Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २९ जून, २०२४

30 जून दैनंदिन शालेय परिपाठ

          30 जून दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 अता बरता भी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमि या पदाला.... 

 

→ श्लोक 

धन्यावान् सभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियःः । ज्ञानं लब्धा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ 

- श्रध्दावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात उसले की शांती प्राप्त होते आणि आत्मबोध होतो.


 → चिंतन 

 तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जुन्या कपड्याप्रमाणे हे शरीर सोडून जायचे आहे. मरण कुणाला टळले आहे. पण कोण किती जगला यापेक्षा तो कसा जगता हे जास्त महत्वाचे ! त्याचे जीवन दुसऱ्याच्या कामी किती आले हे महत्वाचे ! स्वतःसाठी जगणारी माणसे मरतात पण दुसऱ्यासाठी मरणारी मात्र मरूनही कीर्ती रूपाने या जगात राहतात. त्याचा देह जातो पण कीर्ती राहते.कथाकथन 

संत कबीरांच्या  साहित्यातील सामाजिक जाणीव, कबीराच्या काळामध्ये खूप मोठी परकीय आक्रमण झालेली दिसतात. हे आक्रमक हिंस्त्र प्रवृत्तीचे होते तसेच होते. या धर्माती उम्र कनिष्ठ लोकांचे विविध मार्गांनी शोषण करत होते. तत्कालिन सामाजिक खूप मोठा मेदा होता. हिंदू मुस्लिमांमधील भेदाभेद तर होताच, परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माच्या अंतर्गतही खूप मोठी भेदाभेदाची दरी होती या धर्मातील उच्चवर्णीयोक कनिष्ठ वर्गीय लोकांचे विविध क्षेत्री स्थानी असलेले लोक अत्यंत स्थायी आणि भोगवादी बनलेले होते. म्हणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माणुसकी पायी जात होती. म्हणून सामान्य माणूस अत्यंत दुःखी जीवन जगत होता. संत कबीर हे निमठ मनोवृत्तीये असल्यामुळे त्यांना सत्ताधारीलोच्या भोगविलासी प्रवृत्तीय तीव्र विरोध केला. विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडानी काहीही साध्य होत नाही, असे कबीराच स्पष्ट मत होते. तीर्थयात्रा करणे. गंगेमध्ये स्नान करणे, माळा गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे अशा सर्वच गोष्टी निरर्थक असल्याचे कबीर सांगतात. विविध ठिकाणच्या तीर्थस्थानी देवाच्या नावाने तिथील ऐतखाऊ पुजारी लोक भोळ्याभाबड्या जनतेचे खूप मोठे शोषण करतात. अशा शोषणाला समान्यजनांनी बळी पडू नये, जत्रेमध्ये दगड असतो आणि तीर्थ म्हणून चमचाभर पाण्याचा एकेक रुपया वसूल केला जातो. अशा गोष्टींना बळी पडणे हा वेडेपणा आहे. संत कबीर, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य दिसून येते. या संदर्भात संत तुकारामही 'तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी' असे म्हणतात. तीर्थस्थानी नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुवून जातात आणि आपणाला मोक्ष मिळतो, असाही खुळा समज समाजामध्ये प्रचलित आहे. या संदर्भामध्ये संत कबीर एक मार्मिक प्रश्न उपस्थित करतात. तीर्थक्षेत्रातील नदीमध्ये स्नान केल्याने माणसाला मोक्ष मिळत असेल तर रात्रंदिवस त्या पाण्यातच राहणाऱ्या बेडकांना का मोक्ष मिळत नाही. तसेच मुस्लीम धर्मातील बकल्यांचा बढी देण्याच्या प्रथेलाही त्यांनी विरोध केला. कबीरांना मानवता हा धर्मच महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक धर्मातील कर्मकांड माणयांना अंधश्रध्दाळू बनवणारे असते. गळ्यात माळा घालणे, गंध/टिळा लावणे, डोक्याचे केस कापणे, असे केवळ बाह्य सांग, ढोंग केल्याने माणूस साधू, संत किंवा सज्जन होत नाही, तर त्यासाठी आधी आपले मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. टिळक, माळा परिधान केल्याने किंवा शाळीग्रामच्या पूजेने मन शुद्ध, शीतल होत नाही, तर त्यासाठी आधी मनाची भ्रांती दूर झाली पाहिजे आणि माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. संत कबीरांनी आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये सत्य, अहिंसा, सद्भाव, सदाचार, परोपकार, शील या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यासारखी मानवतावादी नैतिक मूल्ये आचरणात आणण्याचा आग्रह कबीरांनी आपल्या साहित्यातून धरलेला आहे. प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे कबीर सांगतात. पोथी पढपढ जग मुआ, पंडित भया ना कोय ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. 'प्रेम' या शब्दाची अडीच अखरे माणसांच्या आचरणात आली तर मानवी जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटतील. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेशही संत कबीरांनी अनेक ठिकाणी दिलेला आहे. हिंदू तूरक दुई महि एकै कहे कबीर पुकारी' असे म्हणत कबीरांनी हिंदू-मुस्लीम दोन्हीही माणसेच आहेत. त्यांच्यामधील कृत्रिम भेदभाव निरर्थक आहेत, असे सांगितले आणि हिंदू-मुस्लिमांनी आपापसांतील भेदभाव विसरून माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे. असा आग्रह धरला; म्हणूनच संत कबीर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही समाज गटांमध्ये अत्यंत मोलाचे वाटले; त्यांनी आपल्या 'गुरू ग्रंथसाहिबा' मध्ये | कबीरच्या दोह्याचा समावेश केला. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे कबीर हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्चनीचतेलाही प्रखर विरोध करतात. सर्वच माणसांची उत्पत्ती एकाच ज्योतीतून झाली असेल तर ब्राह्मण शूद असा भेदभाव कशासाठी करायचा? असा खडा सवाल कबीर विचारतात आणि मानवी समाजामध्ये उच्च नीवतेचे कृत्रिम स्तर निर्माण करणाऱ्या जातीयतेला मूठमाती देण्याचा प्रयत्न करतात. → सुविचार:-

  •"जतरा में फतरा बिठाया। तिरथ बनाया पानी दुनिया भई दियानी पैसे की धूलपानी ।" "तिलक, दिये। पै तपनि न जाई, माता पहरी बनेरी लाई सबै सालिगराम कूं, मन की भांती न जाई ॥ • भगवे तरी धान सहज देश त्याचा तेथे अनुभवांचा काय पंय ? 


→ दिनविषेश 

'दादाभाई नवरोजी' : (जन्म ४ सप्टेंबर १८२५ - मृत्यू ३० जून १९१७ ) - बृहन्मुंबईत फोर्ट विभागात दादाभाई नवरोजी मार्ग 'टाइम्स ऑफ इंडिया या भव्य इमारतीला शोभा देत आहे व त्यांचा पुतळा नवभारताची प्रगती पाहात उभा आहे. ४ सप्टेंबर १८२५ साली पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १८४५ साली बी. ए. होऊन लंडनला गेले. भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील झाले. प्रगतीशील उद्योगव्यवसायात शिरले. इंग्लंडमधील भारतीयांची संघटना बांधली. इंडियन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या सनदशीर विधायक कार्यामुळे ते लोकप्रिय झाले. इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य म्हणून ते निवडून आले. भारताचा सन्माननीय श्रेष्ठ सदस्य म्हणून जनता त्यांना ओळखू लागली. दादाभाई जेव्हा राष्ट्रीय सभेत सामील झाले तेव्हा भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज प्रशासनाच्या दृष्टोत्पत्तीस आणणे व त्यावर उपाय सुचविणे एवढेच मर्यादित स्वरुपाचे कार्य ती संस्था करीत होती. दादाभाई हे अत्यंत लोकप्रिय व मधुर भाषेचे सम्राट होते. १८९६ व १९०६ या दोन वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.


 → मूल्ये - 

 • स्वाधीनता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता. 


→ अन्य घटना

 • दादाभाई नवरोजी स्मृतिदिन १९१७ महान संत कबीर यांची जयंती- १३०९ 

 • भारत पाकिस्तानात कच्छ करार झाला - १९६५

  • मिझोराम या राज्याची निर्मिती - १९८६. 

  • रॅले जॉन विल्यम्स स्ट्रट स्मृतीदिन १९८६ 


→ उपक्रम

 • दुर्बिण मिळवून विविध गोष्टींचे विविध अंतरावरून निरीक्षण करा. राष्ट्रभक्तीपर गीतांची स्पर्धा घ्या. राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे टिपणवहीत लिहा. 


→ समूहगान

 • हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी हैं.... 


→ सामान्यज्ञान

 • महाराष्ट्रात सर्वात जास्त लोखंड - देऊळगाव (चंद्रपूर). महाराष्ट्रात सर्वात जास्त मँगेनीज रामटेक (नागपूर). 

 • महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कामठी (नागपूर) •महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट (कोल्हापूर)

  •महाराष्ट्रात सर्वात जास्त - अभ्रक

  • (नागपूर)

   • महाराष्ट्रात एक प्रचंड जलविद्युत प्रकल्प कोयना (सातारा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा