सर्व टेन्शन संपून जाईल फक्त एकदा वाचा
ना कोणापेक्षा मोठं होण्याची आशा धरा ना स्वतःला कमी समजण्याची चूक करा इथे तर सर्वजण शिकण्यासाठी आले आहेत सर्वांच्याच हातून चुका होतात समोरचा चुकतो तसेच आपण देखील चुकतो फक्त चुका वेगवेगळ्या असतात हा विचार करूनच कधीही कोणाची निंदा करूनका यामुळे तुमचं मन कधीही तिरस्काराने भरणार नाही.
आपली आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी आपली मानसिक अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे पैसा तर वस्तू घेऊन जातो पण हे मानसिक समाधान भूक झोप आनंद यासारख्या अमूल्य गोष्टी देत असते
तुम्ही ना स्वतःला मिठी मारू शकता ना स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकता म्हणून एकमेकांसाठी जगणे म्हणजेच आयुष्य आहे म्हणून वेळ द्या त्यांना जे तुमच्यासाठी वेळ काढतात.
संपत्ती आणि सौंदर्याच्या नादी लागून तुमचा प्रामाणिकपणा कमी होऊ देऊ नका कारण संपत्ती तर इथेच राहणार आहे आणि सौंदर्य माती आड जाणार आहे पण तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या मरणा नंतर सुद्धा तुमची साथ सोडणार नाही.
ज्या घरातील कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम मोठ्या लोकांचा आदर होतो त्या घरामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो प्रेम वाटलं तेव्हा रामायण घडलं आणि संपत्ती वाटली त्यावेळेला महाभारत घडलं.
माणसाचा विनाश त्या वेळेला सुरू होतो ज्या वेळेला आपल्याच माणसाला मागे ओढण्यासाठी दुसऱ्या माणसाचा सल्ला घ्यायला सुरू करतो
जे घडत आहे त्याचा जास्त विचार करायचा नाही जे आपल्याला मिळाला आहे ते गमवायचं नाही यशस्वी तर तेच लोक होतात जे वाईट वेळ आणि संकटांवर रडत नाहीत.
जेव्हा आपण हातावरील रेषांवर आपले भविष्य शोधू त्यावेळेला समजून जा आपल्या मधील ताकद आपल्या मनामधील विश्वास संपून गेला आहे
ज्याने आपल्याच लोकांना बदलताना पाहिला आहे तो माणूस कितीही कठीण कोणत्याही परिस्थिती ला तोंड देऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा