चौथी परिसर अभ्यास-१
एप्रिल ०२, २०२१
Res ads
चौथी परिसर अभ्यास-१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चौथी परिसर अभ्यास-१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २ एप्रिल, २०२१
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
गुरुवार, २३ जुलै, २०२०
चौथी परिसर अभ्यास-१
जुलै २३, २०२०
इयत्ता चौथी ,विषय -परिसर अभ्यास१, १५ माझा जिल्हा माझे राज्य
१५. माझा जिल्हा माझे राज्य
बुधवार, २२ जुलै, २०२०
मंगळवार, २१ जुलै, २०२०
शनिवार, १८ जुलै, २०२०
चौथी परिसर अभ्यास-१
जुलै १८, २०२०
इयत्ता चौथी, प. अभ्यास-१,४- पिण्याचे पाणी
पिण्याचे पाणी
प्रश्नोत्तरे
दिलेल्या कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा : (नैसर्गिक, निर्धाक, द्रावण, उपयुक्त, तुरटी, हलक्या, जड, दिसेनासे, आजार)
(१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर........होतात.
* (२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला......म्हणतात
३)जलसंजीवनी.......
द्रावणाचे एक उदाहरण आहे.
(४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास...... होऊ शकतात.
५)तरंगणाऱ्या वस्तू पाण्या पेक्षा....... असतात
तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा....... फिरवतात. *
(६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात .....फिरवतात
(७) समुद्राचे पाणी मिठाचे .... द्रावण आहे.
८)पाणी.....करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.
उत्तरे: (१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात
(२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात
(३) 'जलसंजीवनी' हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे
(४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतार
(५) तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात
(६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात.
(७) समुद्राचे पाणी मिठाचे नैसर्गिक द्रावण आहे.
(८) पाणी निर्धाक करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे
'पिण्याचे पाणी' या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा : *
(१) तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही.-चूक
(२) पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत -चूक
(३) गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो -बरोबर
(४) खोडरबर पाण्यात तरंगते.-चूक
(५) चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो. -बरोबर
(६) हळदपूड पाण्यात पूर्णपणे विरघळते. - चूक
(७) पाण्यात तरंगणारे कण कधीच तळाला बसत नाहीत चूक
(८) स्वच्छ आणि पारदर्शक पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही. -बरोबर
(९) दूधाचे दहयात रूपांतर करणारे सूक्ष्मजीव अपायकारक असतात.-चूक
१०) अपायकारक सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत -बरोबर
जोड्या जुळवा
(१) पाण्यात विरघळणारे पदार्थ -साखर व मीठ
(२) पाण्यात न विरघळणारे पदार्थ- तेल व पीठ
(३) पाण्यापेक्षा जड वस्तू -खिळा व माती -
(४) पाण्यापेक्षा हलक्या वस्तू -पाचोळा व काड्या
एका वाक्यात उत्तरे लिहा १)जलसंजीवनी द्रावण कधी प्यायला देतात?
उत्तर-एखादयाला जर जुलाब आणि उलटयांचा त्रास सुरु झाला आणि त्याच्या शरीरातले पाणी कमी होऊ लागले की अशा व्यक्तीला जलसंजीवनी प्यायला देतात.
२)पिण्याचे पाणी कसे असावे? उत्तर-पिण्याच्या पाण्याना रंग, वास व चव नसावी आणि ते निर्धोक असावे )
३) पावसाळ्यात कोणत्या रोगांची साथ येते?
उत्तर-पावसाळ्यातील हगवण गैस्ट्रोसारख्या रोगांची साथ येते .
४)सूक्ष्मजीव पाहण्यासाठी कोणते साधन वापरावे लागते?
उत्तर- सूक्ष्मजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शी या साधनाचा वापर करतात
कारणे दया/का ते सांगा
१) समुद्राचे पाणी खारट असते.
उतर समुद्राच्या पाण्यात मीठ विरळलेले असते. समुदाचे पाणी है मिठाचे नैसर्गिक द्रावण आहे. चे पाणी खारट असते
(२) सोडावॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की फसफसून बुडबुडे वर येतात.
उत्तर- सोडावाटर बनवताना कार्बन डायऑक्साइड हा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो. र काल्यावर हा दाब कमी होतो व कार्बन डायऑक्साइड वायू फसफसून बर येतो म्हणून आपल्याला बुडबुडे वर येताना दिसतात
(३) पाण्यामध्ये खिळा बुडतो, पण काड्या तरंगतात.
उत्तर खिळा पाण्यापेक्षा जड असतो म्हणून तो पाण्यामध्ये बुडते. काड्या पाण्यापेक्षा हलक्या जाणून त्या पाण्यावर तरंगतात
(४) पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवतात.
उत्तर : पावसाळ्यात पाण्यात माती मिसळून ते गढूळ बनते असे गड्ळ पाणी स्वच्छ व पारदर्शक त्यासाठी त्यात तुरटी फिरवतात.
६. पुढील प्रश्नांची उत्तरे दया :
(१) लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे?
उत्तर : लिबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस, साखर आणि मीठ या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते.
२)पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले, तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही.
याचे कारण काय?
उत्तर : पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले, तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात. असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात. हे पाणी निर्धोक नसते. म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही.
(३) सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो?
उत्तर : सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो यामुळे साखर लवकर विरघळतात.
(४) पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते?
उत्तर : पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्या वेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते, त्या वेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात. या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात ते सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते
•(५) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते?
उत्तर : तेल पाण्यावर तरंगते प्रश्न
चौथी परिसर अभ्यास-१
जुलै १८, २०२०
इयत्ता-चौथी, प.अभ्यास भाग-१,७- आहाराची पौष्टिकता
आहाराची पौष्टिकता
![]() |
| विविध अन्नपदार्थ |
१)कोणत्या पदार्थापासून पीठ मिळू शकतात?
उत्तर : ज्वारी आणि बाजरी.
२)दही, लोणी, तूप कशापासून मिळते?
उत्तर : दूध.
3)तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात?
उत्तर : शेंगदाणा, करडई, तीळ
४ )प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते?
उत्तर : दूध, अंडी, कोंबडीचे मांस.
(५) आंबट/गोड/तिखट/कडू लागणारे पदार्थ कोणते?
उत्तर : आंबट-चिंच, लिंबू, कैरी. गोड - चिकू तिखट - मिरची, मिरी, लवंग, कडू -कारले.
(६) आपण कोणते पदार्थ जास्त खातो?
उत्तर : काकडी, मुळा, ज्वारी, शेंगदाणा, बाजरी, दूध
(७) अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?
उत्तर : लवंग, मिरी, मिरची, चिंच...
(८) बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?
उत्तर : ज्वारी, बाजरी, दूध
'आहाराची पौष्टिकता' या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा
कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा (आवश्यक, कोंडा, प्रेशर कुकर, साठा, आवडते, रुचिकलिका, प्रमुख साखर )
(१) फळांमध्ये असल्याने फळे गोड लागतात
(२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले अन्नपदार्थ आहेत ३)जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना म्हणतात४) काही..... पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागत
(५) शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात.....होतो.
(६) .....मध्ये अन्न शिजवावे
(७) पीठ चाळून.... काढून टाकू नये
(८) अन्न शिजवताना ..... तेवढेच पाणी घालावे
उत्तर-
(१) फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात
(२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.
(३) जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. (४) काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते
(५) शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा होतो.
(६) प्रेशरकुकरमध्ये अन्न शिजवावे (७) पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये
(८) अन्न शिजवताना आवश्यक तेवढेच पाणी घालावे
न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा :
(१) लसणाची चटणी मोठा डाव भरून वाढावी -चूक
(२) महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात-चूक
(३) फक्त लांब मोड आलेली कडधान्येच खावीत.-चूक
(४) रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या- -बरोबर
(५) काही अन्नघटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते.-बरोबर
(६) खाद्यपदार्थ तयार करताना सर्व अन्नघटक तसेच राहतात -चूक
(७) आवळा खाऊन त्यावर पाणी प्यायल्यावर गोड लागत-बरोबर
(८) आपल्या आहारात तेच तेच पदार्थ येतात.-चूक
प्रश्न ३. जोड्या लावा
(१) दूध -लोणी
(२) तीळ- तेल
(३) ज्वारी-पीठ
(४) चिकू-साखर
प्रश्न ४. प्रत्येकी दोन नावे दया उदाहरणे लिहा:
(१) पदार्थ बनवताना गोडीसाठी घातले जाणारे पदार्थ-गूळ व साखर
(२) सालासकट खायची फळे- अंजीर व द्राक्षे
(३) मोड आणून खायची कडधान्ये-
वाल व मटकी
(४) कोशिंबिरी करावयाच्या रंगीत भाज्या -गाजर व बीट
(4) कशाच्याही सोबत एकत्र करून शिजवता येतील असे पदार्थ- बटाटा व डाळ
उत्तरे गूळ व साखर - अंजीर व द्राक्षे -वाल व मटकी - गाजर व बीट - बटाटा व डाळ
प्रश्न ५. कारणे सांगा
(१) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी.
उत्तर : अन्नपदार्थ शिजवताना त्यातले पोषक घटक नष्ट होऊ शकतात. जास्त वेळ शिजवण्याने अन्नगुण कमी होतात म्हणून असे होऊ नये याकरिता अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी
(२) शरीर धडधाकट हवे.
उत्तर आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आजारपण येते काम करायची ताकद राहत नाही.
(३) आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत.
उत्तर : शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक निरनिराळ्या अन्नपदार्थात असतात. आपल्य शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही
(४) लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही.
उत्तर : आपण जे पदार्थ नियमितपणे रोज खातो व इतर पदापिक्षा सर्वात जास्त खातो त्यांना महत्वाचे अन्नपदार्थ म्हणतात लसूण तसा आपण नियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात खात नाही म्हणून लसूण ही आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही
प्रश्न ६. थोडक्यात उत्तरे लिहा
(१) मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली?
उत्तर-एकाचे जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात हो जिभेची गंमत मोनिकाताई सांगितली
2)फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का?
उत्तर : फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्नघटकदेखील असतात.
गुरुवार, १६ जुलै, २०२०
चौथी परिसर अभ्यास-१
जुलै १६, २०२०
इयत्ता-चौथी, परिसर अभ्यास भाग-१,६-अन्नातील विविधता
अन्नातील विविधता
१) कोकणात प्रामुख्याने....... पीक मोठ्या प्रमाणावर होते. (गव्हाचे ज्वारीचे तांदळाचे)
2).......भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. (पूर्व उत्तर दक्षिण)
3)भारतातील लोकांचा ......हा मुख्य व्यवसाय आहे. (मासेमारी/पशुपालन शेती)
उत्तरे-
१) कोकणात प्रामुख्याने तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.
२) उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.
३) भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
![]() |
| विविध फळे |
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा :
(१) कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात प्रामुख्याने स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.-चूक
(२) तांदळाच्या पिकास भरपूर पाऊस आवश्यक असतो.-बरोबर
(३) उन्हाळ्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. -बरोबर
(४) कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा-पांढरा मटण रस्सा प्रसिद्ध आहे.-बरोबर
(५) गोव्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने ढोकळ्याचा व ठेपल्यांचा समावेश होतो. -चूक
प्रश्न ३, नावे लिहा:
(१) विविध खाद्यान्ने : तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, मका इत्यादी
२) विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.
३) विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब, जांभूळ इत्यादी. )
4)महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात ज्वारीपासून बनवले जाणारे खाद्यपदार्थ : हुरडा भाकरी, घुग्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी.
अन्नातील विविधता या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्न3-पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उतरे लिहा
(१) पीक चांगले येण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात
उत्तर -पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी हे घटक आवश्यक असतात.
(२) जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
उत्तर-जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ नारळ, नाचणी, वर्ग इत्यादी पिके घेतली जातत.
(३) मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
उत्तर : मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तुर, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात.
(४) कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
उत्तर: कमी पावसाच्या प्रदेशात चारी, बाजरी, मटकी इत्यादी पिके घेतली जातात.
(५) समुद्राकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला
उत्तर : समुद्रकिनान्यालगतच्या प्रदेशात तांदळ, नारळ य खोबरेल तेल या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
प्रश्न4-सांगा पाहू:
*पाठ्यपुस्तकातील प पान क्रमांक ३७ वरील (भारत प्रमुख खादयान्न पिके) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
![]() |
| भारत प्रमुख खादयान्न पिके |
(१) उत्तर भारतात कोणकोणती खादयान पिके होतात? उत्तरे : उत्तर भारतात प्रामुख्याने गहू व ज्वारी ही खादयान्न पिके होतात
(२) देशाच्या मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खादयान पीक घेतले जाते?
उत्तर : देशाच्या मध्यवर्ती भागात गहू हे मुख्य खादयान्न पीके घेतले जाते.
(३) भारताच्या दक्षिण भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणावर होते? उत्तर : भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते
(४) भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. यामागचे कारण काय असावे?
उत्तर : १)तांदळाच्या पिकास उष्ण व दमट हवामान व भरपूर पर्जन्यमान लागते.
(२) भारताच्या दक्षिण पानातील किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामान असते व तेथे भरपूर पाऊस पडतो या अनुकूल कामुळे भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.
प्रश्न५- सांगा पाहू: पाठयपुस्तकातील पान क्रमांक ३९ वरील (महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खादयपदार्थ) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
१) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात तांदळाची भाकरी बनवली जाते?
जाले
उत्तर- महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तांदळाची भाकरी बनवली जाते.
(२) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्हयांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली
उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते.
(३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणात बनवली जाते?
उत्तर : महाराष्ट्रातील नागपूर व वर्धा या जिल्ह्यांत संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणावर बनवली जाते
(४) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत सावजीचे मटण बनवले जाते?
उत्तर : महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर वर्धा या जिल्ह्यांत सावजीचे मटण बनवले जाते
(५) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्हयांत मांडे बनवले जातात? उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांत मांडे बनवले जातात.
(६) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांत धपाटे बनवले जातात?
उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, बीड इत्यादी जिल्ह्यांत धपाटे बनवले जातात.
प्रश्न ६वा-सांगा पाहू: (पाठ्यपुस्तक पान क्र. ३९) पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक ३९ वरील (महाराष्ट्र व शेजारील राज्यांतील प्रसिद्ध खादयपदार्थ) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची केवळ शब्दांत उत्तरे लिहा
![]() |
| महाराष्ट्र व शेजारील राज्यांतील प्रसिद्ध खादयपदार्थ |
(१) गुजरातमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : ढोकळा, ठेपला.
(२) गोव्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ : भात, कोळंबीचा रस्सा
(३) मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : बाफला, लापशी.
(४) छत्तीसगड मधील प्रसिद्ध खादयपदार्थ : दाल बाफौरी
(५) आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध खादयपदार्थ कोरीकुरा, बिर्याणी, मिरची सालन.
(६) कर्नाटकमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : मैसूरपाक, इडली, डोसा, अप्पे.
प्रश्न ७वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : •
(१) गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात?
उत्तर : (१) गव्हापासून, गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात. (२) गव्हापासून लापशी, खीर, शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. (३) गव्हाच्या पिठापासून पोळी, फुलका, पुरी, पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात. (४) गव्हाच्या चिकापासून पापड, कुरडई इत्यादी वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात.
मंगळवार, १४ जुलै, २०२०
चौथी परिसर अभ्यास-१
जुलै १४, २०२०
इयत्ता-चौथी, परिसर अभ्यास 1 ,1.प्राण्यांचा जीवनक्रम
1-प्राण्यांचा जीवनक्रम
![]() |
| सांगा पाहू |
वरील चित्रे पाहा : (१) कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य दिसते का? उत्तर : होय. कुत्र्याची पिल्ले त्यांच्या आईसारखीच रंग-रूपाने असतात. जरी ती आकाराने छोटी असली तरीही त्यांच्या व त्यांच्या आत बरेच साम्य असते
(२) फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली अळी यांच्यात साम्य दिसते का? उत्तर : नाही.
फुलपाखरू आणि अळी यांच्यात काहीही साम्य दिसत नाही. अळी मोठी झाल्यावर तिचे रूप पूर्ण बदलते व ती फुलपाखरू होते.
(३) कोंबडी अंडी घालते. कोंबडीची पिल्ले अंड्यांतून बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यांतून बाहेर पडतात का?
उत्तर : नाही, मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या पोटी घेतात
चाचणी सोडवा




















