Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

15 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

       15 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना

 सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना... 

 

→ श्लोक

 - तृणेभ्यो जायते रज्जुः । या नागस्यापि बंधनम् । बनामप्यसाराणां संहतिः कार्यसाधिका ।। - याच्या काड्यापासून दोर (दोरो) तयार होतो. तो (दोर) हत्तीला सुद्धा बंधनात टाकतो. (बांधून ठेवू शकतो) शक्तिहीन अशा अनेकांच्या एकजुटीने (एकीने) कार्य सिद्धीला जाते.

 

 → चिंतन- जीवनात जो एखादी विशिष्ट गोष्ट मिळवायचा सतत प्रयत्न करतो. एकाच गोष्टीत आपले जीवनसर्वस्व खर्च करतो, त्यालाच प्राप्त होण्याची शक्यता असते. माणसाची शक्ती मर्यादित आहे. त्यामुळे एका वेळी माणूस अनेक उद्योग करू शकत नाही. तसेच सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती ही देखील माणसाच्या कर्तृत्वाला बांध घालणारी असते. हे सर्व लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसाने गोष्टीत जीवन सर्वस्व खर्च केले तर त्याला त्याची इच्छित गोष्ट मिळण्याची शक्यता खूपच वाढते. त्यातून त्याला आनंद मिळू शकतो.


कथाकथन 

'गुरुनानक' :- शीख धर्माचे आद्य संस्थापक गुरुनानक यांचा जन्म ६५ एप्रिल १४६९ या दिवशी लाहोरजवळ तलवंडी गावी | नानक थोडा मोठा झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत घातले. लिहिणे, वाचणे, गणिते करणे याबरोबरच संस्कृत, हिंदी, फारसी या भाषाचाही नाका चांगला अभ्यास केला. परंतु नानकाचे मन शाळेत रमेना. मग वडिलांनी त्याला गुराख्याचे काम दिले. पण तेही त्याला जमेना. तो गुरांना रानात सोडून द्यायचा | देवाचे भजन करीत बसायचा. नानकाच्या वडिलांनी त्याला व्यापारात गुंतविले पण व्यापारासाठी दिलेला पैसा तो गोरगरिबांना दान करीत असे. विक्रमा आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. नानकाचे लग्न झाले. त्याला दोन मुली झाल्या. पण नानकाचे मन संसारात रमेना. एक दिवस घरादाराचा, संस येथेोग करून नानक घरातून बाहेर पडला व तीर्थयात्रेला गेला. सोमनाथ, द्वारका, हरिद्वार, काशी, जगन्नाथपुरी इत्यादि तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. मक्का व मि येथे जाऊन त्यांनी मुसलमानांच्या पवित्र स्थानांचे दर्शन घेतले. त्यांनी कबिराचे शिष्यत्व स्वीकारले. स्वतः लिहिलेली भक्तिगीते, भजने ते गात फिरत असत, जातीभ नसावा, मूर्तीपूजा करू नये. ही दोन तत्वे नानकांच्या धर्माचा आधार आहेत. नानकांनी युक्तिवादाने अनेकांना जिंकले, ते नानकांचे अनुयायी शिष्य झाले 'शीख' असे म्हणतात. शीख धर्माची स्थापना गुरुनानकांनी केली. शिखांना अत्यंत प्रिय असलेला धर्मग्रंथ 'ग्रंथसाहेब' नानकांनी तयार केला. नानकांच्या धर्मपंथात हिंदू, मुसलमान असा भेद नाही. ही सर्व परमेश्वराची लेकरे आहेत असे ते सांगत. त्यामुळे असंख्य हिंदू-मुसलमान त्य शिष्य बनले. परमेश्वर एक आहे. शुध्द अंतःकरण ही सर्वात महत्वाची गोष्ट. प्रत्येक मनुष्याने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मागील गुरुंची ि साधुसंताची नुसती शिकवण उपयोगी पडत नाही. नानकांनी हिंदूंची पुराणे व मुसलमानांचे कुराण यांचा अभ्यास केला. पण, त्यांत त्यांना परमेश्व |दिसला नाही. म्हणून त्यांनी सत्यालाच परमेश्वर मानले. हिंदू आणि मुसलमान यांच्यात ऐक्य घडविण्याचा नानकांनी प्रयत्न केला. त्यांच्या पंधाने धर्मरक्षण फार मोठे कार्य केले. १५३८ मध्ये नानक परलोकात गेले.


सुविचार 

• 'कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये पडतात.' 

• 

→ दिनविशेष 

• मोरेश्वर रामचंद्र पराडकर (मोरोपंत) स्मृतिदिन - १७९४ मोरोपंतांचा जन्म १७२९ मध्ये - पन्हाळगड येथे मराठी पंडित कवींचे अग्रणी, आर्याभारतकार. मोरोपंतांनी काव्य, व्युत्पत्ती, अलंकार, वेदान्त इ. विषयांचे अध्ययन केले. शिक्षण पूर्ण करून ते ब आले. तेथे पेशव्यांचे जावई व सावकार बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून राहिले. त्यांच्या ठिकाणी कवित्वशक्ती मूळचीच होती असताना पुराणकथन, ग्रंथावलोकन आणि काव्यरचना याशिवाय अन्य उद्योग त्यांनी केला नाही. 'कुशलव्याख्यान' हे त्यांचे पहिले काव्य कृष्णविजय, प्रल्हादविजय, सीतागीत, सावित्रीगीत, रुक्मिणीगीत, मंत्ररामायण, आर्यकेकावली?, संशयरत्नावली, नामसुधाचषक, आर्याभारत, हरिवंश, संकीर्ण रामायणे, श्लोककेकावली इत्यादी त्यांची काव्यसंपदा प्रसिध्द आहे. त्यांची बहुश्रुतता त्यांच्या काव्यात पदोपदी दिसून येते. म काव्यरचनेचा उच्चांक गाठला असे म्हटले जाते. हरिदासांनी व कीर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. 'मोरोपंतांनी आपल्या वाक् अलंकारांनी नटवून, सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादान करुन दिले आहे. ' महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी असे म्हटले 


→ मूल्ये

 • सर्जनशीलता, परिश्रम.


→ अन्य घटना 

शीख धर्मगुरू नानक यांचा जन्म १४६९. शेक्सपिअरचे निधन - १६१६. 

• खंडेराव दाभाडे यांचे निधन १७२९.

 • सर्जनशीलता, परिश्रम, 

 जगप्रसिद्ध 'टिटॅनिक' बोटीला हिमनगाचा धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू १९१२.

  • इन्शुलिनचा शोध सरबोटिंग (१९२२) आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे भूदान चळवळ सुरू केली- १९५०


 → उपक्रम 

 • मोरापंतांच्या समग्र साहित्याची माहिती मिळविणे किंवा मोरोपंतांच्या काही आर्यांचे विद्यार्थ्यासमोर वाचन करणे, त्यांच विशद करणे.


'समूहगान 1-

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान....सामान्यज्ञान 

भारताचे राष्ट्रपती 

डॉ. राजेंद्रप्रसाद  - १९५० - १९६२

मोहम्मद हिदायत उल्हा १९६९ (कार्यवाहू)

फक्रुद्दीन अली महमद-१९७४ - ७७

 नीलम संजीव रेड्डी - १९७७ - ८२

 आर. व्यंकटरमन-१९८७ - ९२

  के. आर. नारायणन -१९९७ - २००२

  श्रीमती प्रतिभाताई पाटील-२००७

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -१९६२ - ६७ १९७७

डॉ. झाकीर हुसेन --१९६७ - ६९

  व्ही. व्ही. गरी-१९६९ (कार्यवाह)

   व्ही. व्ही. गिरी-१९६९ - ७४

    बी. डी. जत्ती-१९७७ (कार्यवाह्)

     ग्यानी झैलसिंग -१९८२ - ८

     डॉ. शंकर दयाल शर्मा-- ८७ १९९२ - ९७

      डॉ. अब्दुल कलाम (औलफ्फीर अब्दुल कलाम)-२००२ - २००७ 

      

विविध भाषांतील महाकवी.

इंग्रजी शेक्सपिअर -संस्कृत - कालिदास

• उर्दू - मिर्झा गालिब -लॅटिन - वीरगील

• इटालियन - दांते-फ्रेंच सली पुढोम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा