Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी,भूगोल,३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली


3. प्राकृतिक रचना व जलप्रणाली१ कंसांत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा व पुन्हा लिहा : (प्रत्येकी १ गुण)
(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ......
(अ) उच्चभूमीचा आहे
(ब) मैदानी आहे
(क) पर्वतीय आहे
(ड) विखंडित टेकड्यांचा आहे 

(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा .......
(अ) उंच पर्वत आहेत
(ब)प्राचीन पठार आहे
(क) पश्चिमवाहिनी नद्या आहेत
(ड) बर्फाच्छादित डोंगर आहेत

(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः........
(अ) अवर्षणग्रस्त आहे
(ब) दलदलीचे आहे
(क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे
(ड) सुपीक आहे 

‌(४) अँमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत........
(अ) त्रिभुज प्रदेश आहे
(ब) त्रिभुज प्रदेश नाही
(क) विस्तीर्ण खाड्या आहेत
(ड) मासेमारी व्यवसाय केला जातो
 
(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही..... (अ) मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत
(ब) प्रवाळ बेटे आहेत
(क) ज्वालामुखीय बेटे आहेत
(ड) खंडीय बेटे आहेत

उत्तरे : (१) ब्राझीलचा सर्वाधिक पूभाग उच्चभूमीचा आहे.
(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा प्राचीन पठार आहे.
(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(४) अँमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही.
(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हो प्रवाळ बेटे आहेत.
----------------------------
[२]  (१) अरवली पर्वताच्या पायथ्याशी (अ) बुंदेलखंड पठार आहे
(ब) मेवाड पठार आहे
(क) माळवा पठार आहे
(ड) दख्खनचे पठार आहे
(२) भारताचा सर्वाधिक भूभाग .......
(अ) पर्वताने व्यापला आहे
(ब) मैदानी प्रदेशाने व्यापला आहे
(क) प्राचीन पठाराने व्यापला आहे
(ड) वाळवंटाने व्यापला आहे
(३).........ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे.
(अ) अरवली
(ब) शिवालिक
(क) हिमाद्री
(ड) हिमाचल
(४)हिमालयाची सर्वांत अर्वाचीन पर्वतरांग .....ही आहे.
(अ) शिवालिक
ब) हिमाद्री
(क) अरवली
(ड) हिमाचल
(५) राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला
(अ) सहारा वाट (क) थरचे वाळवंट 
(ब) कलहारी वाळवंट
(ड) गोबी वाळवंट
उत्तरे:
(1) अरवली पर्वताच्या पायथ्याशी माळवा पठार आहे.
(२) भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापला आहे
(३) हिमाद्री ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे.
(४)  हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग  शिवालिक ही आहे.
(५) राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला घरचे वाळवंट म्हणतात.


प्र.२ अचूक गट ओळखा :( प्रत्येकी १ गुण)
१.ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या  प्राकृतिक रचनेचा क्रम
(अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी
(ब) गियाना उच्चभूमी - अॅमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(क) किनारपट्टीचा प्रदेश अॅमेझाॅन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(२) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनो आहेत.
(अ) जुरुका - झिंगू- अरागुआ
(ब) निग्रो-ब्रांका-पारू
(क) जापा-जादुई-पुरुष
(३) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात (अ) कर्नाटक - महाराष्ट्र- बुंदेलखंड
(ब) छोटा नागपूर - माळवा - मारवाड (क) तेलंगणा - महाराष्ट्र-मारवाडी
(४) भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
(अ) हिमाचल प्रदेश - मध्य प्रदेश-असम (ब) जम्मू आणि काश्मीर - उत्तराखंड - महाराष्ट्र
(क) तेलंगणा - महाराष्ट्र- कर्नाटक
(५) ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली आदळते
(अ) पारा-पाराना-बाहिया
(ब) रोराईमा-पारा-सांता
(क) आमापा-सांता-सियारा
उत्तरे-(१) -(ब) (२) (अ) (३)- (अ); (४) (क) (५) -(ब)


प्र3-पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने (प्रत्येकी १ गुण) दुरुस्त करून लिहा.
(१) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
उत्तर -योग्य
(२) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
उत्तर - अयोग्य
दुरुस्त विधान : पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिम आहे
(३) पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नदयांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतात.
उत्तर: अयोग्य
दुरुस्त विधान : पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्यांच्या मुखांशी खाड्या आढळतात.
(४) ब्राझील उच्चभूमीच्या नैतत्येकडील भागात पॅराग्बे-पॅराना या नद्यांचा मैदानी प्रदेश आहे.
उत्तर : योग्य


प्र.४. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी १गुण)
(१) हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या?
उत्तर : सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली होत
(२) गंगा नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर : गंगा नदीचा उगम भागीरथी (गंगोत्री येथे) आणि अलकनंदा हिमनदीतून होतो.
(३) राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो?
उत्तर : राजस्थानचा मैदानी प्रदेश हा 'थरचे वाळवंट' आणि मरुस्थळी' या इतर नावांनी ओळखला जातो.
(४) कावेरी नदी कोणत्या राज्यांतून वाहते?
उत्तर : कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून
(५) हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या?
उत्तर : काराकोरम, लडाख व कैलास या हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा होत
(६) गुजरात किनारपट्टीवर कोणती आखाते आहेत?
उत्तर : गुजरात किनारपट्टीवर कच्छचे आखात व खंबातचे आखात ही खते आहेत.
(७) अॅमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? उत्तर : अॅमेझान नदीचा उगम पेरू देशातील अडिज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो
(८) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते?
उत्तर : पिको दी नेब्लीना हे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर होय.

प्र.५ नावे लिहा : (प्रत्येकी १ गुण)
नोंद। उत्तरे थेट दिली आहेत।
(१) गंगा नदीच्या प्रमुख उपनदया :
(१)  यमुना
(२) रामगंगा
(३) घागरा (
४) गंडक
(५) कोसी.
(२) गंगा नदीस जाऊन मिळणाऱ्या ट्वीपकल्पीय नया :
(१) चंबळ (२) केन (3) बेटवा (४) शोण
(३) सिंधू नदीच्या भारतातील प्रमुख उपनद्या : (१) सतलज (२) बियास (३) रावी (४) चिनाब (५) झेलम
(४) खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या :
(१) तापी (२) नर्मदा (३) मही (४) साबरमती.प्र.६ वा पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी २/३ गुण) •
(१) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत,
उत्तर : (१) ब्राझीलमधील अनेक नया ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात.
(२) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.
(३) या नदया अटलांटिक महासाररास जाऊत मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.

२.भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. उत्तर : (१) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी तुलनेने कमी आहे.
(२) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
(३) भारताची पूर्व किनारपट्टी नदयांनी वाहन आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या, पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.

(३) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदो कमी आहेत.
उत्तर : (१) भारताचा पूर्व किनारा नदघांनी वाहन आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात.
(२) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे (३) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

(४) अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
उत्तर : (१) अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. (२) या भागात उदयोगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते.
(३) गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

(५) हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.
उत्तर : (१) हिमालयातील बहुतांश नया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात,
(२) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
(३) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.

(६) पश्चिम किनारी प्रदेशात जास्त विस्ताराची सपाट मैदाने कमी आहेत. उत्तर : (१) गुजरात राज्यातील किनारपट्टीचा अपवाद वगळता, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यांत अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांमध्ये जमिनीच्या अरुंद पाण्याच्या स्वरूपात पश्चिम किनारी प्रदेश पसरलेला आहे.
(२) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिमेकडील कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात विस्तृत मैदाने आढळत नाहीत.
(३) केरळ राज्यातील पश्चिमेकडील मलबार किनारपट्टीच्या प्रदेशात ठिकठिकाणी खाजणे व पश्चजल आढळते. त्यामुळे या किनारपट्टीच्या प्रदेशातही विस्तृत मैदान आढळत नाहीत. त्यामुळे ( पश्चिम किनारी प्रदेशात जास्त विस्ताराची सपाट मैदाने कमी आहेत.


प्र.७.थोडक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण)
(१) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
उत्तर : भारतामध्ये नक्ष्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत :
(१) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे.
(२) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
(३) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नदयांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे.
(४) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.

(२) पँटनाल या अतिविस्तृत खंडांत गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
उत्तर: पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत
(१) पैटनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनदघा वाहतात.
(२) या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते
(३) पंटनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहन आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते. (४) मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.

(३) भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा
उत्तर (१) हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत.
(२) उदा., पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालीचे विभागतो.
(३) उदा., विघ्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे. (४) उदा., हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालया पलीकडील निघा यांना विभागतो.

(४) लक्षद्वीप बेटाची थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : (१) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे
(२) हो बेटे भारताच्या नैऋत्य (पश्चिम) किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत.
(३) बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळ कंकण द्वीपे आहेत
(४) लक्षद्वीप बेटे विस्ताराने लहान असून, त्याची उंची तुलनेने कमी आहे.

(५) अंदमान आणि निकोबार बेटांची थोडक्यात माहिती लिहा
उत्तर : (१) अंदमान आणि निकोबार बेटे हा बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या आग्नेय (पूर्व) किनाऱ्यापासून खूप दूर, बंगालच्या उपसागरात स्थित आहेत.
(२) अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत
(३) अंदमान बेटांच्या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, निकोबार समूहातील काही बेटे कंकण द्वीप क्या स्वरूपात आहेत.
(४) अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील इंदिरा पॉइंट' हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.

(६) पंटनाल प्रदेशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर : (१) पेटल हा जगातील उष्णकटिबंधीय (दलदलीच्या) प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे.
(२) या प्रदेशाचे स्थान ब्राझील उसचभूमीच्या नेत्य भागात हा प्रदेश ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे
(३) ब्राझीलप्रमाणे अर्जेटिना देशातही पैटनाल प्रदेशाचा विा आढळतो
(४) पेटनाल प्रदेशात महाकाय अॅनाकोंडा आढळतात .

(७) पॅराग्वे - पॅराना जलप्रणालीची माहिती लिहा.
उत्तर : (१) पॅराग्वे व पॅराना या दोन नदया ब्राझीलच्या नै भागातून वाहतात
(२) या दोन्ही नदया ब्राझीलमधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळते
(३) या दोन्ही नदयांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो
(४) पॅराग्वे -पराना जलप्रणालीमुळे या नदयांच्या खोल्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झाला आहे.

(८) पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा.
उत्तर : पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :(१) पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अस्वी समुद्राला समांतर पसरत गेला आहे.
(२) पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे. पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठार नद्यांचे उगमस्थान आहे.
(३) पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला, तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग (खिंडी) आहेत.
(४) पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांची प्रमुख जलविभाजक आहे.

(९) पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा.
उत्तर : (१) दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे. याउलट दख्खनच्या पठाराच्या पूर्व सीमेलगत पूर्व घाट आहे.
(२) पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरला आहे. याउलट पूर्व घाट हा नैत्य-ईशान्य दिशेत पसरला आहे. पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे. याउलट पूर्व घाट हा तुलनेने रुंद आहे. पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे. याउलट पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे
(३) पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात. याउलट पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात.
(४) पश्चिम घाट हा अनेक ठिकाणी खिंडमुळे छेदला गेला आहे. याउलट पूर्व घाट हा अनेक ठिकाणी दख्खनच्या पठारावर वाहणारी पूर्ववाहिनी नद्यांनी छेदला गेला आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण)
(१) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा
उत्तर : (१) भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान दूवीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात. याउलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे ) उचभूमी: अजस कडा किनारी प्रदेश) भैदानी प्रदेश आणि वीपसमूह हे पाच पाकृतिक विभाग केले जातात
(२) भारतात विविध भागांत उंच पर्वत आढळतात माझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत याउलट,
(३) भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत. (४) भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० भीटर ते ८००० मीटर आहे. याउलट, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सबोच्च उंचीची कक्षा १००० मीटर ते २००० मीटर आहे.
(५) भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ग्राझोलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही
(६) भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत.
(७) भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत.
(८) ब्राझीलमध्ये अजस कड़ा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे संकेत होता याउलट, भारतात पठारांची सोमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस कड़े आढळत नाहीत.

(२) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत
(१) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
(२) हिमालयाच्या दक्षिण पायध्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सोमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान-पंजाब पासून पूर्वेकडे असमपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
(३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जाताते.
(४) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
(५) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास 'सुंदरबन' म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
(६) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा
मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा भरती चा नावाने ओळखता जातो. राजस्थानचा हताश भाग था वालवंरने व्या आहेर वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबात मैदानी ध्देश म्हणू ओळखला जातो
(७) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पर्ममेकडे पंजाबना भैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनदभांनी वाहन आणलेल्या गाळाच्या संचयनातून  झाली आहे.
(८) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेको आवसोया मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोरया प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

(३) ब्राझीलची उच्चभूमीची वेशिष्टये स्पष्ट करा .
उत्तर : ब्राझीलच्या उच्चभूमी ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
(१) ब्राझील देशातील दक्षिणेकडील भाग विस्तीर्ण पराने व्यापलेला आहे. हा भाग ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उधभूमी किंया थाहौलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाते.
(२) ब्राझील उच्चभूमीची दक्षिणेकडील व पूर्वेकडील भागांतील उंची तुलनेने अधिक आहे व ती १००० मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागातील उंची ५०० मीटर ते १००० मीटर दरम्यान आहे.
(३) ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे रप्ध्यारप्याने कमी होत जाते. ब्राझील उच्चभूमीचे उत्तरेकडील उतार फारसे तीन माहीत.
(४) ब्राझील उच्चभूमीच्या उत्तरेकडील उतारावरूण अभेझान नदीच्या उपनद्या उगम होतो.
(५) यांतील काही उपनदयांमध्ये धावत्या व धबमबे दिसून येतात या नद्या पुढे अटलांटिक महासागरास मिळतात.
(६) ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पराग्वे, पराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहतात
(७) ब्राझील उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशथ तीख्र असून तो अजस कडा म्हणून ओळखला जातो.
(८) ब्राझील उच्चभूमी (बालक्षेत्र) व गियाना उच्भूमी (डालकेत्र) एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात.

(४) अॅमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्टो स्पष्ट करा.
उत्तर : अमेझॉनच्या जलप्रणालीची ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ?
(१) अॅमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. मा नदीचा उगम पेरू देशातील अंडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. (२) निग्रो, जापुरा, पुरुस, सिंगू इत्यादी अमेझानच्या प्रभुख उपनय्या आहेत.
(३) अॅमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचं् आहे. औँभेशनि नदीतून सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवका प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असतो. (४) अॅमेझॉन नदीतून वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहन नेला जातो.
(५) अॅमेझॉन नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या मुखाशी गाळाचे प्रदेश तयार न होता बेटे तयार होतात
(६) अॅमेझॉन नदीच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे तयार झालेली आढळतात. उदा., माराजा बेट
(७) अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. अॅमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे.
(८) अमेझॉन जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.

(५) भारताच्या किनारपट्टीचे प्रदेश स्पष्ट करा.
उत्तर : भारताच्या किनारपट्टीचे प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत
(अ) भारतातील पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश ( १) भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरबी समुद्राला लागून आहे.
(२) भारतातील पश्चिम किनारपट्टी खडकाळ आहे व तिची रुंदीही कमी आहे. (३) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत.
(४) पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रास येऊन मिळतात. या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून तेथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.


(ब) भारताचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश : (१) भारताचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश बंगालच्या उपसागराला लागून आहे.
(२) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने बनला आहे.
(३) पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून उगम पावणाऱ्या अनेक पूर्ववाहिनी नद्या भारताच्या पूर्व किनाऱ्याला येऊन बंगालच्या उपसागराला मिळतात
(४) या नदया पूर्व किनाऱ्यावरील जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात त्यामुळे त्यांनी वाहन आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते.
(५) परिणामी भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. उदा., सुंदरबन

प्र.९वा- पुढील बाबींवर संक्षिप्त टिपा लिहा. किंवा (प्रत्येकी ४ गुण) माहिती लिहा :
(१) अॅमेझॉन नदीचे खोरे.
उत्तर : (१) अॅमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
(२) अॅमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणेजच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.
(३) जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागर कडे वाहत जाते, तसतशी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची (मैदानाची) रुंदी वाढत जाते.
(४) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.

(२) हिमालय.
उत्तर : (१) हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.
(२) हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समातर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
(३) दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालय पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
(४) हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (असम हिमालय) असेही भाग केले जातात.

(३) ब्राझीलची किनारपट्टी.
उत्तर : (१) ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात. (२) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्वे पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो. ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा
(३) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजाँ बेट, माराजॉ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट अॅमेझॉन व टोकॅटिस या नद्यांच्यादरम्यान तयार झाले आहे.
(४) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी
लांबवर पसरलेल्या पुतणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे रक्षण होते .

(४) भारताचा द्वीपकल्पीय विभाग 
उत्तर : (१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो
(२) भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे.वली पर्वत हा सर्वात प्राचीन  आहे.
(३) भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलंगणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्य भागात विध्य-सातपुडा पर्वत आहेत (४) भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.

(५) अजस्र कडा.
उत्तर : (१) क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कड़ा हा। ब्राझील मधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे.
(२) सावो पावलो ते पोतों अॅलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस कड्यामुळे अंकित होते. अजस कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
(३) अजस कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो अजस कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो
(४) अजस कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो.

(६) गियाना उच्चभूमी.
उत्तर : (१) गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात आहे. या उच्चभूमीचा पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत विस्तार आढळतो. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा तुलनेने कमी उंचीचा भाग आढळतो
(२) गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोमाईमा, पारा आणि आमापा या राज्यांत विस्तारलेली आहे.
(३) ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची ३०१४ मीटर आहे.
(४) गियाना उच्चभूमी (ढालक्षेत्र) व ब्राझील उच्चभूमी (ढालक्षेत्र) एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात
(७) ब्राझीलमधील द्वीपसमूह
उत्तर : (१) मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते.
(२) ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे ही ोंमेझॉन व तिच्या उपनदयांनी वाहन आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहेत ब्राझील मधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांत अनेक प्रवाळबेटे आढळतात. त्यांना कंकणद्वीप म्हणतात.
(३) ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून ३०० किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत.
(४) सागरी बेटे खडकाळ स्वरूपाची असून, ती जलमग्न डोंगरांच्या माथ्यांचे भाग आहेत.

(८) सावो फ्रान्सिस्को नदी.
उत्तर : (१) सावो फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील पूर्व भागातील महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते.
(२) ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतारावर या नदीचा उगम होतो. ब्राझील उच्च्भूमीच्या पूर्व भागात या नदीचे पाणलोट क्षेत्र आढळते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील भागात सुमारे १००० किमी अंतरापर्यंत ही नदी सुरुवातीला उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते.
(४) सावो फ्रान्सिस्को नदीच्या मुखाजवळील सुमारे २५० किमी लांबीच्या भागाचा जलवाहतुकीसाठी वापर केला जातो.


(९) ब्राझीलच्या किनारी प्रदेशातील नद्या.
उत्तर : (१) ब्राझीलच्या किनारी प्रदेशात तुलनेने कमी लांबीच्या नद्या आढळतात. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत.
(२) ब्राझीलमधील परानिबा, इटापेकुरू या नदया उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात.
(३) दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांचा ब्राझील उच्चभूमीतून उगम होतो.
(४) ब्राझीलमधील पुरागुआकु नदी साल्वाडोर शहराजवळ अटलांटिक महासागराला मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा