Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सहावी, भूगोल,३.पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : 
(१) 'द्विमितीय वस्तू' म्हणजे काय? 
उत्तर : लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'द्विमितीय वस्तू' होय,
 (२) 'त्रिमितीय वस्तू' म्हणजे काय?
 उत्तर : लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'त्रिमितीय वस्तू' होय. 
 (३) पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल 
उत्तर : पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल. 
 (४) तुमचे गाव / शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? 
उत्तर : आमचे गाव / शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल. 
 (५) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते?
 उत्तर : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय. महत्त्वाचे मुद्दे:-
१. द्विमितीय वस्तू : (१) लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'द्विमितीय वस्तू' होय. (२) लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते
.
२. त्रिमितीय वस्तू (१) लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'त्रिमितीय वस्तू' होय, (२) लांबी, रुंदी व उंची मिळून त्रिमितीय वस्तूचे घनफळ तयार होते.

३. नकाशे (१) नकाशे हे द्विमितीय असतात, (२) नकाशांच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो.

४. पृथ्वीगोल : (१) पृथ्वीगोल हा त्रिमिती असतो. (२) पृथ्वीगोल म्हणजे पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती होय,

५. भौगोलिक सहल (क्षेत्रभेट): (१) भौगोलिक सहल (क्षेत्रभेट) ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. (३) क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता.

६. 'अर्था' : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये 'मेन' राज्यात 'यारमथ्' येथे 'अर्था' हा जगातील एक सर्वांत मोठा पृथ्वीगोल ठेवलेला आहे. (२) या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.

2-पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
(१) द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात. याउलट त्रिमित साधनांना लांबी, रुंदी व उंची या तीन मिती असतात.
(२) द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते. याउलट त्रिमित साधनांचे लांबी, रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते.

(२) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर : (१) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील. देश, बेटे, आखात, उपसागर, सागर व महासागर दाखवता येतील. (२) पृथ्वीवरील विविध

(३) क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा.
 उत्तर : (१) भौगोलिक सहल म्हणजेच 'क्षेत्रभेट' ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेट पद्धतीत ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, उदा., डोंगर, समुद्रकिनारा, लघुठयोग केंद्र इत्यादी त्या क्षेत्राला प्रत्यक्षपणे भेट दिली जाते. (३) क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून बेता येते, (४) क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.

(४) 'अर्था'विषयी माहिती लिहा.
 उत्तर : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये 'मेन' राज्यात 'यारमथ्' येथे 'अर्था' हा जगातील सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल ठेवण्यात आला आहे. (२) 'अर्था' ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. (३) 'अर्था' या पृथ्वीगोलाच्या परिवलनाचा व परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.

 प्रश्न 3. नावे लिहा: (नोंद : उत्तरे थेट दिलेली आहेत.)
 (१) द्विमितीय वस्तू : कागद, फळा, जमीन, नकाशा इत्यादी.
(२) त्रिमितीय वस्तू : डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र, पृथ्वी, पृथ्वीगोल इत्यादी.
 (३) भूगोलाच्या अभ्यासाची साधने : नकाशा, पृथ्वीगोल इत्यादी.

३ टिप्पण्या: