29 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
मंगलमय चरणि तुझ्या विनंती हीच देवा.... -
→ श्लोक
- अब्देष्टा सर्वभूतांना मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःख सुखःक्षमी ॥
- - श्रीमद्भगवतगीता जो कोणाचाही व्देष करीत नाही, सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतो आणि ज्याला अहंकार स्पर्श करीत नाही व सुख दुःखांविषयी जो उदासीन असतो जो क्षमाशील असतो तो सदैव संतुष्ट असतो.
→ चिंतन
जेवणात जसे मीठ तसेच जीवनात विनोद असावेत. जेवण मिठाविना शक्य नाही पण त्याचेही काही प्रमाण असते. नुसते कोणी मीठ खाऊ शकत नाही आणि भरपूर मीठही पदार्थात घालून चालत नाही. ते जेवढे लागते तेवढेच टाकावे लागते. विनोदाचे तसेच आहे. विनोदामुळे रोजच्या कंटाळवाण्या जीवनात लज्जत येते. ते शरीराचे अन् बुध्दीचे उत्तम टॉनिक आहे. पण म्हणून माणूस सारखाच विनोद करू लागला तर विनोदास पात्र होईल. विनोदाची मर्यादा व शक्ती ओळखून विनोद केला तर आयुष्य रंगतदार व चवदार होईल.
कथाकथन
'विनोद बुध्दी' :- स्वतः खूप हसा आणि इतरांना हसवा. तुमच्यात विनोदबुध्दी असेल तर स्वतःच्या वैगुण्यावर हसण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. विनोदी माणूस सर्वांना आवडतो आणि हवाहवासा वाटतो. काही लोकांना विनोदाचं वावडं असतं. विनोदाकडे पाठ फिरवून ते जगणे म्हणायचं ? स्वतःवरही विनोद करून हसायला शिका. कारण असा विनोद कुणालाच दुखवत नाही. आघातातून पुन्हा उठण्याचं बळ विनोदातून हे नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे. विनोदाने परिस्थितीत बदल करता येत नाही परंतु त्याने वेदनेची तीव्रता कमी व्हायला मदत होते. विनोदात जखमेवर फुंकर घालण्याची शक्ती आहे. प्राणांतिक आजारातून माणूस स्वतःला कसं 'बरं' करु शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'अॅनाटमी ऑफ अॅन इलनेस' या पुस्तकाचे लेखक डॉ. नार्मन कझिन्स. एका गंभीर आजाराने त्यांना ग्रासलं होतं. त्यांची प्रकृती सुधारण्याची शक्यता केवळ ०.००२ टक्के म्हणजे जवळपास शून्यच होती. शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते असं कझिन्सला वाटलं आणि त्यांनी ते सिध्द करुन दाखवायचं ठरवलं. त्यांच्या मनात आले की नकारात्मक किंवा वाईट विचारांनी जर शरीरात नुकसान करणारी रसायनं निर्माण होत असतील तर याच्या उलटही होत असलं पाहिजे. आनंद आणि हसणं यासारख्या | सकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरात आरोग्यकारक रसायनं निर्माण होऊ शकतील. हॉस्पिटल सोडून ते एका हॉटेलात राहायला गेले. तिथं त्यांनी | विनोदी चित्रपट पाहाण्याचा सपाटा लावला आणि आश्चर्य म्हणजे हसण्यातून स्वतःला बरं केलं. अर्थात डॉक्टरी औषधोपचार महत्वाचे असतातच. परंतु आजारी माणसाची जगण्याची इच्छासुध्दा तेवढीच महत्वाची असते.
सुविचार
• विनोदी वृत्ती जीवरक्षक ठरु शकते, शिवाय तिच्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती हाताळणे सोप जातं.' 'जी गोष्ट शस्याने होणार नाही ती कधीकधी एका मनमोकळ्या हास्याने होते.'
• त्याच्यावर समाज खूप असतो. जो समाजास नेत्राने, मनाने वचनाने व आचरणाने खूप
दिनविशेष
• श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा जन्मदिन - १८७१: मराठी माणसाला 'सुदाम्याचे पोहे' खाऊ घालून हसणारा २९ जून १८७१ साली नागपूर येथे जन्मला. मातृसुखाला पारख्या झालेल्या श्रीपाद कृष्णांना नवव्या वर्षीच अधीगवायूसारखा भयंकर औषधोपचार व चुलत्यांची सेवा यामुळे ते बरे झाले पण या आजाराची काही चिन्हे जन्मभर राहिलीय, यामुळे झाली ते एकांतप्रिय आणि पुस्तकवेडे झाले. विनोदपूर्ण टीकेचा बाण लक्ष्यावर बसतोच पण जखम मात्र होत नाही हे त्यांनी चांगले ओळखले होते. अशा तर्हेने विनोदाचा ललित वाङ्मयात त्यांनी प्रथमच उपयोग केला, म्हणून त्यांना विनोदी वाङ्मयाचा जनक असे म्हणतात. गडकऱ्यांनी विनोदी लेखनाच्या बाबतीत त्यांना गुरु मानले होते. 'कोल्हटकरांनी महाराष्ट्राला हसायला शिकवले' असे आचार्य अत्रे म्हणतात. अण्णासाहेब किलोस्करांनंतर मराठी रंगभूमीला कोल्हटकरांनीच आधार दिला. वीरतनय, मूकनायक, प्रेमशोधन, मतिविकार, वधूपरीक्षा या त्यांच्या नाटकांनी रंगभूमी गाजविली... "बहु असोत सुंदर' हे महाराष्ट्र गीत त्यांनीच रचले. अनेक अभ्यासपूर्ण समीक्षणेही त्यांनी लिहिली. १९२७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.
मूल्ये
•समता, खिलाडू वृत्ती
अन्य घटना
• महालनोबिस प्रशांतचंद्र जन्मदिन १८९३
. • प्रसिध्द साहित्यीक रंगा मराठे जन्म - १९१३
• प्रसिध्द नट विष्णुपंत जोग यांचे निधन - १९९३
उपक्रम
विनोद सांगण्याची स्पर्धा घ्या. • व्यंगचित्रांची कात्रणे जमवून चिकटवहीत लावा.
समूहगान
• पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना....
→ सामान्यज्ञान
•जगात सर्वात मोठे द्वीपकल्प भारत.
• जगात सर्वात मोठे गोडे पाण्याचे सरोवर -कॅनडा अमेरीका,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा