Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

16 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 16 जून दैनंदिन शालेय परिपाठ→ प्रार्थना

 ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.... 

 

→ श्लोक

 (दोहे) पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत । 'रविदास' दास प्राधीन सों, कौन करे है प्रीत रविदास दर्शन "पारतंत्र्य हे फार मोठे आहे. एक मोठा अभिशाप आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जी व्यक्ती पराधिन, कोणाची तरी गुलाम आहे. त्याच्याबरोबर कोणी प्रेम करीत नाही. त्याचा सर्वजण तिरस्कार-अपमान करतात आणि त्याला ठोकरतात." म्हणून गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा. 

 


→ चिंतन एखायावर केलेले प्रेम हे त्याच्यासाठी केलेल्या त्यागातून दिसत असते - म. गांधी दुसऱ्याकडून काहीतरी लाभ होईल म्हणून केलेले प्रेम हे स्वार्थी असते. मतलब संपला की, ते आपोआप संपून जाते. परंतु खरं प्रेम हे असं दिखाऊ नसतं तर टिकाऊ असतं. खरं प्रेम करणारा माणूस वेळप्रसंगी त्याग करायलाही मागेपुढे पाहत नाही. आपल्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तिचा जीव हा मोलाचा वाटल्यामुळे प्राणाचेही मोल देणारी माणसे या जगात आहेत. शिवरायांसाठी बाजीप्रभूने प्राण अर्पण केले. तर भारतभूमीसाठी अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले ते यामुळेच.→ कथाकथन

 - 'अद्भुत गुरुदक्षिणा': एकलव्य गुरु द्रोणाचार्यांकडे येऊन म्हणाला, 'गुरुदेव! मला धनुर्विद्या शिकविण्याची कृपा करावी' गुरुद्रोणाचार्यांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहीले. कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन दिले होते की, मी केवळ राजकुमारांनाच शस्त्रविद्येचे शिक्षण देईन. एकलव्य तर राजकुमार नाही. मग त्याला धनुर्विया कशी काय शिकवू? म्हणून द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, मी तुला धनुर्विद्या शिकवू शकणार नाही.' एकलव्य धरुन निश्चय करुन निघाला होता की, मी फक्त गुरु द्रोणाचार्याकडे शस्त्रविद्या शिकेन. एकलव्य एकांत अरण्यात गेला आणि तेथे त्याने गुरु द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनविली. मूर्तीकडे एकटक पाहत व ध्यान करीत, तिच्याकडून प्रेरणा घेऊन तो धनुर्विद्या शिकू लागला. एकटक पाहण्याने एकाग्रता येते. या जोरावर एकलव्य धनुर्विद्येत तरबेज झाला. एकदा द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव धनुर्विद्येची चाचणी घेण्यासाठी जंगलात आले. त्यांच्या बरोबर एक कुत्रा होता. एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा भुंकला. एकलव्याने कुत्र्याला कोणतीही दुखापत होणार नाही आणि त्याचे भुंकणे बंद होईल अशा पध्दतीने सात बाण तोंडात सोडले. कुत्रा परत गेला. तिथे द्रोणाचार्याबरोबर पांडव आणि कौरव होते. कुत्र्याला पाहून अर्जुनाला वाटले की कुत्र्याला दुखापत न होता तोंडात बाण घुसवले कसे? ही विद्या तर मी देखील जाणत नाही. हे कसे शक्य झाले? तो द्रोणाचार्यांना म्हणाला, ' गुरुदेव, आपण तर म्हणाला होतात की माझ्या बरोबरीचा दुसरा कोणताही धनुर्धर होणार नाही. परंतु ही विद्या तर मला देखील येत नाही' द्रोणाचार्यांनी पुढे जाऊन पाहिले तर तो होता, हिरण्यधनुचा मुलगा एकलव्य! द्रोणाचार्यांनी| विचारले 'मुला ही विद्या तू कोठून शिकलास?" एकलव्य म्हणाला, 'गुरुदेव, आपल्याच कृपेने शिकलो आहे.' गुरु पुढे धर्मसंकट उभे राहिले. एकलव्याची | अलोट श्रध्दा पाहून द्रोणाचार्य म्हणाले, 'माझी मूर्ती डोळ्यासमोर ठेवून तू धनुर्विद्या शिकलास हे खरे पण गुरुदक्षिणेचे काय?' एकलव्य म्हणाला, 'आपण मागाल ती दक्षिणा द्यायला तयार आहे' द्रोणाचार्य म्हणाले, 'तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे!" एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. 

 


→ सुविचार

 आजच्या गुरुद्रोणाचार्यानी एकलव्याला गुरुदक्षिणेत अंगठा मागू नये. अंगठा दिल्यामुळे एकलव्य मात्र धनुर्विद्येचा वापर करु शकता नाही, निष्काम ठरला. • ज्ञान, उपासना, (श्रब्दा) हा एक केवळ वौद्धिक व्यापार नसून ती एक मानवी जीवन उजळून टाकणारी दुर्दम्य प्रेरणा तद्वतच ज्ञानसाधना आणि एक अखंड शोध आहे. • मानव जन्मात सर्वात मोठे महत्त्व, परमोच्च ज्ञान प्राप्तीस द्यावे, याकरिता सदाचरणी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व तपोवृध्द व्यक्तीस 'गुरु' करावे, जीवन सफल सार्थ बनवावे.


दिनविशेष -

 • ३. चित्तरंजन दास स्मृतिदिन - १९२५ : बॅ. चितरंजन दास हे बंगालमधील सुप्रसिध्द वकील, कवी, समाजसेवक, राष्ट्रीय पुढारी आणि प्रसिध्द असे वृत्तपत्रकार होते. इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी मिळवून भारतात परत आल्यावर त्यांनी हायकोर्टात काम सुरु केले. 'वंदे मातरम्' वरील प्रसिद्ध खात्यांनीच चालविता. त्यामुळे त्यांच्या वकिलीची प्रसिध्दी भारतभर पसरली आणि त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून मान्यता मिळाली. १९१५ मध्ये बंगाली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. स्वतःची सर्व संपत्ती त्यांनी मेडिकल कॉलेज व स्त्रियांच्या हॉस्पिटलसाठी दिली. म्हणून लोक त्यांना म्हणून ओला केवळ मरेपर्यंत नव्हे तर मृत्युनंतरही त्यांचे नाव सामाजिक कार्याशी जोडलेले राहिले. कलकत्ता येथील त्यांच्या वाड्याचे हॉस्पिटमध्ये रुपांतर व्हावे, अशी इच्छा त्यांनी म. गांधींजवळ व्यक्त केली होती. म. गांधीजींनी त्यांच्या या इच्छेला मूर्त स्वरुप देण्यासाठी १० लक्ष रुपये जमविले व त्यांच्या हॉस्पिटलच्या रुपाने एक अमर स्मारक उभारून बॅरिस्टर चित्तरंजन दास यांचे नाव अमर केले. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन शहर 

 

→ मूल्ये

 स्वाधीनता, निर्भयता, राष्ट्रप्रेम 


→ अन्य घटना

 • पुणे येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ भव्य पुतळ्याचे ब्रिटीश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते अनावरण १९२८ संपूर्ण जडणघडण भारतात झालेला हा पहिलाच भव्य १४ फुटी पुतळा. भारतातील नावाजलेल्या पुतळ्यांमध्ये याची गणना होते. 

 • व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा या रशियन महिलेने वोस्तोक ६ या यानातून अंतराळप्रवास करून जगातील पहिली अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळविला. - १९६३

 

 → उपक्रम स्फूर्तिदायक देशभक्तीगीतांचा संग्रह करा व पाठ करा. तुम्हाला आवडणान्या नेत्यांच्या चित्रांची चिकटवही तयार करा - 

 

→ समूहगान आओ बच्चो तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की....... 


→ सामान्यज्ञान 

• घोडा माणसाळल्याला किमान सहा हजार वर्षे झाली असावीत. इतिहासात, पुराणात घोड्याचे अनेक उल्लेख येतात. घोडदळ हे राज्याचे महत्त्वाचे अंग मानले जात असे. घोडा ताशी ६०/६५ कि.मी. वेगाने धावू शकतो. घोडा ३५ ते ४० वर्षे जगतो. आयुष्यभरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा