Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

4 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

         4 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना -

 देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना... 

 

• श्लोक 

• - राजपत्नीः गुरोर्पत्नी मित्रपत्नी तथैव च । पत्नीमाता स्वस्य माता पंचैते मातरः स्मृता ।।

 राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी, आपल्या पत्नीची माता आणि स्वतःची माता अशा पाच माता सांगितल्या आहेत. 


→ चिंतन 

ज्या ठिकाणी युक्ती व शक्ती एकत्र झाली तेथे ऋद्धीसिद्धी निश्चित वास करतात. नुसत्या शक्तीने अगर नुसत्या युक्तीने नेहमी काम भागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड पराक्रम करून स्वशक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन केले. परंतु अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाच्या ताब्यातील लालमहालावरील हल्ला व अग्र्याहून सुटका या सर्व प्रसंगात त्यांनी युक्तीचाही वापर केला.कथाकथन

 'स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर' संगीताच्या दुनियेत अक्षरकीती मिळविलेले सात अक्षरांचे बनलेले 'लता मंगेशकर' हे नाव पृथ्वीतलावर जन्माला आलेले संगीतातील मूर्तिमंत सप्तस्वरच होत असे म्हटले तर त्यात मुळीच अतिशयोकी नाही. जन्माने आणि कमाने त्या लाडक्या कन्या आहेतच, परंतु केवळ भारतातच नव्हे तर अखिल जगतात या नावामागे असलेल्या नैसर्गिक मधुर आवाजाने पराक्रम आहे. 'गांधार स्वर घेऊनच तू जन्माला आली आहेस, तू नाव उज्वल करशील.' असे त्यांचे वडील मास्टर दीनानाथ यांनी त्यांच्या बालपणी भविष्य त्यांनी आपल्या भावी आयुष्यात अक्षरशः खरे करून दाखविले.. कन्येचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर या ठिकाणी झाला. आपल्या पित्याकडून त्या अवघ्या सहाच्या वर्षापासून गाण्याची तालीम घेत होत्या. लहानपणापासून बुद्धी तल्लख असल्याने लतादीदी आपल्या वडिलांच्या गाण्याचे अनुकरण गोड, चपळ, धारदार आणि वळणदार करू लागल्या. तसेच बालसुलभ अभिनय चातुर्यही त्यांच्या अंगी असल्यामुळे तत्कालीन नाटकातून त्यांनी छोटो भूमिका केल्या. मास्टर दीनानाथांची स्वत:ची 'बलवंत संगीत मंडळी' ही नाटक कंपनी त्या वेळी नावारुपाला आली होती. सौभद्र नाटकात लतादिदींनी नारदाची भूमिका केली, तर पुण्यप्रभावमध्ये त्यांनी युवराजाची भूमिका केली आणि गुरुकुल नाटकात श्रीकृष्णाची भूमिका वठवली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दिनिमित्त चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंताला दादासाहेब फाळके ( देण्यात येऊ लागला. १९८९ या वर्षाचा हा पुरस्कार भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना मिळाला. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी मास्टर दिनानाथ यांच्या लतादीदी या जेष्ठ कन्या होत. मा. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला. बालवयामध्ये त्यांनी संगीत पुरस्कार कातून कामे करण्यास सुरवात केली. खाँसाहेब, अमानअली व देवासच्या रजबअली घराण्याचे अमाखा हे त्यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरु होते. अनेक प्रसिध्द संगीतकारांची १८०० च्यावर चित्रपटातील विविध ढंगातील सुमारे २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली असून या गाण्यांची संख्या २५ ते ३० हजारापर्यंत जाते. जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून गिनीज पुस्तकामध्ये त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे. शब्दार्थापलीकडील तरल संवेदना, अर्थपूर्ण शब्दोच्चार, ध्वनिग्राहकाच्या तांत्रिक बाजूंविषयीचे सखोल ज्ञान या गुणांचा संगम लताबाईंच्या गायनात कावयास मिळतो. लता मंगेशकर जगभरात भारताचे भूषण आहेत. लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पद्मभूषण, स्वरभारती, कलाप्रवीण, डी. लिट, सूरश्री, लता तानसेन त्याचबरोबर १९८९ सालचे दादासाहेब फाळके पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांनी आतापर्यंत मिळविले आहेत. आज मात्र सर्वत्र दिदींना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात.• भुविचार :-

 • 'आकाशात देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण आकाशात चंद्र, सूर्य आहेत आणि लताचे सूर आहेत'- पु.ल. देशपांडे 


→ दिनविशेष 

• स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान - (१९८९) (जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौर या (ठिकाणी झाला.) मानसन्मान - १. बालपणी 'खजांची' चित्रपटगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, दिलरुबा व रौप्यपदक, २. १९६९ मध्ये पद्मभूषण पदवी, ३. १९८९ दादासाहेब फाळके पुरस्कार, ४. १९९० लेकिन चित्रपटाच्या निर्मितीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, ५. १९९४ इंदिरा गांधी पुरस्कार, ६. १९९७ राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, ७. १९९७ महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार. या खेरीज लतादिदींना पार्श्वगायनाबद्दल अनेक वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाले आहेत. १९६९ नंतर मात्र अन्य कलाकारांना वाव मिळावा म्हणून हा पुरस्कार त्यांनी नाकारला. पुरीच्या बालाजी मंडळाच्या विश्वस्त मंडळाने त्यांचा आस्थान विद्वान म्हणून गौरव केला. याशिवाय अनेक विद्यापीठातर्फे त्यांना सन्माननीय डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली आहे. पार्श्वगायनातील त्यांच्या उज्ज्वल कारकीर्दीबद्दल 'गिनिजबुका' तही या बद्दलची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या नावाने मध्य प्रदेश शासनातर्फे एक पुरस्कार देण्यात येतो. लतादिदी व त्यांच्या भावंडांनी मा. दीनानाथ पुरस्कार ठेवलेला आहे. १९९९ साली लतादिदींना 'पद्मविभूषण' हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

 

 • मूल्ये -

  • स्वदेशनिष्ठा, देशप्रेम, स्वातंत्र्यप्रेम.


 → अन्य घटना

  • पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे 'नाटो करार' करण्यात आला. - १९४९ अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग यांचे देहावसान. १९६८  


→ उपक्रम -

 • स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची बालगीते, भक्तीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीतांची कॅसेट ऐकणे. 


→ समूहगान -

 • हिंद देश के निवासी, सभी जन एक है । -

 

→ सामान्यज्ञान

 • आवडते गीत प्रकार - ठुमरी, गझल, कजरी

  • लतादिदींचे आवडते गायक - के. एल. सहगल, नूरजहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा