Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

13 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 13 जून दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 नमस्कार माझा ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम् सुंदरा.... 

 

→ श्लोक 

- ॐ सहनाववतु । सहनौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै ॥ १३ जून वार : तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ 

- आम्ही एकत्र सेवन (भोजन) करावे. एक होऊन सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो, सर्वत्र शांती नांदो. यजु. उपनिषद 


→ चिंतन 

मी गुणांचा पूजक आहे हेच माझे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. - आचार्य अत्रे मनुष्याच्या अंगी खूप शक्ती असली की तो फार सामर्थ्यवान आहे असे आपण म्हणतो. मनुष्याकडे भरपूर धन दौलत असली की, त्याला सामर्थ्य प्राप्त झाले असे आपल्याला वाटते. पण, ज्या मनुष्याकडे अनेक गुण असतात तो या दोघांपेक्षा जास्त सामर्थ्यवान असतो. कारण त्याच्या गुणांमुळे अनेक लोकांशी त्यांची मैत्री होते. जगातल्या अनेक प्रकारच्या आनंदाचा त्याला सहजपणे घेता येतो. गुणांची पूजा करणाऱ्या माणसालाच गुणांचा लाभ होतो. तो गुणी बनतो.


→ कथाकथन 

- 'आचार्य अत्रे' : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे गेल्या शतकातले सर्वार्थाने बलाढ्य आणि सर्वस्पर्शी असे तरल व्यक्तिमत्त्व होते. सर्व | क्षेत्रात यश पादाक्रांत केलेल्या आचार्य अत्रे यांनी वाङ्मयीन क्षेत्रात आपली स्वतंत्र मोहर उमटवली. अत्र्यांचे बालवाङ्मयसुध्दा गाजले होते, 'आजीचे घड्याळ' सारख्या अप्रतिम आणि शाश्वत अशा कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या. जवळजवळ साठ वर्षे ते अथकपणे लिहित होते. बोलत होते. 'दिनूचे बिल' ही एक अप्रतिम गोष्ट लिहून आईच्या प्रेमाचे महामंगल स्तोत्र जे त्यांनी प्रगट केले त्याला पर्याय नाही. त्या शाश्वत कथेचा सारांश असा की, दिन नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याचे वडिल डॉक्टर होते. दिनू कधीकधी वडिलांबरोबर दवाखान्यात जाई. दवाखान्यात अनेक प्रकारचे रोगी येत आणि स्वतःला तपासून घेऊन औषधे घेत. दिनूचे वडिल औषध घेतल्या नंतर औषधाचे बिल देत. दिनूने एक दिवस ते बिल पाहिले आणि त्याच्या मनात एक | विचार आला. आपण आईची एवढी कामे करतो तर आपणसुध्दा आईला एक बिल द्यावे. दिनूने मग एक बिल तयार केले. प्रत्येक केलेल्या कामापुढे काही | पैसे लिहिले आणि आईच्या खोलीत जाऊन बिलाचा कागद ठेवला. रात्र झाली, दिनू गाढ झोपी गेला. सकाळी दिनूला जाग आली तर त्याला उशाशी एक | कागद आणि त्या कागदावर, त्याने केलेल्या बिलाचे पैसे ठेवलेले दिसले. दिनूने पैसे एका रुमालात ठेवले आणि तो कागद वाचू लागला. आईने दिनूच्या नावाने लिहिलेले ते बिल होते.तपशील-रुपये

१. लहानपणापासून आजपर्यंत वाढविल्याबद्दल-काही नाही-पैसे

 २. चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल-काही नाही-

  ३. गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल-काही नाही-

   ४. वाचायला शिकवल्याबद्दल- काही नाही-


एकूण-काही नाही


आईने लिहिलेले हे बील वाचल्यावर दिनूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रुमालात बांधून ठेवलेले पैसे दिनूने काढले आणि तो आईकडे गेला. ते सर्व एकूण काही नाही | पैसे त्याने आईला परत केले आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून तो रडू लागला. आईने छोट्या दिनूला जवळ ओढले. त्याचा मुका घेतला आणि म्हणाली, ||दिनू बाळा, तुझे बिल मला मिळाले. मुलांनो, ह्या छोट्या गोष्टीवरून बोध काय घ्यायचा तर आईच मुलाचे सर्व काही अतिशय प्रेमाने करीत असते. आई आयुष्यभर मुलांची निरलसपणे आणि निष्काम बुध्दीने सेवाच करीत असते. मुलांनो एक कायम साठी लक्षात ठेवा की, आईचे ऋण एका जन्मात फिटत नाही. मुलांना आईच्या ऋणातच राहावे लागते. एक कवी म्हणतो की,... स्मरण तुझ्या ममतेचे होई तव उपकारा सीमा नाही, कैसा होऊ मी उतराई, गे माझे आई..... → सुविचार 

•'आई हे सर्व देवतांचे दैवत आहे.' 'काय वर्ण कहाणी तुजला या मातेची, धन्य ही माता तिन्ही जगाची' 

•चांगल्या गोष्टी आपल्याला आमंत्रणे पाठवतील अशी वाट पाहू नये. आपणच त्यांच्याकडे धावत जावे - आचार्य अत्रे 


→ दिनविशेष

 आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन - १९६९: आचार्य अत्रे हे एक अनेक पैलूंनी झळाळणारे असे व्यक्तिमत्व होते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात त्यांनी असामान्य यश मिळविले. उत्तम शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, उत्तम वक्ते, उत्तम लेखक, मराठीत प्रथम विडंबन - कविता करणारे कवी, नाटककार, चित्रपटनिर्माते व अद्वितीय संपादक अशा अनेक छटांनी त्यांचे जीवन झळकले. तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, घराबाहेर, उद्याचा संसार इ. नाटके, झेंडूची फुले हा विडंबनगीत संग्रह, हशा आणि टाळ्या, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र असे विपुल लेखन त्यांनी केले. 'मराठा' हे वृत्तपत्र चालविले. झुंझार पत्रकार म्हणून आचार्य अत्र्यांनी जशी टीकेची तलवार हाती घेतली तशाच खुशखुशीत विनोदाने भरपूर गुदगुल्याही केल्या आणि श्यामच्या आईसारखा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट निर्माण करून जनसामान्यांच्या हृदयाला हात घातला. त्यांच्या 'शामची आई' या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक | (१९५४) व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक(१९५५) मिळाले. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व १३ जून १९६९ रोजी अनंतात विलीन झाले. 


मूल्ये 

• खिलाडू वृत्ती, निर्भयता. 


→ अन्य घटना - 

• बालगंधर्व यांचा जन्मदिन - १८८८ 

 • प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा स्मृतिदिन - १९६९

  

→ उपक्रम

• 'श्यामची आई' तील कथाकथनाची स्पर्धा घ्या. 

  • 'झेंडूची फुले' तील विडंबन गीते वाचा. आचार्य अत्र्यांचे साहित्य बाचा. -> समूहगान 

ह्या भूमिचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान...... 


→ सामान्यज्ञान 

• अत्र्यांना 'आचार्य' ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका समारंभात दिली. आपला हा सर्वोच्च सन्मान मानून अत्रे आपल्या नावापुढे ही उपाधी मोठ्या अभिमानाने लावत असत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा