Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

10 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

               10 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ


दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- तुही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा..... 


 → इलोक 

 - सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसम् । निर्मलं च विशुद्ध च मानसं देवमन्दिरम् ॥ चांगल्या आचरणाने सर्वांचे मन शुद्ध पवित्र होते. शुद्ध आणि पवित्र मन हे देवाचे मंदिर आहे. 

 

• चिंतन

• - पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक आहे. रत्ने बाहेरून चमक दाखवितात. तर पुस्तके आतून अंत:करण उज्वल करतात. पुस्तकांचे कितीही सुंदर असले व अंतरंगातील लेखन किंवा विचार मनाला स्पर्श करणारे नसले, मन हेलावून टाकणारे नसले तर, रत्नासारखे त्याचे मोल काहीच मानले जात नाही. पुस्तकांचे श्रेष्ठत्व त्यातील विचार किती मौल्यवान आहेत, यावरच अवलंबून असते.


कथाकथन 

- 'ढोंगी तपस्वी': एका जन्मात बोधिसत्व घोरपडीच्या कुळात जन्माला आला. तो एका गावाबाहेर एका बिळात राहात असे. तो रानातल्या फळांवर आपला निर्वाह करत असे. जवळच टेकडीवर एक तपस्वी राहात होता. त्याच्या दर्शनाला गावातील मंडळी नेहमी येत. त्याचा धर्मोपदेश ऐकत बसत. पण काही काळाने तो तपस्वी मरण पावला. त्याच्याजागी एक नवीन तपस्वी येऊन राहू लागला. गावातील माणसंही त्याच्या दर्शनाला येत. बोधिसत्त्वही त्याच्या दर्शनाला जात असे. काही काळानं उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे वारुळातून माशा बाहेर पडल्या. त्या खाण्यासाठी घोरपडी सगळीकडे हिंदू लागल्या. गावातल्या काही लोकांनी घोरपडी पकडून त्यांचे मांस खाऊन चांगली चैन केली. त्यांनी त्या तपस्वालाही घोरपडीचं मांस खायला दिलं. ते तपस्व्याला फारच आवडलं. त्यानं ते कशाचे आहे? अशी गावकल्यांकडे चौकशी केली. पण, काही दिवसांनी घोरपडीचं मांस मिळेनासं झालं. तपस्व्याला घोरपडीच्या मांसाची चटक लागली. त्याला चैन पडेना. त्यानं दर्शनासाठी येणाऱ्या बोधिसत्त्वाला मारून मांस खायचं ठरवलं. त्यानं मांस शिजविण्यासाठी भांड, मीठ, मसाला सगळं आणून ठेवलं व तो स्वतःच्या कफनीत मोठं दांडकं लपवून बोधिसत्त्वाची वाट पहात बसला. त्याला जास्त वेळ वाट पहावी लागली नाही. रोजच्या वेळेप्रमाणे बोधिसत्व त्याच्या दर्शनाला आला. पण, तपस्व्याचा गंभीर चेहरा पाहून त्याला संशय आला. थोडं पुढं जाताच त्याला घोरपडीच्या मांसाचा वास आला. मग पुढे न जाता तिथूनच त्यानं तपस्त्र्याला नमस्कार केला. तपस्व्यानं गोड आवाजात त्याला जवळ येण्याचा खूप आग्रह केला. पण, बोधिसत्व त्याचा आग्रह न मानता परत जाण्यासाठी वळला. ते पाहून तपस्व्यानं रागानं लपवलेलं दांडके बोधिसत्त्वाच्या दिशेने फेकलं. ते पाहून बोधिसत्वान तिथून पळ काढला. पण, त्याच्या शेपटीला ते दांडकं लागलंच. मग मात्र सत्व संतापला नि ओरडला, "ढोंगी माणसा, जटा आणि भगवी वस्त्र पाहून सामान्य लोक फसतात. नुसती भगवी वस्त्र परिधान केल्यानं अंत:करण शुद्ध होत नाही. हे दुष्ट माणसा मी मात्र फसणार नाही!" असं म्हणून बोधिसत्त्व दूर अरण्यात निघून गेला.


सुविचार- • 'माणसाने दुष्ट भावनेने भौतिक- अभौतिक वर्तन केले तर जशा गुरांच्या माने गोमाशा लागतात, तसेच दुःख त्याच्या पाठीशी लागत असते.'


 → दिनविशेष

 +  डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर स्मृतिदिन - १९३० त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला. ज्ञानकोशक समाज विचारप्रवर्तक महापंडित म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचित. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या व्यासंगाचा प्रत्यय शिक्षकांना आला होता, शिक्षक त्यांना 'ज्ञानकोश' (एन्साइक्लोपिडिआ) म्हणून संबोधीत. १९०६ साली ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. काल विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास आरंभला. थोड्याच कालावधीत त्यांनी बी.ए., एम.ए., पीएच. डी. या पदव्या प्राप्त केल्या. 'हिस्टरी ऑफ कास्टस् इन इंडिया' आणि 'हिंदुईइम,' 'इटस् फॅर्मिशन अँन्ड फ्युचर' या ग्रंथामुळे तर त्यांना परदेशात मोठी कती मिळाली. १९१२ मध्ये हिंदुस्थानात आल्यावर कलकत्ता विद्यापीठात काही काळ काम केले. राष्ट्रधर्म प्रचारक संघाच्या निमित्ताने त्यांनी प्रवास केला. १९९६ सालापासून त्यांनी ज्ञानकोश या कार्याला प्रारंभ केला. त्यांच्या ठायी असलेली बुद्धिमत्ता, शोधक वृत्ती, स्वतंत्र प्रज्ञा, उद्योगप्रियता, चिकाटी इत्यादी गुणांचा त्यांना या कामी उपयोग झाला. 'विश्वसेवक' या नावाचे एक मासिक त्यांनी सुरू केले. 'परागंदा', 'गोंडवनातील प्रियंवदा', 'आशावादी' या कादंबऱ्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. 'गावसासू', 'ब्राह्मणकन्या', 'विचक्षणा' या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मराठी कादंबरीचे क्षेत्र त्यांनी विस्तृत केले. त्याला जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले. 'प्राचीन महाराष्ट्र' नामक त्यांच्या संकल्पित ग्रंथाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. १० एप्रिल १९३७ रोजी त्यांचे देशावसान झाले. ज्ञानकोशकार केतकर म्हणून ते आज व पुढेही प्रसिद्ध राहतील.


मूल्ये 

-• परिश्रमशीलता, ज्ञाननिष्ठा 


 अन्य घटना

 • संत गोरा कुंभारांनी समाधी घेतली १३१७. होमिओपॅथीचे जनक समजले जाणारे डॉ. हॉर्निमन यांचा जन्म १७५५. 

 • जगप्रसिद्ध रिटनिक बोटीचा पहिला प्रवास सुरू झाला १९१२. भारताचा पहिला उपग्रह इन्सेंट वन याचे अंतराळात उड्डाण १९८२. - 

 • डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीदिन १९६५. महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली १८७५. 


उपक्रम 

ज्ञानकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश यांची माहिती देऊन त्यांचे दर्शन घडविणे • शब्दकोश वापरण्याची संधी देणे, सवय लावणे,


 समूहगान 

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....


 - सामान्यज्ञान 

 - डॉ. द. न. गोखले यांनी लिहिलेल्या 'डॉ. केतकर' या पुस्तकास सन १९६१ मध्ये साहित्य ॲकॅडमीचा पुरस्कार मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा