Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi-itihas v rajyashastra ५ भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने

                                  ५ .भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने






पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
(१) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
  उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण (१) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. (२) लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. (३) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.
-----------------------------------------------------------------------

(२) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण - (१) जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या. (२) यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी, म्हणजेच डाव्या उग्रवादयांची चळवळ सुरू झाली. (३) परंतु, मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकार- विरोधात हिंसक कारवाया करू लागली, पोलिसांवर हल्ले करू लागली. हिंसेलाच अधिक महत्त्व आले. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
-----------------------------------------------------------------------

 (३) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण - (१) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते. (२) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो. (३) बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.(३) शासनव्यवहारात जनतेचा सहभाग वाढतो. (४) त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते, लोकशाही शासनपद्धतीत सत्तेच्या विकेंद्रीकरणाला खूप महत्त्व असते.
-----------------------------------------------------------------------

(२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण.
उत्तर : (१) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते. (२) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. (३) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात. (४) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते.
-----------------------------------------------------------------------
थोडक्यात टिपा लिहा (प्रत्येकी २ गुण)
 (१) डावे उग्रवादी.

 उत्तर : (१) भूमिहीन यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली. (२) या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या 'विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते. (३) सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.. (४) शेतकरी आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.
 
-----------------------------------------------------------------------

  (२) भ्रष्टाचार.
 उत्तर : (१) कायदयानुसार, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात. (२) भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो, असे नाही; तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. (३) अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच. (४) भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत प्रस्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरोल लोकांचा विश्वास उडू शकतो.

-----------------------------------------------------------------------

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी २ गुण)
(१) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
उत्तर : भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे (१) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. (२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. (३) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. (४) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे
-----------------------------------------------------------------------

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम ?
 उत्तर : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात. (१) राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते. (२) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते. (३) दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो. (४) सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.

-----------------------------------------------------------------------

(३) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?
 उत्तर : राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात - योजना नवाद रणाचे रीकरण आव्हाने (१) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.. (२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. (३) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते. (४) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.
 -----------------------------------------------------------------------

(४) वाढत्या भ्रष्टाचाराचे कोणते परिणाम होतात ?
उत्तर : भ्रष्टाचार वाढत गेल्यास, त्याचे पुढील परिणाम होतात. (१) राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर भ्रष्टाचार वाढून सरकारची कार्यक्षमता कमी होते.(२) सरकारी कामे पूर्ण होण्यास बराच विलंब होतो. (३) सार्वजनिक सोई व सुविधा यांची गुणवत्ता घसरते. (४) वाढत्या घोटाळ्यांमुळे लोकशाही व्यवस्थेबद्दल लोकांत अविश्वासाची आणि असमाधानाची भावना निर्माण होते. (५) लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडून देशात अराजक माजू शकते..
-----------------------------------------------------------------------

(५) जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?
उत्तर : जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत (१) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे. (२) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे. (३) केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे. (४) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.

-----------------------------------------------------------------------

(६) लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे
 उत्तर : लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी पुढील सुधारणांची आवश्यकता आहे. (१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता ही मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. (२) सामाजिक संस्थांना स्वायत्तता देऊन सर्व समाजघटकांचे सामीलीकरण करणे. (३) सर्व नागरिकांचे सक्षमीकरण करणे. (४) निष्पक्षपाती निवडणुका, स्वतंत्र न्यायालये यांची तरतूद करून जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही निर्माण करणे.
 -----------------------------------------------------------------------


(७) लोकशाही मजबूत होण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना राबवल्या आहेत ?
 उत्तर : लोकशाही मजबूत होण्यासाठी भारताने पुढील उपाययोजना राबवल्या आहेत (१) सत्तेचे विकेंद्रीकरण. (२) सत्तेत वाटा मिळण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांना व महिलांना आरक्षण. (३) शासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, ग्राम समृद्धी योजना असे अनेक उपक्रम राबवले जातात. (४) समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांचा संविधानाने केलेला स्वीकार.
-----------------------------------------------------------------------

तुमचे मत मांडा : (प्रत्येकी २ गुण) (९) शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास कार्य होईल, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर : शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास पुढील गोष्टी होतील, असे मला वाटते- (१) शासनाच्या सार्वजनिक धोरणांत बदल होऊन ते व्यापक होईल. (२) समाजातील सर्व घटकांत सुसंवाद निर्माण होऊन, सत्तेवर न आलेल्यांशीही वैचारिक देवाणघेवाण होईल. (३) शासनाच्या कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचारासारख्या समस्या कमी होतील. (४) व्यापक जनहिताच्या योजना आखल्या जाऊन कोणत्याही घटकाला आपल्यावर अन्याय होतो आहे किंवा दुर्लक्ष होत आहे असे वाटणार नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही निर्माण होईल.
-----------------------------------------------------------------------


(२) बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा झाल्यास, कोणात्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील ? 
 उत्तर : (१) लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या मार्गाने संसद आणि विधिमंडळे या लोकशाही संस्था अस्तित्वात येतात. या संस्थांमार्फत 'सरकार' ही संस्था निर्माण होते. (२) स्थानिक कारभार करण्यासाठी स्थानिक शासनसंस्था निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वात येतात. (३) लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना संविधानाद्वारे स्वातंत्र्य, न्याय, समता इत्यादींबाबत अधिकार मिळतात. (४) या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायसंस्था असतात. बिगर लोकशाही व्यवस्थेत या संस्था नसतात व असल्या तरी त्यांना अधिकार नसतात. म्हणून अधिकार असणाऱ्या अशा संस्था निर्माण कराव्या लागतील.
 
-----------------------------------------------------------------------

(३) लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का ? 
उत्तर : (१) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक असते. (२) पक्षाचा अध्यक्ष, खजिनदार, सचिव या पदांच्या दर तीन वर्षांनी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून निवडणुका घ्याव्या लागतात. अन्यथा त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करतो.(३) या निवडणुकांमुळे पक्षावर एकाच व्यक्तीचे नियंत्रण राहत नाही. (४) त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही टिकून राहते. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात.

-----------------------------------------------------------------------

(४) आर्थिक सुधारणा स्वीकारूनही चीनमध्ये एकाच पक्षा वर्चस्व कसे ? 
उत्तर : (१) १९४९ मध्ये चीनमध्ये साम्यवादी राज्यक्रांती झाली. चीनच्या साम्यवादी पद्धतीत 'कम्युनिस्ट' या एकाच पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. (२) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षांतर्गत निवडणुकांद्वारे निवड होते. (३) चीन स्वतःला लोकशाही राज्य म्हणवून घेतो; परंतु तेथे कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय हुकूमशाहीच आहे. (४) चीनने देशात आर्थिक सुधारणा स्वीकारल्या; तसेच जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्वही स्वीकारले. परंतु ही चीनची आर्थिक नीती झाली. लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांना मिळणारे अधिकार मात्र 'चिनी नागरिकांना नाहीत.

-----------------------------------------------------------------------

(५) तुम्हांला काय वाटते?  राजकारणात घराणेशाही असावी का ?
 उत्तर : (१) लोकशाही व्यवस्थेत घराणेशाहीला स्थान नसते. (२) लोकशाहीत जनतेकडून निवडलेले प्रतिनिधी विशिष्ट कालमर्यादेत राज्यकारभार करतात. अपात्र किंवा अकार्यक्षम प्रतिनिधींना जनता पुन्हा निवडून देत नाही. (३) एकाच कुटुंबाच्या हाती सत्ता असेल तर लोकशाहीचा संकोच होतो. सामान्य जनतेला सत्तेत वाटा मिळत नाही. (४) घराणेशाहीत अकार्यक्षम व्यक्ती निर्माण झाल्यास जनतेचे अहित होईल; म्हणून राजकारणात घराणेशाही नसावी, असे मला वाटते.

-----------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा