Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सहावी, भूगोल,४.हवा व हवामान

              हवा व हवामान


प्रश्न 1. पुढील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा : 
(१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते.
 उत्तर: योग्य.

 (२) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते. 
उत्तर : अयोग्य. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता जास्त असते. 

(३) जमिनीच्या प्रकाराचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो. 
उत्तर : योग्य, 

(४) एखादया ठिकाणाच्या हवामानात सतत बदल होत असतो. 
उत्तर : अयोग्य. एखाद्या ठिकाणाच्या हवामानात सहसा बदल होत नाही.

 (५) सजीवांचा आहार व निवारा या बाबींवर हवामानाचा परिणाम होत असतो. 
उत्तर : योग्य.

प्रश्न ३. मी कोण? (नोंद : उत्तरे थेट दिलेली आहेत.) (१) मी नेहमी बदलत असते-हवा
 (२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते-हवामान
(३) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते.-हिम
 (४) मी वातावरणात बाष्परूपात असते- आर्द्रता.


प्रश्न 3. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। (१) 'हवा' म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय
 (२) 'हवामान' म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय.
(३) 'वारा' म्हणजे काय?
उत्तर : जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे क्षितिज समांतर दिशेत वाहणारी हवा, म्हणजे 'वारा' होय
 (४) 'वृष्टी' म्हणजे काय?
उत्तर : हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत रूपांतरण होणे व ते पुन्हा पृथ्वीवर (जमिनीवर) येणे, म्हणजे 'वृष्टी' होय. •
(५) हवेची अंगे कोणती?
उत्तर : तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे होत.
(६) वृष्टीची रूपे कोणती?
उत्तर : पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे होत.
 (७) हवेच्या अंगांचा कशावर परिणाम होत असतो ? उत्तर : हवेच्या अंगांचा दैनंदिन व्यवहारांवर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो.
(८) बहुतांश सजीवसृष्टी कोणत्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशात दिसून येते?
उत्तर : बहुतांश सजीव सृष्टी पोषक हवामानाच्या प्रदेशात दिसून येते.

प्रश्न ४. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
 (१) महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे?
 उत्तर : (१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे हवेचे तापमान कमी होते. (२) महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे. त्यामुळे ठेश्वरचे हवामान थंड आहे.

 (२) समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते, कारण काय?
उत्तर : (१) समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळत जाते. (२) हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल; तर त्यामुळे हवेतील आर्द्रता (ओलसरपणा) वाढते. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते.

 (३) हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे?
 उत्तर : हवा व हवामान यांमध्ये पुढीलप्रमाणे फरक आहे : (१) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय. याउलट एखादया ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय. (२) हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात. याउलट हवामानात दीर्घकाळाने बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाहीत.


•(४) समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो?
 उत्तर : (अ) समुद्रसान्निध्याचा हवामानावर होणारा परिणाम (१) समुद्रसान्निध्य असणार्या भागात समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळते. म्हणजेच या भागातील हवेत बाष्पाचे (आर्द्रतचे) प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवामान दमट असते. (२) याउलट समुद्रसान्निध्य नसणाऱ्या भागातील हवेत बाष्पाचे (आर्द्रेचे) प्रमाण कमी असते. त्यामुळे हवामान कोरडे असते.

 (ब) समुद्रसपाटीपासूनच्या उंची यांचा हवामानावर होणारा परिणाम : (१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे तापमान कमी होत जाते. म्हणजेच हवामान थंड असते. (२) याउलट समुद्रसपाटीला असणाऱ्या भागात भूपृष्ठाजवळची हवा अधिक तापलेली असते. म्हणजेच हवामान उष्ण असते.

 (५) वायुदाबाविषयी माहिती लिहा.
उत्तर : (१) हवेला वजन असते. हवेच्या दाबाला 'वायुदाब म्हणतात. (२) वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. त्यामुळे हवेची घनता वाढते. (३) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो हवेचा हा ऊर्ध्व वायुदाब होय. (४) तापमानातील फरकामुळेही वायुदाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.

 (६) हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
उत्तर : हवामानावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत: (१) अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह इत्यादी घटक हवामानावर परिणाम करतात. उदा., मुंबई हे शहर समुद्राच्या जवळ असल्याने मुंबईचे हवामान उष्ण व दमट आहे. (२) याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचाही त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. उदा., मसुरी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशात असल्याने तेथील हवामान थंड आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा