Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास ना. शास्त्र,६,मुघलांशी संघर्ष

              मुघलांशी संघर्ष




प्रश्न . शोधा म्हणजे सापडेल :

(१) शिवरायांनी तयार करवून घेतलेला फारसी - संस्कृत शब्दकोश-

राज्यव्यवहारकोश

(२) त्र्यंबकगड जिंकून घेणारा -

 मोरोपंत पिंगळे

(३) वरणी-दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार -

दाऊदखान

(४) इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण-

सुरत

(५) दक्षिण मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजीराजांनी नेमलेला मुख्य कारभारी -

रघुनाथ नारायण हणमंते

(६) तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय-

सरस्वती महाल.


प्रश्न  योग्य पर्याय निवडा :

(१) चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार याने शायिस्ताखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला -

फिरंगोजी नरसाळा 

(२) शायिस्ताखानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे  केली?

बंगालमध्ये

(३) सुरतेच्या स्वारीच्या वेळी या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले- 

इनायतखान 

(४) आग्याहून परत येताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते ?

मथुरेत

(५) 'मऱ्हाटा पातशाह येव्हढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असे राज्याभिषेकाच्या

घटनेचे वर्णन आपल्या बखरीत कोणी केले आहे ?

 कृष्णाजी अनंत सभासद

(६) पुरंदरच्या किल्ल्याला दिलेरखानाने वेढा दिल्यावर पराक्रमाची शर्थ करणाऱ्या कोणाला वीरमरण आले ?

 मुरारबाजी देशपांडे,

प्रश्न  पुढील घटना कालानुक्रमे लिहा :

उत्तरे 

(१) शायिस्ताखानाची स्वारी

२) लाल महालावर छापा

(३) पुरंदरचा तह

(४) आगऱ्याहून  सुटका

५) राज्याभिषेक

(६) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम

आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले

कर्नाळा, सिंहगड, रोहिडा, पुरंदर, लोहगड, माहुली

शिवरायांनी पाडलेली नाणी

सोन्याचा होन, तांब्याची शिवराई

शिवरायांच्या संदर्भात रायगडावर घडलेल्या घटना

राज्याभिषेक

३ एप्रिल १६८० रोजी निधन

भारतातील धर्मकृत्यांच्या दोन परंपरा

वैदिक पद्धती, तांत्रिक पद्धती

प्रश्न .आपल्या भाषेत थोडक्यात उत्तरे लिहा.

1] पुरंदरच्या तहानंतर शिवाजीराजांनी कोणती व्यापक योजना तयार केली ?

उत्तर : पुरंदरच्या तहाने  मुघलांना दिलेले किल्ले व  प्रदेश मिळवण्यासाठी शिवाजीराजांनी पुढ़ील व्यापक योजना तयार केली- (१) जय्यत तयारीनिशी निरनिराळया किल्ल्यांवर सैन्य पाठवून ते किल्ले जिंकायचे. (२) त्याच वेळी दख्खनमध्ये मुघच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे.

(२) मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन महाराजांनी कोणकोणत्या बाबी केल्या?

उत्तर : पुरंदरच्या तहानंतर     महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक होऊन पुढील बाबी केल्या (१) मुघलाच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. (२) मुघलांच्या ताब्यातील अनेक किल्ले जिंकून घेतले. (३) दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. (४) मोरोपंत पिंगळे यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला.

(३) शिवरायांनी स्वराज्याला जोडलेल्या जिंजी किल्ल्याचा भविष्यात कोणता उपयोग झाला?

उत्तर : १६७७ साली हाती घेतलेल्या दक्षिण मोहिमेत शिवरायांनी तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून घेतला होता. पुढे औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून बसला. रायगडावरील त्याच्या स्वारीच्या वेळी छत्रपती राजाराम यांना सुरक्षिततेसाठी तेथून हलवावे लागले. त्या वेळी त्यांनी जिंजी किल्ल्याचाच आश्रय घेऊन स्वराज्याचा कारभार चालवला. अशा तऱ्हेने उपयोग झाला.

प्रश्न  कारणे लिहा :

(१) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.

उत्तर : (१) शिवरायांकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशाहाने मोठी फौज पाठवली. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. (२) मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. (३) परिस्थिती मोठी कठीण होती. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून 'पुरंदरचा तह' केला.

(२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

उत्तर : (१) मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. (२) मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दयावा लागला होता. (३) हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुधलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

(३) शिवाजी महाराजांनी शायिस्ताखानाविरुद्ध धाडसी बेत आखला.

उत्तर : (१) शायिस्ताखानाने शिवरायांच्या महालात  तळ ठोकला होता. (२) त्याच्या फौजा पूण्याच्या आसपासच्या प्रदेशाची लूट करून मोठी हानी करीत असत (३) त्याचा प्रजेच्या  नीतीधैर्यावर परिणाम झाला होता 

4] शायिस्तारखानाने आपला मुक्काम औरंगाबादला हलवला

उत्तर : (१) शायिस्ताखान लाल महालात दोन वर्षे तळ ठोकून बसल्याने शिवरायांनी त्याच्याविरुद्ध एक धाडसी बेत आखला ५ एप्रिल १६६३  रोजी लाल महालावर छापा घातला यात    खानाची बोटे तोडली या मानहानीमुळे शायिस्तारखानाने आपला मुक्काम औरंगाबादला हलवला

(५) शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीने औरंगजेब बादशाहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला.

उत्तर : (१) शायिस्ताखानाच्या स्वारीमुळे स्वराज्याचा बराबसा प्रदेश उदध्यस्त झाला होता. ते नुकसान भरून काढण्यासाठी शिवरायांनी मुधलांच्या सुरतेवर हल्ला केला. (२) हे शहर बादशाहाला सर्वात जास्त प्रिय होते. (३) आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार्या सुरतमधून महाराजांनी प्रचंड संपत्ती लुटून नेली. त्यामुळे औरंगजे बादशाहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला

प्रश्न  तुमच्या शब्दांत लिहा : (थोडक्यात माहिती लिहा.)

(१) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.

उत्तर : आपल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळण्यासाठी शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करवून घेण्याचे निश्चित केले. ६ जून १६७४ या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकप्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. 'होन' व 'शिवराई' ही दोन नाणी पाडली. राजपत्रांवर 'क्षत्रयकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती' असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली.

२] आग्याहून सुटका.

उत्तर : औरंगजेबाने शिवाजीराजांचा दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. अशा वेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले. नजरकैदेतून  सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार करून, त्याप्रमाणे शिताफीने ते निसटले. आग्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले. अशा रितीने शिवाजीराजांनी मोठ्या धैर्यनि आणि कौशल्याने  स्वतःची सुटका करून धेतली.

(३) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम.

उत्तर : ऑक्टोबर १६७७ मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी मैत्रि तह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळूूरु. होसकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला तमिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकले. तंजावरचे राजे व्यंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्याकार्यात सहभागी होण्याचाही राजांनी प्रयत्न केला.

(४) शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी.

उत्तर : तीस वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर निर्माण झालेल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळावी. म्हणून शिवरायांनी स्वत स राज्याभिषेक करवून घेण्याचे ठरवले. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पंडित गागाभट्टांना बोलावून धेतले. रत्नजडित असे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. विविध प्रांतांतून श्रेष्ठ विदवानांना, राज्यकत्यांना आमंत्रित केले सोन्याचा 'होन' आणि तांब्याची 'शिवराई' ही खास नाणी पाडली. अशा रितीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली.

(५) पुरंदरचा तह.

उत्तर : (१) जून १६६५ मध्ये मिर्झाराजे  जयसिंग आणि शिवाजीराजे यांच्यात झालेल्या तहाला 'पुरंदरचा तह' असे म्हणतात. (२) या तहानुसार शिवरायांनी मुघलांना २३ किल्ले व त्यांच्या सभोवतालचा चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. (३) आदिलशाहीविरुद्ध लढण्यासाठी राजांनी मुघलांना मदत करण्याचे आश्वासन दिले. (४) मुघलाच्या स्वारीमुळे होणारी भूप्रदेशाची आणि सैन्याची हानी टाळण्यासाठी महाराजांनी मुघलांशी हा तह केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा