Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास,१.इतिहासाची साधने (ऑनलाईन चाचणी)

       १.इतिहासाची साधने

प्रश्नोत्तरे
प्रश्न १. गटांतील वेगळा शब्द शोधून लिहा (१) भौतिक साधने, लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने
(२) स्मारके, नाणी, लेणी, कथा
(३) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या मिथके
उत्तरे : (१) अलिखित साधने (२) कथा (३) मंदिरे (४) तवारिखा

प्रश्न २. म्हणजे काय?
 (१) इतिहास
उत्तर :भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीरपणे दिलेली माहिती, म्हणजे 'इतिहास' होय
(२) इतिहासाची साधने.
उत्तर : ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो, त्या पुराव्यांनाच 'इतिहासाची साधने असे म्हणतात
(३) ताम्रपट.
उत्तर : तांब्याच्या पत्र्यांवर कोरलेल्या लेखांना, आज्ञाना वा निवाड्यांना 'ताम्रपट' असे म्हणतात
 (४) शिलालेख
 उत्तर : दगडावर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख' असे म्हणतात.
(५) बखर.
उत्तर : 'बातमी' या अर्थाच्या 'खबर' या शब्दावरून तयार झालेल्या इतिहासवजा लेखनप्रकाराला बखर असे म्हणतात.

'इतिहासाची साधने'या पाठावरील चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

 https://forms.gle/Th8N4DpJJ6QrmYf36

प्रश्न 3. लिहिते व्हा :
(एका वाक्यात उत्तरे लिहा.)
(৭) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
उत्तर : स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ (स्मृतिशिळा) थडगे, विजयस्तंभ, विजयकमानी इत्यादींची समावेश होतो.

 (२) 'तवारिख' म्हणजे काय?
 उत्तर : 'तवारिख' म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे

३) इतिहासलेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात?
उत्तर इतिहासलेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती, त्याचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे त्यांचे असतात

(४) पत्रव्यवहार व राज्यकर्त्यांची चरित्रे यांवरून आपल्याला कोणती माहिती मिळते?
 उत्तर : पत्रव्यवहार व राज्यकर्त्यांची चरित्रे यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था तसेच राजकीय संबंध यांची माहिती मिळते.
 (५) इमारतीमध्ये कोणत्या प्रकारच्या वास्तूंचा समावेश होतो?
उत्तर : इमारतीमध्ये राजवाडे, मंत्र्यांची निवासस्थाने, राणीवसा, सामान्य माणसांची घरे या वास्तूचा समावेश होतो.

 (६) कोणत्या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले आहेत? उत्तर चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले.

 (७) बखरीतून आपल्याला कोणती माहिती मिळते?
उत्तर : बखरीतून आपल्याला त्या काळातील सांस्कृतिक जीवन, भाषाव्यवहार, तत्कालीन राजकीय घडामोडी तसेच सामाजिक परिस्थिती यांची माहिती मिळते.

 (८) कवी परमानंदांनी कोणते शिवचरित्र लिहिले?
उत्तर : कवी परमानंदांनी संस्कृत भाषेत 'श्रीशिवभारत' हे शिवचरित्र लिहिले.

(९) मध्ययुगीन भारतावर लिखाण करणाऱ्या पाश्चात्त्य इतिहासकारांची नावे लिहा.
उत्तर : ग्ॅट डफ, रॉबर्ट आर्म, एम. सी. स्प्रेंगल या पाश्चात्त्य इतिहासकारांनी मध्ययुगीन भारतावर लिखाण केले.

प्रश्न ६. संकल्पना स्पष्ट करा :
(१) भौतिक साधने.
उत्तर : पूर्वीच्या काळातील माणसाची वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्परसंबंधांचे माहिती मिळते. प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना 'इतिहासाची भौतिक साधने' असे म्हणतात.

२)लिखित साधने. उत्तर : मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिह ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सणसमारंभ, खाण्या पदार्थ इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्याला 'इतिहासाची लिखित साधने' असे म्हणतात.

(३) मौखिक साधने.
उत्तर : लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यान्पिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेत असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला 'इतिहासाची मौखि साधने' असे म्हणतात.

प्रश्न ७. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा?
उत्तर : ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी, केव्हा व का लिहिला यांची छाननी करावीच लागते सापडलेल्या वस्तूचे चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनाशी व्या पडताळून घ्यायला हव्यात असे केले नाही, तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील. म्हणून ऐतिहासिक साथनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते, असे मला वाटते.

 प्रश्न ८. सांगा पाहू
(१) नाणी इतिहास कसा सांगतात?
उत्तर- इतिहासाच्या भौतिक साधनांतील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात -(१) नाण्यावरील चित्रातून त्या काळात कोण राज्यकर्ता होता, त्याचा काळ कोणता होता यांची माहिती प्याचे होते. (२) त्या काळातील धार्मिक संकल्पना, लिपी, भाषा यांचा बोध होतो (३) नाण्यांच्या धातूवरून त्या काळात वेश प्रचलित असणारे धातू, आर्थिक व्यवहार व आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते (४) नाण्यांवरील नक्षी, चित्रे यांवरून तत्कालीन कलेची प्रगती समजते (५) नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते.

 (२) ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते?
उत्तर : ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला - (१) त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते मोडी (२) कलेचा दर्जा समजतो (३) त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते (४) त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान कसे होते, हे माहीत होते.

प्रश्न ९. तुमचे मत लिहा : (कारणे लिहा.) (৭) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर : दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख असे म्हणतात राजानी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यांतील घटना व तारखाच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो .

(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात
 उत्तर : ओव्या, मिथके, लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठातराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात

(३) बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.
उत्तर :(१) इतिहासलेखनात साधनांची विश्वसनीयता आणि लेखकाचा निःपक्षपातीपणा आवश्यक असतो (२) बखरीत अनेकदा अतिशयोक्त आणि आलंकारिक वर्णन असते शिवाय (३) अनेक बखरी घटना घडून गेल्यावर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने, त्या ऐकीव माहितीवर लिहिल्या गेल्या आहेत, म्हणून बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.

(४) इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते? उत्तर : इतिहास लेखन एकदा करून चालत नाही, कारण भूतकाळातील घटनाचे अखंडपणे सशोधन चालू असते संशोधनाची नवी नवी साधने उपलब्ध होत असतात. त्यावरून नवी माहिती समोर येते. पूर्वीच्या माहितीचे संदर्भ बदलले जातात. त्यामुळे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करावे लागते.

1 टिप्पणी: