 'बलवंत संगीत मंडळी' ही नाटक कंपनी त्या वेळी नावारुपाला आली होती. सौभद्र नाटकात लतादिदींनी नारदाची भूमिका केली, तर पुण्यप्रभावमध्ये त्यांनी युवराजाची भूमिका केली आणि गुरुकुल नाटकात श्रीकृष्णाची भूमिका वठवली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दिनिमित्त चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंताला दादासाहेब फाळके ( देण्यात येऊ लागला. १९८९ या वर्षाचा हा पुरस्कार भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना मिळाला. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी मास्टर दिनानाथ यांच्या लतादीदी या जेष्ठ कन्या होत. मा. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला. बालवयामध्ये त्यांनी संगीत पुरस्कार कातून कामे करण्यास सुरवात केली. खाँसाहेब, अमानअली व देवासच्या रजबअली घराण्याचे अमाखा हे त्यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरु होते. अनेक प्रसिध्द संगीतकारांची १८०० च्यावर चित्रपटातील विविध ढंगातील सुमारे २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली असून या गाण्यांची संख्या २५ ते ३० हजारापर्यंत जाते. जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून गिनीज पुस्तकामध्ये त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे. शब्दार्थापलीकडील तरल संवेदना, अर्थपूर्ण शब्दोच्चार, ध्वनिग्राहकाच्या तांत्रिक बाजूंविषयीचे सखोल ज्ञान या गुणांचा संगम लताबाईंच्या गायनात कावयास मिळतो. लता मंगेशकर जगभरात भारताचे भूषण आहेत. लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पद्मभूषण, स्वरभारती, कलाप्रवीण, डी. लिट, सूरश्री, लता तानसेन त्याचबरोबर १९८९ सालचे दादासाहेब फाळके पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांनी आतापर्यंत मिळविले आहेत. आज मात्र सर्वत्र दिदींना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात.



• भुविचार :-

 • 'आकाशात देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण आकाशात चंद्र, सूर्य आहेत आणि लताचे सूर आहेत'- पु.ल. देशपांडे 


→ दिनविशेष 

• स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान - (१९८९) (जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौर या (ठिकाणी झाला.) मानसन्मान - १. बालपणी 'खजांची' चित्रपटगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, दिलरुबा व रौप्यपदक, २. १९६९ मध्ये पद्मभूषण पदवी, ३. १९८९ दादासाहेब फाळके पुरस्कार, ४. १९९० लेकिन चित्रपटाच्या निर्मितीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, ५. १९९४ इंदिरा गांधी पुरस्कार, ६. १९९७ राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, ७. १९९७ महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार. या खेरीज लतादिदींना पार्श्वगायनाबद्दल अनेक वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाले आहेत. १९६९ नंतर मात्र अन्य कलाकारांना वाव मिळावा म्हणून हा पुरस्कार त्यांनी नाकारला. पुरीच्या बालाजी मंडळाच्या विश्वस्त मंडळाने त्यांचा आस्थान विद्वान म्हणून गौरव केला. याशिवाय अनेक विद्यापीठातर्फे त्यांना सन्माननीय डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली आहे. पार्श्वगायनातील त्यांच्या उज्ज्वल कारकीर्दीबद्दल 'गिनिजबुका' तही या बद्दलची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या नावाने मध्य प्रदेश शासनातर्फे एक पुरस्कार देण्यात येतो. लतादिदी व त्यांच्या भावंडांनी मा. दीनानाथ पुरस्कार ठेवलेला आहे. १९९९ साली लतादिदींना 'पद्मविभूषण' हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

 

 • मूल्ये -

  • स्वदेशनिष्ठा, देशप्रेम, स्वातंत्र्यप्रेम.


 → अन्य घटना

  • पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे 'नाटो करार' करण्यात आला. - १९४९ अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग यांचे देहावसान. १९६८  


→ उपक्रम -

 • स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची बालगीते, भक्तीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीतांची कॅसेट ऐकणे. 


→ समूहगान -

 • हिंद देश के निवासी, सभी जन एक है । -

 

→ सामान्यज्ञान

 • आवडते गीत प्रकार - ठुमरी, गझल, कजरी

  • लतादिदींचे आवडते गायक - के. एल. सहगल, नूरजहा

एप्रिल ०१, २०२४

2 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

            2 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी... 

 

→ श्लोक

उपकारोऽपि नीचानामपकारो हि जायते । पयः पानं भुजङ्गानां केवल विषवर्धनम् । 

दुष्ट माणसावर केलेला उपकारसुद्धा अपकार ठरतो. सापांना दूध पाजले तरी केवळ विषाचीच वाढ होते. -


- चिंतन 

- - कार्याचे स्वरूप, कर्त्याचे शहाणपण व हिंमत, साधनांचा योग्यायोग्यपणा यावर मुख्यतः कामाचे यश किंवा अपयश अवलंबून असते. प्रयत्नांची पराकाष्ठाही करावयास हवी. सतत पडणाऱ्या पाण्याचे धारेने कठीण असा खडकही फुटतो. यशाच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणे असते. शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका करून घेतली, ते यश म्हणजे कर्त्यांचे शहाणपण, साधनांचा योग्य उपयोग याचे


कथाकथन -

 'कपिलदेवाची क्रिकेट साधना' भारतातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू बनलेला कपिलदेव याने अनेक जागतिक विक्रम मोडून | आपले विक्रम प्रस्थापित केले. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यासाठी त्याने वेढलेकीचा वेग तर वाढवलाच, पण आदबरोबर चेंडू आत किंवा बाहेर वळवावेत कसे, हे कौशल्य संपादनासाठी अनेक वेगवान बॉलर्सच्या शैलीचे निरीक्षण केले व ते कौशल्य संपादन केले. अनेक अशा गोलंदाजांचे मार्गदर्शन प्राप्त केले. त्यासाठी भरपूर सराव केला. चेंडू धरावा कसा, फेकावा कसा, त्या वेळी शरीराची अवस्था कशी असावी, आसूड टप्याचा चेंडू टाकून फलंदाजाला गोंधळून कसं टाकावे, यासाठी अथक परिश्रम करून कौशल्य हस्तगत केले. आपली शारीरिक क्षमता टिकून राहावी, म्हणून सतत विविध प्रकारचे व्यायाम तो घेत राहिला. त्यामुळे तो अधिक गोलंदाजी करू शकत होता. यासाठी आपली दमछाक होऊ नये म्हणून खबरदारी घेतली. आपलं मन सतत क्रिकेटच्या खेळातच रमवल. बॉलिंग बरोबर उत्तम फटकेबाज फलंदाजी कशी करावी याची दीक्षा घेतली व त्यासाठी अनेक प्रयोग करून तो चांगला फटकेबाज फलंदाजही बनला आणि क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे करता यावे म्हणून आपल्या अंगी चापल्य, चेंडूचा नेमका अंदाज घेण्याची कुवत आणि चेंडू पकडून तो यष्टिरक्षकाकडे फेकण्याची कलाही साध्य केली. डोकं शांत वून गोलंदाजी व फलंदाजी करण्यासाठी मनावर ताबा मिळविण्याची मानसिक शक्ती प्राप्त करून घेतली. मनाचा निश्चय करून जागतिक फलंदाजीत एकदिवसीय एका सामन्यात दोनशेच्या वर धावा काढून अपयशाचं रूपांतर विजयात करण्याचा कणखरपणा प्राप्त केला. ही त्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक साधनाच त्याला जगातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून बनवू शकली. आता सांगा साधना करायची नणजे काय करायचं ते? एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, "गुरुजी साधना म्हणजे शारीरिक अवयवांवर नियंत्रण मिळवून त्याचा उपयोग ध्येयसिद्धीसाठी रून घेणे आणि ते ध्येयसिद्धीसाठीच वापरत राहणे म्हणजे साधना होय." कमळे गुरुजी म्हणाले, “योग्य असा अर्थ सांगितलास साधनेचा. अशी साधना तुम्ही आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापरणे. तसेच मानसिक तोल साधून भावनांचा उद्रेक वा मरगळ टाकून सर्व मानसिक भावना ध्येयप्राप्तीसाठी वापरणे आणि बुद्धीने ध्येयसिद्धीसाठी योग्य विचार करून ते विचार ध्येयसिद्धीसाठीच सतत करीत रहा.' 


+ सुविचार 

+ • आयुष्यातील बिकट प्रसंगांना तोंड देण्याची तालीम म्हणजे खेळ.


दिनविशेष - 

• क्रिकेटपटू रणजी स्मृतिदिन (रणजितसिंहजी) १९३३ - हे थोर भारतीय क्रिकेटपटू होते. नवजांचे ते वारस होते. त्यांचा जन्म जामनगरजवळच्या सरोदर या खेडेगावात १०-९-१८८२ रोजी झाला. शिक्षणरंभीच क्रिकेटविषयी त्यांना गोडीच्या प्राचार्यांनी रणजींचे उपजत क्रीडागुण हेरले. त्यांचेच त्यांना मार्गदर्शन लाभले. लवकरच ते फलंदाजीत व विशेषतः फटकेबाजीत पारंगत झाले. ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी अपार कष्ट घेऊन आपल्या खेळात खूप सुधारणा व प्रगती घडवून आणली. आपण मोठे क्रिकेटपटू व्हावे" अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. १८९५ सालापासून रणर्जीचे क्रिकेटमधील खरे तेज लोकांना दिसू लागले. त्याच साली संसेक्स परगणा संघात त्यांचा सन्मानपूर्वक अंतर्भाव झाला. भारतीय खेळाडू परगणा संघातून खेळण्याच्या योग्यतेचे नसतात. हा इंग्रजांचा समज रणजींनी आपल्या खेळाने चुकीचा ठरविला. पहिल्याच सामन्यात त्यांनी लॉर्डसचे मैदान गाजविले. त्यानंतर त्यांच्या शतकांचा जोरदार धडाका सुरू झाला. त्या वेळेपासूनच त्यांचे नाव मान्यवर फलांदाजांच्या नामावलीत समाविष्ट झाले. एकाच महिन्यात एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन वेळा केला. रणजी हे 'ग्लान्स' फटक्याबद्दल प्रख्यात होते. तसेच त्यांचा 'हूक' चा फटकाही अप्रतिम होता. त्यांचे फटके बघण्यासाठी प्रेक्षक अतोनात गर्दी करत. भारतात जन्मलेले व इंग्लंडतर्फे खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू होते. 'रणजी' हे एका छोट्या संस्थानचे राजकुमार असले तरी खेळाच्या साम्राज्यातील सम्राट आहेत. असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल ए.जी. गार्डनर या सुप्रसिद्ध इंग्लिश लेखकाने काढलेले आहेत. जामनगर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला रणर्जीचे नाव देण्यात आलेले आहे. 


•  मूल्ये

   • खिलाडूवृत्ती, ध्येयनिष्ठा


अन्य घटना 

• बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे निधन - १७२०. 

• जगप्रसिद्ध पहिलवान युजेन सैंडी यांचा जन्म १८६०.

 • राजर्षी शाहू महाराज राज्यरोहण दिन - १८९४. 

 • केशवराव जेधे जन्मदिन - १८९६, 

 • दलाई लामांचे भारतात आश्रयार्थं आगमन - १९५९.

 •  इनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ मी. चा टॉवर बांधून पूर्ण झाला 

  

 उपक्रम +

१९७५ • आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची माहिती वा क्रिकेटपटूंची चित्रे संग्रहित करण्यास सांगणे.


समूहगान

• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा.....


 सामान्यज्ञान


प्रमुख राष्ट्रे-राष्ट्रीय खेळ

 भारत-हॉकी

• ऑस्ट्रेलिया-क्रिकेट

  • जपान ● - ज्युजत्सू (कुस्तीचा एक प्रकार)

• अमेरिका-बेसबॉल

 • ब्राझील -टेबल टेनिस (पिंगपाँग)

• चीन -फुटबॉल

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

एप्रिल ०१, २०२४

10 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

               10 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ


दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- तुही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा..... 


 → इलोक 

 - सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसम् । निर्मलं च विशुद्ध च मानसं देवमन्दिरम् ॥ चांगल्या आचरणाने सर्वांचे मन शुद्ध पवित्र होते. शुद्ध आणि पवित्र मन हे देवाचे मंदिर आहे. 

 

• चिंतन

• - पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक आहे. रत्ने बाहेरून चमक दाखवितात. तर पुस्तके आतून अंत:करण उज्वल करतात. पुस्तकांचे कितीही सुंदर असले व अंतरंगातील लेखन किंवा विचार मनाला स्पर्श करणारे नसले, मन हेलावून टाकणारे नसले तर, रत्नासारखे त्याचे मोल काहीच मानले जात नाही. पुस्तकांचे श्रेष्ठत्व त्यातील विचार किती मौल्यवान आहेत, यावरच अवलंबून असते.


कथाकथन 

- 'ढोंगी तपस्वी': एका जन्मात बोधिसत्व घोरपडीच्या कुळात जन्माला आला. तो एका गावाबाहेर एका बिळात राहात असे. तो रानातल्या फळांवर आपला निर्वाह करत असे. जवळच टेकडीवर एक तपस्वी राहात होता. त्याच्या दर्शनाला गावातील मंडळी नेहमी येत. त्याचा धर्मोपदेश ऐकत बसत. पण काही काळाने तो तपस्वी मरण पावला. त्याच्याजागी एक नवीन तपस्वी येऊन राहू लागला. गावातील माणसंही त्याच्या दर्शनाला येत. बोधिसत्त्वही त्याच्या दर्शनाला जात असे. काही काळानं उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे वारुळातून माशा बाहेर पडल्या. त्या खाण्यासाठी घोरपडी सगळीकडे हिंदू लागल्या. गावातल्या काही लोकांनी घोरपडी पकडून त्यांचे मांस खाऊन चांगली चैन केली. त्यांनी त्या तपस्वालाही घोरपडीचं मांस खायला दिलं. ते तपस्व्याला फारच आवडलं. त्यानं ते कशाचे आहे? अशी गावकल्यांकडे चौकशी केली. पण, काही दिवसांनी घोरपडीचं मांस मिळेनासं झालं. तपस्व्याला घोरपडीच्या मांसाची चटक लागली. त्याला चैन पडेना. त्यानं दर्शनासाठी येणाऱ्या बोधिसत्त्वाला मारून मांस खायचं ठरवलं. त्यानं मांस शिजविण्यासाठी भांड, मीठ, मसाला सगळं आणून ठेवलं व तो स्वतःच्या कफनीत मोठं दांडकं लपवून बोधिसत्त्वाची वाट पहात बसला. त्याला जास्त वेळ वाट पहावी लागली नाही. रोजच्या वेळेप्रमाणे बोधिसत्व त्याच्या दर्शनाला आला. पण, तपस्व्याचा गंभीर चेहरा पाहून त्याला संशय आला. थोडं पुढं जाताच त्याला घोरपडीच्या मांसाचा वास आला. मग पुढे न जाता तिथूनच त्यानं तपस्त्र्याला नमस्कार केला. तपस्व्यानं गोड आवाजात त्याला जवळ येण्याचा खूप आग्रह केला. पण, बोधिसत्व त्याचा आग्रह न मानता परत जाण्यासाठी वळला. ते पाहून तपस्व्यानं रागानं लपवलेलं दांडके बोधिसत्त्वाच्या दिशेने फेकलं. ते पाहून बोधिसत्वान तिथून पळ काढला. पण, त्याच्या शेपटीला ते दांडकं लागलंच. मग मात्र सत्व संतापला नि ओरडला, "ढोंगी माणसा, जटा आणि भगवी वस्त्र पाहून सामान्य लोक फसतात. नुसती भगवी वस्त्र परिधान केल्यानं अंत:करण शुद्ध होत नाही. हे दुष्ट माणसा मी मात्र फसणार नाही!" असं म्हणून बोधिसत्त्व दूर अरण्यात निघून गेला.


सुविचार- • 'माणसाने दुष्ट भावनेने भौतिक- अभौतिक वर्तन केले तर जशा गुरांच्या माने गोमाशा लागतात, तसेच दुःख त्याच्या पाठीशी लागत असते.'


 → दिनविशेष

 +  डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर स्मृतिदिन - १९३० त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला. ज्ञानकोशक समाज विचारप्रवर्तक महापंडित म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचित. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या व्यासंगाचा प्रत्यय शिक्षकांना आला होता, शिक्षक त्यांना 'ज्ञानकोश' (एन्साइक्लोपिडिआ) म्हणून संबोधीत. १९०६ साली ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. काल विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास आरंभला. थोड्याच कालावधीत त्यांनी बी.ए., एम.ए., पीएच. डी. या पदव्या प्राप्त केल्या. 'हिस्टरी ऑफ कास्टस् इन इंडिया' आणि 'हिंदुईइम,' 'इटस् फॅर्मिशन अँन्ड फ्युचर' या ग्रंथामुळे तर त्यांना परदेशात मोठी कती मिळाली. १९१२ मध्ये हिंदुस्थानात आल्यावर कलकत्ता विद्यापीठात काही काळ काम केले. राष्ट्रधर्म प्रचारक संघाच्या निमित्ताने त्यांनी प्रवास केला. १९९६ सालापासून त्यांनी ज्ञानकोश या कार्याला प्रारंभ केला. त्यांच्या ठायी असलेली बुद्धिमत्ता, शोधक वृत्ती, स्वतंत्र प्रज्ञा, उद्योगप्रियता, चिकाटी इत्यादी गुणांचा त्यांना या कामी उपयोग झाला. 'विश्वसेवक' या नावाचे एक मासिक त्यांनी सुरू केले. 'परागंदा', 'गोंडवनातील प्रियंवदा', 'आशावादी' या कादंबऱ्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. 'गावसासू', 'ब्राह्मणकन्या', 'विचक्षणा' या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मराठी कादंबरीचे क्षेत्र त्यांनी विस्तृत केले. त्याला जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले. 'प्राचीन महाराष्ट्र' नामक त्यांच्या संकल्पित ग्रंथाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. १० एप्रिल १९३७ रोजी त्यांचे देशावसान झाले. ज्ञानकोशकार केतकर म्हणून ते आज व पुढेही प्रसिद्ध राहतील.


मूल्ये 

-• परिश्रमशीलता, ज्ञाननिष्ठा 


 अन्य घटना

 • संत गोरा कुंभारांनी समाधी घेतली १३१७. होमिओपॅथीचे जनक समजले जाणारे डॉ. हॉर्निमन यांचा जन्म १७५५. 

 • जगप्रसिद्ध रिटनिक बोटीचा पहिला प्रवास सुरू झाला १९१२. भारताचा पहिला उपग्रह इन्सेंट वन याचे अंतराळात उड्डाण १९८२. - 

 • डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीदिन १९६५. महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली १८७५. 


उपक्रम 

ज्ञानकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश यांची माहिती देऊन त्यांचे दर्शन घडविणे • शब्दकोश वापरण्याची संधी देणे, सवय लावणे,


 समूहगान 

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....


 - सामान्यज्ञान 

 - डॉ. द. न. गोखले यांनी लिहिलेल्या 'डॉ. केतकर' या पुस्तकास सन १९६१ मध्ये साहित्य ॲकॅडमीचा पुरस्कार मिळाला.

एप्रिल ०१, २०२४

15 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

       15 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना

 सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना... 

 

→ श्लोक

 - तृणेभ्यो जायते रज्जुः । या नागस्यापि बंधनम् । बनामप्यसाराणां संहतिः कार्यसाधिका ।। - याच्या काड्यापासून दोर (दोरो) तयार होतो. तो (दोर) हत्तीला सुद्धा बंधनात टाकतो. (बांधून ठेवू शकतो) शक्तिहीन अशा अनेकांच्या एकजुटीने (एकीने) कार्य सिद्धीला जाते.

 

 → चिंतन- जीवनात जो एखादी विशिष्ट गोष्ट मिळवायचा सतत प्रयत्न करतो. एकाच गोष्टीत आपले जीवनसर्वस्व खर्च करतो, त्यालाच प्राप्त होण्याची शक्यता असते. माणसाची शक्ती मर्यादित आहे. त्यामुळे एका वेळी माणूस अनेक उद्योग करू शकत नाही. तसेच सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती ही देखील माणसाच्या कर्तृत्वाला बांध घालणारी असते. हे सर्व लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसाने गोष्टीत जीवन सर्वस्व खर्च केले तर त्याला त्याची इच्छित गोष्ट मिळण्याची शक्यता खूपच वाढते. त्यातून त्याला आनंद मिळू शकतो.


कथाकथन 

'गुरुनानक' :- शीख धर्माचे आद्य संस्थापक गुरुनानक यांचा जन्म ६५ एप्रिल १४६९ या दिवशी लाहोरजवळ तलवंडी गावी | नानक थोडा मोठा झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत घातले. लिहिणे, वाचणे, गणिते करणे याबरोबरच संस्कृत, हिंदी, फारसी या भाषाचाही नाका चांगला अभ्यास केला. परंतु नानकाचे मन शाळेत रमेना. मग वडिलांनी त्याला गुराख्याचे काम दिले. पण तेही त्याला जमेना. तो गुरांना रानात सोडून द्यायचा | देवाचे भजन करीत बसायचा. नानकाच्या वडिलांनी त्याला व्यापारात गुंतविले पण व्यापारासाठी दिलेला पैसा तो गोरगरिबांना दान करीत असे. विक्रमा आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. नानकाचे लग्न झाले. त्याला दोन मुली झाल्या. पण नानकाचे मन संसारात रमेना. एक दिवस घरादाराचा, संस येथेोग करून नानक घरातून बाहेर पडला व तीर्थयात्रेला गेला. सोमनाथ, द्वारका, हरिद्वार, काशी, जगन्नाथपुरी इत्यादि तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. मक्का व मि येथे जाऊन त्यांनी मुसलमानांच्या पवित्र स्थानांचे दर्शन घेतले. त्यांनी कबिराचे शिष्यत्व स्वीकारले. स्वतः लिहिलेली भक्तिगीते, भजने ते गात फिरत असत, जातीभ नसावा, मूर्तीपूजा करू नये. ही दोन तत्वे नानकांच्या धर्माचा आधार आहेत. नानकांनी युक्तिवादाने अनेकांना जिंकले, ते नानकांचे अनुयायी शिष्य झाले 'शीख' असे म्हणतात. शीख धर्माची स्थापना गुरुनानकांनी केली. शिखांना अत्यंत प्रिय असलेला धर्मग्रंथ 'ग्रंथसाहेब' नानकांनी तयार केला. नानकांच्या धर्मपंथात हिंदू, मुसलमान असा भेद नाही. ही सर्व परमेश्वराची लेकरे आहेत असे ते सांगत. त्यामुळे असंख्य हिंदू-मुसलमान त्य शिष्य बनले. परमेश्वर एक आहे. शुध्द अंतःकरण ही सर्वात महत्वाची गोष्ट. प्रत्येक मनुष्याने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मागील गुरुंची ि साधुसंताची नुसती शिकवण उपयोगी पडत नाही. नानकांनी हिंदूंची पुराणे व मुसलमानांचे कुराण यांचा अभ्यास केला. पण, त्यांत त्यांना परमेश्व |दिसला नाही. म्हणून त्यांनी सत्यालाच परमेश्वर मानले. हिंदू आणि मुसलमान यांच्यात ऐक्य घडविण्याचा नानकांनी प्रयत्न केला. त्यांच्या पंधाने धर्मरक्षण फार मोठे कार्य केले. १५३८ मध्ये नानक परलोकात गेले.


सुविचार 

• 'कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये पडतात.' 

• 

→ दिनविशेष 

• मोरेश्वर रामचंद्र पराडकर (मोरोपंत) स्मृतिदिन - १७९४ मोरोपंतांचा जन्म १७२९ मध्ये - पन्हाळगड येथे मराठी पंडित कवींचे अग्रणी, आर्याभारतकार. मोरोपंतांनी काव्य, व्युत्पत्ती, अलंकार, वेदान्त इ. विषयांचे अध्ययन केले. शिक्षण पूर्ण करून ते ब आले. तेथे पेशव्यांचे जावई व सावकार बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून राहिले. त्यांच्या ठिकाणी कवित्वशक्ती मूळचीच होती असताना पुराणकथन, ग्रंथावलोकन आणि काव्यरचना याशिवाय अन्य उद्योग त्यांनी केला नाही. 'कुशलव्याख्यान' हे त्यांचे पहिले काव्य कृष्णविजय, प्रल्हादविजय, सीतागीत, सावित्रीगीत, रुक्मिणीगीत, मंत्ररामायण, आर्यकेकावली?, संशयरत्नावली, नामसुधाचषक, आर्याभारत, हरिवंश, संकीर्ण रामायणे, श्लोककेकावली इत्यादी त्यांची काव्यसंपदा प्रसिध्द आहे. त्यांची बहुश्रुतता त्यांच्या काव्यात पदोपदी दिसून येते. म काव्यरचनेचा उच्चांक गाठला असे म्हटले जाते. हरिदासांनी व कीर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. 'मोरोपंतांनी आपल्या वाक् अलंकारांनी नटवून, सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादान करुन दिले आहे. ' महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी असे म्हटले 


→ मूल्ये

 • सर्जनशीलता, परिश्रम.


→ अन्य घटना 

शीख धर्मगुरू नानक यांचा जन्म १४६९. शेक्सपिअरचे निधन - १६१६. 

• खंडेराव दाभाडे यांचे निधन १७२९.

 • सर्जनशीलता, परिश्रम, 

 जगप्रसिद्ध 'टिटॅनिक' बोटीला हिमनगाचा धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू १९१२.

  • इन्शुलिनचा शोध सरबोटिंग (१९२२) आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे भूदान चळवळ सुरू केली- १९५०


 → उपक्रम 

 • मोरापंतांच्या समग्र साहित्याची माहिती मिळविणे किंवा मोरोपंतांच्या काही आर्यांचे विद्यार्थ्यासमोर वाचन करणे, त्यांच विशद करणे.


'समूहगान 1-

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान....



सामान्यज्ञान 

भारताचे राष्ट्रपती 

डॉ. राजेंद्रप्रसाद  - १९५० - १९६२

मोहम्मद हिदायत उल्हा १९६९ (कार्यवाहू)

फक्रुद्दीन अली महमद-१९७४ - ७७

 नीलम संजीव रेड्डी - १९७७ - ८२

 आर. व्यंकटरमन-१९८७ - ९२

  के. आर. नारायणन -१९९७ - २००२

  श्रीमती प्रतिभाताई पाटील-२००७

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -१९६२ - ६७ १९७७

डॉ. झाकीर हुसेन --१९६७ - ६९

  व्ही. व्ही. गरी-१९६९ (कार्यवाह)

   व्ही. व्ही. गिरी-१९६९ - ७४

    बी. डी. जत्ती-१९७७ (कार्यवाह्)

     ग्यानी झैलसिंग -१९८२ - ८

     डॉ. शंकर दयाल शर्मा-- ८७ १९९२ - ९७

      डॉ. अब्दुल कलाम (औलफ्फीर अब्दुल कलाम)-२००२ - २००७ 

      

विविध भाषांतील महाकवी.

इंग्रजी शेक्सपिअर -संस्कृत - कालिदास

• उर्दू - मिर्झा गालिब -लॅटिन - वीरगील

• इटालियन - दांते-फ्रेंच सली पुढोम

एप्रिल ०१, २०२४

18 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

       18 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...

 

 श्लोक 

 - अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसी ।। जय राम लक्ष्मणाला म्हणतो 

 - हे लक्ष्मणा, ही लंका सोन्याची असली तरी मला आवडत नाही. आपल्याला जन्म देणारी आई आणि जन्मभूमि या दोन गोष्टी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.

 

 → चिंतन 

 अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी असले पाहिजे. माणसामधला असा स्वाभिमान केव्हा झोपलेला असतो तेव्हा माणूस पारतंत्र्यात, परावलंबनात आनंद, सुख मानीत असतो आणि जे जसे आहे ते तसे पत्करतो. आपल्याला बुद्धी, मन आहे. या जगात आनंद लुटण्याचा, उपभोगण्याचा हक्क आपल्यालाही आहे हे अशा माणसांच्या ध्यानीमनीही राहात नाही. आपण आपल्या भारतीय इतिहासाचा विचार केला तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधता येईल की आपणावर अनेक परकीय लोकांनी सत्ता का गाजविली. म्हणूनच पुन्हा परकीय सत्तेखाली जायचे नसेल तर स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान आणि स्वावलंबन सोडता कामा नये.


कथाकथन 

- 'दारू करते सत्यानाश': दारूचे दुष्परिणाम फार प्राचीन काळातही पडलेले आहेत. सुरांनी असुरांना सुरा पासून अमृत फळविले. संजीवनी मंत्र साध्य असूनही दैत्यांचा गुरू शुक्राचार्य दैत्यांना देवांवर जय मिळवून देऊ शकला नाही ते या व्यसनापायी. यादवांच्या थोर, शूर घराण्याचा झाला तो मद्यामुळेच इतिहासकालातही या दारूने वेळोवेळी आपल्या सीता दाखविल्या आहेत. इंग्रजांच्या अमलात मद्याला प्रतिष्ठा लाभली. राज्यकर्ते थंड देशातील त्यामुळे त्यांना मद्याची सवय आणि आम्ही गुलाम प्रजाजनांनी त्यांचे केवळ अनुकरण केले. लोकमान्य टिळकांनी तेव्हाच | आपल्या लोकांना महाभयानक व्यसनापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. महात्माजींना तर दारूबंदीसाठी अनेकविध यत्न केले. दुकानांवर सवयंसेवकांच्या साहाय्याने त्यांनी मद्यपान विरोधी निदर्शनेही केली. तरीपण त्याचा व्हावा तसा परिणाम झालेला नाही. आज गोरगरिब दारू पितात ते म्हणे कष्ट हलके करण्यासाठी. दुःख विसरण्यासाठी आणि नंतर सवय झाली म्हणून व्यसनाधिनता एवढी वाढते की, त्यांच्यातील माणूसच हरवून बसतो; मग बायकामुलांची उपासमार करून, प्रसंगी त्यांना मारझोड करूनही ते दारु पितात. दारुमुळे त्यांना नाना रोग, व्याधी जडतात. दारुच्या आधीन गेलेल्या माणसाचा विवेक संपतो. त्याला फक्त मद्य प्यावयास हवे असते. मग आपण पितो आहोत ते काय आहे तो विचार करीत नाही. कित्येकदा त्यात विषारी द्रव मिसळल्याने शेकड्यांनी माणसे मरतात वा अंध व अपंग होतात. तरीपण दारुडो उपडत नाहीत. कित्येकदा मद्य घेऊन त्या धुंदित वाहन चालविल्याने मोठमोठे भीषण अपघातही होतात. ही झाली अशिक्षितांची, श्रमिकांची कथा; स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या लोकांच्यात तर आज मद्यपान ही फॅशनच झाली आहे; प्रतिष्ठितपणाचे ते एक अविभाज्य लक्षण मानले आहे. काही ना काही निमित्ताने या अशा 'ओल्या पाटर्चा' आयोजित केल्या जातात. महत्वाच्या सभांच्या ठिकाणी तर मद्यपान हे आवश्यकच मानले जाते.. आणखी एक वर्ग असा आहे की, तो मद्यप्राशन करण्याची आपल्याला सनदच आहे. असे मानतो. हा वर्ग म्हणजे कलावंताचा वर्ग, काही उत्कृष्ठ गायक, अभिनेते हे मद्याशी मैत्री करतात व आपले आणि आपल्या कलेचे अकाली मरण ओढवून घेतात. असे हे मद्य सत्यानाश करणारे जालिम विष आहे. मुलांनो यापासून सावध रहा. 


सुविचार

• मद्य हे सत्यानाश करणारे विष आहे; यापासून दूर रहा व शिक्षण हे अमृत आहे ते पिऊन यशस्वी जीवन जगा. • दारूच्या आधीन झालेला माणसाचा विवेक संपतो.


 → दिनविशेष 

 • तात्या टोपे स्मृतिदिन १८५११८५७ सालच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढणारे हे हापूरच्या पराभवानंतर त्यांची युद्धकुशलता दिसून आलो. विस्कळीत होऊन गेलेल्या आपल्या सैन्यात्यां वोड्याच अवधीत त्यांनी पायदळ, घोडदळ व तोफखाना आपल्या ताब्यात घेऊन गनिमी काव्याने देशांशी युद्ध बुद्धकौशल्यत्वाच्या प्रत्ययाला आणून दिले. एका लढाईत कानपूर येथे इंग्रज सेनापती कॉलिन त्यांचा तरी त्यांच्या हाती पडले. गंगेवरील पूल उडवून तात्यांनी इंग्रजांचा गंगापार होण्याचा मार्ग बंद करून टाकला तरीही चालून त्यांनी आपल्या सैन्याची वारंवार नवनवीन रचना करण्याचा प्रयत्न केला. १८५९ रोजी शिघ्री येथे त्यांचा मृत्यू झाला. 

 

• मूल्ये 

• स्वदेशनिष्ठा, देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम + अन्य घटना

 • महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८५८

 • क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांना फाशी- १८९८.

  • जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे निधन - १९५५ 

  • जागतिक वारसा दिन. उपक्रम - 

  • १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरातील काही रोमहर्षक प्रसंगांचे कथन करणे. 

  

→ समूहगान

 • नन्हा मुन्ना राही है, देश का सिपाही हूँ... 

 

→ सामान्यज्ञान 

• औद्योगिक क्रांती - १८ व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये झाली. 

• रशियन क्रांती १९१० रशि सेक्ट

 • फ्रेंच राज्यक्रांती - १७८९ से १७९१

  • अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध - १७७५ से १७८३.