Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १८ जुलै, २०२०

इयत्ता-चौथी, प.अभ्यास भाग-१,७- आहाराची पौष्टिकता

           आहाराची पौष्टिकता

विविध अन्नपदार्थ

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा
१)कोणत्या पदार्थापासून पीठ मिळू शकतात?
 उत्तर : ज्वारी आणि बाजरी.

 २)दही, लोणी, तूप कशापासून मिळते?
 उत्तर : दूध.

3)तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात?
 उत्तर : शेंगदाणा, करडई, तीळ

 ४ )प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते?
उत्तर : दूध, अंडी, कोंबडीचे मांस.

(५) आंबट/गोड/तिखट/कडू लागणारे पदार्थ कोणते?
उत्तर : आंबट-चिंच, लिंबू, कैरी. गोड - चिकू तिखट - मिरची, मिरी, लवंग, कडू -कारले.

 (६) आपण कोणते पदार्थ जास्त खातो?
उत्तर : काकडी, मुळा, ज्वारी, शेंगदाणा, बाजरी, दूध

(७) अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?
उत्तर : लवंग, मिरी, मिरची, चिंच...

 (८) बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?
उत्तर : ज्वारी, बाजरी, दूध

'आहाराची पौष्टिकता' या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा

कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा (आवश्यक, कोंडा, प्रेशर कुकर, साठा, आवडते, रुचिकलिका, प्रमुख साखर )
(१) फळांमध्ये असल्याने फळे गोड लागतात
(२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले अन्नपदार्थ आहेत ३)जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना म्हणतात४) काही..... पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागत
 (५) शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात.....होतो.
(६) .....मध्ये अन्न शिजवावे
 (७) पीठ चाळून.... काढून टाकू नये
(८) अन्न शिजवताना ..... तेवढेच पाणी घालावे
उत्तर-
 (१) फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात
(२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.
 (३) जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. (४) काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते
(५) शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा होतो.
 (६) प्रेशरकुकरमध्ये अन्न शिजवावे (७) पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये
 (८) अन्न शिजवताना आवश्यक तेवढेच पाणी घालावे

न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा :
(१) लसणाची चटणी मोठा डाव भरून वाढावी -चूक

(२) महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात-चूक

(३) फक्त लांब मोड आलेली कडधान्येच खावीत.-चूक

 (४) रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या- -बरोबर

(५) काही अन्नघटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते.-बरोबर

 (६) खाद्यपदार्थ तयार करताना सर्व अन्नघटक तसेच राहतात -चूक

(७) आवळा खाऊन त्यावर पाणी प्यायल्यावर गोड लागत-बरोबर

 (८) आपल्या आहारात तेच तेच पदार्थ येतात.-चूक


प्रश्न ३. जोड्या लावा
(१) दूध -लोणी
(२) तीळ- तेल
(३) ज्वारी-पीठ
(४) चिकू-साखर


प्रश्न ४. प्रत्येकी दोन नावे दया उदाहरणे लिहा:
(१) पदार्थ बनवताना गोडीसाठी घातले जाणारे पदार्थ-गूळ व साखर
(२) सालासकट खायची फळे- अंजीर व द्राक्षे
(३) मोड आणून खायची कडधान्ये-
वाल व मटकी
(४) कोशिंबिरी करावयाच्या रंगीत भाज्या -गाजर व बीट
(4) कशाच्याही सोबत एकत्र करून शिजवता येतील असे पदार्थ- बटाटा व डाळ

उत्तरे गूळ व साखर - अंजीर व द्राक्षे -वाल व मटकी - गाजर व बीट - बटाटा व डाळ

प्रश्न ५. कारणे सांगा
(१) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी.
 उत्तर : अन्नपदार्थ शिजवताना त्यातले पोषक घटक नष्ट होऊ शकतात. जास्त वेळ शिजवण्याने अन्नगुण कमी होतात म्हणून असे होऊ नये याकरिता अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी

(२) शरीर धडधाकट हवे.
 उत्तर आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आजारपण येते काम करायची ताकद राहत नाही.

(३) आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत.
उत्तर : शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक निरनिराळ्या अन्नपदार्थात असतात. आपल्य शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही

 (४) लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही.
उत्तर : आपण जे पदार्थ नियमितपणे रोज खातो व इतर पदापिक्षा सर्वात जास्त खातो त्यांना महत्वाचे अन्नपदार्थ म्हणतात लसूण तसा आपण नियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात खात नाही म्हणून लसूण ही आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही

प्रश्न ६. थोडक्यात उत्तरे लिहा
 (१) मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली?
उत्तर-एकाचे जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात हो जिभेची गंमत मोनिकाताई  सांगितली

2)फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का?
 उत्तर : फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्नघटकदेखील असतात.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा