Res ads
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
गुरुवार, १८ जुलै, २०२४
आई संपावर गेली तर
आई संपावर गेली तर...
बुधवार, १७ जुलै, २०२४
माझे कुटुंब ।। my family
माझे कुटुंब । my family
सोमवार, ८ जुलै, २०२४
Motivational thoughts
पुढील गोष्टी जीवनात लक्षात ठेवा या गोष्टी तुमचे मानसिक रूप मजबूत स्ट्रॉग बनवतील.
१) जे घडून गेलं आहे त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून टेन्शन घेऊ नका.
२) कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका.
३) जर तुमच्याकडून कोणतीही चूक झाली आहे तर स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका फक्त त्या चुकीतून स्वतःसाठी एक शिकवण घ्या .
४)एखाद्या कामात अपयश आलं म्हणून भिऊन घाबरून शांत बसू नका प्रत्येक दिवशी शांत रहा अभ्यास करा
स्वतःला डेव्हलप करा.
५) आपली ऊर्जा अशा गोष्टींवर किंवा अशा लोकांवर कधीच वाया घालू नका ज्यांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही.
६) बोलणे कमी करा बघा तुमचा मेंदू आपोआप जास्त कार्यरत होईल ऐका सगळ्यांचे पण करा मनाचे ते म्हणतात ना ऐकावे जनाचे पण करावे मनाचे .
७) लक्षात ठेवा आंघोळ शरीराला ध्यान मनाला आणि दान संपत्तीला प्रार्थना आत्म्याला उपवास आरोग्याला क्षमा नात्यासाठी निस्वार्थी स्वभाव नशिबाला शुद्ध करत असते.
८) काही गोष्टी अहंकाराने नाही तर स्वतःच्या स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात .
९) काही वेळेला असे लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांचे आपल्याला हात लावण्याची हिंमत नसते.
१०) काही गोष्टी माहित नसलेल्याच बऱ्या कारण सगळ्या गोष्टी माहित असल्यामुळे खूप त्रास होऊ शकतो .
११) काही लोक जवळ असतात पण सोबत नाही. मनाचे दुःख हे शरीराच्या दुःखापेक्षा खूप मोठं असतं.
१२) वेळ निघून गेल्यानंतर एकाद्याची किंमत कळाली तर ती किंमत नाही पश्याताप असतो.
१३)स्वार्थ या स्वार्थाचे खूप वजन असते हा स्वार्थ जर साधला तर प्रत्येक नात्याचे वजन कमी होते.
शनिवार, २९ जून, २०२४
30 जून दैनंदिन शालेय परिपाठ
30 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
अता बरता भी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमि या पदाला....
→ श्लोक
धन्यावान् सभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियःः । ज्ञानं लब्धा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥
- श्रध्दावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात उसले की शांती प्राप्त होते आणि आत्मबोध होतो.
→ चिंतन
तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जुन्या कपड्याप्रमाणे हे शरीर सोडून जायचे आहे. मरण कुणाला टळले आहे. पण कोण किती जगला यापेक्षा तो कसा जगता हे जास्त महत्वाचे ! त्याचे जीवन दुसऱ्याच्या कामी किती आले हे महत्वाचे ! स्वतःसाठी जगणारी माणसे मरतात पण दुसऱ्यासाठी मरणारी मात्र मरूनही कीर्ती रूपाने या जगात राहतात. त्याचा देह जातो पण कीर्ती राहते.
कथाकथन
संत कबीरांच्या साहित्यातील सामाजिक जाणीव, कबीराच्या काळामध्ये खूप मोठी परकीय आक्रमण झालेली दिसतात. हे आक्रमक हिंस्त्र प्रवृत्तीचे होते तसेच होते. या धर्माती उम्र कनिष्ठ लोकांचे विविध मार्गांनी शोषण करत होते. तत्कालिन सामाजिक खूप मोठा मेदा होता. हिंदू मुस्लिमांमधील भेदाभेद तर होताच, परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माच्या अंतर्गतही खूप मोठी भेदाभेदाची दरी होती या धर्मातील उच्चवर्णीयोक कनिष्ठ वर्गीय लोकांचे विविध क्षेत्री स्थानी असलेले लोक अत्यंत स्थायी आणि भोगवादी बनलेले होते. म्हणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माणुसकी पायी जात होती. म्हणून सामान्य माणूस अत्यंत दुःखी जीवन जगत होता. संत कबीर हे निमठ मनोवृत्तीये असल्यामुळे त्यांना सत्ताधारीलोच्या भोगविलासी प्रवृत्तीय तीव्र विरोध केला. विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडानी काहीही साध्य होत नाही, असे कबीराच स्पष्ट मत होते. तीर्थयात्रा करणे. गंगेमध्ये स्नान करणे, माळा गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे अशा सर्वच गोष्टी निरर्थक असल्याचे कबीर सांगतात. विविध ठिकाणच्या तीर्थस्थानी देवाच्या नावाने तिथील ऐतखाऊ पुजारी लोक भोळ्याभाबड्या जनतेचे खूप मोठे शोषण करतात. अशा शोषणाला समान्यजनांनी बळी पडू नये, जत्रेमध्ये दगड असतो आणि तीर्थ म्हणून चमचाभर पाण्याचा एकेक रुपया वसूल केला जातो. अशा गोष्टींना बळी पडणे हा वेडेपणा आहे. संत कबीर, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य दिसून येते. या संदर्भात संत तुकारामही 'तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी' असे म्हणतात. तीर्थस्थानी नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुवून जातात आणि आपणाला मोक्ष मिळतो, असाही खुळा समज समाजामध्ये प्रचलित आहे. या संदर्भामध्ये संत कबीर एक मार्मिक प्रश्न उपस्थित करतात. तीर्थक्षेत्रातील नदीमध्ये स्नान केल्याने माणसाला मोक्ष मिळत असेल तर रात्रंदिवस त्या पाण्यातच राहणाऱ्या बेडकांना का मोक्ष मिळत नाही. तसेच मुस्लीम धर्मातील बकल्यांचा बढी देण्याच्या प्रथेलाही त्यांनी विरोध केला. कबीरांना मानवता हा धर्मच महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक धर्मातील कर्मकांड माणयांना अंधश्रध्दाळू बनवणारे असते. गळ्यात माळा घालणे, गंध/टिळा लावणे, डोक्याचे केस कापणे, असे केवळ बाह्य सांग, ढोंग केल्याने माणूस साधू, संत किंवा सज्जन होत नाही, तर त्यासाठी आधी आपले मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. टिळक, माळा परिधान केल्याने किंवा शाळीग्रामच्या पूजेने मन शुद्ध, शीतल होत नाही, तर त्यासाठी आधी मनाची भ्रांती दूर झाली पाहिजे आणि माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. संत कबीरांनी आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये सत्य, अहिंसा, सद्भाव, सदाचार, परोपकार, शील या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यासारखी मानवतावादी नैतिक मूल्ये आचरणात आणण्याचा आग्रह कबीरांनी आपल्या साहित्यातून धरलेला आहे. प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे कबीर सांगतात. पोथी पढपढ जग मुआ, पंडित भया ना कोय ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. 'प्रेम' या शब्दाची अडीच अखरे माणसांच्या आचरणात आली तर मानवी जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटतील. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेशही संत कबीरांनी अनेक ठिकाणी दिलेला आहे. हिंदू तूरक दुई महि एकै कहे कबीर पुकारी' असे म्हणत कबीरांनी हिंदू-मुस्लीम दोन्हीही माणसेच आहेत. त्यांच्यामधील कृत्रिम भेदभाव निरर्थक आहेत, असे सांगितले आणि हिंदू-मुस्लिमांनी आपापसांतील भेदभाव विसरून माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे. असा आग्रह धरला; म्हणूनच संत कबीर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही समाज गटांमध्ये अत्यंत मोलाचे वाटले; त्यांनी आपल्या 'गुरू ग्रंथसाहिबा' मध्ये | कबीरच्या दोह्याचा समावेश केला. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे कबीर हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्चनीचतेलाही प्रखर विरोध करतात. सर्वच माणसांची उत्पत्ती एकाच ज्योतीतून झाली असेल तर ब्राह्मण शूद असा भेदभाव कशासाठी करायचा? असा खडा सवाल कबीर विचारतात आणि मानवी समाजामध्ये उच्च नीवतेचे कृत्रिम स्तर निर्माण करणाऱ्या जातीयतेला मूठमाती देण्याचा प्रयत्न करतात.
→ सुविचार:-
•"जतरा में फतरा बिठाया। तिरथ बनाया पानी दुनिया भई दियानी पैसे की धूलपानी ।" "तिलक, दिये। पै तपनि न जाई, माता पहरी बनेरी लाई सबै सालिगराम कूं, मन की भांती न जाई ॥ • भगवे तरी धान सहज देश त्याचा तेथे अनुभवांचा काय पंय ?
→ दिनविषेश
'दादाभाई नवरोजी' : (जन्म ४ सप्टेंबर १८२५ - मृत्यू ३० जून १९१७ ) - बृहन्मुंबईत फोर्ट विभागात दादाभाई नवरोजी मार्ग 'टाइम्स ऑफ इंडिया या भव्य इमारतीला शोभा देत आहे व त्यांचा पुतळा नवभारताची प्रगती पाहात उभा आहे. ४ सप्टेंबर १८२५ साली पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १८४५ साली बी. ए. होऊन लंडनला गेले. भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील झाले. प्रगतीशील उद्योगव्यवसायात शिरले. इंग्लंडमधील भारतीयांची संघटना बांधली. इंडियन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या सनदशीर विधायक कार्यामुळे ते लोकप्रिय झाले. इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य म्हणून ते निवडून आले. भारताचा सन्माननीय श्रेष्ठ सदस्य म्हणून जनता त्यांना ओळखू लागली. दादाभाई जेव्हा राष्ट्रीय सभेत सामील झाले तेव्हा भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज प्रशासनाच्या दृष्टोत्पत्तीस आणणे व त्यावर उपाय सुचविणे एवढेच मर्यादित स्वरुपाचे कार्य ती संस्था करीत होती. दादाभाई हे अत्यंत लोकप्रिय व मधुर भाषेचे सम्राट होते. १८९६ व १९०६ या दोन वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
→ मूल्ये -
• स्वाधीनता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता.
→ अन्य घटना
• दादाभाई नवरोजी स्मृतिदिन १९१७ महान संत कबीर यांची जयंती- १३०९
• भारत पाकिस्तानात कच्छ करार झाला - १९६५
• मिझोराम या राज्याची निर्मिती - १९८६.
• रॅले जॉन विल्यम्स स्ट्रट स्मृतीदिन १९८६
→ उपक्रम
• दुर्बिण मिळवून विविध गोष्टींचे विविध अंतरावरून निरीक्षण करा. राष्ट्रभक्तीपर गीतांची स्पर्धा घ्या. राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे टिपणवहीत लिहा.
→ समूहगान
• हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी हैं....
→ सामान्यज्ञान
• महाराष्ट्रात सर्वात जास्त लोखंड - देऊळगाव (चंद्रपूर). महाराष्ट्रात सर्वात जास्त मँगेनीज रामटेक (नागपूर).
• महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कामठी (नागपूर) •महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट (कोल्हापूर)
•महाराष्ट्रात सर्वात जास्त - अभ्रक
• (नागपूर)
• महाराष्ट्रात एक प्रचंड जलविद्युत प्रकल्प कोयना (सातारा)
शुक्रवार, २८ जून, २०२४
29 जून दैनंदिन शालेय परिपाठ
29 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
मंगलमय चरणि तुझ्या विनंती हीच देवा.... -
→ श्लोक
- अब्देष्टा सर्वभूतांना मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःख सुखःक्षमी ॥
- - श्रीमद्भगवतगीता जो कोणाचाही व्देष करीत नाही, सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतो आणि ज्याला अहंकार स्पर्श करीत नाही व सुख दुःखांविषयी जो उदासीन असतो जो क्षमाशील असतो तो सदैव संतुष्ट असतो.
→ चिंतन
जेवणात जसे मीठ तसेच जीवनात विनोद असावेत. जेवण मिठाविना शक्य नाही पण त्याचेही काही प्रमाण असते. नुसते कोणी मीठ खाऊ शकत नाही आणि भरपूर मीठही पदार्थात घालून चालत नाही. ते जेवढे लागते तेवढेच टाकावे लागते. विनोदाचे तसेच आहे. विनोदामुळे रोजच्या कंटाळवाण्या जीवनात लज्जत येते. ते शरीराचे अन् बुध्दीचे उत्तम टॉनिक आहे. पण म्हणून माणूस सारखाच विनोद करू लागला तर विनोदास पात्र होईल. विनोदाची मर्यादा व शक्ती ओळखून विनोद केला तर आयुष्य रंगतदार व चवदार होईल.
कथाकथन
'विनोद बुध्दी' :- स्वतः खूप हसा आणि इतरांना हसवा. तुमच्यात विनोदबुध्दी असेल तर स्वतःच्या वैगुण्यावर हसण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. विनोदी माणूस सर्वांना आवडतो आणि हवाहवासा वाटतो. काही लोकांना विनोदाचं वावडं असतं. विनोदाकडे पाठ फिरवून ते जगणे म्हणायचं ? स्वतःवरही विनोद करून हसायला शिका. कारण असा विनोद कुणालाच दुखवत नाही. आघातातून पुन्हा उठण्याचं बळ विनोदातून हे नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे. विनोदाने परिस्थितीत बदल करता येत नाही परंतु त्याने वेदनेची तीव्रता कमी व्हायला मदत होते. विनोदात जखमेवर फुंकर घालण्याची शक्ती आहे. प्राणांतिक आजारातून माणूस स्वतःला कसं 'बरं' करु शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'अॅनाटमी ऑफ अॅन इलनेस' या पुस्तकाचे लेखक डॉ. नार्मन कझिन्स. एका गंभीर आजाराने त्यांना ग्रासलं होतं. त्यांची प्रकृती सुधारण्याची शक्यता केवळ ०.००२ टक्के म्हणजे जवळपास शून्यच होती. शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते असं कझिन्सला वाटलं आणि त्यांनी ते सिध्द करुन दाखवायचं ठरवलं. त्यांच्या मनात आले की नकारात्मक किंवा वाईट विचारांनी जर शरीरात नुकसान करणारी रसायनं निर्माण होत असतील तर याच्या उलटही होत असलं पाहिजे. आनंद आणि हसणं यासारख्या | सकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरात आरोग्यकारक रसायनं निर्माण होऊ शकतील. हॉस्पिटल सोडून ते एका हॉटेलात राहायला गेले. तिथं त्यांनी | विनोदी चित्रपट पाहाण्याचा सपाटा लावला आणि आश्चर्य म्हणजे हसण्यातून स्वतःला बरं केलं. अर्थात डॉक्टरी औषधोपचार महत्वाचे असतातच. परंतु आजारी माणसाची जगण्याची इच्छासुध्दा तेवढीच महत्वाची असते.
सुविचार
• विनोदी वृत्ती जीवरक्षक ठरु शकते, शिवाय तिच्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती हाताळणे सोप जातं.' 'जी गोष्ट शस्याने होणार नाही ती कधीकधी एका मनमोकळ्या हास्याने होते.'
• त्याच्यावर समाज खूप असतो. जो समाजास नेत्राने, मनाने वचनाने व आचरणाने खूप
दिनविशेष
• श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा जन्मदिन - १८७१: मराठी माणसाला 'सुदाम्याचे पोहे' खाऊ घालून हसणारा २९ जून १८७१ साली नागपूर येथे जन्मला. मातृसुखाला पारख्या झालेल्या श्रीपाद कृष्णांना नवव्या वर्षीच अधीगवायूसारखा भयंकर औषधोपचार व चुलत्यांची सेवा यामुळे ते बरे झाले पण या आजाराची काही चिन्हे जन्मभर राहिलीय, यामुळे झाली ते एकांतप्रिय आणि पुस्तकवेडे झाले. विनोदपूर्ण टीकेचा बाण लक्ष्यावर बसतोच पण जखम मात्र होत नाही हे त्यांनी चांगले ओळखले होते. अशा तर्हेने विनोदाचा ललित वाङ्मयात त्यांनी प्रथमच उपयोग केला, म्हणून त्यांना विनोदी वाङ्मयाचा जनक असे म्हणतात. गडकऱ्यांनी विनोदी लेखनाच्या बाबतीत त्यांना गुरु मानले होते. 'कोल्हटकरांनी महाराष्ट्राला हसायला शिकवले' असे आचार्य अत्रे म्हणतात. अण्णासाहेब किलोस्करांनंतर मराठी रंगभूमीला कोल्हटकरांनीच आधार दिला. वीरतनय, मूकनायक, प्रेमशोधन, मतिविकार, वधूपरीक्षा या त्यांच्या नाटकांनी रंगभूमी गाजविली... "बहु असोत सुंदर' हे महाराष्ट्र गीत त्यांनीच रचले. अनेक अभ्यासपूर्ण समीक्षणेही त्यांनी लिहिली. १९२७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.
मूल्ये
•समता, खिलाडू वृत्ती
अन्य घटना
• महालनोबिस प्रशांतचंद्र जन्मदिन १८९३
. • प्रसिध्द साहित्यीक रंगा मराठे जन्म - १९१३
• प्रसिध्द नट विष्णुपंत जोग यांचे निधन - १९९३
उपक्रम
विनोद सांगण्याची स्पर्धा घ्या. • व्यंगचित्रांची कात्रणे जमवून चिकटवहीत लावा.
समूहगान
• पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना....
→ सामान्यज्ञान
•जगात सर्वात मोठे द्वीपकल्प भारत.
• जगात सर्वात मोठे गोडे पाण्याचे सरोवर -कॅनडा अमेरीका,
गुरुवार, २७ जून, २०२४
28 जून दैनंदिन शालेय परिपाठ
28 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....
→ श्लोक
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थ व्देष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥
मनुष्याची आणखी अधिक प्रगति झाली असे तेव्हा समजावे की जेव्हा तो सर्वांशी म्हणजे प्रामाणिक, हितैषी, मित्र आणि वैरी, हेवेखोर, सज्जन, दुर्जन आणि जे उदासिन व निःपक्षपाती आहेत त्यांच्याशी समबुध्दीने वागतो. श्रीमद्भगवतगीता
→ चिंतन
कोणताही सद्विचार किंवा कल्पना तुमच्या चित्तात उगम पावली तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका. या कामी धरसोड उपयोगार्थी नाही. अशा धरसोडीने दानत बिघडते. आपल्या विचारांना सदासर्वदा एकसारखे चिकटून रहावे, मोठ्या धीराने ही लढाई एकसारखी चालविली पाहिजे. यात केव्हाही मागे तोंड फिरवू नये. अशा निश्चयाने आणि धीमेपणाने, धीराने तुम्ही चालला तर आज ना उद्या ज्ञानरवीचा उदय झाल्यावाचून राहणार नाही स्वामी विवेकानंद
→ कथाकथन
व्यक्तिमत्व विकास :- ज्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो त्याचा परिणाम मनावर होत असतो. त्यातून 'उत्तम ते घ्यावे' हे मनाला गांव वाईट यात फरक आपण बुध्दीने ओळखतो. त्यातील चांगुलपणा' मनावरील परिणाम म्हणजे संस्कार होय. अशा सं व्यक्तिमत्व विकास होत असतो. संस्कार या शब्दाबरोबर विकार हा शब्द ऐकतो. विकार म्हणजे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी जे असू नये ते 'भाव' ! राग, व्देष, मोह, मद, लोभ, मत्सर हे मनाचे विकार आहेत. ते वाढू न देणे, त्यांना आवर घालणे, मनावर संयम ठेवणे इ. व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. 'अभिमान' ही देखील मनाची एक प्रवृत्ती आहे. स्वभाषेचा, स्वदेशाचा आपले म्हणून जे आहे त्याचा अभिमान असावा, स्वाभिमान असावा, पण कोणत्याही प्रकारे दुराभिमान असू नये. प्रेम, सहानुभुती, दया, माया इ. मनोधर्माची प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या सुख, दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, समाज-देशावर संकट आ असता धावून जाणे, त्याग भावना असणे, उदार दृष्टीकोन असणे इ. व्यक्तिमत्व विकासाची अंगे आहेत. निर्भयता, कर्तव्यदक्षता, उद्योगशीलता ह्या गुणामुळे व्यक्तित्व अधिक प्रभावी बनते. या उलट आळस, अंधश्रध्दा, अकर्मण्यता, केवळ चैन करण्याची प्रवृत्ती ह्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरतात. तेव्हा चांगल्या गुणांचा स्वीकार व वाईटाला नकार देण्याची सवय मनाला लावायला पाहिजे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. याक्तिमत्व विकासाच्या संदर्भात आपल्या स्वभावाला मनाला चांगले वळण लागावे म्हणून आपल्याला खालील बाबी महत्वाच्या वाटतात
(१) उत्तम ध्येय समोर ठेवावे ते साध्य करण्याकरता सतत प्रयत्नशील असावे.
२) उत्तम पुस्तकांचे विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, चरित्रात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करावे.
३) एखादा नियम करावा व निश्चयाने त्याचे पालन करावे.
४) 'सुसंगति सदा घडो' यातले मर्म ओळखून चांगल्या मित्रांच्या संगतीत रहावे.
५) आपली चूक असेल तर ती मान्य करावी, केवळ दुसऱ्यावर दोषारोपण करून समाधान मिळवू नये.
६) चांगल्या गोष्टीचे, सवयींचे अनुकरण कराये, वाईटाकडे धावणाऱ्या मनाला आवर घालावा.
७) दुसऱ्याची चूक असेल तर ती चांगल्या भाषेत समजाऊन सांगावी.
(८) आपली अभिरुची (आवड) संपन्न असावी. त्या करिता चांगल्या वाईटातला फरक ओळखायला शिकावे.
९) एखादा सुंदर छंद जोपासावा.
(१०) काही नित्य पाठाची सवय लावावी. सुविचार जो विचारी आहे तो तत्वज्ञ आहे, जो विकारी आहे तो बेकार आहे. आत्मचिंतन, आत्मपरिचय, आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मसन्मान, आत्मनिर्भय, आत्माभान, आत्मभिमान, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची अंगे आहेत. • उद्योगाने कार्य सिध्द होते, मनोरथांनी नाही.
सुविचार
• जो विचारी आहे तो तत्वज्ञ आहे, जो विकारी आहे तो बेकार आहे.
• आत्मचिंतन, आत्मपरिचय, आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मसन्मान, आत्मनिर्भय, आत्माधान, आत्मभिमान, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची अंगे आहेत.
• उद्योगाने कार्य सिध्द होते, मनोरथांनी नाही
. → दिनविशेष
• महालनोबिस प्रशांतचंद स्मृतीदिन १९७२ : या प्रसिध्द भारतीय संख्याशास्त्रज्ञाचा जन्म २९ जून १८९३ रोजी झाला. यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज येथे गेले. सन १९१५ ते १९२२ या काळात कलकत्ता विद्यापीठात पदार्थ विज्ञान या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. १९२२ नंतर ते या विभागाचे प्रमुख झाले. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणूनही सन १९३१ साली ते काम पाहत होते. १९४५-१९४८ या काळात कलकत्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. १९४९ पासून भारत सरकारचे संख्याशास्त्रविषयक सल्लागार म्हणून ते काम पाहत असत. भारत सरकारच्या नियोजन मंडळाशीही यांचा संबंध होता. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे ते अध्यक्ष होते. अनेक जागतिक संस्थांचे ते सभासद होते. १९४४ साली त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठाने वेल्डन पदक व पारितोषिक देऊन गौरव केला. १९५७ साली कलकत्ता विद्यापिठाचे सर्वाधिकारी पद त्यांना मिळाले. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांनी पद्मविभूषण हा किताब दिला. भारतीय सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे 'संख्या' हे नियतकालीक १९३३ मध्ये त्यांनी सुरु केले आणि तेव्हापासून त्याचे सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. अशा अनेक सन्मान्य पदे व मानसन्मान मिळवलेल्या या श्रेष्ठ भारतीय संख्याशास्त्रज्ञाने २८ जून १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला.
मूल्ये
• कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा
→ अन्य घटना
• प्रसिध्द साहित्यिक व समीक्षक थोर विचारवंत गंगाधर पानतावणे यांचा जन्म १९३७ कर्मवीर औंदुबर कोंडीबा पाटील स्मृतीदिन २०००
• भारत व पाकिस्तानमध्ये सिमला करार झाला - १९७२ रत्नप्रभादेवी मोहीते पाटील स्मृती - २००२
→ उपक्रम
• मराठीतील विज्ञान मासिकांची माहिती मिळवा
. • मराठीतील विज्ञान मासिकांचे वाचन करा.
→ समूहगान
• आम्ही बालक या देशाचे, शिकू घडे सारे विज्ञानाचे....
→ सामान्यज्ञान
- • माणसाला हसण्यासाठी १७ स्नायू वापरावे लागतात. पण रागावण्यासाठी ४३ स्नायू वापरावे लागतात. • जगात सर्वात जास्त वेगाने उडणारी चिमणी स्वीटर होय. तिचा वेग ताशी २०० मैल असतो.
बुधवार, २६ जून, २०२४
27 जून दैनंदिन शालेय परिपाठ
27 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
मंगलनाम तुझे सतत गाऊ दे....
श्लोक
प्रकाशं च प्रवृतिंच मोहमेव च पाण्डव । न व्देष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानी कांक्षति || उदासीनवदासीनो गुणैयों न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेंगते ॥ समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्म संस्तुतिः ॥ मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्चते ॥ श्रीमद्भगवतगीता
- जय जिजाऊ प्रकाश, प्रवृत्ति आणि मोह (म्हणजे अनुक्रमे सत्व, रज व तम या गुणांची कार्ये किंवा फले) प्राप्त झाली तरी त्यांचा जो व्देष करीत नाही. आणि प्राप्त न झाली तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, (कर्म फलाबद्दल) जो उदासीनसारखा राहणारा, सत्व, रज व तम हे गुण ज्याला विचलित करीत नाहीत, गुण (आपापले काम करीत आहेत एवढेच मानून जो स्थिर राहतो, विचलित होत नाही, म्हणजे विकार पावत नाही, जो सुखदुःखांना समान समजतो, जो स्वस्थ म्हणजे आपल्याच स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर झाला, माती, दगड व सोने यांच्याकडे जो समान दृष्टीने पाहतो, प्रिय व अप्रिय, आपली स्तुती ही ज्याला समसमान वाटतात, सदा धैर्याने युक्त ज्याला मान व अपमान मित्र व शत्रुपक्ष तुल्य म्हणजे एकसारखे, आणि (प्रकृति सर्व करते असे समजल्यामुळे) त्याने सर्व सकाम कर्माचा त्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हणतात.
→ चिंतन
'धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात.' धैर्यवान लोकांच्या जीवनाचे एकच ध्येय असते व ते म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होणे. अन्यायाच्या अंधारात मशाल होऊन घुसणे, घरातल्या थोड्याशा अंधाराला दूर करण्यासाठी दिवा लावता येतो पण, त्यापेक्षा भयंकर अंधार दूर करायचा तर पाजळती मशाल हवी. मशाल उलटी धरली तरी ज्वाळा वरच झेपावते त्याप्रमाणे धैर्यवान लोकांना कितीही प्रतिकार झाला तरी त्यांचे धैर्य कधीही खालावत नाही. ते सदैव तळपतच राहते.
कथाकथन
'लोभी शेतकरी' : रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एकदा त्याला राजाकडून असे वचन मिळालं की तो एका दिवसात - | जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होइल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचं. दुसन्या | दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली; कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी | चालत राहिला; कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती. दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथं सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होतं. जास्तीत जास्त जमीन | मिळवायच्या लोभामुळे तो आता दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरु केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडं होतं. सूर्यास्त जवळ येऊ लागता तमा तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला, त्याला श्वास घेता येईना. तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या | ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली. त्याला पुरण्यात आलं त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली.
सुविचार -
• 'श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत हाल
• 'जुलमाने विचार भरत नाहीत, उलट ते सुदृढ होत राहतात - झिनी
→ दिनविशेष -
• 'शिवराम परांजपे यांचा जन्मदिन - १८६४ : शि.म.परांजपे यांना त्यांच्या नावापेक्षा लोकांनी क राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व फर्डे वक्ते होते. महाराष्ट्रात 'काळ' या वृत्तपत्राद्वारे देशाभिमानाची धगधगती ज्योत त्यांनी जनमानसात पेटवली | शुध्द स्वातंत्र्याचे प्रतिपादक म्हणून त्यांनी 'काळ' या वृत्तपत्रातून आपला ठसा उमटविला. काळमधील लेख इतके प्रक्षोभक असत की इंग्रज सरकार ते जात करीत असे. त्यांचे निवडक लेख 'काळातील निवडक लेख' या नावाने प्रसिध्द आहेत. मानाजीराव हे नाटक, विंध्याचल गोविंदाची गोष्ट या काय आणि 'मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास' हा ग्रंथ असे त्यांचे सकस साहित्य आहे. ब्रिटिश सरकारने 'काळ' वृत्तपत्रावर जामीनकीची कुऱ्हाड चालवून ते बंद पाडल्यामुळे या प्रतिभावंताची प्रतिभा कुस्करली गेली. पुढे त्यांनी 'स्वराज्य' वृत्तपत्र | काढले पण त्यात काळाचा आवेश आणि आग नव्हती. लो. टिळकांच्या निधनानंतर म. गांधींच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यात ते मनापासून रमले नाहीत. १९२९ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. नंतर प्रकृती खालावत गेली व २७ सप्टेंबर १९२९ साली ते कालगत झाले. काळातील तेजस्वी निबंधाचे जनक म्हणून त्यांची कीती मात्र काळावर मात करून अजरामर झाली आहे.
→ मूल्ये
• स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, बंधुता, निर्भयता.
→ अन्य घटना
• शूर मराठा सेनापती धनाजी जाधव स्मृतिदिन - १७१०.
• महाराजा रणजीतसिंहाचे निधन - १८३९
• अंधत्वावर मात करून महान कर्तृत्व गाजवणारी अमेरिकन महिला हेलन केलर हिचा जन्म १८८०
→ उपक्रम
• महाराष्ट्रातील वेगवेगळी वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या दाखवणारा तक्ता तयार करा..
→ समूहगान
• बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या....
→ सामान्यज्ञान
• सर्वात मोठा खंड - आशिया.
• सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड.
• सर्वात मोठा सागर - पॅसिफिक.
• सर्वात मोठे वाळवंट • सर्वात सहारा
. • (ER) सर्वात लांब नदी मोठा ग्रह- ज्युपिटर (गुरु) नाईल.
मंगळवार, २५ जून, २०२४
26 जून दैनंदिन शालेय परिपाठ
26 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो....
श्लोक -
आयुः सत्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विकप्रियाः ॥ कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्ण रुक्ष विदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ।। याययामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥
- श्रीमद्भगवतगीता सात्विक मनुष्यांना, आयुष्य वाढविणारे, सत्वशुद्धि करणारे, बल आरोग्य, सुख आणि तृप्ति देणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे आणि मनाला आनंद देणारे आहार आवडतात. राजस मनुष्यांना कडु, आंबट, खारट, अति उष्ण, तिखट, रुक्ष म्हणजे शुष्क आणि दाहकारक असे हे दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारे आहार, प्रिय असतात. तामस मनुष्यांना, तीन तासांपूर्वी शिजवलेले बेचव, दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र अन्न आवडणारे असते.
→ चिंतन
'वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवतो.' कुठल्याही गोष्टीत काळजीपूर्वक काम करणे जरुरीचे असते. बेजबाबदारपणाने वागल्याने आपले भरून न येण्याइतके नुकसान होते. जर अंगातील कपडा थोडासा फाटलेला असला तर त्याला एक टाका घातला नाही तर मग तो कपडा अधिक फाटत जातो आणि दहा टाके घालायची वेळ येते. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्याकडे असेच काळजीपूर्वक लक्ष दिले तर नंतर तो वाईट मार्गाला लागल्याचे दुःख त्यांना भोगावे लागत नाही.
कथाकथन
- 'छत्रपती शाहू महाराज' : (सर्व सद्गुणांचा उपासक) छत्रपती शाहू महाराज आणि भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले .तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेती. २६ जुलै १९०२ बहुजनांसाठी शाहू महाराजनांनी आरक्षण लागू केले. २८ वर्षाचा कालावधी त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविला. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक थंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरिबांचा, दीनदलितांचा राजा होता. विद्वानांचा चाहता होता. कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्याने क्षात्रजगद्गुरूचे धर्मपीठ स्थापन किले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठीपद निर्माण केले. बलुतेपद्धती नष्ट केली. पूर्वाश्रमीकाच्या गुन्हेगारांना मुक्त केले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. तळगाळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परत आले तेव्हा या दलित विद्वानाच्या भेटीसाठी उत्सुक असलेला हा राजा परळला सिमेंटच्या चाळीत त्यांना भेटायला गेला. कोल्हापुरात बोलवून त्यांचा त्यांनी मोठा सत्कार केला. त्याचे व्यक्तिमत्त्व लोकोत्तर होते. कलाप्रेम अगाध होते. माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाल गंधर्व, बाबूराव पेंटर, गोविंदराव टेंबे, भालजी पेंढारकर, केशवराव भोसले, अब्दुली करीम खाँ, शंकरराव सरनाईक अशा गुणसंपदेचा मेळा कोल्हापुरात महाराजांनी निर्माण केला. त्यांच्या सर सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंब्रीज विद्यापीठाने घेतली. त्यांना एल. एल. डी. ही सन्माननीय पदवी बहाल केली. राजाचे नाव जगभर झाले. ६ मे १९२२ हा स्मृतिदिन.
→ सुविचार-
• शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनविणारे, असे शिक्षण आपल्याला हवे शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झाल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतात.
दिनविशेष
- • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन -: जगात जसजशी भौतिक सुखाची रेलचेल झाली तसतसे माणसाचे मन अधिकाधिक सुखाकडे धाव घेऊ लागले. एकीकडे पैसे मिळवण्याची लालसा वाढली, तर दुसरीकडे सुखाचा उपभोग विकृत पध्दतीने घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. या विकृतीच्या विख्यात सापडलेल्या जगातील अनेक तरुणांची सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था जिवापाड परिश्रम करीत आहेत. वेगवेगळ्या शहरात केल्या जाणाऱ्या अशा अंमली पदार्थ निषेध प्रयत्नातून २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ निषेध दिन म्हणून पाळला जाण्याची कल्पना पुढे आली. या दिवशी सरकारी तसेच खाजगी संख्या, ज्या व्यसनमुक्तीचे काम करीत आहेत. वेगवेगळी पथनाट्ये, समूहनाट्ये, समूहगीते अशा माध्यमातून लोकांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावीपणे समजावून सांगतात व त्यांना दारू, चरस गांजा, ब्राऊन शुगर अशा अंमली पदार्थांच्या भयानक आकर्षणापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. पुण्यात येरवड्यानजीक चालविली जाणारी 'मुक्तांगण' ही संस्था डॉ. अनिता अवचट यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे समाजोपयोगी काम अनेक वर्षे करीत आहे.
मूल्ये
बंधुता, समता, निर्भयता
• राजर्षी शाहु महाराज जयंती - १८७४
→ अन्य घटना राजर्षी शाहू महाराज जयंती १८७४
• बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म १८८८. रसायन शास्त्रज्ञ डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे निधन - १९४४. युनोची स्थापना - १९४५. पुणे महापालिकेला कारभार मराठी भाषेतून करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली गेली - १९५८.
• पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन - १९६८. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली १९७५.
• एअर इंडियाचे बोइंग विमान गौरीशंकर कोसळले - १९८२.
→ उपक्रम
आपल्या आसपासच्या वस्त्यांमधून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम दाखवणारी पथनाट्ये सादर करा. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी अशा प्रकारचे एक छोटेसे नाटक सादर करा.
→ समूहगान
ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा...
→ सामान्य ज्ञान
• सूर्य मंदिर कोणार्क(ओरिसा).
• गुलाबी शहर जयपूर (राजस्थान). अफू अफूच्या झाडांना आलेल्या कच्च्या बोंडांना पाडलेल्या चिरांतून पाझरलेल्या व वाळून घट्ट झालेल्या रसाला 'अफू' म्हणतात. हा एक मादक विषारी पदार्थ आहे. नशेसाठी अफू सेवन केल्यावर पुनः पुन्हा तिची इच्छा होऊन मनुष्य व्यसनात गुरफटला जातो.
सोमवार, २४ जून, २०२४
25 जून दैनंदिन शालेय परिपाठ
25 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपुले घर....
→ श्लोक
- वंदे मातरम् । सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम । सस्यशामलाम् । मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभ्रज्योत्स्नां - पुलकीत - यामिनीम् । फुल्लकुसुमितद्रुमदल - शोभिनीम् ॥ चार : सुहासिनीं, सुमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय
- हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जलांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृध्द बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधीत वाऱ्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही चंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस; आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस. हे माते. तुला आम्ही वंदन करतो.
→ चिंतन
- 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' जय- जिजाऊ ( जय सावित्री स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्. माझ्या मातृभूमीला माझे वंदन असो. वेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी.
→ कथाकथन
- 'आपल्यावरून जग ओळखावे' सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका लढाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा त्यापैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनांस विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलप्रमाणे राबवीत असे. धनी देईल ते खावयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे. काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे, असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोमिला. पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच. त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाव धाव रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस !" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला. तेव्हा त्याने त्याला विकत घेतले. आणि उलट त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले. हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. 'काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का बरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी, तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत सबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मला पहावेना, म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले.
→ सुविचार
• सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी
• जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही- अब्राहम लिंकन
• दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांची माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.
दिनविशेष -
• 'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन - १८३८ बंकिमचंद्र चटनी ते राष्ट्रगीताचे जनक म्हणून. बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एकम प्रसिध्द होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी | होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी 'बंगदर्शन' हे बंगाली नियतकालीक सुरु केले. प्रे राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे उपल आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले. शुद्ध भाषा व बोली भाषा यांचा सुंदर संगम करून किमान वे वळण लावले व सामर्थ प्राप्त करुन दिले. आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या. बंगाली साहित्यात विनोदही बकिमचंद्रांनीच आणला. 'कमलकांतेर दातेर मधील विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिध्द आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती.एप्रिल १८९४)
→ मूल्ये
स्वाधीनता, कर्तव्यदक्षता.
अन्य घटना
इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारताने विश्वचषक जिंकला - १९८३.
→ उपक्रम
• सुप्रसिध्द बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा.
> समूहगान -
• जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा...
→ सामान्यज्ञान -
• राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज.
• वि.वा.शिरवाडकर - कुसुमाग्रज.
• कृष्णाजी केशव दामले - केशवसुत.
• प्रल्हाद केशव -अत्रे केशवकुमार.
• त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी.
• नारायण मुरलीधर गुप्ते बी.
रविवार, २३ जून, २०२४
24 जून दैनंदिन शालेय परिपाठ
24 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- ऐ मातृभूमि तेरे परणों में सिर नवाउँ.....
→ श्लोक
शंभो दमस्तपः शीचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानविज्ञानमास्तिक्यं ब्रम्हकर्म स्वभावजम् ॥ शौर्य तेजो मृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् । दानमौश्वरभावश्च क्षात्रकर्म स्वभावजम्।। कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्मत्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्थापि स्वभावजम् ॥
- श्रीमद्भगवद्गीता मनाची शांती, इंद्रियनिग्रह, पवित्रता, सहिष्णुता, सरळपणा किंवा सत्यनिष्ठा, अध्यात्मज्ञान, विविधज्ञान श्रध्दा या गुणांनी युक्त अशी ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे असतात. पराक्रम, तेजस्विता, धैर्य किंवा मनाचा दृढनिश्चय, युध्दातून पळून न जाणे, दान,, औदार्य आणि प्रजेचे नेतृत्व हे "क्षत्रियाच्या कर्माचे गुण आहेत; हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म होय. तर शेतकी, गुरे बाळगणे, व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म होय. आणि तसेच दुसऱ्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.
→ चिंतन
प्रयत्न करा यश मागे येईलच. - महर्षी कर्वे आपल्या संस्कृतीने नेहमीच कर्माचे महत्त्व सांगितले आहे. कर्म म्हणजे काम किंवा प्रयत्न. प्रयत्न करत राहणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करणाऱ्याला त्याचे योग्य ते फळ जरूर मिळते. आजवर जगाला आधुनिक युगात येईपर्यंत जे साहाय्य लाभले असे निरंतर प्रयत्न करणाऱ्या माणसांकडूनच ! अशा संशोधकांनी सतत प्रयत्न करुन नवे शोध लावले. अथक प्रयत्न करून कलाकारांनी यशाचे उंच मजले गाठले. भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, शिल्पकार करमरकर हे अशा प्रयत्नशील माणसांपैकी काही, ज्यांच्या अपार प्रयत्नांवर प्रसन्न होऊन यशश्रीने त्यांना माळ
→ कथाकथन 'चारित्र्य' सचोटी, निस्वार्थीपणा, आत्मभान, निश्चित मत, धैर्य, निष्ठा आणि आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य. - | उत्तम चारित्र्यसंपन्न प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची अनेक वैशिष्टये सांगता येतात. • असे लोक कुठेही उठून दिसतात. असे लोक कोणत्याही प्रसंगात आपला तोल क्यू देत नाहीत. शांत, आश्वासक, आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण परंतु संयमित असं त्यांचं वर्तन असत.
•या लोकांचा | आत्मविश्वास जबरदस्त असतो. पण, त्यात उद्धटपणा नसतो. हे लोक दुसऱ्याच्या भावना समजवून घेतात. • असे लोक सबबी सांगत बसत नाहीत. असे लोक सभ्य असतात. शिष्टाचार पाळतात. त्यासाठी अनेक छोटे-मोठे त्याग करायला तयार असतात.
• हे लोक आपल्या आधीच्या चुकांपासून घडे | घेवून त्या चुका सुधारतात.
• असे लोक संपत्ती किंवा जन्मजात वारसा अशा गोष्टींची पर्वा करीत नाहीत.
• असे लोक कधीही दुसऱ्याचे वाटोळे करुन स्वतःचा फायदा करुन घेत नाही. असे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहातात. असे लोक सामान्यांप्रमाणे राहूनही प्रतिष्ठितांच्यात सहज वावरतात. असे लोक ढोंगी वा दांभिक नसतात. असे लोक मृदुभाषी व प्रेमळ असतात. हसतमुख असतात. जुलमाविरुद्ध उभे राहण्यास ते सदैव सिध्द असतात. • हे म्हणजे तुमच्या कामगिरीला विजय प्राप्त करुन देणारा सुवर्णस्पर्श. हे लोक किमया करून दाखवतात. हे लोक सहज ओळखता येतात, पण त्यांची व्याख्या करणं अवघड असतं. हे लोक लीलया जबाबदाऱ्या स्वीकारतात. हे लोक म्हणजे मूर्तिमंत नम्रपणा. असे लोक जय आणि पराजय या दोहोंनाही सारख्याच उमदेपणानं सामोरे जातात.
• हे लोक नावलौकिक आणि संपत्ती यांच्या मागे धावत नाहीत. हे लोक म्हणजे शोभेची वस्तू नाही. हे लोक कणखर असतात.
• तकलादू नसतात. यांच्या व्यक्तिमत्वाची प्रसन्न अनुभूती पूर्णपणे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. हे लोक विनयशील असतात. पण, अगतिक वा दीनवाणे नसतात. हे लोक उच्च अभिरुचीचे असतात. छचोर वा उच्छृंखल नसतात. हे म्हणजे मूर्तिमंत स्वयंशिस्त आणि सौजन्य असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक विजयातही नम्र असतात आणि पराभवातही अविचल व धीरगंभीर असतात. चांगल चारित्र्य म्हणजेच यश असतं. मुलांनो वरील वैशिष्टये अंगी जोपासा व उत्तम चारित्र्यसंपन्न व्हा. सुविचार
• 'शूर माणसानं नम्र, धनिक माणसानं निगर्वी, ज्ञानी माणसानं शांत, तपस्व्यानं क्षमाशील, धार्मिक माणसानं सज्जन आणि उदार माणसाने विवेकी असणं हे त्यांचं भूषण आहे. तेव्हा सर्व माणसांच्या बाबतीत चरित्र्य किंवा सदाचार हे सर्वश्रेष्ठ भूषण आहे.' (शीलं परं भूषणम्- भर्तृहरि) "चित्र ही हाताची कृती आहे तर चरित्र ही मनाची कृती आहे.' 'आपले काम जवाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे. शेक्सपिअर
दिनविशेष
• भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा स्मृतिदिन - १९८० : गिरींचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी झाला. ते शाळेत शिकत असतानाच ना. गोखले यांनी राष्ट्रीय निधीची व लो. टिळकांनी पैसा फंडाची योजना सुरु केली होती. या कार्यात छोट्या गिरीने हिरिरीने भाग घेऊन मदत मिळवून दिली. आपल्या मुलाने नामांकित वकील व्हावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना आयर्लंडमधील डब्लिन विद्यापीठात बॅरिस्टर होण्यासाठी धाडले. 'चुकूनही मांसाहार करणार नाही.' हे आईला दिलेले वचन त्यांनी निग्रहाने पाळले. आयर्लंड हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपड करीत होता. तेथील तरुण सशस्त्र उठावाच्या हालचाली करीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर भारतात सुध्दा सशस्त्र उठाव झाला पाहिजे, हे जाणून भारतीय तरुणांनी आयर्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. यात गिरी क्रियाशील कार्यकर्ते होते. बॅरिस्टर होऊन गिरी भारतात परत आले पण त्यांनी फक्त पाचच वर्षे वकिली केली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यानंतर निरनिराळ्या घटक राज्यात मिळून ११ वर्षे ते राज्यपाल होते. १९६७ साली उपराष्ट्रपती पदावर त्यांची निवड झाली. तर १९६९ साली ते राष्ट्रपती झाले. २४ जून १९८० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
→ मूल्ये
स्वाधीनता, समता, बंधुता, निर्भयता.
→ अन्य घटना
• राणी दुर्गावतीचे बलिदान - १५६४
→ उपक्रम
• भारताच्या राष्ट्रपतींची नावे व त्यांचा कार्यकाल लिहिलेले तक्ते तयार करा.
समूहगान -
→ • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का...
→ सामान्यज्ञान
भारतातील साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'ज्ञानपीठ पुरस्कार' होय. १९८४ पासून मध्यप्रदेश सरकारने सुगम संगीतासाठी 'लता मंगेशकर' पुरस्कार सुरू केला. भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रत्येक खेळातील उत्कृष्ट खेळाडूस 'अर्जुन पुरस्कार' दिला जातो.
शनिवार, २२ जून, २०२४
23 जून दैनंदिन शालेय परिपाठ
23 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
असो तुला देवा माझा सदा नमस्कार....
→ श्लोक
- यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
- श्रीमद्भगवद्गीता जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा -हास होतो, आणि अधर्माचे वर्चस्व होते. त्या त्या वेळी हे भारता! मी स्वतः अवतीर्ण होतो. जग निसर्गाने घडविले. विज्ञानाने जगाला प्रगती दिली तर कलेने त्याला सौंदर्य दिले, प्रसन्नता दिली. कलांच्या आविष्कारने आपले नेहमीचं
→ चिंतन
कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे. २३ जून वार जीवन देखील रम्य भासू लागते. जेवताना सनईचे गोड स्वर कानी पडले, झोपताना अंगाईचे सूर ऐकू आले आणि पहाटे भूपाळीच्या गोड शब्दांनी डोळे उघडले तर कुणाला प्रसन्न वाटणार नाही? साध्या शब्दातून सांगायचे ते कवितेतून सांगितले तर ते हृदयात पोहोचते आणि त्याला सुरांची जोड दिली तर हृदयात रुजते. कला अशी माणसाला प्रसन्नतेचे वरदान देते.
→ कथाकथन
'दृढनिश्चयी ध्रुवबाळ' फार पूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या एक होत नाह रुबीन दूसरी होती नावडती, तिचे नाव सुनीती सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम असे होते पण सुनीतीला मात्र दूर राहावे लागे. एके दिवशी काही मुलांबरोबर खेळत असता इतर मुलांनी तुझ्या वडीलांचे नाय काय, असे विचारले. काही तो धावत आईकडे आला व म्हणाला,' आई, माझे बाबा कोण? ते कुठे आहेत? 'ध्रुवाचे हे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली. बाळ, उत्तानपाद राजे जा तुझे वडील.' आईचे बोलणे ऐकताच ध्रुवाला खूप आनंद झाला व आई नको म्हणत असताना तो राजवाड्यात धावत आला. उत्तानपाद राज्य सेवा सिंहासनावर बसला होता. ध्रुवबाळाला पाहून राजाने चटकन त्याला उचलून घेतले व आपल्या मांडीवर बसविले नि तो प्रेमाने फुरवान नागला. इतक्यात सुरुची तेथे आली. राजाने ध्रुवाला मांडीवर बसविले हे तिला आवडले नाही. ती रागाने म्हणाली, 'महाराज, माझ्या उत्तमऐकती या प मांडीवर बसविले? त्याला खाली उतरया.' राजाने तिच्या बोलण्याकडे सक्ष न देता तो प्रवाशी गोड गोड बोलण्यात दंग होता. राजा ऐकत सुरुची अधिकच रागावली व तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. ध्रुवाला फार वाईट वाटले नि तो रडत रडत आपल्या आईको आजा व म्हणाला,' आई, असे का ग झाले?' सुनीतीने ध्रुवाची समजूत घातली. ती म्हणाली, 'बाळ आपण मनापासून देवाची भक्ती केली मजे ते मिळेल यावर ध्रुव म्हणला, 'आई, तो देव आहे तरी कुठे?" सुनीती म्हणाली, बाळ देव खूप लांब अरण्यात असतो.' आईये पोष ध्रुव आईला म्हणाला, 'आई, तर मग मी अरण्यात जाऊन त्या देवाला भेटतो' आई म्हणाली, 'बाळ तू अजून लहान आहेस. अरण्यात सिंह ते तुला त्रास देतील. तू आताच मला सोडून जाऊ नकोस' ध्रुवाने निश्चयाने सांगितले, 'आई, आता मी देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही. तु माझी काळजी करू नकोस.' लागलीच ध्रुव निघाला. तो खूप लांब अरण्यात शिरला नि एका झऱ्याच्या काठी असलेल्या झाडाखाली बसला. इतक्यात सेनानी आले. या लहानग्या मुलाला अरण्यात पाहून त्यांना नवल वाटले. ते ध्रुवाला म्हणाले.' बाळ, तू एकटा या अरण्यात कशाला आलास?' ध्रुवमा देवाला भेटायचे आहे. म्हणून मी देवाची प्रार्थना करण्यासाठी येथे आलो आहे.' नारदमुनींनी देवाची प्रार्थना करण्यासाठी ध्रुवाला एक मंत्र से निघून गेले. ध्रुवाने खूप वर्षे त्या मंत्राचा जप केला, त्याचा दृढ निश्चय नि भक्ती पाहून श्री विष्णुदेव त्याला प्रसन्न झाले नि म्हणाले, बाळ, तुम काय हवे ते माग, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे' ध्रुव बोलला, 'देवा, माझ्या आईला सुखी कर नि मला जेथून कोणी ढकलणार नाही अशी जागा दे तथास्तु" पुढे ध्रुवाने पुष्कळ वर्षे राज्य केले व शेवटी देवाने दिलेल्या जागी तो गेला. मुलांनो, आकाशात उत्तरेकडे जो तारा नेहमी एकाच जागी दिसतो तो ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो. तोच आपला ध्रुवबाळ. बरं का
→ सुविचार
•'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' 1 • जाती धर्माच्या भिंती ओलांडून पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त कलेत व दृढनिश्चियात आहे.
दिनविशेष -
• भारतीय नभोवाणीची प्रथम ललकारी - १९२७ : २३ जून १९२७ रोजी संध्याकाळी ६ वा. भारतीय नभोवाणी मुंबईहुन अधिकृतपणे घुमली. याआधी २ वर्षापूर्वीपासून फक्त मुंबई शहराच्या कक्षेत कानाला यंत्र लावूनच कार्यक्रम ऐकू येत. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचाच समावेश कार्यक्रमात असे. ही नभोवाणी खासगी कंपनीच्या मालकीची होती. याच काळात पाश्चिमात्य देशातून रेडिओचा प्रसार झपाट्याने होत होता. हिंदुस्थानी लोकांकडून आपला फायदा होईल, अशा रितीने रंजन, शिक्षण देण्यासाठी रेडिओचे माध्यम उत्तम आहे. याची जाणीव तेव्हा ब्रिटिश राजसत्तेला झाली व त्यानी इंडिया कॅलेंडर केबल्स' ही खासगी कंपनी ताब्यात घेऊन 'इंडियन ब्रॉडकॉस्टिंग' या नावाने २३ जून १९२७ पासून हा सरकारी उद्योग म्हणून चालू केला. लॉर्ड आयर्विन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व नंतर सुप्रसिध्द गायक फैयाझखांचे संगीत मुंबईकरांना ऐकायला मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात नभोवाणीचा विकास झपाट्याने झाला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, परभणी आणि रत्नागिरी अशी नभोवाणी केंद्रे चालविली जात आहेत.
→ मूल्ये
• कर्तव्यदक्षता, समता, निसर्गप्रेम.
→ अन्य घटना
• प्लासीची लढाई झाली व बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव होऊन ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली - १७५७ • नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) स्मृतिदिन - १७६१ • राष्ट्रमाता इंदिरा गांधींचे सुपुत्र व युवा नेते संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन - १९८० काँग्रेसचे जेष्ठ नेते व मुंबईचे माजी महापौर स. का. पाटील यांचे निधन - १९८१
→ उपक्रम
• शाळेत एक शालेय नभोवाणी मंडळ स्थापन करा व दर आठवड्याला त्याचा कार्यक्रम करा. यात मागील आठवड्यातल्या बातम्या, एखादी मजेदार, आश्चर्यकारक माहिती व चांगली कामे केलेल्यांची मुलाखत सादर करा.
→ समूहगान
• राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम्......
→ सामान्यज्ञान
• अरुंडेल रुक्मिणी देवी प्रसिध्द नृत्य कलाकार
• नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक -
नंदलाल बोस - प्रसिध्द शिल्प कलाकार
• लता मंगेशकर - सर्वश्रेष्ठ गायिका
• अरुडेल रुक्मिणी देवी प्रसिध्द नृत्य कलाकार
• नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक
22 जून दैनंदिन शालेय परिपाठ
22 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू....
→ श्लोक
न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्म संगिनाम् । जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन् ॥
(ज्ञानी) पुरुषाने, कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञ लोकांचा बुध्दिभेद करू नये. (त्यांची बुध्दी विचलित करु नये) तर आपण स्वतः योगयुक्त (चित्त संतुलित ठेवून) होऊन सर्व कर्माचे नीट आचरण करीत त्यांच्याकडूनही सर्व कर्मे करवून घ्यावीत. (त्यांनाही प्रेरित करते संस्कार :- विद्वानांनी अनासक्तपणे कर्म करण्याचा उपदेश करण्याऐवजी आपल्या आचरणातून त्यांना अनासक्त राहून कर्म करण्यास प्रेरित करावे.
→ चिंतन
'समाजाचे पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा, स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी असते.' - लो. टिळक A पुढारी म्हणजे समाजाला पुढे नेणारा, जो पुढे असतो त्याचे मागील लोक अनुकरण करतात. म्हणून पुढे असणाऱ्या नेत्याने आपले वर्तन आदर्श ठेवायला हवे म्हणजे त्याच्या अनुकरणाने समाज आदर्श बनेल. आदर्श वर्तन म्हणजेच सदाचरण, धर्मनिष्ठा आणि त्यागभावना यांचा मिलाफ, असा आदर्श पुढारी ज्या ज्या देशाला लाभला त्या देशाने प्रगती करुन घेतली. मग तो भारत असो की जपान! 'विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.'
→ कथाकथन
- 'लोकमान्यांचे धैर्योद्वार' : इंग्रजांच्या राजवटीतून देश मुक्त करण्यासाठी भारतभर आपआपल्या परीने प्रयत्न चालू होते. कुठे बाँब होते, कुठे क्रांतिकारकांच्या पिस्तुलांना गोरे अधिकारी बळी पडत होते. कुठे दारुच्या गुत्त्यांवर निरोधन केले जात होते, तर कुठे विदेशी कपडे जाळले जात होते. देशभर चालू झालेल्या या प्रकारामुळे चक्रावून गेलेले ब्रिटिश सरकार जुलूम व अत्याचार यांच्या जात्यात प्रजेला भरडून काढीत होते. अशा स्थितीत ब्रिटिशांनी चालविलेल्या या अत्याचारांवर खरमरीत आगपाखड करणारे 'हे उपाय टिकाऊ नाहीत', 'बाँबगोळ्याचे रहस्य' अशांसारखे जळजळीत अग्रलेख लो. टिळकांनी आपल्या 'केसरी' या वृत्तपत्रात लिहिले. लोकमान्यांवर ब्रिटिश सरकारचा राग होताच. त्याने त्यांना एकदा तुरुंगात टाकले होतेच. आता या अग्रलेखाचे निमित्त काढून ब्रिटिश सरकारने लोकमान्य मुंबईत असताना त्यांना अटक केली व तुरुंगात डांबले. त्यावेळच्या मुंबई राज्याच्या गव्हर्नर जॉन क्लार्कने १३ जुलै १९०८ रोजी त्यांच्यावर विविध आरोपांबद्दल न्यायालयात खटला भरला. मुंबईचे न्या. मू. दावर यांच्यापुढे खटल्याचे कामकाज सुरू झाले. लोकमान्यांनी आपल्यातर्फे वकील न देता, स्वतःच स्वतःची बाजू मांडली. सरकारी वकिलाने लोकमान्यांच्या विविध अपराधांचा पाढा वाचून ते कसे राजद्रोही आहेत हे दाखवून दिले; या उलट लोकमांन्यांनी ५ दिवसात एकून २१ तासांपेक्षाही अधिक बोलून, आपण कसे निर्दोष आहोत, ते मुद्देसूद सांगितले. पण काही झाले तरी ब्रिटिश सत्तेच्या ताब्यातील न्यायालय ते दोन्ही बाजूंचे म्हणणे केवळ रीत म्हणून ऐकून घेऊन ब्रिटिशधार्जिण्या ज्युरींच्या सल्ल्याने न्यायमूर्तींनी लोकमान्यांना त्यांच्या दोन अपराधांकरीता ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा दिली. तर तिसन्या अपराधाकरिता १०००रु. दंड ठोठावला. एचडी जबर शिक्षा ठोठावली असतानाही निश्चल राहिलेल्या त्या निर्भय महापुरुषाला न्या. मू. दावर यांनी विचारले, “दिल्या गेलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे काय? यावर लोकमान्य म्हणाले," न्यायालयानं जरी मला अपराधी ठरविलं असलं, तरी मी अपराधी नाही. एकूण लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी या न्यायालयाच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ अशी एक ईश्वरी शक्ती आहे. मी शिक्षा भोगल्याने, माझ्या देशबांधवांमध्ये या परकीय सत्तेविषयीचा असंतोष वाढीला लागून स्वातंत्र्याची घटका जवळ यावी, यासाठी या सत्तेने तुम्हाला मला शिक्षा देण्याची बुध्दी दिलेली असते." लोकमान्यांचे हे धैर्योद्रार ऐकून, न्यायाधीशासहित सर्व थक्क झाले. फुटत
→ सुविचार
जेथे जोन व नेट आहे आणि राष्ट्रातील प्रत्येक स्वी पुरुष एकजूट होऊन देशासाठी परमावधीचा त्याग करण्यास तयार आहेत -> तेथे विययश्री नेहमीच धावत येते'
दिनविशेष -
• इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी जन्मदिन १८०५ : मॅझीनी हा इटलीतील राष्ट्रवादाचा जनक मानला जातो. 'राष्ट्रवाद हाव धर्म होय' अशी त्रिकवण त्याने तुकडे-तुकडे झालेल्या इटलीला दिली. जुलमी सत्ताधीशांमुळे जनतेचे जीवन असह्य होत चालले होते. या जुलमाला विरोध करण्यासाठी कार्बोनेरी नामक सशस्त्र गुप्त संघटना निर्माण झाली. मॅझिनी या संस्थेचा सक्रीय सभासद होता. त्याच्या भावनाप्रधान राष्ट्रवादी लेखांनी त्याने इटलीच्या जनतेला प्रेरित केले. राष्ट्राच्या दुर्देवी परिस्थितीची सूचक अशी काळी फीत तो आपल्या दंडावर लावी. इटलीतून त्याच्या चळवळीमुळे त्याला हदपार करण्यात आले तेव्हा तो पॅरिसला गेला. तिथे त्याने 'यंग इटली' नावाची क्रांतिकारी संघटना स्थापना केली. गॅरिबाल्डीसारखे जहाल देशभक्त त्याच्या झेंडयाखाली एकत्र आले. इटलीची एकीकरण चळवळ यशस्वी होण्यासाठी मॅझिनीने चारित्र्य, शिक्षण, स्वार्थत्याग या गोष्टींवर भर दिला. राष्ट्रीय ऐक्य, उच्चार विचार स्वातंत्र्य व परकीयांपासून मुक्तता या मंत्राचा घोष त्याने सतत केला. लंडनला जाऊन तो तेथील कायमचा रहिवासी झाला व शेवटपर्यंत तेथूनच त्याने आपल्या राष्ट्रीय चळवळीची सूत्रे हलविली. १८७० साली इटली स्वतंत्र होऊन एक राष्ट्र बनले. या एकीकरण कार्यात मॅझिनीचा सिंहाचा वाटा आहे.
→ मूल्ये
स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता, कर्तव्यदक्षता.
→ अन्य घटना
• पेशव्यांना वकील-इ-मुतालिक पदवी अर्पण - १७९२ • देशभक्त दामोदर हरी चाफेकर यांनी चार्ल्स रॅंडवर गोळ्या झाडल्या - १८९७ • लो. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा. १९०८ महानुभाव वाङ्मयाचे विद्वान व नामवंत साहित्यिक डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म १९०८ • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीचें निधन १९५३ महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर ३० टक्के जागा राखीव १९९४ • दक्षिणायनास प्रारंभ कर्क संक्रमण
उपक्रम
• मॅझिनी या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील विचार निवडून फळ्यावर लिहा. • वेगवेगळ्या देशांच्या पराक्रमी देशभक्तांची माहिती जमवून एक हस्तलिखित तयार करा.
समूहगान
• दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए....
सामान्यज्ञान
नेहमीच्या वापरातील धातूपेक्षा सोने जास्त जड आहे. पाऱ्यामध्ये ते तरंगते. १०६३ अंश सेल्सिअस तापमानाला ते वितळून त्याचा रस होतो; तर २९७० अंशाला सोने उकळू लागून त्याची वाफ होते.
21 जून दैनंदिन शालेय परिपाठ
21 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
- प्रार्थना देवा तुला, मिटू देरे बैर वासना....
→ श्लोक
- यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥
- श्रीमद्भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कारण (हे पार्था । (अर्जुना) मी जर आळस झटकून (अतन्द्रितः) कर्म चार : करीत राहिलो नाही तर लोकही सर्व प्रकारे माझाच मार्ग अनुसरतील. ते देखील आळशी होऊन कर्म करणार नाहीत. संस्कार :- थोर व्यक्ती आळस सोडून सतत कर्म करीत राहिल्या तर सामान्य जनसुध्दा
→ चिंतन
- 'हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहीले पाहिजे.' - विनोबा भावे त्याचे अनुकरण करतील. हाताच्या पाच बोटांपैकी कुठलेच बोट दुसऱ्यासारखे नसते. पण तरीही एखादी वस्तू उचलताना ही पाचही बोटे एकत्र येतात. पाचच बोटे पण हजारो कामे करीत असतात. कारण एकत्र आल्यावर ती बोटे राहत नाहीत तर मूठ बनते. ही मूठ सामावूनही घेऊ शकते आणि ठोसा देऊन फेकूनही देऊ शकते. बोटे म्हणजेच माणसे व मूठ म्हणजे संघटना. जी शक्ती एकट्या माणसात नाही ती संघटनेत आहे. कृष्णासह गोपांच्या काठ्या लागल्या तेव्हा गोवर्धन उचलला गेला. संघटनेची शक्ती अपार आहे.
कथाकथन
- 'उघड सत्य : संगीताची आवड असणारे एक कुटुंब होते. त्या कुटुंबातील एक लहान मूल फारच खेळकर होते. खेळताना ते संगीता वाद्ये ठेवलेल्या खोलीत आले, खोलीत सतार, पखवाज, तबला, बासरी अशी वाद्ये व्यवस्थित ठेवलेली होती. त्या मुलाने सतारीया या पि पखवाजावर बुक्क्याने मारले, तबल्यावर थापडा लगावल्या, समोर अनेक छिद्र असलेली बासरी पडलेली होती. तिला उचलून घेऊन ओटाला लावून पाहिली. काही वेळेने ते मूल तेथून निघून गेले. त्यांनंतर खोलीतील वाद्ये आपसात बोलू लागली. सतार म्हणाली, 'एक लहान मूल माझे कान ओवून गेले, असे का केले?" पखवाज म्हणाला, 'सतार, तू नेहमीच अकडून राहतेस म्हणून तुझे कान ओढले गेले.' सतार म्हणाली 'हे ठीकच झाले. माझा अकडबाजरा कळाला. परंतु तू मार का खाल्लास?" आता बासरी म्हणाली, ' बंधु पखवाज तू ढोल असला तरी आतून पोकळ आहेस आणि हा पोकळपणा बहुमूल्य वस्त्रांनी लपवून ठेवला आहे, तसेच तबल्याचे सुध्दा आहे. तोसुध्दा आतून पोकळच आहे. यासाठी पखबाज दादा तुम्हाला बुक्क्याचा मारा खाया आणि तबले भाऊ तुम्हाला चापटपुऱ्या खाव्या लागल्या,' असे बासरीने म्हटल्याबरोबर तिघेही एकदम तुटून पडताना म्हणाले, 'तुझ्यामधे असे कोणते गुण आहेत की तुझे त्या बालकाने आपल्या ओठाने चुंबन घेतले.' बासरी म्हणाली, 'मी सुध्दा तुमच्या प्रमाणेच पोकळ आहे. एवढेच नव्हेतर मला अनेक छिद्रे आहेत. परंतु मी आपला पोकळपणाच नव्हेतर स्वतःचे स्वरुपच झाकून ठेवले नाही. ते सर्वांनाच सहज दिसते.'
→ सुविचार • ‘सत्य हे सूर्य प्रकाशाइतके उघड आहे. • सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र असले पाहिजे. सत्याचरणाने त्याची विनम्रता वाढत जाते.
→ दिनविशेष
डॉ. हेडगेवार स्मृतिदिन - १९४० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने विख्यात असलेल्या देशव्यापी संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या एकावन्न वर्षाच्या आयुष्यात डॉ. हेडगेवारांनी आसेतुहिमाचल सान्या भारतभर सर्वांची हृदये एका सूत्रात ओवण्याचे जे काम केले त्याला जगाच्या इतिहासात तोड सापडणे कठीण आहे. डॉक्टरांनी कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन १९१४ मध्ये एल. एम. अँड एस. ही. पदवी मिळवली. नागपूरला येऊन व्यवसाय व सामाजिक कार्य दोन्हीस सुरुवात केली. प्रबळ संघटना नसणे हे या देशाच्या अवनतीचे कारण आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून निश्चयाने रोजच्या रोज एकत्र येणे, राष्ट्रीय विचारांचे चिंतन करणे फार आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले आणि अशा प्रकारचा शिस्तबध्द कार्यक्रम असणारी एक संघटना उभारावी असा संकल्प त्यांनी केला. | १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर अवघ्या पाच स्वयंसेवकांनिशी त्यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची' स्थापना केली. संघटनेसाठी संघटना या प्रमुख तत्वावर आधारित या संघटनेकडे चारित्र्य आणि शुचितेचे आशास्थान म्हणून पाहिले जाते.
→ मूल्ये
• स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता.
→ अन्य घटना
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते.
• कवी भूषण याने 'श्री शिवराजभूषण' हे दीर्घ काव्य पूर्ण केले - १६७४
• हिंदी - प्रचार संघाची स्थापना - १९३४
• सी. राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले - १९४८
→ उपक्रम'
एकी हेच बळ' या कल्पनेवर आधारित कथांच्या लेखनाची स्पर्धा घ्या. • चांगल्या हस्ताक्षराच्या मुलांची संघटना करून टिपण- वह्या, फलकलेखन, तक्ते तयार करणे ही कामे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा. -
> समूहगान -
• कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा...
→ सामान्यज्ञान
- मराठी वाङ्मयातील पहिले
• पहिली स्त्री कादंबरीकार साळुबाई तांबवेकर 'चंद्रप्रभा विरहवर्णन' - इ.स. १७६९
• पहिले वृत्तपत्र - 'दर्पण'- संपादक बाळशास्त्री जांभेकर- इ.स. १८३२
• पहिली सामाजिक कादंबरी- 'यमुना पर्यटन'- लेखक बाबा पद्मनजी - इ.स. १८६० शिलालेख शके ९०५ - -
• पहिले उपलब्ध वाक्य - 'श्री. चावुण्डेरायें करवियले' श्रवणबेळगोळ
• पहिला ग्रंथ - विवेकसिंधू - लेखक मुकुंदराज - शके १११०
• पहिला गद्य चरित्रग्रंथ- 'लीला चरित्र' - म्हाईंभट्टांनी या ग्रंथात चक्रधर स्वामींच्या आठवणी समाविष्ट केल्या आहेत. शके १२००
• आद्य कवियत्री महदंबा किंवा महदाइसा
• पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे-'स्त्री-पुरुष समानता' इ.स. १८८५
• मराठीतील आद्य गीताभाष्य- 'ज्ञानेश्वरी'
• मराठी रंगभूमीवरील नाटकालचा पहिला प्रयोग 'सीतास्वयंवर'- इ.स. १८४३ - विष्णुदास भावे यांनी या नाटकाचा प्रयोग घडवून आणला.