सहावी भूगोल
डिसेंबर ०८, २०२०
Res ads
सहावी भूगोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सहावी भूगोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
सोमवार, ७ डिसेंबर, २०२०
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०
सहावी भूगोल
ऑगस्ट १२, २०२०
इयत्ता सहावी, भूगोल,५.तापमान
तापमान
प्रश्न १. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.
उत्तर : (१) समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. (२) बाष्प हवेतील तापमान साठवू शकते. (३) त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.
(२) खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
उत्तर : (१) खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते. म्हणजेच तेथे हवा कोरडी राहते. (२) त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
(३) उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते.
उत्तर : (१) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. (२) उत्तर गोलार्धात अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्ही घटकांचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होतो. म्हणून उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते.
(४) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
उत्तर : (१) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात प्लवंक हे माशांचे खाद्य मोठ्या प्रमाणात वाढते. (२) त्यामुळे अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
(५) पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
उत्तर : (१) वातावरणातील अॅरगॉन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वत:मध्ये सामावून ठेवू शकतात. (२) या वायूंना 'हरितगृह वायू' म्हणतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. (३) वाढते नागरीकीकरण व औद्योगिकीकरण व कमी होणारे वनाच्छादन यांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. म्हणून वाढत आहे पृथ्वीचे तापमान.
सहावी भूगोल
ऑगस्ट १२, २०२०
इयत्ता सहावी, भूगोल,४.हवा व हवामान
हवा व हवामान
प्रश्न 1. पुढील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते.
उत्तर: योग्य.
(२) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते.
उत्तर : अयोग्य. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता जास्त असते.
(३) जमिनीच्या प्रकाराचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो.
उत्तर : योग्य,
(४) एखादया ठिकाणाच्या हवामानात सतत बदल होत असतो.
उत्तर : अयोग्य. एखाद्या ठिकाणाच्या हवामानात सहसा बदल होत नाही.
(५) सजीवांचा आहार व निवारा या बाबींवर हवामानाचा परिणाम होत असतो.
उत्तर : योग्य.
प्रश्न ३. मी कोण? (नोंद : उत्तरे थेट दिलेली आहेत.) (१) मी नेहमी बदलत असते-हवा
(२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते-हवामान
(३) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते.-हिम
(४) मी वातावरणात बाष्परूपात असते- आर्द्रता.
प्रश्न 3. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। (१) 'हवा' म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय
(२) 'हवामान' म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय.
(३) 'वारा' म्हणजे काय?
उत्तर : जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे क्षितिज समांतर दिशेत वाहणारी हवा, म्हणजे 'वारा' होय
(४) 'वृष्टी' म्हणजे काय?
उत्तर : हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत रूपांतरण होणे व ते पुन्हा पृथ्वीवर (जमिनीवर) येणे, म्हणजे 'वृष्टी' होय. •
(५) हवेची अंगे कोणती?
उत्तर : तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे होत.
(६) वृष्टीची रूपे कोणती?
उत्तर : पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे होत.
(७) हवेच्या अंगांचा कशावर परिणाम होत असतो ? उत्तर : हवेच्या अंगांचा दैनंदिन व्यवहारांवर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो.
(८) बहुतांश सजीवसृष्टी कोणत्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशात दिसून येते?
उत्तर : बहुतांश सजीव सृष्टी पोषक हवामानाच्या प्रदेशात दिसून येते.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(१) महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे?
उत्तर : (१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे हवेचे तापमान कमी होते. (२) महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे. त्यामुळे ठेश्वरचे हवामान थंड आहे.
(२) समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते, कारण काय?
उत्तर : (१) समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळत जाते. (२) हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल; तर त्यामुळे हवेतील आर्द्रता (ओलसरपणा) वाढते. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते.
(३) हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे?
उत्तर : हवा व हवामान यांमध्ये पुढीलप्रमाणे फरक आहे : (१) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय. याउलट एखादया ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय. (२) हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात. याउलट हवामानात दीर्घकाळाने बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाहीत.
•(४) समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो?
उत्तर : (अ) समुद्रसान्निध्याचा हवामानावर होणारा परिणाम (१) समुद्रसान्निध्य असणार्या भागात समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळते. म्हणजेच या भागातील हवेत बाष्पाचे (आर्द्रतचे) प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवामान दमट असते. (२) याउलट समुद्रसान्निध्य नसणाऱ्या भागातील हवेत बाष्पाचे (आर्द्रेचे) प्रमाण कमी असते. त्यामुळे हवामान कोरडे असते.
(ब) समुद्रसपाटीपासूनच्या उंची यांचा हवामानावर होणारा परिणाम : (१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे तापमान कमी होत जाते. म्हणजेच हवामान थंड असते. (२) याउलट समुद्रसपाटीला असणाऱ्या भागात भूपृष्ठाजवळची हवा अधिक तापलेली असते. म्हणजेच हवामान उष्ण असते.
(५) वायुदाबाविषयी माहिती लिहा.
उत्तर : (१) हवेला वजन असते. हवेच्या दाबाला 'वायुदाब म्हणतात. (२) वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. त्यामुळे हवेची घनता वाढते. (३) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो हवेचा हा ऊर्ध्व वायुदाब होय. (४) तापमानातील फरकामुळेही वायुदाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.
(६) हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
उत्तर : हवामानावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत: (१) अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह इत्यादी घटक हवामानावर परिणाम करतात. उदा., मुंबई हे शहर समुद्राच्या जवळ असल्याने मुंबईचे हवामान उष्ण व दमट आहे. (२) याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचाही त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. उदा., मसुरी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशात असल्याने तेथील हवामान थंड आहे.
सहावी भूगोल
ऑगस्ट १२, २०२०
इयत्ता सहावी, भूगोल,३.पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) 'द्विमितीय वस्तू' म्हणजे काय?
उत्तर : लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'द्विमितीय वस्तू' होय,
(२) 'त्रिमितीय वस्तू' म्हणजे काय?
उत्तर : लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'त्रिमितीय वस्तू' होय.
(३) पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल
उत्तर : पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल.
(४) तुमचे गाव / शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल?
उत्तर : आमचे गाव / शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल.
(५) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते?
उत्तर : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय.
महत्त्वाचे मुद्दे:-
१. द्विमितीय वस्तू : (१) लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'द्विमितीय वस्तू' होय. (२) लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते
.
२. त्रिमितीय वस्तू (१) लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'त्रिमितीय वस्तू' होय, (२) लांबी, रुंदी व उंची मिळून त्रिमितीय वस्तूचे घनफळ तयार होते.
३. नकाशे (१) नकाशे हे द्विमितीय असतात, (२) नकाशांच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो.
४. पृथ्वीगोल : (१) पृथ्वीगोल हा त्रिमिती असतो. (२) पृथ्वीगोल म्हणजे पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती होय,
५. भौगोलिक सहल (क्षेत्रभेट): (१) भौगोलिक सहल (क्षेत्रभेट) ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. (३) क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता.
६. 'अर्था' : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये 'मेन' राज्यात 'यारमथ्' येथे 'अर्था' हा जगातील एक सर्वांत मोठा पृथ्वीगोल ठेवलेला आहे. (२) या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.
2-पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
(१) द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात. याउलट त्रिमित साधनांना लांबी, रुंदी व उंची या तीन मिती असतात.
(२) द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते. याउलट त्रिमित साधनांचे लांबी, रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते.
(२) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर : (१) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील. देश, बेटे, आखात, उपसागर, सागर व महासागर दाखवता येतील. (२) पृथ्वीवरील विविध
(३) क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा.
उत्तर : (१) भौगोलिक सहल म्हणजेच 'क्षेत्रभेट' ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेट पद्धतीत ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, उदा., डोंगर, समुद्रकिनारा, लघुठयोग केंद्र इत्यादी त्या क्षेत्राला प्रत्यक्षपणे भेट दिली जाते. (३) क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून बेता येते, (४) क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.
(४) 'अर्था'विषयी माहिती लिहा.
उत्तर : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये 'मेन' राज्यात 'यारमथ्' येथे 'अर्था' हा जगातील सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल ठेवण्यात आला आहे. (२) 'अर्था' ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. (३) 'अर्था' या पृथ्वीगोलाच्या परिवलनाचा व परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.
प्रश्न 3. नावे लिहा: (नोंद : उत्तरे थेट दिलेली आहेत.)
(१) द्विमितीय वस्तू : कागद, फळा, जमीन, नकाशा इत्यादी.
(२) त्रिमितीय वस्तू : डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र, पृथ्वी, पृथ्वीगोल इत्यादी.
(३) भूगोलाच्या अभ्यासाची साधने : नकाशा, पृथ्वीगोल इत्यादी.
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
सहावी भूगोल
ऑगस्ट ०५, २०२०
इयत्ता सहावी, भूगोल,१.पृथ्वी आणि वृत्ते
१.पृथ्वी आणि वृत्ते
प्रश्न 1- पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) 'पृथ्वीगोल' म्हणजे काय?
उत्तर : पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती, म्हणजे 'पृथ्वीगोल' होय.
(२) 'अक्षवृत्ते ' म्हणजे काय?
उत्तर : पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या साहाय्याने तयार झालेली व पूर्व-पश्चिम दिशेत असलेली काल्पनिक वर्तुळे, म्हणजे 'अक्षवृत्ते' होत.
(३) कोणत्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात?
उत्तर : विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात.
(४) विषुववृत्त या शब्दाचा अर्थ सांगा. (जरा डोके चालवा : पाठ्यपुस्तक पान क्र. उत्तर : ०° चे व सर्वांत मोठे अक्षवृत्त, म्हणजे 'विषुववृत्त ' होय.
(५) बिंदुस्वरूप अक्षवृत्ते कोणती?
उत्तर : उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही बिंदुस्वरूप अक्षवृत्ते होत.
(६) 'रेखावृत्ते' म्हणजे काय?
उत्तर : पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या सहाय्याने तयार झालेली व दक्षिण-उत्तर दिशेत असलेली काल्पनिक अर्धवर्तुळे, म्हणजे 'रेखावृत्ते' होत.
(७) वृत्तजाळीचे उपयोग लिहा.
उत्तर : पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो.
(८) उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?
उत्तर : उत्तर ध्रुवाचे अक्षांश ८०° उ. अक्षवृत्त याप्रमाणे सांगता येईल. रेखांश ० (अव्याख्येय) रेखावृत्त याप्रमाणे सांगू.
(९) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?
उत्तर : कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७° इतके असते.
(१०) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे, त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
उत्तर : ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे, अशा काही देशांची नावे : कोलंबिया, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, सोमालिया इत्यादी.