Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

10 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 10 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 तू ही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा.....

 

 → श्लोक 

 पठति लिखति पश्यति, परिपृच्छति पठितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरवैः नलिनीदलमिव विकाश्यते बुध्दिः ॥

  जो वाचन करतो, लिहितो, पाहतो (निरीक्षण करतो) प्रश्न विचारतो, विद्वानाच्या सहवासात राहतो. त्याची बुध्दी, सूर्याच्या किरणांनी कमळ फुलावे त्याप्रमाणे विकसित होते. 

  

→ चिंतन 

जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा । - संत तुकाराम नुसती भगवी वस्त्रे घालून, अंगावर राख फासून स्वतःला साधू म्हणवून घेणाऱ्या वैराग्याला आपण मान देतो, त्याची पूजा करतो, नमस्कार करतो.पण तुकारामांच्या मते खरा साधू कोणता तर जो दुःखी, कष्टी लोकांचे दुःख जाणतो आणि आपले पणाने तो दूर करायचा प्रयत्न करतो. हा माझा, तो परका असा भेद न करता तो सर्वांची दुःखे दूर करून सर्वांचे अश्रू पुसतो. संत एकनाथ, संत तुकाराम, गाडगेबाबा, बाबा आमटे, मदर तेरेसा हे नव्या युगातील खरे साधू होत.


कथाकथन 

- 'दानात दान नेत्रदान' : केळकर कुटुंब अतिशय आनंदी अन् मनमिळावू. मुलगा दीपक आणि मुलगी मेधा असा छोटासा परिवार. त्यांच्या घरात सान्यांचाच स्वभाव चांगला होता. दुसऱ्यांना ते सतत मदत करीत. कुणी आजारी असेल तर केळकर कुटुंब त्यांच्या मदतीला हजर. कुणाच्या घरी सण- समारंभ असेल तेथेही ते मदतीला. त्यात त्यांच्या शेजारी जे गोखले आजोबा-आजी राहत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत केळकर कुटुंबाची त्यांना मदत होई. दीपक आता सातवीला होता आणि मेघा पाचवीला. दोघांच्याही गोड स्वभावामुळे त्यांना मित्रमंडळी भरपूर मिळाली होती. संध्याकाळ झाली की गल्लीतली सारी मित्रमंडळी मोकळ्या मैदानात खेळत. अगदी मनसोक्त आनंद लुटत खेळायची. केळकरांच्या घरात एकच गोष्ट कमी होती. ती म्हणजे दीपकचा एक डोळा जन्मापासून निकामी होता. त्यामुळे एका डोळ्यावरच त्याचे काम चाले. तरीही दीपक अभ्यासात, खेळात हुशार होता. एकदा संध्याकाळी सारी मुले मैदानात जमली आणि शिवाशिवीचा खेळ सुरु झाला. एकदम खेळता-खेळता काय झाले कोणास ठाऊक? दीपक पळत होता. पळता पळता त्याचा पाय घसरला आणि तो सपशेल आपटला. तिथेच बाभळीचा एक काटा होता. तो दीपकच्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्यातून भळभळा रक्त वाहू लागले. एक डोळा आधीच निकामी, त्यात दुसराही काट्यामुळे फुटला आणि दीपक अधिक बनला. त्याला काहीच दिसेना. मुलांनी त्याला धरून घरी आणले. दीपकला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेले आणि डॉक्टरांनी डोळा तपासून सांगितले, " दीपक आंधळा झालाय. आता त्याला दिसू शकणार नाही." झाले, त्या दिवसा पासून केळकरांच्या घरातले हसू संपले. दुःखाची छाया पसरली गल्लीतल्या साऱ्यांनाच वाईट वाटत होते; पण कोण काय करू शकणार होते. दिवस जात होते. दीपक घरी एका कोपऱ्यात बसून राही. सारी कामे आई करी. त्याला हाताला धरून नेई. वर्षे लोटली आणि शेजाऱ्यांच्या गोखले आजी आजारी पडल्या. अगदी शेवटचेच आजारपण. त्या आता काही दिवसांच्याच सोबती होत्या. डॉक्टर घरी येत. तपासत. पण फरक पडत नव्हता. उलट आजार जास्तच वाढत चालला होता. गोखले आजींनाही कळले की, आता आपण संपणार आहोत. पण, संपण्यापूर्वी एक सत्कर्म करायचे त्यांनी ठरविले, त्यांनी डॉक्टरांना गोखले आजोबांना जवळ बोलवले. एव्हाना केळकर कुटुंबही त्यांच्या जवळ आले होते. आजी अडखळत सांगू लागल्या, “ हे बघा, मी आता जाणार, पण माझ्यासाठी रडत बसू नका. मी गेल्याबरोबर माझे डोळे दीपकला द्या." असे म्हणून त्यांनी दीपकच्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला. साऱ्यांकडे डोळे भरून पाहिले आणि प्राण सोडला. डॉक्टरांनी लगेच आजींना व दीपकला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचे डोळे दीपकला बसवले. आजींच्या नेत्रदानामुळे दीपक डोळस बनला आणि आजींची शेवटची इच्छा पूर्ण झाली.


→ सुविचार

 • 'रक्तदान श्रेष्ठ दान, नेत्रदान कार्य महान, देहदान जीवन दान' ● 'शिक्षण हाच अंधाचा डोळा, यामुळे मिळणारा आत्मविश्वास हीच त्याची दृष्टी'. ● 'दुसऱ्याला मदत करणे, त्याच्या दुःखावर फुंकर घालणे म्हणजे खरी माणुसकी' 

  

→ दिनविशेष

 जागतिक दृष्टीदान दिवस : डॉ.के. भालचंद्र यांचा जन्मदिन १० जून १९२४. डॉ. के. भालचंद्र हे एक महान शल्यचिकित्सक. त्यांनी अंधांच्या दुःख निवारणासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. शक्य तितक्या अंधांना दृष्टीदान करणे हेच त्यांनी आपले जीवनध्येय मानले. त्यांनी आपल्या हयातीत ८०,००० व्यक्तींचे अंधत्व दूर केले म्हणून त्यांचा जन्मदिवस १० जून हा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करतात.

 


 → मूल्ये 

 • कर्तव्यदक्षता, बंधुता, भुतदया. 

 

→ अन्य घटना

 • ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांमध्ये पहिली होड्या वल्हविण्याची स्पर्धा सुरू झाली. - १८२९ 

 • भारताचे लष्करप्रमुख जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म १९०९ प्रसिध्द उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म १९३८ "मिग' या जातीच्या विमानाची नाशिक येथे निर्मिती - १९६६ 

 • कथा लेखिका कमलाबाई टिळक यांचे निधन - १९८९

 

 → उपक्रम

 • ब्रेल लिपीची माहिती मिळवा. नेत्रदानाची माहिती करून घ्या. 

 

→ समूहगान

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....


. → सामान्यज्ञान

 • १९९१ मध्ये भारताची लोकसंख्या ८४ कोटी ६३ लक्ष इतकी होती. तर २००१ पर्यंत भारताची लोकसंख्या १०० कोटी पेक्षा • निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे न ओळखणे म्हणजे रंगांधत्व होय. यात कोणताही प्राथमिक रंग न ओळखता येण्यापासून एखादाच रंग ओळखणे या अवस्थांचा समावेश असतो. पूर्ण रंगांधत्वापेक्षा एखाद्या रंगापुरतेच रंगांधत्व अधिक आढळते. 'शिनोबू इशिहारा' या जपानी नेत्रवैद्याच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या 'इशिहारा चाचणी' परीक्षेत निरनिराळ्या रंगीत ठिपक्यांच्या पार्श्वभूमीवर आकडे दडविलेले असतात. रंगांधत्व असणाऱ्यांना ते आकडे ओळखता येत नाहीत. एक लाख डोळ्याची शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ. तात्यासाहेब लहाने, मुंबई यांचा नवा विक्रम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा