Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १८ जुलै, २०२०

इयत्ता चौथी, प. अभ्यास-१,४- पिण्याचे पाणी


              पिण्याचे पाणी

                   

प्रश्नोत्तरे
दिलेल्या कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा :  (नैसर्गिक, निर्धाक, द्रावण, उपयुक्त, तुरटी, हलक्या, जड, दिसेनासे, आजार)
(१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर........होतात.
 * (२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला......म्हणतात
३)जलसंजीवनी.......
 द्रावणाचे एक उदाहरण आहे.
 (४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास...... होऊ शकतात.
५)तरंगणाऱ्या वस्तू पाण्या पेक्षा....... असतात
तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा....... फिरवतात. *
(६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात .....फिरवतात
 (७) समुद्राचे पाणी मिठाचे .... द्रावण आहे.
 ८)पाणी.....करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.



उत्तरे: (१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात
(२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात
(३) 'जलसंजीवनी' हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे
(४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतार
(५) तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात
(६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात.
(७) समुद्राचे पाणी मिठाचे नैसर्गिक द्रावण आहे.
(८) पाणी निर्धाक करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे

'पिण्याचे पाणी' या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा.


प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा : *
(१) तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही.-चूक

(२) पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत -चूक

(३) गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो -बरोबर

(४) खोडरबर पाण्यात तरंगते.-चूक

 (५) चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो. -बरोबर

(६) हळदपूड पाण्यात पूर्णपणे विरघळते. - चूक

(७) पाण्यात तरंगणारे कण कधीच तळाला बसत नाहीत चूक

 (८) स्वच्छ आणि पारदर्शक पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही. -बरोबर

(९) दूधाचे दहयात रूपांतर करणारे सूक्ष्मजीव अपायकारक असतात.-चूक

 १०) अपायकारक सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत -बरोबर

जोड्या जुळवा
(१) पाण्यात विरघळणारे पदार्थ -साखर व मीठ
(२) पाण्यात न विरघळणारे पदार्थ- तेल व पीठ
 (३) पाण्यापेक्षा जड वस्तू -खिळा व माती -
(४) पाण्यापेक्षा हलक्या वस्तू -पाचोळा व काड्या

एका वाक्यात उत्तरे लिहा १)जलसंजीवनी द्रावण कधी प्यायला देतात?
उत्तर-एखादयाला जर जुलाब आणि उलटयांचा त्रास सुरु झाला आणि त्याच्या शरीरातले पाणी कमी होऊ लागले  की अशा व्यक्तीला जलसंजीवनी प्यायला देतात.

 २)पिण्याचे पाणी कसे असावे? उत्तर-पिण्याच्या पाण्याना रंग, वास व चव नसावी आणि ते निर्धोक असावे )

३) पावसाळ्यात कोणत्या रोगांची साथ येते?
उत्तर-पावसाळ्यातील हगवण गैस्ट्रोसारख्या रोगांची साथ येते .

 ४)सूक्ष्मजीव पाहण्यासाठी कोणते साधन वापरावे लागते?
 उत्तर- सूक्ष्मजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शी या साधनाचा वापर करतात

कारणे दया/का ते सांगा
१) समुद्राचे पाणी खारट असते.
उतर समुद्राच्या पाण्यात मीठ विरळलेले असते. समुदाचे पाणी है मिठाचे नैसर्गिक द्रावण आहे. चे पाणी खारट असते

 (२) सोडावॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की फसफसून बुडबुडे वर येतात.
उत्तर- सोडावाटर बनवताना कार्बन डायऑक्साइड हा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो. र काल्यावर हा दाब कमी होतो व कार्बन डायऑक्साइड वायू फसफसून बर येतो म्हणून आपल्याला बुडबुडे  वर येताना दिसतात

(३) पाण्यामध्ये खिळा बुडतो, पण काड्या तरंगतात.
उत्तर खिळा पाण्यापेक्षा जड असतो म्हणून तो पाण्यामध्ये बुडते. काड्या पाण्यापेक्षा हलक्या जाणून त्या पाण्यावर तरंगतात

 (४) पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवतात.
 उत्तर : पावसाळ्यात पाण्यात माती मिसळून ते गढूळ बनते असे गड्ळ पाणी स्वच्छ व पारदर्शक त्यासाठी त्यात तुरटी फिरवतात.

६. पुढील प्रश्नांची उत्तरे दया :
 (१) लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे?
 उत्तर : लिबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस, साखर आणि मीठ या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते.

२)पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले, तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही.
 याचे कारण काय?
 उत्तर : पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले, तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात. असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात. हे पाणी निर्धोक नसते. म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही.

(३) सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो?
उत्तर : सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो यामुळे साखर लवकर विरघळतात.

 (४) पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते?
उत्तर : पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्या वेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते, त्या वेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात. या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात ते सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते

•(५) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते?
उत्तर : तेल पाण्यावर तरंगते प्रश्न


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा