Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

7 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 7 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो..... 


→ श्लोक

 - सच्छील गृहिणी, सुवृत्त मुलगा, सुप्रीत ऐसा धनी । प्रेमी मित्र, मन व्यथेविण, रमे जो भृत्य ना वचनी बांघा गोंडस, वैभव स्थिर, मुखीं विद्येमुळें तेज तें । तोषे इष्टद तो भवान्तक हरी, तेव्हांच हैं लाभते ।। 

 - सद्वर्तनी पुत्र, सच्छील पत्नी, आपल्यावर संतुष्ट असा स्वामी, प्रेमळ मित्र, न फसविणारा नोकर, यत्किंचितही क्लेश नसलेले मन, सुंदर बांधा, स्थिर वैभव, विद्येने शोभणारे मुख, हे सर्व, भवसागरांतून मुक्त करणारा व इष्ट देणारा, श्रीहरी ज्यावर प्रसन्न होतो, त्याच धन्य पुरुषास प्राप्त होत असते. 

 

→ चिंतन 

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची गती अवलंबून असते. विज्ञान म्हणजे मानवाला मिळालेले एक वरदान होय. जो देश या वरदानाचा योग्य उपयोग करुन घेतो त्याची प्रगती होते. जेव्हा नवे - नवे शोध लागतात तेव्हा विज्ञानाची प्रगती होते आणि त्याच बरोबर देशाच्या प्रगतीची घोडदौड सुरु होते. नवीन नवीन यंत्रे, नवीन औषधे माणसाचे जीवन सुखमय करतात आणि त्यांच्या मदतीने अधिक काम करून अधिक उत्पादन निर्माण करतो. विज्ञानाच्या साहाय्याने देश सुखी होऊ शकतो. पुढे जाऊ शकतो.


→ कथाकथन 

- 'मैत्री' : मैत्रीत त्याग असतो. मैत्री आणि स्नेहसंबंध जोडण्याठी त्याग, प्रामाणिकपणा आणि परिपक्वतेची आवश्यकता असते. त्याग हा काही जाता जाता होत नसतो. तर तो जाणीवपूर्वक करावा लागतो. स्वार्थीपणा मुळे मैत्रीत बाधा येते. नुसत्या ओळखीपाळखी सहन होतात, परंतु खरी | मैत्री जुळायला वेळ लागतो आणि ती टिकवायला प्रयत्न करावे लागतात. मैत्रीला सत्वपरिक्षा द्यावी लागते आणि त्यातून जेव्हा ती टिकून राहते तेव्हा ती अधिक दृढ, घट्ट होते. आपण खोटी, दिखाऊ नाती ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या मित्राला त्रास व्हावा असं खऱ्या मित्राला कधीच वाटत नाही. खरी | ही मैत्री घेण्यापेक्षा अधिक देते आणि प्रतिकूल परिस्थितीतही भक्कमपणे टिकून राहते. मैत्रीचे प्रकार..... १) सुखाची मैत्री - एकमेकांशी असलेले संबंध करमणुकीचे आणि मजेचे असतात तोपर्यंत ही मैत्री टिकते. म्हणजे सुखाचे सोबती. २) सोयीची मैत्री - जेव्हा लोक विशिष्ट फायद्यासाठी मैत्री करतात तेव्हा त्याला सोयीची किंवा सोयीस्कर मैत्री म्हणता येईल. दुसऱ्या व्यक्तीची उमयुक्तता संपते तेव्हा अशी मैत्री संपते. अशी मैत्री कायमची टिकणारी नसते. ३) खरी मैत्री - अशी मैत्री एकमेकांबद्दलचा आदर आणि कौतुक यावर आधारलेली असते. खरे मित्र मनापासून एकमेकांचं कल्याण चिंततात आणि त्याप्रमाणे वागतात. जीवनात आपण केलेल्या सत्कृत्यांची भरपाई म्हणजेच आपल्याला लाभलेले चांगले मित्र, असंही म्हणता येईल. अशी ही चांगुलपणची |देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी चालू राहते. खरी मैत्री चारित्र्य आणि बांधिलकीवर आधारलेली असते. श्रीमंतीमुळे मित्र मिळतात, प्रतिकूल परिस्थितीत, संकटात त्यांची पारख होते. नाहीतर ते केवळ सुखाचे सोबती ठरतात. 

→ सुविचार -

 • 'संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नका.

 ' • 'एकमेकांवरचा विश्वास आणि भरवसा हा मैत्रीचा पाया आहे.'



दिनविशेष 

• भारताचा दुसरा उपग्रह 'भास्कर -१' चे अंतरिक्षात उढाण - १९७९ : भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासात 'भास्कर' हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले नाव आहे. खगोलशास्त्राच्या इतिहासात आपला ठसा उमटविणारे दोन भास्कराचार्य होऊन गेले. त्यांची स्मृती म्हणून भारताच्या दुसऱ्या उपग्रहास 'भास्कर' हे नाव देण्यात आले आहे. भारताने ६ कोटी ४० लाख रु. खर्च करुन बनविलेला 'भास्कर' हा दुसरा उपग्रह रशियातील अंतरिक्ष स्थानकावरून ७ जून १९७९ रोजी सोडण्यात आला. भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' १९ एप्रिल १९७५ रोजी रशियातूनच सोडण्यात आला होता. श्रीहरीकोटा, अंबाद बंगलोर व रशियातील चिअर्सलेक या अंतराळ संशोधन केंद्राकडे हा उपग्रह माहिती प्रक्षेपित करील. या उपग्रहाचे वजन ४४४ किलो आहे. तो पृथ्वीच्या अक्षांशी ५०.७ अंशानी कलता आहे. ९५.२ मिनिटांनी तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पुरी करतो. त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे कमाल व किमान अंतर | अनुक्रमे ५५७ व ५१२ कि. मी. आहे. यात अत्याधुनिक दूरचित्रवाणी कॅमेरे व मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स बसविण्यात आले आहेत. यातील कॅमेऱ्यांना ३२५ कि. मी. चे क्षेत्र एकाच वेळी पाहण्याची क्षमता आहे. तसेच जमिनीवरील वेगवेगळे भूस्तर, पाण्याचे पट्टे, तापमानातील बदल, अरण्यांचे स्वरूप स्वतंत्रपणे दृष्टीपथात आणण्याची त्याची क्षमता आहे. 'भास्कर' मुळे होणारे संशोधन वननिर्माण, जलशास्त्र, भूशास्त्र, बर्फस्तर व त्यांचे वितळणे, महासागरांच्या पृष्ठांचा अभ्यास या दृष्टीने उपयुक्त ठरले आहे. सौरविद्युत थरांचा वापर करुन आवश्यक विद्युत पुरविण्याची यात सोय केलेली आहे. 


→ मूल्ये विज्ञाननिष्ठा, निर्भयता 


→ अन्य घटना

 • महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक व बुध्दिवादी पुरुष गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन - १८९५ 

 • तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा मृत्यू - १९५७

  • क्रांतिकारक आशुतोष काली यांचा मृत्यू - १९६५

   • मराठी वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. स. गं. मालशे यांचे निधन - १९९२ • सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश - भारतात पावसाळ्यास सुरुवात. 

   

→ उपक्रम

 • भारताने सोडलेल्या इतर उपग्रहांची माहिती मिळवा.

  • आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करा. 

  

→ समूहगान

 • धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं.... 

 

→ सामान्यज्ञान

 • भारतातील प्रमुख वेधशाळा - 

 • अलीपूर

  • अलीबाग 

  •गुलमर्ग 

  •पाटणा

  •आग्रा 

  •कुलाबा

  • उज्जैन

  •  जयपूर

  •   मद्रास

  •    पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा