Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

इयत्ता दूसरी, विषय-मराठी,७ वडेश बहरला

                वडेश बहरला



वर्गकार्य
१. कोण ते लिहा :
*(१) लपाछपी खेळणारी -पिल्ले
*(२) पाखरांची भाषा समजणारा-वडेश
 (३) शीळ घालून वडेशला हाका मारणारी-पाखरे
 (४) शेवटी बहरून आलेला-वडेश

२. का ते सांगा व लिहा
१) वडेश वैतागून जायचा कारण पिल्लांच्या दंग्याने दुपारी वडेशची झोप मोडायची
(२) पाखरे दूर निघून गेली कारण पाखराना वडेशचा राग आला
(३) पाखरे वडेशजवळ परत आली कारण लाल लाल फळे खाण्यासाठी वडेशने त्यांना मार्यने बोलावले

वडेश बहरला या पाठावरील चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

३. वाचा व क्रमाने सांगा
 (१) पाखरांची पिल्ले दंगा करायची (२) पाखरे दूर निघून गेली.
(३) पाखरांना वडेशचा राग आला (४) वडेश पिल्लावर रागवायचा
 उत्तर : योग्य क्रम
(१) पाखरांची पिल्ले दंगा करायची (२) वडेश पिल्लावर रागवायचा
 (३) पाखरांना वडेशचा राग आला (४) पाखरे दूर निघून गेली

 ४. झाडावरच्या पाखरांची नावे सांगा.
उत्तर चिमणी कावळा मैना, पोपट,खारूताई

 ५. पुढील चौकटी पूर्ण करा :
 (१) चिमणीच्या पिल्लाचे नाव-चिनू
(२) कावळिणीच्या पिल्लाचे नाव-कानू
 (३) पोपटाच्या पिल्लाचे नाव-पिनू
 (४) गावाचे नाव- चिंचपूर

६. रंगांची नावे चौकटीत लिहा :
 (१) पाने-हिरवी
 (३) ठिपके -हिरवे
(२) अंकुर -तांबूस व पोपटी
(४) फळे- लाल

७. भूर भूर' यासारखे पाठातील शब्द शोधून लिहा. 
उत्तर : (१) उंच उंच
(२) दूर दूर
(३) कटकट
(४) हळूहळू
(५) सळसळ
(६) फडफड
(७) हिरवे हिरवे
(८) लाल लाल
(९) येतो येतो
(१०) खूप खूप

८. पाठातील प्रश्नचिन्ह (?) असलेले वाक्य शोधून लिहा.
उत्तर : आता काय करावे?

९. जसे - पाखरांची , किलबिल तसे - (१) पानांची- सळसळ
 (२) पाण्याची- झुळझुळ

१०. जसे - पाखरांचे-घरटे तसे
(१) कोंबड्यांचे-खुराडे २)पोपटाची-ढोली
(३) गाईचा-गोठा
(४)मुंग्यांचे-वारुळ

*११. कविता पूर्ण करा :
कावळा करतो, काव काव
चिमणी करते, चिव चिव
कोंबडा बोलतो, कॉक कॉक
कोकीळ बोले, कुहू कुहू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा