सहावी सामान्य विज्ञान
डिसेंबर १४, २०२०
Res ads
सहावी सामान्य विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सहावी सामान्य विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
सहावी सामान्य विज्ञान
ऑगस्ट २८, २०२०
इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान,१.नैसर्गिक संसाधने-हवा ,पाणी आणि जमीन
१.नैसर्गिक संसाधने-हवा ,पाणी आणि जमीन
प्रश्न१. एका वाक्यात उत्तरे लिहा
(१) पृथ्वीचा किती भाग पाण्याने व किती भाग जमिनीने व्यापला आहे?
उत्तर-पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व २९% भाग जमिनीने व्यापला आहे.
(२) स्थितांबरात वायूंचे प्रमाण किती असते?
उत्तर : स्थितांबरात वायूंचे प्रमाण १९% असते.
(३) पाण्याला 'वैश्विक विद्रावक' का म्हणतात?
उत्तर : अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात; म्हणून पाण्याला 'वैश्विक विद्रावक' म्हणतात.
(४) पाणी कसे निर्माण होते?
उत्तर : हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास, त्याचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन पाण्याची निर्मिती आहे.
(५) खनिज तेलापासून कोणकोणते उपयुक्त पदार्थ मिळतात?
उत्तर : पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन ही इंधने आणि डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ खनिज तेलापासून मिळतात.
असे का म्हणतात?
(१) ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.
उत्तर : सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो. त्यामुळे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते. म्हणून ओझोन हे अतिनील थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे, असे म्हणतात .
(२) पाणी हे जीवन आहे.
उत्तर : सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबन असतात वनस्पतींतील रसद्रव्ये आणि प्राण्याच यांतही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाहीत, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात.
(३) समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. किंवा समुद्र, महासागराचे पाणी खारट असूनसुद्धा उपयुक्त कसे आहे?
उत्तर : (१) समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात. यापैकी काही मासे, शिंपले, कालवं, कोळंबी, शेवंड, खेकडे-असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात (२) मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे. (३) समुद्राच्या पाण्यापासून मीठ, आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात. (४) समुद्रातील प्राण्यांपासून प्रवाळ आणि मोती ही रत्ने मिळतात. (५) समुद्रमार्गान दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते. (६) समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो. मोसमी पाऊस, हवामान आणि संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतुचक्र समुद्रावर अवलंबून असते. (७) काही देशांत आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू झाले आहे. म्हणूनच समुद्र, महासागराचे पाणी खारट असूनसुद्धा उपयुक्त आहे.
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
१) पृथ्वीचा सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असूनदेखील पाण्याची कमतरता का भासते?
उत्तर : पृथ्वीवरचा सुमारे ७१% भूभाग जरी पाण्याने व्यापलेला असला, तरी त्यातले ९७% पाणी खारट समुद्रजल असते. पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी हे पाणी उपयुक्त नाही. तसेच गेल्या काही दशकांत लोकसंख्येच्या भरमसाट वाढीमुळे पाण्याची गरजही वाढली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कारणांमुळे, पृथ्वीचा सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असूनदेखील पाण्याची कमतरता भासते.
(३) हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा.
उत्तर : 1) हवेतील विविध घटक :
(१) नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायॉक्साइड हे वायू.
(२) अरगॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू. (३) बाष्प, धूर, धुके, धुरके असे घटक. (II) हवेतील घटकांचा उपयोग : (१) नायट्रोजन : सजीवांना आवश्यक असणारी प्रथिने नायट्रोजनपासून तयार होतात. अमोनियानिर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. खादयपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात. (२) ऑक्सिजन : सर्व सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजनशिवाय ज्वलन होऊ शकत नाही. (३) कार्बन डायॉक्साइड : प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती कार्बन डायॉक्साइडचा वापर करतात. (४) अरगॉन : विजेच्या बल्बमध्ये वापर होतो.
(५) हेलिअम : विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये कमी तापमान मिळवण्यासाठी हेलिअम वापरतात.
(६) निऑन : जाहिरातींच्या आणि रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.
(७) क्रिप्टॉन : फ्लुरोसेन्ट पाइप्समध्ये वापर केला जातो.
(८) झेनॉन : फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर होतो.
(४) हवा, पाणी, जमीन ही 'बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत?
उत्तर : हवा, पाणी व जमीन या तिन्हींकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरीत्या मिळतात. म्हणूनच त्यांना 'बहुमोल नैसर्गिक संसाधने' असे म्हणतात.
(५) हवा प्रदूषणाची माहिती लिहा.
उत्तर : वाहने आणि कारखान्यांतील प्रक्रिया यांमुळे मोठ्या प्रमाणावर इंधनांचे ज्वलन होते तसेच लाकूड व कोळसा यांच्या ज्वलनानेही विषारी वायू हवेत सोडले जातात. त्यामध्ये नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, कार्बन डायॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड - असे घातक वायू असतात. धूर, धुरके व काजळीनेही हवा प्रदूषित होते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते व मानवाचे आरोग्य धोक्यात येते.
(६) पाण्याचा वापर करताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात?
उत्तर : (१) पाण्याचा वापर योग्य रितीने व काटकसरीने करावा. (२) पाणी भूगर्भात मुरावे यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा' अशा योजनांची आखणी करावी. (३) पाणी साठवून ठेवावे. विशेषतः पावसाचे पाणी निव्वळ वाहून जाऊ देऊ नये. (४) पाणी कधीही शिळे होत नाही, त्याचा पुनर्वापर करावा.
(७) जमिनीत कोणकोणते थर दिसतात?-त्यांची माहिती लिहा?
उत्तर : (१) जमिनीत वरच्या बाजूस परिपक्व मृदेचा थर असतो. या परिपक्व मृदेत सर्वांत वर कुथित मृदा असते. वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून कुथित मृदा बनलेली असते. (२) त्याच्या खालच्या जमिनीत वाळू, माती, बारीक खडे, कृमी-कीटक इत्यादींनी समृद्ध असलेला थर असतो. या थराला 'मृदा' असे म्हणतात. (३) याच्या खाली अपरिपक्व मृदा असते. त्यात माती आणि मूळ खडकांचे तुकडे आढळतात. (४) या खडकांतील खनिजांमुळे मातीला विशिष्ट रंग प्राप्त होतो.
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
सहावी सामान्य विज्ञान
ऑगस्ट ०७, २०२०
इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान,८ आपली अस्थिसंस्था व त्वचा
८. आपली अस्थिसंस्था व त्वचा
सहावी सामान्य विज्ञान
ऑगस्ट ०७, २०२०
इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान,४.आपत्ती व्यवस्थापन
४.आपत्ती व्यवस्थापन
असे का घडते?
(१) महापूर-
उत्तर : एकाच ठिकाणी खुूप वृष्टी झाली की, नदया-नाले तुडुंब भरून वाहतात. हे पाणी सखल जमिनीवर आणि सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होते. शहरामध्येही पाणी निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने गर्य तुंबतात. पाणी रस्त्यावर पसरते.
(२) जंगलांना आग.
उत्तर : कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलात वणवा भडकवू शकते. कधी कधी सुक्या फांदच एकमेकांवर घासूनही वणवा भडकू शकतो. जंगलांना अशा रितीने आग लागते.
(३) इमारत कोसळणे/दरडी कोसळणे. उत्तर : भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या कंपनांमुळे इमारती कोसळू शकतात, बांधकामाचे साहित्य निकृष्
(४) वादळ, उत्तर : नैसर्गिकरीत्या हवेमध्ये कमी-अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. असे झाल्या मुळे हवामानात लगेच बदल होतो. यामुळे जोराने वारे वाहतात आणि वादळनिर्मिती होते.
(५) भूकंप.
उत्तर : भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात. यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. यामुळे भूगर्भात भूकंप वलय निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे भूकवच थरथरते. यालाच 'भूकंप' असे म्हणतात. भूकंपामुळे जमीन धरधरते, हलते आणि जमिनीला भेगाही पडतात.
प्रश्न ५. तात्काळ काय उपाय कराल?
(१) कुत्रा चावला.
उत्तर : कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जतुक पाण्याने धुवावी. पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे. अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यास सांगावे.
(२) खरचटले/रक्तस्राव.
उत्तर : रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करावा. जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसवांवे. जखम स्वच्छ धुवावी. जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंचावर ठेवावा जंतुनाशक मलम लावावे. जखम खोल असल्यास डॉक्टरकडे नेऊन टाके घालावेत.
(३) भाजले/पोळले.
उत्तर : सर्वप्रथम किती प्रमाणात भाजले आहे. ते पाहावे. किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवावा, व्यक्तीला पिण्यास पाणी दयावे. निजतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी गंभीररीत्या भाजले असल्यास मानसिक आधार दयावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा.
(४) सर्पदंश.
उत्तर : जखम पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोचणार नाही यासाठी असे कापड बांधणे आवश्यक आहे. दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरकडे नेऊन विषावरच्या उताऱ्याचे इंजेक्शन दयावे.
(५) उष्माघात.
उत्तर : रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे. शरीर थंड पाण्याने पुसावे आणि मानेवर व डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालाव्यात. पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबत दयावे. शरीर शुष्क होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. उलटी किंवा अशक्तपणा आला असेल; तर पोटावर उताणे झोपवून मान एका बाजूस करून ठेवावी.
पुढील प्रश्नांची तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा :
(१) 'आपत्ती' म्हणजे काय?
उत्तर : अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना 'आपत्ती' असे म्हणतात.
(२) आपत्तीचे प्रकार कोणते?
उत्तर : मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती-असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.
(३) 'आपत्ती व्यवस्थापन' म्हणजे काय? उत्तर : आपत्ती येण्याअगोदर आपण आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, आपत्ती टाळणे आणि त्यासाठी क्षमता तयार करणे-याला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात.
(४) आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते?
उत्तर : आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन-असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन घटक आहेत. यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घ्यावयाची, हे लक्षात घेतले जाते.
(५) सर्पमित्र कसे काम करतात?
उत्तर : सर्पमित्र सापांचे रक्षण करतात. जर चुकून साप मानवी वस्तीत शिरला, तर लोक भीतीपोटी त्याला ठार मारू पाहतात. अशा ठिकाणी सर्पमित्र जाऊन साप पकडतात. प्रत्यक्षात थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. सर्पमित्रांना सापांची आणि सर्पदंशावरील प्रथमोपचारांची सखोल माहिती असते ते सापांना पकडून पुन्हा जंगलात किंव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. सर्व लोकांना सापांबाबतची माहितीही देतात. नागपंचमीसारख्या सणात त सापांवर अत्याचार होत असतील, तर तेव्हाही सर्पमित्र सापांची गारुड्यांपासून सुटका करतात.
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
सहावी सामान्य विज्ञान
ऑगस्ट ०५, २०२०
इयत्ता सहावी, भूगोल,२.चला वृत्ते वापरुयात
२.चला वृत्ते वापरुयात
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : (१) पृथ्वीचा आस किती अंशाने कललेला आहे?
उत्तर : पृथ्वीचा आस २३°३०' ने कललेला आहे.
(२) २३°३० उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात?
उत्तर : २३°३० उत्तर अक्षवृत्तास 'कर्कवृत्त' म्हणतात.
(३) २३°३० दक्षिण अक्षवृत्तास काय म्हणतात?
उत्तर : २३°३० दक्षिण अक्षवृत्तास 'मकरवृत्त' म्हणतात.
(४) ६६°३० दक्षिण अक्षवृत्तास काय म्हणतात?
उत्तर : ६६°३०' दक्षिण अक्षवृत्तास 'दक्षिण ध्रुववृत्त ' किंवा 'अंटार्क्टिक वृत्त' म्हणतात.
(५) कोणत्या अक्षवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात?
उत्तर : विषुववृत्तापासून २३°३०' उ. (कर्कवृत्त) आणि २३°३० द. (मकरवृत्त) या दोन अक्षवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात.
(६) कोणते रेखावृत्त 'ग्रिनिचचे रेखावृत्त' म्हणून ओळखले जाते?
उत्तर : ०° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त 'ग्रिनिचचे रेखावृत्त' म्हणून ओळखले जाते.
(७) जागतिक प्रमाणवेळ निश्चित करण्यासाठी कोणत्या रेखावृत्ताचा आधार घेतला जातो?
उत्तर : जागतिक प्रमाणवेळ निश्चित करण्यासाठी ०० रेखावृत्त या मूळ रेखावृत्ताचा म्हणजेच 'ग्रिनिच् रेखावृत्ता'चा आधार घेतला जातो.
(८) कोणत्या रेखावृत्ताच्या संदर्भाने 'आंतरराष्ट्रीय वाररेषा' विचारात घेतली जाते?
उत्तर : १८०° रेखावृत्ताच्या संदर्भाने 'आंतरराष्ट्रीय वाररेषा' विचारात घेतली जाते.
(९) जगातील सर्वांत लहान देश कोणता?
उत्तर : व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश होय.
प्रश्न 2. पाठ्यपुस्तकातील आकृती २.२ चे निरीक्षण करा व पाठ्यपुस्तकातील पान क्र. १० वरील 'पृथ्वीगोलाशी मैत्री' या चौकटीखाली दिलेल्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (१) पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर : पृथ्वीवरील आडव्या रेषांना ' अक्षवृत्त' म्हणतात
(२) पृथ्वीवरील उभ्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर : पृथ्वीवरील उभ्या रेषांना 'रेखावृत्त ' म्हणतात.
(३) विषुववृत्त कोणकोणते खंड व महासागर यांवरून जाते?
उत्तर : विषुववृत्त दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांवरून व पॅसिफिक महासागर यांवरून जाते.
(४) कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत?
उत्तर : पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत.
(५) कोणकोणते खंड चारही गोलार्धांत विस्तारलेले आहेत?
उत्तर : आफ्रिका खंड चारही गोलार्धात विस्तारलेला आहे.
•(६) सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात ?
उत्तर : सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात.
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
सहावी सामान्य विज्ञान
ऑगस्ट ०४, २०२०










