Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

14 जून दैनंदिन शालेय परिपाठ

14 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.... 

 

→ श्लोक 

ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । थियोयोनः प्रचोदयात ॥ 

विश्वाची उत्पती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुपी आहे. तो अज्ञानाचा नाश करती. ...तो आमच्या बुध्दीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे - सदाचार सद्भाषण सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत - 


→ चिंतन

 समाजाची शोभा ज्ञानी माणसे तर ज्ञानी माणसाचे भूषण क्षमा व त्याग. वार : ज्या समाजात ज्ञानी माणसांची संख्या जास्त असते जो समाज विकसित होऊन प्रगतीच्या पथावर जातो. परंतु मनुष्य ज्ञानी असून भूषणाव नाही. त्याच्या जोडीला त्याच्या जवळ क्षमा व त्यागही हवा. ज्या प्रमाणे फळाफुलांनी बहरलेला वृक्ष त्याच्यावर दगड मारण्याच्याही करतो व आपल्या जवळच्या सर्व गोष्टींचा दुसऱ्यांसाठी त्याग करतो, तसे ज्ञानी माणसाने असायला हवे.


→ कथाकथन 

विचारधन माणसाचे जीवन सुखी, यशस्वी, आनंददायी होण्यासाठी ती म्हणजे धनाची फार मोठी आवश्यकता असते. ही हे धन अनेक प्रकारचं असतं. ते प्रयत्नपूर्वक मिळवा सागतं. शरीरसंपदा, अनुभवसंपदा, ज्ञानसंपदा, धनसंपदा (पेसा), आत्मिक संप विचारसंपदा, कार्यसंपदा अशी ही संपत्ती जितकी चांगली, अधिक प्रमाणात, मौल्यवान, शुध्द स्वरुपात माणसावळ असेल तेवढं त्याचं जीवन सुखी यशस्वी होतं. या संपत्तीपैकी विचारधन हे फार महत्वाचं पायाभूत घन आहे. ते कोणतं कसं आहे, ते कशा प्रकारे मिळवावं, त्याचा उपयोग करावा हे सांगणारी एका महान विचारसंपन्न महापुरुषाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे..... हे महापुरुष म्हणजे आपल्या राष्ट्राचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, ते संस्कृत, इंग्रजीचे महापंडित होते. भारतीय तत्वज्ञान इतर तत्वज्ञानांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारतीय तत्वज्ञान, वैदिक वाङ्मय हे अतिशय तेजस्वी, मौल्यवान विचारांचा अपूर्व आहे. ते डॉ. राधाकृष्णांनी नीट अभ्यासलं, त्यावर तौलनिक विचार करून त्याचे महत्व जाणून घेतलं. ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. मग भारतीयच नव्हे तर सर्व जगातील प्रमुख विद्यापीठात ते विचार समजावून देण्यासाठी आमंत्रण आली. त्यांनी भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानावर अनेक विद्यापीठात व्याखानं दिली. हे विचार केवळ माहितीचं भांडार नव्हते. विविध विषयावर अनुभवातून तावून सुलाखून तयार झाले सुवर्णजडित हिरे, माणके होती. हे तत्त्वज्ञान जगाची उत्पत्ती, जगातील सर्व पदार्थ, प्राणीपशुपक्षी, मानव, ईश्वर, आत्मा, परमात्मा. ऐहिक सुख र पारमार्थिक मोक्ष प्राप्तीचे मार्ग सांगून मानवीजीवन कसं उन्नत, सफल होईल हे सांगणारे अनुभवसिध्द विचार होते. याचे आकर्षण डॉ. राधाकृष्णन विद्यार्थीदशेतच निर्माण झालं. त्यासाठी त्यांनी अनेक जुने-नवे ग्रंथ, अनेक तत्वज्ञांची चरित्रं व विचार याचं परिशीलन केलं. अनेक महापुरुषांची संगत त्यांचे विचार ऐकले. कथा, कीर्तनं, व्याख्याने ऐकली. आपल्या जीवनक्रमातील सुखदुःखाच्या अनुभवातून त्यांना या विचारांचा आता पडताळा पाहि त्यावर स्वतःच विचार करून त्यातले चांगले, बुध्दीला पटणारे विचार त्यांनी आत्मसात केले. त्यातील दोष व फापटपसारा यांचा विचारपूर्वक त्याग केला. केवळ ग्रंथातील माहितीवर विश्वास, अंधश्रध्दा नाही ठेवली. आपल्या दिव्य विचारकसोटीवर त्यांना पारखून त्यांचा निवडक संग्रह केला आणि हे विचारधन फार मोठ्या प्रमाणात जमवलं, आत्मसात केलं. मग त्यांनी त्याचं वितरण केलं. अनेक विद्यापीठातील विद्याथ्र्यांना प्राध्यापकांना, अनेक तत्त्वज्ञान्यांना ते आपल्या अमोघ, रसाळ वाणीतून पटवून दिले. त्या धनाचा केवळ साठा करून ठेवला नाही. त्याचा दुरूपयोगही नाही केला म्हणजे ते सांगून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा नाही मिळवली. तर लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुखी व्हावे म्हणून जगभर त्यांचा प्रसार केला. मग त्यांना भारतात केवळ उत्तम प्राध्यापक, महान तत्त्वज्ञानी म्हणूनच गौरव नाही प्राप्त झाला. तर त्यांना प्रथम आपल्या राष्ट्राचे परदेशातील वकील नंतर उपराष्ट्रपतिपद व अखेर राष्ट्रपतीपद देऊन त्यांना 'भारतरत्न' म्हणून गौरवले. त्यामुळे भारताची प्रतिमा व प्रतिष्ठा सर्व जगात शिखराला जाऊन पोहोचली.


सुविचार -

 • 'सुख हे सुखदायी वस्तूंच्या संग्रहात, धन, सत्ता, प्रतिष्ठा यांच्या प्राप्तीत नसत. ते असतं शुद्ध विचारातून, प्रेमळ मधुर उच्चारातून, मानवांना सुखदायी आपल्या कृतीतून मिळवलेल्या आत्मिक समाधानात ' 

 

→ दिनविशेष

 • लँडस्टेनर कार्ल जन्मदिन - १८६८ : कार्ल लँडस्टेनर हा ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ. व्हिएन्ना येथे याचा जन्म, शिक्षण होऊन तेथील विद्यापीठातच तो शरीरशास्त्राचा प्राध्यापक होता. मानवी रक्ता संबंधी याने महत्त्वाचे संशोधन केले आहे. झिबर्ग, झुरिच, म्युनिक या विविध ठिकाणी त्याने संशोधन केले. १९०० मध्ये याने मानवी रक्ताचे प्रकार, त्यांचे एकमेकांशी साम्य याचे संशोधन प्रसिद्ध केले. नंतर त्याला याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. परंतु त्याच्या शोधाचे महत्व लोकांच्या लक्षात यायला बराच काळ लागला. रक्तातील संलग्नतेच्या गुणधर्मावरून याने रक्ताचे चार प्रकार मानले आहेत. याच्या प्रयोगातून रक्तसंक्रमणाचे तत्व सिध्द होऊन लाखो लोकांचे प्राण वाचले. पुढे अमेरिकेमध्ये रॉकफेलर इन्स्टिट्युटच्या वैद्यकीय विभागात याने काम केले. 'दि स्पेसिफिसिटी ऑफ सिरॉलॉजिकल रिअॅक्शन' हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. 

 

→ मूल्ये

 आदरभाव, बंधुता, सर्वधर्मसहिष्णुता, कर्तव्यदक्षता. 


→ अन्य घटना

 • महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था स्थापन केली- १८९६

  • शास्त्रीय संगीताच्या प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म - १९०५ •प्रा. के. श्रीनिवास कृष्णन यांचे निधन - १९६१ समाजकल्याण मंत्रालयाची स्थापना - १९६४

  

 → उपक्रम

  • रक्तगटांची माहिती मिळवा. रक्तपेढीची माहिती मिळवा. 

  

→ समूहगान 

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान....

 

 → सामान्यज्ञान -

  • मानवाच्या रक्तात तीन प्रकारच्या पेशी असतात. 

  • लोहित रक्तकणिका ऑक्सिजन वाहक

   • श्वेत रक्तकणिका शरीराचे सैनिक रक्त बिंबिका रक्त गोठण्याच्या क्रियेत उपयोगी N

    • रक्त पेढी - रुग्णालयाच्या खास विभागात रक्तदात्याकडून गोळा केलेले रक्त त्यावर योग्य प्रक्रिया करुन विशिष्ट रीतीने साठविले जाते आणि आवश्यक तेव्हा रुग्णाकरिता पुरविले जाते, त्याला रक्तपेढी म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा