Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
दैनंदिन शालेय परिपाठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दैनंदिन शालेय परिपाठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ जून, २०२४

जून २९, २०२४

30 जून दैनंदिन शालेय परिपाठ

          30 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 अता बरता भी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमि या पदाला.... 

 

→ श्लोक 

धन्यावान् सभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियःः । ज्ञानं लब्धा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ 

- श्रध्दावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात उसले की शांती प्राप्त होते आणि आत्मबोध होतो.


 → चिंतन 

 तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जुन्या कपड्याप्रमाणे हे शरीर सोडून जायचे आहे. मरण कुणाला टळले आहे. पण कोण किती जगला यापेक्षा तो कसा जगता हे जास्त महत्वाचे ! त्याचे जीवन दुसऱ्याच्या कामी किती आले हे महत्वाचे ! स्वतःसाठी जगणारी माणसे मरतात पण दुसऱ्यासाठी मरणारी मात्र मरूनही कीर्ती रूपाने या जगात राहतात. त्याचा देह जातो पण कीर्ती राहते.



कथाकथन 

संत कबीरांच्या  साहित्यातील सामाजिक जाणीव, कबीराच्या काळामध्ये खूप मोठी परकीय आक्रमण झालेली दिसतात. हे आक्रमक हिंस्त्र प्रवृत्तीचे होते तसेच होते. या धर्माती उम्र कनिष्ठ लोकांचे विविध मार्गांनी शोषण करत होते. तत्कालिन सामाजिक खूप मोठा मेदा होता. हिंदू मुस्लिमांमधील भेदाभेद तर होताच, परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माच्या अंतर्गतही खूप मोठी भेदाभेदाची दरी होती या धर्मातील उच्चवर्णीयोक कनिष्ठ वर्गीय लोकांचे विविध क्षेत्री स्थानी असलेले लोक अत्यंत स्थायी आणि भोगवादी बनलेले होते. म्हणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माणुसकी पायी जात होती. म्हणून सामान्य माणूस अत्यंत दुःखी जीवन जगत होता. संत कबीर हे निमठ मनोवृत्तीये असल्यामुळे त्यांना सत्ताधारीलोच्या भोगविलासी प्रवृत्तीय तीव्र विरोध केला. विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडानी काहीही साध्य होत नाही, असे कबीराच स्पष्ट मत होते. तीर्थयात्रा करणे. गंगेमध्ये स्नान करणे, माळा गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे अशा सर्वच गोष्टी निरर्थक असल्याचे कबीर सांगतात. विविध ठिकाणच्या तीर्थस्थानी देवाच्या नावाने तिथील ऐतखाऊ पुजारी लोक भोळ्याभाबड्या जनतेचे खूप मोठे शोषण करतात. अशा शोषणाला समान्यजनांनी बळी पडू नये, जत्रेमध्ये दगड असतो आणि तीर्थ म्हणून चमचाभर पाण्याचा एकेक रुपया वसूल केला जातो. अशा गोष्टींना बळी पडणे हा वेडेपणा आहे. संत कबीर, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य दिसून येते. या संदर्भात संत तुकारामही 'तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी' असे म्हणतात. तीर्थस्थानी नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुवून जातात आणि आपणाला मोक्ष मिळतो, असाही खुळा समज समाजामध्ये प्रचलित आहे. या संदर्भामध्ये संत कबीर एक मार्मिक प्रश्न उपस्थित करतात. तीर्थक्षेत्रातील नदीमध्ये स्नान केल्याने माणसाला मोक्ष मिळत असेल तर रात्रंदिवस त्या पाण्यातच राहणाऱ्या बेडकांना का मोक्ष मिळत नाही. तसेच मुस्लीम धर्मातील बकल्यांचा बढी देण्याच्या प्रथेलाही त्यांनी विरोध केला. कबीरांना मानवता हा धर्मच महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक धर्मातील कर्मकांड माणयांना अंधश्रध्दाळू बनवणारे असते. गळ्यात माळा घालणे, गंध/टिळा लावणे, डोक्याचे केस कापणे, असे केवळ बाह्य सांग, ढोंग केल्याने माणूस साधू, संत किंवा सज्जन होत नाही, तर त्यासाठी आधी आपले मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. टिळक, माळा परिधान केल्याने किंवा शाळीग्रामच्या पूजेने मन शुद्ध, शीतल होत नाही, तर त्यासाठी आधी मनाची भ्रांती दूर झाली पाहिजे आणि माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. संत कबीरांनी आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये सत्य, अहिंसा, सद्भाव, सदाचार, परोपकार, शील या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यासारखी मानवतावादी नैतिक मूल्ये आचरणात आणण्याचा आग्रह कबीरांनी आपल्या साहित्यातून धरलेला आहे. प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे कबीर सांगतात. पोथी पढपढ जग मुआ, पंडित भया ना कोय ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. 'प्रेम' या शब्दाची अडीच अखरे माणसांच्या आचरणात आली तर मानवी जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटतील. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेशही संत कबीरांनी अनेक ठिकाणी दिलेला आहे. हिंदू तूरक दुई महि एकै कहे कबीर पुकारी' असे म्हणत कबीरांनी हिंदू-मुस्लीम दोन्हीही माणसेच आहेत. त्यांच्यामधील कृत्रिम भेदभाव निरर्थक आहेत, असे सांगितले आणि हिंदू-मुस्लिमांनी आपापसांतील भेदभाव विसरून माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे. असा आग्रह धरला; म्हणूनच संत कबीर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही समाज गटांमध्ये अत्यंत मोलाचे वाटले; त्यांनी आपल्या 'गुरू ग्रंथसाहिबा' मध्ये | कबीरच्या दोह्याचा समावेश केला. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे कबीर हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्चनीचतेलाही प्रखर विरोध करतात. सर्वच माणसांची उत्पत्ती एकाच ज्योतीतून झाली असेल तर ब्राह्मण शूद असा भेदभाव कशासाठी करायचा? असा खडा सवाल कबीर विचारतात आणि मानवी समाजामध्ये उच्च नीवतेचे कृत्रिम स्तर निर्माण करणाऱ्या जातीयतेला मूठमाती देण्याचा प्रयत्न करतात.



 → सुविचार:-

  •"जतरा में फतरा बिठाया। तिरथ बनाया पानी दुनिया भई दियानी पैसे की धूलपानी ।" "तिलक, दिये। पै तपनि न जाई, माता पहरी बनेरी लाई सबै सालिगराम कूं, मन की भांती न जाई ॥ • भगवे तरी धान सहज देश त्याचा तेथे अनुभवांचा काय पंय ? 


→ दिनविषेश 

'दादाभाई नवरोजी' : (जन्म ४ सप्टेंबर १८२५ - मृत्यू ३० जून १९१७ ) - बृहन्मुंबईत फोर्ट विभागात दादाभाई नवरोजी मार्ग 'टाइम्स ऑफ इंडिया या भव्य इमारतीला शोभा देत आहे व त्यांचा पुतळा नवभारताची प्रगती पाहात उभा आहे. ४ सप्टेंबर १८२५ साली पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १८४५ साली बी. ए. होऊन लंडनला गेले. भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील झाले. प्रगतीशील उद्योगव्यवसायात शिरले. इंग्लंडमधील भारतीयांची संघटना बांधली. इंडियन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या सनदशीर विधायक कार्यामुळे ते लोकप्रिय झाले. इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य म्हणून ते निवडून आले. भारताचा सन्माननीय श्रेष्ठ सदस्य म्हणून जनता त्यांना ओळखू लागली. दादाभाई जेव्हा राष्ट्रीय सभेत सामील झाले तेव्हा भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज प्रशासनाच्या दृष्टोत्पत्तीस आणणे व त्यावर उपाय सुचविणे एवढेच मर्यादित स्वरुपाचे कार्य ती संस्था करीत होती. दादाभाई हे अत्यंत लोकप्रिय व मधुर भाषेचे सम्राट होते. १८९६ व १९०६ या दोन वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.


 → मूल्ये - 

 • स्वाधीनता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता. 


→ अन्य घटना

 • दादाभाई नवरोजी स्मृतिदिन १९१७ महान संत कबीर यांची जयंती- १३०९ 

 • भारत पाकिस्तानात कच्छ करार झाला - १९६५

  • मिझोराम या राज्याची निर्मिती - १९८६. 

  • रॅले जॉन विल्यम्स स्ट्रट स्मृतीदिन १९८६ 


→ उपक्रम

 • दुर्बिण मिळवून विविध गोष्टींचे विविध अंतरावरून निरीक्षण करा. राष्ट्रभक्तीपर गीतांची स्पर्धा घ्या. राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे टिपणवहीत लिहा. 


→ समूहगान

 • हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी हैं.... 


→ सामान्यज्ञान

 • महाराष्ट्रात सर्वात जास्त लोखंड - देऊळगाव (चंद्रपूर). महाराष्ट्रात सर्वात जास्त मँगेनीज रामटेक (नागपूर). 

 • महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कामठी (नागपूर) •महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट (कोल्हापूर)

  •महाराष्ट्रात सर्वात जास्त - अभ्रक

  • (नागपूर)

   • महाराष्ट्रात एक प्रचंड जलविद्युत प्रकल्प कोयना (सातारा)

सोमवार, २४ जून, २०२४

जून २४, २०२४

25 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 25 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपुले घर.... 

 

→ श्लोक

 - वंदे मातरम् । सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम । सस्यशामलाम् । मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभ्रज्योत्स्नां - पुलकीत - यामिनीम् । फुल्लकुसुमितद्रुमदल - शोभिनीम् ॥ चार : सुहासिनीं, सुमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय 

 - हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जलांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृध्द बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधीत वाऱ्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही चंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस; आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस. हे माते. तुला आम्ही वंदन करतो. 

 

→ चिंतन 

- 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' जय- जिजाऊ ( जय सावित्री स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्. माझ्या मातृभूमीला माझे वंदन असो. वेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी. 



→ कथाकथन 

- 'आपल्यावरून जग ओळखावे' सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका लढाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा त्यापैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनांस विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलप्रमाणे राबवीत असे. धनी देईल ते खावयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे. काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे, असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोमिला. पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच. त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाव धाव रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस !" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला. तेव्हा त्याने त्याला विकत घेतले. आणि उलट त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले. हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. 'काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का बरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी, तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत सबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मला पहावेना, म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले. 



→ सुविचार

 • सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी

  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही- अब्राहम लिंकन

   • दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांची माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.


दिनविशेष - 

• 'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन - १८३८ बंकिमचंद्र चटनी ते राष्ट्रगीताचे जनक म्हणून. बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एकम प्रसिध्द होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी | होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी 'बंगदर्शन' हे बंगाली नियतकालीक सुरु केले. प्रे राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे उपल आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले. शुद्ध भाषा व बोली भाषा यांचा सुंदर संगम करून किमान वे वळण लावले व सामर्थ प्राप्त करुन दिले. आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या. बंगाली साहित्यात विनोदही बकिमचंद्रांनीच आणला. 'कमलकांतेर दातेर मधील विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिध्द आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती.एप्रिल १८९४)


→ मूल्ये 

स्वाधीनता, कर्तव्यदक्षता.


अन्य घटना

 इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारताने विश्वचषक जिंकला - १९८३. 

 

→ उपक्रम

 • सुप्रसिध्द बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा.


> समूहगान -

 • जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा... 

 

→ सामान्यज्ञान -

 • राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज.

 •  वि.वा.शिरवाडकर - कुसुमाग्रज. 

 • कृष्णाजी केशव दामले - केशवसुत.

 •  प्रल्हाद केशव -अत्रे केशवकुमार.

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी.

 • नारायण मुरलीधर गुप्ते बी.

मंगळवार, ४ जून, २०२४

जून ०४, २०२४

14 जून दैनंदिन शालेय परिपाठ

14 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.... 

 

→ श्लोक 

ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । थियोयोनः प्रचोदयात ॥ 

विश्वाची उत्पती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुपी आहे. तो अज्ञानाचा नाश करती. ...तो आमच्या बुध्दीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे - सदाचार सद्भाषण सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत - 


→ चिंतन

 समाजाची शोभा ज्ञानी माणसे तर ज्ञानी माणसाचे भूषण क्षमा व त्याग. वार : ज्या समाजात ज्ञानी माणसांची संख्या जास्त असते जो समाज विकसित होऊन प्रगतीच्या पथावर जातो. परंतु मनुष्य ज्ञानी असून भूषणाव नाही. त्याच्या जोडीला त्याच्या जवळ क्षमा व त्यागही हवा. ज्या प्रमाणे फळाफुलांनी बहरलेला वृक्ष त्याच्यावर दगड मारण्याच्याही करतो व आपल्या जवळच्या सर्व गोष्टींचा दुसऱ्यांसाठी त्याग करतो, तसे ज्ञानी माणसाने असायला हवे.


→ कथाकथन 

विचारधन माणसाचे जीवन सुखी, यशस्वी, आनंददायी होण्यासाठी ती म्हणजे धनाची फार मोठी आवश्यकता असते. ही हे धन अनेक प्रकारचं असतं. ते प्रयत्नपूर्वक मिळवा सागतं. शरीरसंपदा, अनुभवसंपदा, ज्ञानसंपदा, धनसंपदा (पेसा), आत्मिक संप विचारसंपदा, कार्यसंपदा अशी ही संपत्ती जितकी चांगली, अधिक प्रमाणात, मौल्यवान, शुध्द स्वरुपात माणसावळ असेल तेवढं त्याचं जीवन सुखी यशस्वी होतं. या संपत्तीपैकी विचारधन हे फार महत्वाचं पायाभूत घन आहे. ते कोणतं कसं आहे, ते कशा प्रकारे मिळवावं, त्याचा उपयोग करावा हे सांगणारी एका महान विचारसंपन्न महापुरुषाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे..... हे महापुरुष म्हणजे आपल्या राष्ट्राचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, ते संस्कृत, इंग्रजीचे महापंडित होते. भारतीय तत्वज्ञान इतर तत्वज्ञानांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारतीय तत्वज्ञान, वैदिक वाङ्मय हे अतिशय तेजस्वी, मौल्यवान विचारांचा अपूर्व आहे. ते डॉ. राधाकृष्णांनी नीट अभ्यासलं, त्यावर तौलनिक विचार करून त्याचे महत्व जाणून घेतलं. ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. मग भारतीयच नव्हे तर सर्व जगातील प्रमुख विद्यापीठात ते विचार समजावून देण्यासाठी आमंत्रण आली. त्यांनी भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानावर अनेक विद्यापीठात व्याखानं दिली. हे विचार केवळ माहितीचं भांडार नव्हते. विविध विषयावर अनुभवातून तावून सुलाखून तयार झाले सुवर्णजडित हिरे, माणके होती. हे तत्त्वज्ञान जगाची उत्पत्ती, जगातील सर्व पदार्थ, प्राणीपशुपक्षी, मानव, ईश्वर, आत्मा, परमात्मा. ऐहिक सुख र पारमार्थिक मोक्ष प्राप्तीचे मार्ग सांगून मानवीजीवन कसं उन्नत, सफल होईल हे सांगणारे अनुभवसिध्द विचार होते. याचे आकर्षण डॉ. राधाकृष्णन विद्यार्थीदशेतच निर्माण झालं. त्यासाठी त्यांनी अनेक जुने-नवे ग्रंथ, अनेक तत्वज्ञांची चरित्रं व विचार याचं परिशीलन केलं. अनेक महापुरुषांची संगत त्यांचे विचार ऐकले. कथा, कीर्तनं, व्याख्याने ऐकली. आपल्या जीवनक्रमातील सुखदुःखाच्या अनुभवातून त्यांना या विचारांचा आता पडताळा पाहि त्यावर स्वतःच विचार करून त्यातले चांगले, बुध्दीला पटणारे विचार त्यांनी आत्मसात केले. त्यातील दोष व फापटपसारा यांचा विचारपूर्वक त्याग केला. केवळ ग्रंथातील माहितीवर विश्वास, अंधश्रध्दा नाही ठेवली. आपल्या दिव्य विचारकसोटीवर त्यांना पारखून त्यांचा निवडक संग्रह केला आणि हे विचारधन फार मोठ्या प्रमाणात जमवलं, आत्मसात केलं. मग त्यांनी त्याचं वितरण केलं. अनेक विद्यापीठातील विद्याथ्र्यांना प्राध्यापकांना, अनेक तत्त्वज्ञान्यांना ते आपल्या अमोघ, रसाळ वाणीतून पटवून दिले. त्या धनाचा केवळ साठा करून ठेवला नाही. त्याचा दुरूपयोगही नाही केला म्हणजे ते सांगून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा नाही मिळवली. तर लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुखी व्हावे म्हणून जगभर त्यांचा प्रसार केला. मग त्यांना भारतात केवळ उत्तम प्राध्यापक, महान तत्त्वज्ञानी म्हणूनच गौरव नाही प्राप्त झाला. तर त्यांना प्रथम आपल्या राष्ट्राचे परदेशातील वकील नंतर उपराष्ट्रपतिपद व अखेर राष्ट्रपतीपद देऊन त्यांना 'भारतरत्न' म्हणून गौरवले. त्यामुळे भारताची प्रतिमा व प्रतिष्ठा सर्व जगात शिखराला जाऊन पोहोचली.


सुविचार -

 • 'सुख हे सुखदायी वस्तूंच्या संग्रहात, धन, सत्ता, प्रतिष्ठा यांच्या प्राप्तीत नसत. ते असतं शुद्ध विचारातून, प्रेमळ मधुर उच्चारातून, मानवांना सुखदायी आपल्या कृतीतून मिळवलेल्या आत्मिक समाधानात ' 

 

→ दिनविशेष

 • लँडस्टेनर कार्ल जन्मदिन - १८६८ : कार्ल लँडस्टेनर हा ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ. व्हिएन्ना येथे याचा जन्म, शिक्षण होऊन तेथील विद्यापीठातच तो शरीरशास्त्राचा प्राध्यापक होता. मानवी रक्ता संबंधी याने महत्त्वाचे संशोधन केले आहे. झिबर्ग, झुरिच, म्युनिक या विविध ठिकाणी त्याने संशोधन केले. १९०० मध्ये याने मानवी रक्ताचे प्रकार, त्यांचे एकमेकांशी साम्य याचे संशोधन प्रसिद्ध केले. नंतर त्याला याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. परंतु त्याच्या शोधाचे महत्व लोकांच्या लक्षात यायला बराच काळ लागला. रक्तातील संलग्नतेच्या गुणधर्मावरून याने रक्ताचे चार प्रकार मानले आहेत. याच्या प्रयोगातून रक्तसंक्रमणाचे तत्व सिध्द होऊन लाखो लोकांचे प्राण वाचले. पुढे अमेरिकेमध्ये रॉकफेलर इन्स्टिट्युटच्या वैद्यकीय विभागात याने काम केले. 'दि स्पेसिफिसिटी ऑफ सिरॉलॉजिकल रिअॅक्शन' हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. 

 

→ मूल्ये

 आदरभाव, बंधुता, सर्वधर्मसहिष्णुता, कर्तव्यदक्षता. 


→ अन्य घटना

 • महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था स्थापन केली- १८९६

  • शास्त्रीय संगीताच्या प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म - १९०५ •प्रा. के. श्रीनिवास कृष्णन यांचे निधन - १९६१ समाजकल्याण मंत्रालयाची स्थापना - १९६४

  

 → उपक्रम

  • रक्तगटांची माहिती मिळवा. रक्तपेढीची माहिती मिळवा. 

  

→ समूहगान 

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान....

 

 → सामान्यज्ञान -

  • मानवाच्या रक्तात तीन प्रकारच्या पेशी असतात. 

  • लोहित रक्तकणिका ऑक्सिजन वाहक

   • श्वेत रक्तकणिका शरीराचे सैनिक रक्त बिंबिका रक्त गोठण्याच्या क्रियेत उपयोगी N

    • रक्त पेढी - रुग्णालयाच्या खास विभागात रक्तदात्याकडून गोळा केलेले रक्त त्यावर योग्य प्रक्रिया करुन विशिष्ट रीतीने साठविले जाते आणि आवश्यक तेव्हा रुग्णाकरिता पुरविले जाते, त्याला रक्तपेढी म्हणतात.

जून ०४, २०२४

13 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 13 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 नमस्कार माझा ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम् सुंदरा.... 

 

→ श्लोक 

- ॐ सहनाववतु । सहनौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै ॥ १३ जून वार : तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ 

- आम्ही एकत्र सेवन (भोजन) करावे. एक होऊन सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो, सर्वत्र शांती नांदो. यजु. उपनिषद 


→ चिंतन 

मी गुणांचा पूजक आहे हेच माझे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. - आचार्य अत्रे मनुष्याच्या अंगी खूप शक्ती असली की तो फार सामर्थ्यवान आहे असे आपण म्हणतो. मनुष्याकडे भरपूर धन दौलत असली की, त्याला सामर्थ्य प्राप्त झाले असे आपल्याला वाटते. पण, ज्या मनुष्याकडे अनेक गुण असतात तो या दोघांपेक्षा जास्त सामर्थ्यवान असतो. कारण त्याच्या गुणांमुळे अनेक लोकांशी त्यांची मैत्री होते. जगातल्या अनेक प्रकारच्या आनंदाचा त्याला सहजपणे घेता येतो. गुणांची पूजा करणाऱ्या माणसालाच गुणांचा लाभ होतो. तो गुणी बनतो.


→ कथाकथन 

- 'आचार्य अत्रे' : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे गेल्या शतकातले सर्वार्थाने बलाढ्य आणि सर्वस्पर्शी असे तरल व्यक्तिमत्त्व होते. सर्व | क्षेत्रात यश पादाक्रांत केलेल्या आचार्य अत्रे यांनी वाङ्मयीन क्षेत्रात आपली स्वतंत्र मोहर उमटवली. अत्र्यांचे बालवाङ्मयसुध्दा गाजले होते, 'आजीचे घड्याळ' सारख्या अप्रतिम आणि शाश्वत अशा कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या. जवळजवळ साठ वर्षे ते अथकपणे लिहित होते. बोलत होते. 'दिनूचे बिल' ही एक अप्रतिम गोष्ट लिहून आईच्या प्रेमाचे महामंगल स्तोत्र जे त्यांनी प्रगट केले त्याला पर्याय नाही. त्या शाश्वत कथेचा सारांश असा की, दिन नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याचे वडिल डॉक्टर होते. दिनू कधीकधी वडिलांबरोबर दवाखान्यात जाई. दवाखान्यात अनेक प्रकारचे रोगी येत आणि स्वतःला तपासून घेऊन औषधे घेत. दिनूचे वडिल औषध घेतल्या नंतर औषधाचे बिल देत. दिनूने एक दिवस ते बिल पाहिले आणि त्याच्या मनात एक | विचार आला. आपण आईची एवढी कामे करतो तर आपणसुध्दा आईला एक बिल द्यावे. दिनूने मग एक बिल तयार केले. प्रत्येक केलेल्या कामापुढे काही | पैसे लिहिले आणि आईच्या खोलीत जाऊन बिलाचा कागद ठेवला. रात्र झाली, दिनू गाढ झोपी गेला. सकाळी दिनूला जाग आली तर त्याला उशाशी एक | कागद आणि त्या कागदावर, त्याने केलेल्या बिलाचे पैसे ठेवलेले दिसले. दिनूने पैसे एका रुमालात ठेवले आणि तो कागद वाचू लागला. आईने दिनूच्या नावाने लिहिलेले ते बिल होते.



तपशील-रुपये

१. लहानपणापासून आजपर्यंत वाढविल्याबद्दल-काही नाही-पैसे

 २. चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल-काही नाही-

  ३. गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल-काही नाही-

   ४. वाचायला शिकवल्याबद्दल- काही नाही-


एकूण-काही नाही


आईने लिहिलेले हे बील वाचल्यावर दिनूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रुमालात बांधून ठेवलेले पैसे दिनूने काढले आणि तो आईकडे गेला. ते सर्व एकूण काही नाही | पैसे त्याने आईला परत केले आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून तो रडू लागला. आईने छोट्या दिनूला जवळ ओढले. त्याचा मुका घेतला आणि म्हणाली, ||दिनू बाळा, तुझे बिल मला मिळाले. मुलांनो, ह्या छोट्या गोष्टीवरून बोध काय घ्यायचा तर आईच मुलाचे सर्व काही अतिशय प्रेमाने करीत असते. आई आयुष्यभर मुलांची निरलसपणे आणि निष्काम बुध्दीने सेवाच करीत असते. मुलांनो एक कायम साठी लक्षात ठेवा की, आईचे ऋण एका जन्मात फिटत नाही. मुलांना आईच्या ऋणातच राहावे लागते. एक कवी म्हणतो की,... स्मरण तुझ्या ममतेचे होई तव उपकारा सीमा नाही, कैसा होऊ मी उतराई, गे माझे आई..... 



→ सुविचार 

•'आई हे सर्व देवतांचे दैवत आहे.' 'काय वर्ण कहाणी तुजला या मातेची, धन्य ही माता तिन्ही जगाची' 

•चांगल्या गोष्टी आपल्याला आमंत्रणे पाठवतील अशी वाट पाहू नये. आपणच त्यांच्याकडे धावत जावे - आचार्य अत्रे 


→ दिनविशेष

 आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन - १९६९: आचार्य अत्रे हे एक अनेक पैलूंनी झळाळणारे असे व्यक्तिमत्व होते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात त्यांनी असामान्य यश मिळविले. उत्तम शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, उत्तम वक्ते, उत्तम लेखक, मराठीत प्रथम विडंबन - कविता करणारे कवी, नाटककार, चित्रपटनिर्माते व अद्वितीय संपादक अशा अनेक छटांनी त्यांचे जीवन झळकले. तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, घराबाहेर, उद्याचा संसार इ. नाटके, झेंडूची फुले हा विडंबनगीत संग्रह, हशा आणि टाळ्या, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र असे विपुल लेखन त्यांनी केले. 'मराठा' हे वृत्तपत्र चालविले. झुंझार पत्रकार म्हणून आचार्य अत्र्यांनी जशी टीकेची तलवार हाती घेतली तशाच खुशखुशीत विनोदाने भरपूर गुदगुल्याही केल्या आणि श्यामच्या आईसारखा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट निर्माण करून जनसामान्यांच्या हृदयाला हात घातला. त्यांच्या 'शामची आई' या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक | (१९५४) व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक(१९५५) मिळाले. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व १३ जून १९६९ रोजी अनंतात विलीन झाले. 


मूल्ये 

• खिलाडू वृत्ती, निर्भयता. 


→ अन्य घटना - 

• बालगंधर्व यांचा जन्मदिन - १८८८ 

 • प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा स्मृतिदिन - १९६९

  

→ उपक्रम

• 'श्यामची आई' तील कथाकथनाची स्पर्धा घ्या. 

  • 'झेंडूची फुले' तील विडंबन गीते वाचा. आचार्य अत्र्यांचे साहित्य बाचा. -



> समूहगान 

ह्या भूमिचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान...... 


→ सामान्यज्ञान 

• अत्र्यांना 'आचार्य' ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका समारंभात दिली. आपला हा सर्वोच्च सन्मान मानून अत्रे आपल्या नावापुढे ही उपाधी मोठ्या अभिमानाने लावत असत.

जून ०४, २०२४

12 जून दैनंदिन शालेय परिपाठ

12 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....

 

 → श्लोक 

 - अपूर्वः कोऽपि कोशीयं विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिमायाति, क्षणमायाति संचयात् ॥ 

 - हे भारती (विद्या देवते) तुझा (कोशोयं) खजिना काही आगळाच (अपूर्व) आहे. खर्च केल्याने (विद्या दुसऱ्याला शिकविल्याने) तो अधिक वाढतो, तर साठा केल्याने (न शिकविल्याने) क्षीण ( विसरत जातो) होतो. 

 

→ चिंतन चिंतन हा उत्तम शिक्षक होय. माणसाने दिवसभरात एकदातरी अंतर्मुख होऊन चिंतन केले पाहिजे. चिंतनाने आपण स्वतःच स्वतःचे शिक्षक बनतो. विचारांच्या दृष्टीने स्वाद बनत जातो व मग समाजाच्या अनेकविध प्रश्नांवर योग्य प्रकारे विचार करून समाजास योग्य रीतीने मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य प्राप्त


कथाकथन

 'सोन्याची धागर' एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. आपल्या मालकीच्या जमिनीच्या छोट्याशा तुकडयावर त्याचा उदरनिर्वाह चाले. दिवसभर तो शेतात काम करी. तरीही तो समाधानी होता. असाच एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी तो शेती कामासाठी निघाला. शेतात नांगरणी करताना नांगराचा फळ जमिनीत अडकला. त्याने पाहिले तर फाळाजवळ एक धागर होती. आजूबाजूची मातीन त्याने ती घागर बाहेर काढली. पाहतो तर ती धागर चक्क सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती. त्याने ती पुन्हा तेथेच पुरली आणि पुढची कामे करून आल्यानंतर त्याने ही हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. पत्नीला शेतकन्याची खूप चीड आली. ती त्याला म्हणाली 'दैव देतं नि कर्म नेते असं म्हणतात ना. ते हेच. तुम्ही असं बेडद्यासारखं काय केलं? ती घागर घरी का आणली नाही?' यावर शेतकरी म्हणाला, 'जर ती घागर आपल्या नशिबात असेल तर ती आपल्यालाच मिळेल. त्याच वेळी गावातील दोन भुरटे चोर शेतकऱ्याच्या घराजवळून जात होते त्यांनी हे सारे ऐकले आणि शेतकन्याच्या शेतात जाऊन ती घागर शोधून काढली. घागर घेऊन ते पळाले. घरी जाऊन पाहतात तर कसल्या मोहरा अन कसलं काय? घागर चक्क सापांनी भरली होती. दोघांनी घागरीचे झाकण लावले आणि सकाळी धागर पुन्हा तेथे ठेवू या असे ठरवून झोपी गेले. इकडे शेतकरी सकाळी-सकाळी शेतावर गेला पण घागर शेतात नव्हती. त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली. पत्नी म्हणाली, कोण मूर्ख सोन्याने भरलेली घागर सोडणार आहे? कुणीतरी ती नेसी, आता बसा हरी विठ्ठल करीत. पत्नीचा राग अनावर झाला. न्याहारी आटोपल्यावर शेतकरी जेव्हा पुन्हा शेतात गेला त्याने पाहिले. घागर पुन्हा तेथे होती. शेतकऱ्याने यावेळी घागरीता हातही लावला नाही. तो मनातच म्हणाला, 'जर ही घागर माझ्या नशिबात असेल तर ती माझ्या घरापर्यंत आपोआप येईल. कारण सकाळी नसलेली घागर दुपारी पुन्हा शेतात दिसली म्हणजे यामागे कोणता तरी देवी हेतू असणार!' चोरांना मात्र शेतकऱ्याचा खूप संताप आला होता. त्यांनी पाहिले, शेतकऱ्याने घागर उचलली नाही. शेतकन्याला धडा शिकविण्याच्या हेतूने त्यांनी घागर रात्री शेतकऱ्याच्या दारात नेऊन ठेवली आणि झाडामागे आता शेतकरी धागर कधी उघडीत अन् त्यातील साप त्याला दंश कधी करतील असे म्हणत वाट पाहू पाहू लागले. शेतकरी नेहमी प्रमाणे शेतावर जाण्यासाठी | निघाला. त्याने पाहिले दारात तीच घागर. त्याने पत्नीला हाक मारली. दोघांनी घागरीचे झाकण उघडले. इकडे आता शेतकरी सर्पदंशाने मरणार म्हणून चोरांना खूप आनंद होत होता! आम्हाला फसवतो काय? पण झाले निराळेच! घागर सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती. या अचानक मिळालेल्या दैवीकृपेने | शेतकऱ्याचे जीवन पालटले. तो आता श्रीमंत झाला होता. मुलं-बाळं आनंदात होती. तरीही त्याने साधी व समाधानी राहणी सोडली नव्हती. चोर मात्र दात -ओठ चावीत राहिले. जेथे देवाची कृपा असते, तिथे कोणाचे काहीच चालत नाही हेच खरे!

 


 → सुविचार 

 • कुणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करु नका. 

 • आहे त्या परिस्थितीत सुख व समाधान माना. लोभ करु नका.



→ दिनविशेष

 भारत सेवक समाजाची स्थापना - १९०५ : सतत २० वर्षे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापनाचे व्रत पूर्ण करुन ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची १९०५ मध्ये स्थापना केली. दुःख निवारण, समाजसेवा, सहकार्याचा प्रसार, समाजशिक्षण जागृती ही त्याची उद्दिष्टे होती. या समाजाची स्थापना करून त्यांनी त्यागी; निरलस कार्यकर्त्यांना देशसेवेची एक सुवर्णसंधीच प्राप्त करून दिली. सुरुवातीस या संघटनेच्या मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी स्वतःच पार पाडली. त्यांच्या पश्चात हे कार्य पेलण्याची धुरा श्रीनिवास शास्त्री यांनी वाहिली व त्यांच्या नंतर खूप काळापर्यंत पं. हृदयनाथ कुझरूंनी त्यांचे नेतृत्व केले. सदैव देशाची चिंता करणे व स्वतःजवळील उत्कृष्ट ते देशाला अर्पण करणे, स्वार्थी विचारांना थारा न देता जे मिळेल त्यात संतुष्ट राहून मोहापासून दूर राहणे, भांडणतंटा न करता खाजगी चारित्र्य निष्कलंक राखणे, पंथ जात याचा विचार न करता भारतीयांच्या हितासाठी झटणे व सामाजिक ध्येयाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, ही भारतसेवक समाजाच्या कार्यकर्त्यांची व्रते होती. निदान ५ वर्षे समाजकार्याचा अनुभव घेतल्यावाचून कुणालाही समाजाचे सभासद होता येत नसे. या संस्थेपुढे स्वतःचे उदाहरण ठेवून गोखल्यांनी निस्वार्थी, मेहनती व देशकार्याला वाहून |घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक संघ तयार केला. पुढे हा समाज देशकार्यात अग्रणी ठरला. 

 

→ मूल्ये 

राष्ट्रप्रेम, आदरभाव, कर्तव्यदक्षता, बंधुता, सर्वधर्मसहिष्णुता. 


→ अन्य घटना

 • भारतीय गणिती व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट जन्मदिन - इ.स. ४७६ 

 • साधनासिद्ध साहित्यिक भा. द. खेर यांचा जन्म - १९१७

  • मराठी भाषेचे व व्याकरणाचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुळकर्णी यांचे निधन - १९६४

  

 → उपक्रम

  आपल्या शाळेतील गरजू मुलांना मदत करण्यासाठी 'शालेव स्नेह - मंडळ' निर्माण करा

  . • ना. गोखल्यांचे रेखाचित्र काढून त्यांचे आदर्श गुण लिहून काचफलकावर लावा. 

  

समूहगान

 देश हमारा, निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा..... 

  

 → सामान्यज्ञान • उंट हा पाण्यावाचून २ आठवडे राहू शकतो. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. • उंट एकाच वेळेस २५ गॅलन पाणी पिऊ शकतो.

जून ०४, २०२४

11 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 11 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....

 

श्लोक

 - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थच साधयेत्। क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्। क्षणा-क्षणाने विद्या, कणाकणाने धन जमवावे. क्षण गमावला तर विद्या कशी मिळणार, कण गमावले तर धन कसे मिळणार (प्राप्त होणार)


चिंतन

 प्रभूची लेकरे सारी, त्याला सर्वही प्यारी । कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अपदि । - एकाच ईश्वराची आम्ही लेकरे आहोत. नुकतीच जन्मलेली काही मुले जर एकत्र ठेवली तर त्यातून कुठले मूल हिंदूवे, कुठले मुसलमानाचे, कुठले ब्राह्मणाचे, कुठले हरिजनाचे हे ओळखता येणार नाही. म्हणजेच हे भेदभाव देवाने नव्हे माणसा निर्माण केले. या भेदामुळे भने दुखावतात आणि देश कमजोर होतात. माणसाने माणसासारखे जगावे. प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे. हे विश्वची झे घर असे ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले आहे. आपले मन तितके मोठे करायला हवे. आई 

 

→ संस्कार -

 “ 'श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवा सांग शुद्ध बुध्दी दे म्हणून."- श्यामचीआई.



→ कथाकथन

 - महात्मा ज्योतिराव फुले - महात्मा ज्योतीराव फुले याचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे निवाई गय दाम्पत्याच्या पोटी झाला. १८४० मध्ये म्हणजे अवघ्या तेराव्या वषी गोविंदरावानी तानातान पाटाच्या कन्येशी (सावित्रीबाईशी ) लावून दिले. आता ज्योतिया विद गरज निर्माण करणारा व मनावर प्रचंड आपात करणारा प्रसंग होता ज्योतिबाच्या ब्राह्मण मित्राच्या उग्नादा. फुलमाया ज्योतिबाया | आपल्या बरोबरीने चालतो आहे हे पाहून कर्मठ सनातनी ब्राह्मणांचा राग अनावर झाला. त्यांनी धक्के मारून ज्योतिबाला वरातीवर काढते. या | आपमानाचा आघात होऊन महात्मा फुलेंनी शूद्रांना गुलामीत ठेवणाऱ्या वेदशास्त्र पुराणांचा धर्मग्रंथाचा बारकाईने चिकित्सक अभ्यास सुरू केला. त्यामुळे सर्वप्रथम बहुजनांना शिक्षण देऊन त्याचं अज्ञान दूर करावयास हवे याची जाणीव ज्योतिदाना झाडी पूर्णकृप | कुटुंबातील स्त्री साक्षर व्हावयास हवी. स्त्रियांना शिकविण्यासाठी स्त्री शिक्षिका हवी कारण तत्कालीन समाज अत्यंत कर्मठ व परंपरावादी होता. त सावित्रीच्या हाती ज्योतिबा गुरूने लेखणी दिली आणि स्त्री शिक्षणाचा ओनामा केला. सावित्री शिकली. ज्योतियाच्या प्रेरणेने भारतातील पहिली शिक्षिका जन्माला आली. अत्यंत कृतज्ञतेने सावित्रीबाई ज्योतिबांच्या काचा देख आपल्या काव्य' या काव्यसंग्रहातील ज्योतियां नमस्कार' या ज्योति संमर्पित कवितेतून करतात. १८४८ साली भिड्यांच्या वाड्यात काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेतील मातंग समाजची मुक्ता साळवे ही पहिली चिकित् करणारा अत्यंत तर्कशुध्द निबंध लिहिते. ताराबाई शिंदे ही जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका ठरते. 'स्त्री पुरुष समानता नावाचा अत्यंत विस्फोटक ग्रंथ लिहून ती पुरूषप्रधान समाजासमोर ते धर्मव्यवस्थेसमोर बिनधास्तपणे अनेक प्रश्न उभे करते ते केवळ सावित्रीबाई व ज्योतिबांच्या समर्थ प्रेरणेमुळे ज्योतिबा एक उत्तुंग व्यक्तीत्व होते. जगातील निवडक विद्वानांपैकी एक होते. सर्वश्रेष्ठ असे सांस्कृतिक पुरूष होते. त्यांचे समाज परिवर्तनाचे प्रचंड कार्य | शासनाने त्यांचा मोठा सत्कार केला. जनतेने त्यांचे निःस्पृह कार्य पाहून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. नेलसन मंडेला यांनी त्यांच्याबद्दलच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला महामानव असे गौरवोदगार काढले. अत्यंत संपन्न जीवन जगता येत असतानाही शेतकन्याचा वेष धारण करून अत्यंत साधे जीवन जगणारे ते फार मोठे कॉन्टेक्टरदेखील होते. समाज सुशिक्षित, संपन्न व संघटित करीत असतानाच त्यांनी १८४७ ला 'पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी' स्थापन करून स्थापत्य शास्त्रातील उत्तम नमुने असणारी बांधकामे उभी केली महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा २८ नोव्हेंबर १८९० रोजी मृत्यू झाला. 

 

→ सुविचारः 

• मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नांनी आणि बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणकीचे फलित होय -सावित्रीबाई फुले.


→ दिनविशेष

 - साने गुरुजी स्मृतिदिन - १९५० : 'श्यामची आई' हे पुस्तक लिहून मुलांच्या हृदयात कायमची जागा मिळविलेल्या साने गुरुजीया जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणात पालगड येथे झाला. अमळनेर हायस्कूलमध्ये ६ वर्षे शिक्षक म्हणून काम करणारे साने गुरुजी आपल्या प्रेमळ अंतःकरणाने, गोड बोलण्याने मुलांच्यात अतिशय प्रिय झाले. समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. श्रद्धा, भावना, स्वप्ने व त्या स्वप्नांचा ध्यास म्हणजेच गुरुजींचे साहित्य, पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून उपोषण केले. साने गुरुजींची गोड गोष्टी, श्यामची आई, सुंदर पत्रे इ.सुमारे १०० च्यावर पुस्तके प्रसिध्द आहेत. समाजातील वाईट गोष्टी हळव्या मनाला सहन न झाल्यामुळे ११ जून १९५० रोजी गुरुजीनी आपले जीवन संपविले. 'साने गुरुजीचे पुण्यस्मरणानिमित्त - (आईचे उपकार) - "आई देह देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच! आई माझा गुरु, आई कल्पतरु, तिचे उपकार कसे मी विसरू? माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. प्रेमळपणे वागायला बोलायला, चांगले विचार करायला तिनेच मा शिकवले. माझ्यातली सेवावृत्ती, निरहंकारिता, करुणा, क्षमाशीलता हे सारे आईचे देणे, कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्रयातही स्वत्व, तत्व न गमावता कसे जगावे हेही तिनेच मला घटना प्रसंगातून, आचरणातून शिकवले. आईची स्मृती आळवून तिचे गुणगान करुन हे ओठ पवित्र करीन" 

 - 


→ मूल्ये

 समता, सर्वधर्मसमभाव.



 → अन्य घटना

  • शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगाची भेट १६६५

   • वासुदेव शास्त्री खरे यांचा स्मृतिदिन. १९२४ 

   • भारताचे थोर गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आपले मार्गदर्शक डॉ. हॉईल यांच्या सहकार्याने होईल- नारळीकर सिध्दांत स्थापित केला. - १९६४ 

   • नामवंत उद्योगपती घनःश्यामदास बिर्ला यांचे निधन - १९८३ 

   

→ उपक्रम

 •'श्यामची आई' पुस्तक मिळवून वाचा.

 • साने गुरुजींची समूहगीते पाठ करा.


समूहगान

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा


सामान्यज्ञान

 • काडेपेटीच्या आकाराच्या सोन्याचा ठोकून पत्रा बनविला तर तो टेनिसच्या मैदानाइतका होईल.

जून ०४, २०२४

10 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 10 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 तू ही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा.....

 

 → श्लोक 

 पठति लिखति पश्यति, परिपृच्छति पठितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरवैः नलिनीदलमिव विकाश्यते बुध्दिः ॥

  जो वाचन करतो, लिहितो, पाहतो (निरीक्षण करतो) प्रश्न विचारतो, विद्वानाच्या सहवासात राहतो. त्याची बुध्दी, सूर्याच्या किरणांनी कमळ फुलावे त्याप्रमाणे विकसित होते. 

  

→ चिंतन 

जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा । - संत तुकाराम नुसती भगवी वस्त्रे घालून, अंगावर राख फासून स्वतःला साधू म्हणवून घेणाऱ्या वैराग्याला आपण मान देतो, त्याची पूजा करतो, नमस्कार करतो.पण तुकारामांच्या मते खरा साधू कोणता तर जो दुःखी, कष्टी लोकांचे दुःख जाणतो आणि आपले पणाने तो दूर करायचा प्रयत्न करतो. हा माझा, तो परका असा भेद न करता तो सर्वांची दुःखे दूर करून सर्वांचे अश्रू पुसतो. संत एकनाथ, संत तुकाराम, गाडगेबाबा, बाबा आमटे, मदर तेरेसा हे नव्या युगातील खरे साधू होत.


कथाकथन 

- 'दानात दान नेत्रदान' : केळकर कुटुंब अतिशय आनंदी अन् मनमिळावू. मुलगा दीपक आणि मुलगी मेधा असा छोटासा परिवार. त्यांच्या घरात सान्यांचाच स्वभाव चांगला होता. दुसऱ्यांना ते सतत मदत करीत. कुणी आजारी असेल तर केळकर कुटुंब त्यांच्या मदतीला हजर. कुणाच्या घरी सण- समारंभ असेल तेथेही ते मदतीला. त्यात त्यांच्या शेजारी जे गोखले आजोबा-आजी राहत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत केळकर कुटुंबाची त्यांना मदत होई. दीपक आता सातवीला होता आणि मेघा पाचवीला. दोघांच्याही गोड स्वभावामुळे त्यांना मित्रमंडळी भरपूर मिळाली होती. संध्याकाळ झाली की गल्लीतली सारी मित्रमंडळी मोकळ्या मैदानात खेळत. अगदी मनसोक्त आनंद लुटत खेळायची. केळकरांच्या घरात एकच गोष्ट कमी होती. ती म्हणजे दीपकचा एक डोळा जन्मापासून निकामी होता. त्यामुळे एका डोळ्यावरच त्याचे काम चाले. तरीही दीपक अभ्यासात, खेळात हुशार होता. एकदा संध्याकाळी सारी मुले मैदानात जमली आणि शिवाशिवीचा खेळ सुरु झाला. एकदम खेळता-खेळता काय झाले कोणास ठाऊक? दीपक पळत होता. पळता पळता त्याचा पाय घसरला आणि तो सपशेल आपटला. तिथेच बाभळीचा एक काटा होता. तो दीपकच्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्यातून भळभळा रक्त वाहू लागले. एक डोळा आधीच निकामी, त्यात दुसराही काट्यामुळे फुटला आणि दीपक अधिक बनला. त्याला काहीच दिसेना. मुलांनी त्याला धरून घरी आणले. दीपकला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेले आणि डॉक्टरांनी डोळा तपासून सांगितले, " दीपक आंधळा झालाय. आता त्याला दिसू शकणार नाही." झाले, त्या दिवसा पासून केळकरांच्या घरातले हसू संपले. दुःखाची छाया पसरली गल्लीतल्या साऱ्यांनाच वाईट वाटत होते; पण कोण काय करू शकणार होते. दिवस जात होते. दीपक घरी एका कोपऱ्यात बसून राही. सारी कामे आई करी. त्याला हाताला धरून नेई. वर्षे लोटली आणि शेजाऱ्यांच्या गोखले आजी आजारी पडल्या. अगदी शेवटचेच आजारपण. त्या आता काही दिवसांच्याच सोबती होत्या. डॉक्टर घरी येत. तपासत. पण फरक पडत नव्हता. उलट आजार जास्तच वाढत चालला होता. गोखले आजींनाही कळले की, आता आपण संपणार आहोत. पण, संपण्यापूर्वी एक सत्कर्म करायचे त्यांनी ठरविले, त्यांनी डॉक्टरांना गोखले आजोबांना जवळ बोलवले. एव्हाना केळकर कुटुंबही त्यांच्या जवळ आले होते. आजी अडखळत सांगू लागल्या, “ हे बघा, मी आता जाणार, पण माझ्यासाठी रडत बसू नका. मी गेल्याबरोबर माझे डोळे दीपकला द्या." असे म्हणून त्यांनी दीपकच्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला. साऱ्यांकडे डोळे भरून पाहिले आणि प्राण सोडला. डॉक्टरांनी लगेच आजींना व दीपकला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचे डोळे दीपकला बसवले. आजींच्या नेत्रदानामुळे दीपक डोळस बनला आणि आजींची शेवटची इच्छा पूर्ण झाली.


→ सुविचार

 • 'रक्तदान श्रेष्ठ दान, नेत्रदान कार्य महान, देहदान जीवन दान' ● 'शिक्षण हाच अंधाचा डोळा, यामुळे मिळणारा आत्मविश्वास हीच त्याची दृष्टी'. ● 'दुसऱ्याला मदत करणे, त्याच्या दुःखावर फुंकर घालणे म्हणजे खरी माणुसकी' 

  

→ दिनविशेष

 जागतिक दृष्टीदान दिवस : डॉ.के. भालचंद्र यांचा जन्मदिन १० जून १९२४. डॉ. के. भालचंद्र हे एक महान शल्यचिकित्सक. त्यांनी अंधांच्या दुःख निवारणासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. शक्य तितक्या अंधांना दृष्टीदान करणे हेच त्यांनी आपले जीवनध्येय मानले. त्यांनी आपल्या हयातीत ८०,००० व्यक्तींचे अंधत्व दूर केले म्हणून त्यांचा जन्मदिवस १० जून हा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करतात.

 


 → मूल्ये 

 • कर्तव्यदक्षता, बंधुता, भुतदया. 

 

→ अन्य घटना

 • ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांमध्ये पहिली होड्या वल्हविण्याची स्पर्धा सुरू झाली. - १८२९ 

 • भारताचे लष्करप्रमुख जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म १९०९ प्रसिध्द उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म १९३८ "मिग' या जातीच्या विमानाची नाशिक येथे निर्मिती - १९६६ 

 • कथा लेखिका कमलाबाई टिळक यांचे निधन - १९८९

 

 → उपक्रम

 • ब्रेल लिपीची माहिती मिळवा. नेत्रदानाची माहिती करून घ्या. 

 

→ समूहगान

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....


. → सामान्यज्ञान

 • १९९१ मध्ये भारताची लोकसंख्या ८४ कोटी ६३ लक्ष इतकी होती. तर २००१ पर्यंत भारताची लोकसंख्या १०० कोटी पेक्षा • निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे न ओळखणे म्हणजे रंगांधत्व होय. यात कोणताही प्राथमिक रंग न ओळखता येण्यापासून एखादाच रंग ओळखणे या अवस्थांचा समावेश असतो. पूर्ण रंगांधत्वापेक्षा एखाद्या रंगापुरतेच रंगांधत्व अधिक आढळते. 'शिनोबू इशिहारा' या जपानी नेत्रवैद्याच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या 'इशिहारा चाचणी' परीक्षेत निरनिराळ्या रंगीत ठिपक्यांच्या पार्श्वभूमीवर आकडे दडविलेले असतात. रंगांधत्व असणाऱ्यांना ते आकडे ओळखता येत नाहीत. एक लाख डोळ्याची शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ. तात्यासाहेब लहाने, मुंबई यांचा नवा विक्रम.

जून ०४, २०२४

9 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 9 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि.... 

 

→ श्लोक

 विद्या ददाति विनयं, विनयाद् याति पात्रताम् । पात्रत्वान् धनमाप्नोति, धनाद् धर्म ततः सुखम्।। 

 विद्या विनय (नम्रता) देते, विनयामुळे पात्रता (योग्यता) येते. पात्रता आल्याने (योग्यता वाढल्याने) धन प्राप्त होते. धनामुळे धर्म वाढतो आणि धर्मातून सुखाचा लाभ होतो.

 

 → चिंतन

  - गरज ही शोधाची जननी मानतात. मानवाच्या विकासाच्या काळात जसजशी सुधारणा होत गेली तसतशा त्याच्या गरजाही वाढत गेल्या. सुरुवातीस तो कंदमुळे खाऊन, झाडाची वल्कले गुंडाळून अल्पसंतुष्टपणे राहत होता. पण बदलत्या काळाबरोबर त्याला नव्यानव्या गोष्टींची जरूरी भासू लागली व त्या मिळविण्यासाठी तो धडपडू लागला आणि या धडपडीत वेगवेगळे शोध लागत गेले. अग्नीची वेगवगळी रूपे, घराच्या बदलत्या सुखसोयी, वस्त्रांचे विविध प्रकार अशा गरजांतून निर्माण झाले. गरज लागल्यावर माणूस शोध घेतो, अन्नाच्या वेगवेगळ्या जाती शोधून काढतो. हे सर्व आधुनिक जग माणसाच्या गरजांतूनच निर्माण झाले आहे.


कथाकथन -

 कांतिकारी महानायक बिरसा मुंडा इंग्रजी राजवटीत आदिवासीचा न्यायहक्क त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला होता. अन्यायाविरुद्ध आवाज काढणान्या आदिवासीच्या जिमा कापल्या जात होत्या. आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते. सतत अन्याय, अत्याचार, हिंसा आणि शोषण होत होते. तेव्हा आपल्या आदिवासी समाजास संघटित करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वरील उद्गार काढले आहेत, एका महान क्रांतिकारकामे आणि त्याचे नाव आहे बिरसा मुंडा! बिरसा मुंडा या महान क्रांतिकारकाचा जन्म १५ नोव्हेंबर १८७७ मध्ये झारखंड मधील संची जिल्ह्यातील अहात नावाच्या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू होते. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या बिरसा मुंडाचे प्राथमिक शिक्षण बिरजू मिशन स्कूलमधून झाले. उच्च प्राथमिक परीक्षा सन १८८७ मध्ये जी.ई.एल. मिडल स्कूलमधून उत्तीर्ण केली. ब्रिटीश प्रशासनात मुंडा आदिवासीची नोंद चोर, डाकू, लुटारू म्हणून केली जायची; त्यामुळे त्यांना न्याय मिळत नव्हता. अधिकारी वर्ग त्यांचे शोषण करीत असे. हे सर्व अत्याचार सुशिक्षित बिरसा मुंडा उघड्या डोळ्यांनी पाहत होता. इ.स १८६९ चा 'वनसंरक्षण कायदा' निघाला; तत्पूर्वी आदिवासींचे जगणे, आदिवासींच्या उपजीविकेस वनांची मदत व्हायची, त्यावरही बंदी आणली गेली. हे अन्याय, अत्याचार सहन न झाल्याने १८९० मध्ये बिरसा मुंडाने स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध एक सशस्त्र संघटना उभी केली. १८९८ च्या फेब्रुवारी महिन्यात गोंडवनातील एका सभेमध्ये बिरसाने आपल्याच कुन्हाडीने आपलाच हात कापून त्या रक्ताने आदिवासी बांधवाच्या कपाळावर टिळे लावले आणि संकल्प करवून घेतला, की, जोपर्यंत आपल्या आयाबहिणींच्या इज्जतीचा बदला आपण घेत नाही, तोपर्यंत आपण चूपचाप सायचे नाही. आपल्या सशस्त्र लढ्यास प्रारंभ करण्यापूर्वी बिरसाने आपल्या अनुयायांसोबत रांचीजवळील चुटिया |मंदिराला भेट देण्याचे ठरविले. आदिवासी मुंडात आपल्या श्रध्दा स्थानाबाबत जागृती करून आपल्या परंपरांबद्दल आदर आणि आस्था निर्माण करण्यासाठी ती भेट होती. चुटिया मंदिराबाबत मुंडाचे असे मत होते की, या आदिवासींच्या मालकीच्या जागेवर आर्य-हिंदूनी ताबा मिळवून त्यात थोडाफार बदल करून मंदिराची निर्मिती केली. आदिवासींची संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्या मनावर असलेली इतर धर्मांची पुटे काढावी लागतील. त्याशिवाय मुंडामध्ये जागृती होणार नाही. म्हणूनच बिरसाने या मंदिरातील हिंदू देवतांच्या मूर्ती नष्ट केल्या आणि त्याने आपल्या समाज बांधवांना समजावून सांगितले की, | आदिवासी समाजाच्या दुःखाला आणि पतनाला आर्य हिंदू कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांना भिरकावून द्या आणि आपल्या मूळ संस्कृतीनुसार आचरण करा. आदिवासीचे पूर्वज हे भारतातील शासक होते. त्या वेळी आदिवासी समाजात एकता होती. समाज सुखी व समाधानी होता. परंतु पुढे आर्यांनी भारतात आगमन। करून आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवला आणि त्यांची मूळ संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला. बिरसा व मुंडा आदिवासी आनंदात राहत असल्याने इंग्रज सरकार व पोलिस यंत्रणेची झोप उडाली होती. ढोमवारी गावात सामूहिक हत्या आणि बलात्काराचे तांडव केले. या हत्याकांडात बिरसाची | अनेक विश्वासू माणसं मारली गेलीत. या प्रकारामुळे मुंडाच्या लढ्यास हादरा बसला असल्या नीच कृत्यामुळे बिरसाही हतबल होऊन परिहट येथील घनदाट | जंगलात निघून गेला. यातच बिरसा मुंडा पोलिसांच्या हाती लागला. त्यांला तुरूंगात डांबले गेले. स्वातंत्र्यप्रिय बिरसाला तुरुंगातले वातावरण मानवले नाही. त्यांने अन्नपाणी सोडले. ९ जून १९०० ला सकाळी बिरसाने शेवटचा श्वास घेतला.


सुविचार 

• चांगुलपणाबरोबर शीर्य, वीरत्व व शान हवे, तरच संगतीची वाईट माणसे चांगली बनतात.

 • सर्वाच्या हिताचे कल्याणाचे जे असेल ते करावे. 

 


→ दिनविशेष 

 • जॉर्ज स्टीफन्सन जन्मदिन - १७८१ : १८२५ मध्ये जगातील पहिली आगगाडी तयार करण्याचा मान मिळविला एका ब्रिटीश इंजिनीयरने! जॉर्ज स्टीफन्सन हे त्याचे नाव, गरिबीतून याने कसेबसे स्वकष्टाने शिक्षण घेतले. ज्या खाणीत त्याचे वडील इंजिनवर काम करीत होते तिथेच तो असिस्टंट फायरमन म्हणून काम करु लागला. रिकाम्या वेळात त्याने इंजिन या विषयावरचे सर्व ग्रंथ वाचून काढले. खाणीतील इंजिनात सुधारणा करुन जॉर्जने १८१४ मध्ये ताशी ४ मैल वेगाणे जाणारे इंजिन तयार केले. त्याची हुशारी पाहून खाणमालकाने त्याच्या उपक्रमास पैसे पुरवायचे ठरविले. वाफेच्या इंजिनामध्ये कोळसा प्रखरपणे जळण्यासाठी हवेच्या जोरदार प्रवाहाची आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन मार्ग शोधून काढणे जरूरी आहे, असे त्याला वाटू लागले. याचवेळी स्टोक्टन व डालींग्टन या गावांना कोळसा वाहून नेण्यासाठी स्टिफन्सने आपल्या इंजिनाचा विचार मांडला. या दोन गावांमध्ये १ मैलाचा | रेल्वेमार्ग बांधला गेला. १८२५ च्या सप्टेंबर महिन्यात या मार्गावरुन उतारू घेऊन जाणाऱ्या गाडीचा पहिला प्रयोग झाला. नवनवे बदल होत आजचे इंजिन तयार झाले. १८२९ सालची लिव्हरपूल मँचेस्टर आगगाडीची स्पर्धा याने जिंकली. १८४८ मध्ये १२ ऑगस्टला जॉर्ज स्टीफन्सनचे निधन झाले


. → मूल्ये 

• श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, कर्तव्यदक्षता. 


→ अन्य घटना

 • गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी दिन मान्य होऊन साप्ताहिक सुट्टीची सुरुवात झाली. - १८९० लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. - १९६४ क्रांतीकारी शहिद बिरसा मुंडा स्मृती-१९००

  •केंद्रीय रेल्वेमंत्री लालु प्रसाद यादव जन्मदिन - १९४८ 


→ उपक्रम 

• विविध शास्त्रज्ञांच्या शोधकार्याचा एक तक्ता तयार करा. वेगवान आगगाड्यांची माहिती मिळवा.


→ समूहगान

• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता..... 


→ सामान्यज्ञान 

• घरबांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ९" x ४ X २, " विटेच्या आकाराची सोन्याची वीट केली तर ती सुमारे ३२ किलो भरेल.

जून ०४, २०२४

8 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 8 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा... 


→ श्लोक 

सुन्दरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः । शोभते न विनाविद्या, विद्या सर्वस्य भूषणम् ॥ 

एखादी व्यक्ती कितीही सुंदर असली, शीलसंपन्न असली, कुलीन (उत्तम कुळात जन्मलेली) असली, खूप धनवान। असली तरीही विधेशिवाय ती शोभून दिसत नाही. विद्या हे सर्वांचेच भूषण आहे.


 → चिंतन

  महत्त्वाकांक्षेची पूर्तता आपल्या शक्तीवर आणि आपल्या मानसिक बळावर अवलंबून असते. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती करताना ज्या विशेष देणग्या त्याला दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे बुध्दी. या बुध्दीच्या जोरावर मनुष्य श्रेष्ठ होत राहण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नातूनच महत्त्वाकांक्षेचा जन्म होतो. पण नुसतीच महत्त्वाकांक्षा काय कामाची? तिच्या पूर्ततेसाठी आपले शारीरिक बळही वाढायला हवे आणि मानसिक शक्तीही. शारीरिक शक्तीसाठी व्यायाम हवा, तर मानसिक शक्तीसाठी हवा आत्मविश्वास, चिकाटी आणि एकाग्रता यांचा त्रिवेणी संगम!


कथाकथन '

द्रोण आणि अर्जुन' एकदा काय झाले, गुरुदेव सर्वांना धनुर्विद्या शिकवत होते आणि त्यांना एकदम तहान लागली. त्यांनी अर्जुन हाक मारली. "कत्सा ! जरा इकडे ये...." अर्जुन ताड्कन उठला नि त्याने गुरुदेवांना प्रणाम केला. " अर्जुना ! मला तहान लागली आहे. जरा यमुनेवरून पाणी घेऊन ये... अर्जुनाने जवळ असलेला हंडा उचलला आणि तडक यमुनेवर गेला. आचार्य वडाच्या झाडाखाली आसन घालून बसले. इतक्यात युवराज दुर्योधन द्रोणांच्या जवळ आला नि पटकन म्हणाला, “गुरुदेव ! एका बाणात शत्रुची मुंडकी एकदम उडविण्याची कला तुम्हाला अवगत आहे ती तुम्ही मला शिकवणार का?" द्रोणांना दुर्योधनाच्या या बोलण्याची गंमत वाटली; पण त्यांनी दुर्योधनाला जवळ बोलावले नि हळुवारपणे म्हटले, " युवराज! मी तुल अवश्य ही विद्या शिकवीन पण प्रथम तुला एक परिक्षा द्यावी लागेल." दुर्योधनाने लगेच 'हो गुरुदेव' असे म्हटले. दुर्योधनाला गुरुदेवांनी सांगितले, “ज्या वाली मी बसलो होतो. त्या झाडाच्या एका फांदीला तू एक बाण मार आणि वडाची पाने खाली पाड; पण एक लक्षात ठेव, पानांचे देठ झाडावरच राहिले | पाहिजेत: "दुर्योधनाने लगेचच बाण सोडला आणि काय गंमत झाली. वडाची काही पाने खाली पडली; पण सर्व पाने अर्धवट पडली होती. अर्धीपाने देठासकट झाडावरच राहिली होती. गुरुदेव काहीही बोलले नाहीत. दुर्योधनाने मान खाली घातली. तेवढ्यात समोरुन अर्जुन येताना दिसला. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला हंडा होता, पण एक थेंबही त्याच्या अंगावर सांडला नव्हता. वाटेत त्याला अर्धवट पडलेली वडाची पाने दिसली. अर्जुनाच्या सर्व काही एका क्षणात लक्षात आले. त्याने बाण काढला, प्रत्यंचा ओढली आणि बाणावर खांद्यावरची पाण्याने भरलेली घागर तोलून धरली. घागर अधांतरी होती. दुर्योधन पहातव राहीला. अर्जुनाने पुन्हा वाण मंत्र म्हणून सोडला, तेव्हा झाडावरची सर्व अर्धवट पाने खाली पडली; पण त्यांचे देठ झाडावरच साहिले. नंतर त्याने पुन्हा बाण काढला आणि पुन्हा सोडला. त्या एका बाणातून बाणांचा एक झुला तयार झाला आणि ती अधांतरी पाण्याने भरलेली घागर गुरुदेवांच्या मुखाजवळ गेली आणि त्यांच्या मुखात यमुनेचे स्वच्छ पाणी हलकेच पडले. गुरुदेवांना संतोष झाला. त्यांनी फक्त दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधन भराभर महालाकडे चालता झाला. तेव्हा दुर्योधनाला उद्देशून आचार्य म्हणाले, “युवराज, तुम्हाला अर्जुनासारखे शरसंधान जमणे कठीण आहे. " 


→ सुविचार

 'एकाग्रता ही यशाची पहिली पयारी आहे.' 

 • 'यश फक्त परिश्रमाने मिळत नाही, त्यासाठी परिश्रमाबरोबर मुत्सद्देगिरी आणि बदलत्या परिस्थितीची अचूक जाणही असावी लागते.


→ दिनविशेष

 प्रकाश पदुकोणने बॅडमिंटनचा राष्ट्रीय चषक जिंकला - १९८१ : बॅडमिंटन हा मूळचा इंग्लंडचा खेळ. १८७० मध्ये पुण्याला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी खेळाचे काही नियम बनविले. १८९३ पर्यंत त्यात बदल होत गेले. १९३४ साली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संस्था स्थापन झाली. भारताच्या प्रकाश पदुकोण या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यवीराने १९७१ ते १९७९ या काळात ९ स्पर्धा जिंकल्या. १९७१ मध्ये एकाच दिवशी कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटातील सामने जिंकले. त्यावेळी वयाने तो सर्व खेळाडूंपेक्षा लहान होता. चीनच्या हान जियानचा पराभव करुन प्रकाशने १९८१ मध्ये जेव्हा अल्वा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाचे उधाण आले. भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील तो एक अपूर्व दिवस होता. हृदयातल्या महत्त्वाकांक्षेला अथक परिश्रम आत्मविश्वास आणि चिकाटीचे खत पाणी घातले की किती गोजिरी फळे येतात याचा साक्षात्कार त्या दिवशी साया भारतीय युवक खेळाडूंना झाला. योग्य संधीची वाट पहा आणि ती आपल्या आटोक्यात आली की अथक प्रयत्नांनी काबीज करा असाच संदेश प्रकाशने आपल्या खेळातून दिला. 

 

→ मूल्ये 

खिलाडूवृत्ती, श्रमनिष्ठा.


→ अन्य घटना

 • फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ डॉमिनिको जन्मदिन १६२५ सिद्दीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला शाहू महाराजांनी श्रीनिवासराव प्रतिनिधी यांच्या मार्फत पुन्हा हस्तगत केला. १७३३ 

 • एरिटिड या नावाने ओळखले जाणारी उल्कावृष्टी १८६६ -

  • प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस पेन स्मृती- १८०९ प्रसिद्ध समीक्षक व विचारवंत प्रा. दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म १९१० 

  • टिळकांनी मंडाले येथील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. १९१५ • मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. राम जोशी यांचा जन्म १९२४

   • भारत ब्रिटनच्या विमानसेवा सुरु १९४८ - 

   • तुकारामदादा गिताचार्य यांचा स्मृतीदिन २००६ 

   • 'फील्ड मार्शल' हे सर्वोच्य लष्करी पद पटकविणारे पहिले भारतीय सेनापती माणेकशा यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती- १९१६९ 

 

→ उपक्रम

 • बॅडमिंटन खेळाची माहिती करून घ्या

 . •तुमच्या शाळेतल्या मैदानावर या दिवशी क्रीडादिन साजरा करा.

  • वेगवेगळ्या खेळांच्या चैंपियनथी नावे जमा करा. 

 

→ समूहगान

 • हम युवकों का 555नारा है, हैड, हैड, हैड...... 

 

सामान्यज्ञान -

 • भारतात एकूण १,११२ प्रमुख दैनिक वर्तमानपत्रे निघतात. त्यापैकी महाराष्ट्रातच मराठीतून १०० पेक्षा जास्त प्रमुख दैनिके निघतात.

जून ०४, २०२४

7 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 7 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो..... 


→ श्लोक

 - सच्छील गृहिणी, सुवृत्त मुलगा, सुप्रीत ऐसा धनी । प्रेमी मित्र, मन व्यथेविण, रमे जो भृत्य ना वचनी बांघा गोंडस, वैभव स्थिर, मुखीं विद्येमुळें तेज तें । तोषे इष्टद तो भवान्तक हरी, तेव्हांच हैं लाभते ।। 

 - सद्वर्तनी पुत्र, सच्छील पत्नी, आपल्यावर संतुष्ट असा स्वामी, प्रेमळ मित्र, न फसविणारा नोकर, यत्किंचितही क्लेश नसलेले मन, सुंदर बांधा, स्थिर वैभव, विद्येने शोभणारे मुख, हे सर्व, भवसागरांतून मुक्त करणारा व इष्ट देणारा, श्रीहरी ज्यावर प्रसन्न होतो, त्याच धन्य पुरुषास प्राप्त होत असते. 

 

→ चिंतन 

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची गती अवलंबून असते. विज्ञान म्हणजे मानवाला मिळालेले एक वरदान होय. जो देश या वरदानाचा योग्य उपयोग करुन घेतो त्याची प्रगती होते. जेव्हा नवे - नवे शोध लागतात तेव्हा विज्ञानाची प्रगती होते आणि त्याच बरोबर देशाच्या प्रगतीची घोडदौड सुरु होते. नवीन नवीन यंत्रे, नवीन औषधे माणसाचे जीवन सुखमय करतात आणि त्यांच्या मदतीने अधिक काम करून अधिक उत्पादन निर्माण करतो. विज्ञानाच्या साहाय्याने देश सुखी होऊ शकतो. पुढे जाऊ शकतो.


→ कथाकथन 

- 'मैत्री' : मैत्रीत त्याग असतो. मैत्री आणि स्नेहसंबंध जोडण्याठी त्याग, प्रामाणिकपणा आणि परिपक्वतेची आवश्यकता असते. त्याग हा काही जाता जाता होत नसतो. तर तो जाणीवपूर्वक करावा लागतो. स्वार्थीपणा मुळे मैत्रीत बाधा येते. नुसत्या ओळखीपाळखी सहन होतात, परंतु खरी | मैत्री जुळायला वेळ लागतो आणि ती टिकवायला प्रयत्न करावे लागतात. मैत्रीला सत्वपरिक्षा द्यावी लागते आणि त्यातून जेव्हा ती टिकून राहते तेव्हा ती अधिक दृढ, घट्ट होते. आपण खोटी, दिखाऊ नाती ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या मित्राला त्रास व्हावा असं खऱ्या मित्राला कधीच वाटत नाही. खरी | ही मैत्री घेण्यापेक्षा अधिक देते आणि प्रतिकूल परिस्थितीतही भक्कमपणे टिकून राहते. मैत्रीचे प्रकार..... १) सुखाची मैत्री - एकमेकांशी असलेले संबंध करमणुकीचे आणि मजेचे असतात तोपर्यंत ही मैत्री टिकते. म्हणजे सुखाचे सोबती. २) सोयीची मैत्री - जेव्हा लोक विशिष्ट फायद्यासाठी मैत्री करतात तेव्हा त्याला सोयीची किंवा सोयीस्कर मैत्री म्हणता येईल. दुसऱ्या व्यक्तीची उमयुक्तता संपते तेव्हा अशी मैत्री संपते. अशी मैत्री कायमची टिकणारी नसते. ३) खरी मैत्री - अशी मैत्री एकमेकांबद्दलचा आदर आणि कौतुक यावर आधारलेली असते. खरे मित्र मनापासून एकमेकांचं कल्याण चिंततात आणि त्याप्रमाणे वागतात. जीवनात आपण केलेल्या सत्कृत्यांची भरपाई म्हणजेच आपल्याला लाभलेले चांगले मित्र, असंही म्हणता येईल. अशी ही चांगुलपणची |देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी चालू राहते. खरी मैत्री चारित्र्य आणि बांधिलकीवर आधारलेली असते. श्रीमंतीमुळे मित्र मिळतात, प्रतिकूल परिस्थितीत, संकटात त्यांची पारख होते. नाहीतर ते केवळ सुखाचे सोबती ठरतात. 

→ सुविचार -

 • 'संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नका.

 ' • 'एकमेकांवरचा विश्वास आणि भरवसा हा मैत्रीचा पाया आहे.'



दिनविशेष 

• भारताचा दुसरा उपग्रह 'भास्कर -१' चे अंतरिक्षात उढाण - १९७९ : भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासात 'भास्कर' हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले नाव आहे. खगोलशास्त्राच्या इतिहासात आपला ठसा उमटविणारे दोन भास्कराचार्य होऊन गेले. त्यांची स्मृती म्हणून भारताच्या दुसऱ्या उपग्रहास 'भास्कर' हे नाव देण्यात आले आहे. भारताने ६ कोटी ४० लाख रु. खर्च करुन बनविलेला 'भास्कर' हा दुसरा उपग्रह रशियातील अंतरिक्ष स्थानकावरून ७ जून १९७९ रोजी सोडण्यात आला. भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' १९ एप्रिल १९७५ रोजी रशियातूनच सोडण्यात आला होता. श्रीहरीकोटा, अंबाद बंगलोर व रशियातील चिअर्सलेक या अंतराळ संशोधन केंद्राकडे हा उपग्रह माहिती प्रक्षेपित करील. या उपग्रहाचे वजन ४४४ किलो आहे. तो पृथ्वीच्या अक्षांशी ५०.७ अंशानी कलता आहे. ९५.२ मिनिटांनी तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पुरी करतो. त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे कमाल व किमान अंतर | अनुक्रमे ५५७ व ५१२ कि. मी. आहे. यात अत्याधुनिक दूरचित्रवाणी कॅमेरे व मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स बसविण्यात आले आहेत. यातील कॅमेऱ्यांना ३२५ कि. मी. चे क्षेत्र एकाच वेळी पाहण्याची क्षमता आहे. तसेच जमिनीवरील वेगवेगळे भूस्तर, पाण्याचे पट्टे, तापमानातील बदल, अरण्यांचे स्वरूप स्वतंत्रपणे दृष्टीपथात आणण्याची त्याची क्षमता आहे. 'भास्कर' मुळे होणारे संशोधन वननिर्माण, जलशास्त्र, भूशास्त्र, बर्फस्तर व त्यांचे वितळणे, महासागरांच्या पृष्ठांचा अभ्यास या दृष्टीने उपयुक्त ठरले आहे. सौरविद्युत थरांचा वापर करुन आवश्यक विद्युत पुरविण्याची यात सोय केलेली आहे. 


→ मूल्ये विज्ञाननिष्ठा, निर्भयता 


→ अन्य घटना

 • महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक व बुध्दिवादी पुरुष गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन - १८९५ 

 • तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा मृत्यू - १९५७

  • क्रांतिकारक आशुतोष काली यांचा मृत्यू - १९६५

   • मराठी वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. स. गं. मालशे यांचे निधन - १९९२ • सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश - भारतात पावसाळ्यास सुरुवात. 

   

→ उपक्रम

 • भारताने सोडलेल्या इतर उपग्रहांची माहिती मिळवा.

  • आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करा. 

  

→ समूहगान

 • धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं.... 

 

→ सामान्यज्ञान

 • भारतातील प्रमुख वेधशाळा - 

 • अलीपूर

  • अलीबाग 

  •गुलमर्ग 

  •पाटणा

  •आग्रा 

  •कुलाबा

  • उज्जैन

  •  जयपूर

  •   मद्रास

  •    पुणे

जून ०४, २०२४

6 जून दैनंदिन शालेय परिपाठ

6 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता....

 

 → श्लोक 

 दशोपाव्यायांसि गुरु पिता गुरुशताहूनी । सहस्वहि पित्यांहून माता श्रेष्ठचि मन्मनीं ॥

  (धर्मकार्य करणाऱ्या) दहा कुलोपाध्यायांहून, विद्यादाता गुरु श्रेष्ठ, शंभर गुरुंहून पिता श्रेष्ठ, आणि सहस्त्र पित्यांहून माता श्रेष्ठ होय । 

  

चिंतन

 जो जनतेचे रक्षण करतो । पोषण करतो धारण करतो तोचि पिता साक्षात मानावा । जन्म देई जो निमित्त केवळ रघुवंश - राजाचे कर्तव्य या श्लोकात फार सुंदर प्रकाराने वर्णन केले आहे. तो जनतेचे पित्याच्या वात्सल्याने रक्षण, पालनपोषण करतो. प्रभू रामचंद्रांसारख्या राजाचे उदाहरण या बाबतीत सहजपणे डोळ्यांसमोर येते. प्रजेचे पालन हेच त्याने कर्तव्य मानले. प्रजेची आज्ञा शिरसावंद्य मानली. प्रजेची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणप्रिय अशा पवित्र सीतेचा त्यागही केला आणि प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नाही हा आदर्श घालून दिला. म्हणूनच प्रभू रामचंद्र एक आदर्श शासनकर्ता म्हणून अमर झाला आहे.



→ कथाकथन - 

'शिवराज्याभिषेक' : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊसाहेब पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान करून सदरेवर बसल्या होत्या. जे स्वप्न आपण पाहिले होते तो क्षण साकार होतांना जिजाऊसाहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा जिजाऊसाहेबांनी हात जोडले आणि मनातल्या मनात तुळजाभवानीला साकडे घातले की, शिवबाचे राज्य निष्कंटक होवो. ' गागाभट्टांनी जेव्हा सिंहाचा मुखवटा असलेला राजदंड राजांच्या हातात दिला तेव्हा राजांनी जिजाऊसाहेबांकडे पाहिले. जिजाऊसाहेबांनी उजवा हात किंचित वर करून राजांना आशीर्वाद दिला. त्यानंतर राजांनी तो राजदंड मस्तकी लावून हात जोडले. रत्नखचित सिंहासनाकडे पाहिले. राजांचे डोळे भरून आले. ह्या सिंहासनावर आपण आता राजा म्हणून बसणार, परंतु ह्या क्षणासाठी किती भक्तांनी आपले जीव अर्पण केले त्याची आठवण शिवाजी महाराजांना झाली. राजे सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि सिंहासनाला चरणस्पर्श न करता ते सिंहासनारूढ झाले तेव्हा, संपूर्ण राजदरबार आनंदाने महाराजांचा जयजयकार करू लागला. अचानक जिजाऊसाहेब सरदेवर उभ्या राहिल्या आणि ह्या वृध्द आईने राजांना वाकून कुर्निसात केला, तेव्हा राजे चपापले. आपली आई वाकून आपल्याला सलामी का देत आहे, याचा उलगडा राजांना होईना... राजे गप्प झाले. जिजाऊसाहेबांनी नंतर आपल्या आनंदाश्रूंना मोकळेपणाने वाट करून दिली. दरबार संपला आणि राजे तडक जिजाऊसाहेबांच्या महालाशी आले. महाराज येत आहेत हे जिजाऊसाहेबांना कळल्यावर जिजाऊसाहेब उठून बसल्या. वास्तविक वृध्दपणामुळे चटकन त्यांना उठता येत नव्हते. परंतु आपला लाडका लेक आता राजाच्या स्वरुपात येतो आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. राजे आले आणि त्यांनी जिजाऊसाहेबांच्या पायावर लोळण घेतली. जिजाऊसाहेबांनी राजांना अलगद उठवले. राजे म्हणाले, “ मांसाहेब, आम्ही आपल्या पदराखाली मोठे झालो. आपले आर्शीवाद घेण्यासाठी आलो. आज मी खूप दानधर्म केला. परंतु मांसाहेब, पृथ्वीचे दान केले तरी आपले ऋण फिटणार नाही...." राजांची ही नम्रता पाहून आईचा जीव भरून आला. जिजाऊसाहेबांनी राजांना जवळ ओढले आणि प्रेमाच्या मिठीत सामावून घेतले..... मुलांनो, धन्य तो शिवबा, ज्याने आपल्या आईचे पांग फेडले. आणि धन्य ती आई, जिने शिवबाला राजा म्हणून घडविले..... 


सुविचार 

 • 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती सर्व जगाला उध्दारी

 • हिच 'जिजाऊ'जींच्या प्रेरणे, उजळे स्वराज्य ज्योती । हिच जिजाऊ जिने घडविले राजा शिवछत्रपती ॥


→ दिनविशेष 

• शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक - १६७४: शिवरायांनी सतत तीस वर्षे धडपड करून एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे हे हिंदुस्थानातील सर्व राज्यकर्त्यांना कळावे आणि त्या राजाला हिंदू धर्माच्यावतीने इतरांना जाब | विचारायचा अधिकार आहे हे सर्वांना कळून त्यांना जरब बसावी या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडायचे ठरविले. राज्यभिषेकाचा मुहूर्त ५ जून रोजी उत्तररात्री होता. रायगडावर राज्याभिषेकाची धुमधडाक्याने तयारी सुरू झाली. काशीचे महाविद्वान पंडित गागाभट्ट यांनी या सोहळ्याचे संचालन केले. महानद्यांचे पवित्र जल, सुलक्षणी हत्ती, घोडा, व्याघ्र मृगचर्म, छत्रचामरे, सुवर्णकलश, सिंहासन अशा सर्व साहित्यानिशी थाटामाटाने राज्याभिषेक सोहळा पार पडला. पहाटेच्या वेळी नवीन वस्त्रे परिधान करून शिवराय राजसभेत सिंहासनावर विराजमान झाले. गागाभट्टांनी छत्र घेऊन त्यांच्या मस्तकी धरले व जयघोष केला. 'क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज...' आणि शिवाजीमहाराजांना राजा म्हणून इतरांची मान्यता मिळाली. 


मूल्ये -

-• स्वाधीनता, निर्भयता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम. 


→ अन्य घटना

 • प्रसिध्द मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म १९०९ शिवराज्याभिषेक शके ३३४ प्रारंभ (१६७४) • रशियाने सोयुझ ११ हे अंतराळयान सोडले. या यानात वजनरहित अवस्थेत वनस्पतींची वाढ करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग -१९७१ • इंदिरा गांधींच्या कारण प्रीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदिरावर हल्ला चढविला. - १९८४ • वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याने प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात ५०१ धावा काढून नवीन विक्रम प्रस्थापित केला. -१९९४ 



→ उपक्रम

 • शिवरायांच्या आयुष्यातील रोमांचक घटनांचा एकपात्री प्रयोग करा. जवळच्या किल्ल्यांवर सहल काढा. ● प्रसिध्द इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचे 'शिवरायांचा खरा इतिहास' हे पुस्तक मिळवा व वाचन करा. 

 

→ समूहगान

 इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके.... 


→ सामान्यज्ञान

 • ड्रॉसेरा व नेपथस ह्या वनस्पती मांसाहारी आहेत. • सह्याद्री पर्वतावर सापडणारी दुर्मिळ वनस्पती सर्पगंधा

जून ०४, २०२४

5 जून दैनंदिन शालेय परिपाठ

5 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः.... 

 

→ श्लोक

 - सुगंधी एकही वृक्ष करी फुलुनि गंधित । साया राना, कुला जैसा शोभवी चांगला सुत || एखादा चांगला सुगंधी वृक्ष, जर फुलून आला तर, तो सारे रान सुगंधित करुन टाकतो. तद्वतच एक चांगला मुलगा सर्व कुलाला, सत्कीर्तिसुगंध देतो. 

 


 → चिंतन

  सुजल, सुफल, मलयजशीतल सस्यश्यामल अशी प्रिय मातृभूमी! ज्या प्रमाणे आपण आपले नातेवाईक, शेजारी, मित्र यांच्याशी प्रेमाने वागतो, त्यांना दुखवत नाही, त्यांची काळजी घेतो, अडचणीतून त्यांचे रक्षण करायला धावत जातो. तशी भावना आपल्या मनात वृक्ष आणि प्राणिमात्रांबद्दल निर्माण झाली पाहिजे. अशुध्द वायूचा नाश, पाऊस, जमिनीचे रक्षण अशी | कामे करून झाडे आपल्याला मदत करीत असतात. आपल्याला आरोग्य पाहिजे असेल तर आपण निसर्गनियमांचे पालन केले पाहिजे. पर्यावरणाच्या | संतुलनाकडे काटेकोर लक्ष दिले पाहिजे. वृक्षतोड, अपायकारक गोष्टींची चुकीची विल्हेवाट, प्रदूषण या गोष्टीबद्दल काळजी घेतली पाहिजे.



→ कचाकचन 

'पर्यावरण' आज संपूर्ण विश्वात प्रदूषण या शब्दामुळे प्रत्येक माणूस असुरक्षित झाला आहे. हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषण सतत वाढत आहे. वाढती लोकसंख्या, वाढते प्रदूषण असे समीकरण तयार झाले आहे. निसर्ग आणि मानव यांचे नाते अतूट आहे. निसर्गाच्या मदतीनेच मानवाने नेत्रदिपक प्रगती केली आहे. परंतु मानवाच्या स्वार्थी स्वभावामुळे निसर्ग मानवाला ओळखून चुकला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे तडाखे चटके मानवाला बसत आहेत. त्यासाठी मानवाने निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी तर हरित आरोग्य पर्यटन केंद्राची कल्पना देशाला दिली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे प्रत्येक माणसाने उपलब्ध पाण्याचा, सांडपाण्याचा वापर करून घराभोवती रिकाम्या जागेत, शालेय परिसरात, कारखाना परिसरात, फळांची, फुलांची, भाजीपाल्याची लागवड करावी जेणेकरून प्रत्येक ठिकाणी हे हरित आरोग्य पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. सांडपाण्याचा योग्य विनियोग होईल. फळे, भाजीपाला मिळून सकस अन्ननिर्मिती बरोबर हिरव्या वनस्पतींमुळे प्राणवायु सुध्दा निर्माण होईल. एका कामात दहा कामे पूर्ण होतील. उदा. सांडपाण्याची विल्हेवाट, डासांची निर्मिती होणार नाही, सांडपाण्यामुळे वृक्षांची लागवड, वृक्षांपासून फळे, प्राणवायु मिळेल अशाप्रकारे सांडपाण्यामुळे गटारे होऊन डास होणार नाहीत. पुढे मलेरिया किंवा रोगांचा प्रादुर्भाव तर थांबेलच उलट अन्न म्हणून सकस फळे व भाजीपाला उपलब्ध होईल. डॉ. स्वामीनाथन यांची हरित आरोग्य पर्यटन केंद्राची निर्मिती प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. राळेगणसिद्धी येथे रुक्ष, ओसाड जंगलात समाजसेवक अण्णा हजारे यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' याप्रमाणे पाणी साठवण व पाणी वापर तंत्रज्ञान राबविले. त्यामुळे आज तेथील जनजीवन समृध्द झाले आहे. त्याचप्रमाणे आज बारामती कृषी प्रतिष्ठान जगात प्रसिध्द आहे. मा. शरदरावजी पवार यांनी वयाच्या १७ व्या वर्षी बारामती परिसरात ३०० पाझर तलाव केले. आज जगातील सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी बारामती परिसरात वापरले. जैविक तंत्रज्ञाने, कुक्कटपालन, बकरीपालन, साखर कारखाना, इ.टी. एच. असो. या सर्व बाबी अत्याधुनिक स्वरूपात पवार साहेबांनी स्वतःच्या परिसरात अवलंबिल्या आहेत. 'आधी केले मग सांगितले ' याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम शास्त्रशुध्द तऱ्हेने प्रत्यक्षात राबवून प्रत्येकाच्या घरात समृध्वीची गंगा | निर्माण केली. ही समृध्दीची गंगा प्रत्येकाने अंगीकारावी. पाणी साठवण, पाणी वापर, वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, हरित आरोग्य पर्यटन केंद्र यासारखे विविध उपक्रम प्रत्येकाने स्वतःहून राबविल्यास प्रत्येक कुटुंब सुखी कुटुंब, समृध्द कुटुंब झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण परिसर प्रदूषण मुक्त तर होईलच त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात सुख, शांती व समाधान नांदू शकेल. यासाठी प्रत्येकाने जमीन, पाणी, हवा, अग्नी व आकाश या पाच नैर्सगिक शक्तींचा अचूक व योग्य गतीने वापर करुन पर्यावरणाचा मानवी कल्याणासाठी वापर करावा, पर्यावरणाचे संतुलन, समतोल, संवर्धन ही काळाची गरज आहे.. 


→ सुविचार 

'वृक्ष लावा, वृक्ष जगवा'

 • 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे साजरे.


दिनविशेष 

• विश्वपर्यावरण दिवस - १९७२ : पर्यावरणाचा समतोल कायम राहावा व त्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ५ जून १९७२ रोजी स्टॉकहोम येथे 'मानवी जीवन व पर्यावरण' यांचा विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. १३० राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली जे जे काही दिसते ते पर्यावरण. सजीव निर्जीव, हवा, पाणी, जमीन यांचा | देखील समावेश आहे. पर्यावरण मोहिमेत सर्वांचा सहभाग जरूरीचा आहे. मूलतः निसर्गाची योजना मानवाने अन्य जीवसृष्टीसह शांतता टिकवून राहावे। अशी आहे. परंतु वाढते औद्योगिकीकरण, शहरांची वाढ, निसर्गावर वाढते अतिक्रमण यामुळे पर्यावरण समतोल ढासळत आहे. ही जाणीव निर्माण करण्यासाठीच हा दिन पाळला जातो 


→ अन्य घटना

 • जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ अॅडम स्मिथ यांचा जन्म १७२३

  • प्रसिध्द हार्मोनियम वादक, संगीतकार व नट गोविंदराव टेंबे यांचा जन्म - १८८१ 

  • क्रांतिकारक उधमसिंहास फाशी- १९४० अमेरिकन कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा स्मृतिदिन - १९४३

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली- १९५२ झरतुष्ट जन्मदिन १९६७ पासून आठ वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला 'सुवेझ' कालवा पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला १९७५

    • प्रसिध्द इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचे निधन - १९८५ • त्रिशूल शेपणास्त्राची यशस्वी चाचणी- १९८९ 

 

→ मूल्ये 

 • निसर्गप्रेम, भूतदया.


→ उपक्रम -

• आपल्या जवळच्या माळरानावर झाडे लावा. •तुमच्या आसपासच्या झाडांचे औषधी उपयोग समजावून घ्या. 


> समूहगान

 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.... 


→ सामान्यज्ञान

 • मानवी वस्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर जंगल - रानात वा वनात राहणाऱ्या प्राण्यांनी कुठे जायचे या समस्येतून अभयारण्याचा उपाय सापडला व जगभर अभयारण्ये राखण्यास, जतन करण्यास सुरूवात झाली. अमेरिकेतील यलोस्टोन येथील अभयारण्य हे जगातील पहिले | अभयारण्य. भारतातही अभयारण्ये राखून जंगल व वनस्पतीचे संरक्षण करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका, केनिया, झांबिया, टांगानिका येथील अभयारण्ये जगप्रसिध्द आहेत. ब्रिटनमध्ये नैसर्गिक तळी व जंगले सुस्थितीत राखली जातात. जपानमध्ये वनांची मुद्दाम निगा राखली जाते. | फिनलंड या छोट्या देशात अभयारण्य आहेत.