Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi-itihas v rajyashastra 3-राजकीय पक्ष

 3-राजकीय पक्ष  





प्र. २ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी २ गुण)
 (१) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून करतात.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण- (१) राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनाप पोहोचवण्याचे कार्य करतात. (२) शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहित जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. (३) या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
--------------------------------------------------------------------------

  (२) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
   उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण- (१) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात; म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात. (२) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करोत असतात. (३) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.
------------------------------------------------------------------------

(३) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण- (१) १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न 'मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.(२) पक्षांचा आपापला कार्यक्रम भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले (३) १९७७ च्या जनता पक्षाचा प्रयोग कल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण खोटा ठरला आहे.
---------------------------------------------------------------------------

 (४) 'शिरोमणी अकाली दल' हा राष्ट्रीय पक्ष आहे.
  उत्तर : हे विधान चूक आहे; कारण- (१) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्य निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देश असतो. (२) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो. (३) शिरोमणी अकाली दल हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
--------------------------------------------------------------------------

पुढील संकल्पना स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
 *(१) प्रादेशिकता
.
 *उत्तर : (१) भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. (२) भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते. (३) प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. (४) आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात
 
------------------------------------------------------------------------

(२) राष्ट्रीय पक्ष

 उत्तर : राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत- (१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा (२) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक. किंवा (३) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------

(३) प्रादेशिक पक्ष.
उत्तर : (१) विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना 'प्रादेशिक पक्ष' असे म्हणतात. (२) या पक्षांचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी, असा या पक्षांचा आग्रह असतो. (३) आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत. (४) प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून होत आहे.
--------------------------------------------------------------------------

थोडक्यात टिपा लिहा : (प्रत्येकी २ गुण) ए च पक्ष
 (१) पक्षपद्धती

 उत्तर : (१) ज्या देशात दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता असते आणि अन्य पक्षांचे अस्तित्व नसते किंवा त्यांचा प्रभाव नसतो त्या पद्धतीला 'एकपक्षीय पद्धती' असे म्हणतात मीन- मध्ये ही पद्धती अस्तित्वात आहे. (२) काही देशांत दोन पक्ष प्रभावी असतात व ते आलटून- पालटून स्वतंत्रपणे सत्तेवर येतात. तेव्हा त्या पद्धतीला द्विपक्ष पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती अमेरिका, इंग्लंड येथे आहे. (३) जेथे अनेक पक्ष अस्तित्वात असून ते एकमेकांशी सत्तास्पर्धा करतात, सर्वांचा कमी-अधिक राजकीय प्रभाव असतो; अशा पद्धतीला 'बहुपक्षीय पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती भारतात आहे. (४) बहुपक्षीय पद्धतीमध्येच लोकशाही विकसित होते.
 
--------------------------------------------------------------------------
 (२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
 उत्तर : (१) १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. (२) भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी सर्वसमावेशक अशी एक चळवळ, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरुवातीचे स्वरूप होते. (३) या संघटनेत विविध विचारसरणींचे गट स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्देशाने एकत्र आलेले होते. (४) स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा पक्ष चार दशके एक प्रभावी पक्ष म्हणून केंद्र व राज्यांत सत्तेवर होता. त्यानंतर या पक्षाचा प्रभाव कमी होत २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तो केंद्र सत्तेतून बाहेर फेकला गेला.
-----------------------------------------------------------------------------

(३) भारतीय कम्युनिस्ट पक्ष,
उत्तर : (१) १९२५ साली स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला आहे. (२) हा पक्ष मजूर, कष्टकरी वर्ग यांच्या हितासाठी काम करतो. (३) या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध असून, कामगारांचे हित पाहणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. (४) पक्षात झालेल्या वैचारिक मतभेदातून १९६२ साली या पक्षात फूट पडून बाहेर पडलेल्या नेत्यांनी 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा'ची स्थापना केली

------------------------------------------------------------------------
. (४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
. उत्तर : (१) १९९९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. (२) लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये हा पक्ष महत्त्वाची मानतो. (३) स्थापनेनंतर हा राष्ट्रीय पक्ष युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) गटात सामील झाला.

-------------------------------------------------------------------------

(५) तृणमूल काँग्रेस,

 उत्तर : (१) १९९८ मध्ये ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस २०१५ पक्षाची स्थापना झाली. (२) भारतीय निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय पक्ष म्हणून २०१६ साली या पक्षाला मान्यता दिली. (३) लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करणे ही या पक्षाची धोरणे आहेत. (४) सध्या  पश्चिम बंगाल या राज्यात हा पक्ष सत्ताधारी आहे.
 -------------------------------------------------------------------------

(६) शिवसेना.
उत्तर : (१) महाराष्ट्रात १९६६ साली शिवसेना हा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला. (२) मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे ही या पक्षाची उद्दिष्टे आहेत. (३) महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावाला या पक्षाचा विरोध आहे. (४) १९९५ साली भारतीय जनता पक्षाशी युती करून हा पक्ष महाराष्ट्रात तर १९९८ ते २००४ पर्यंत केंद्रात सत्तेत सहभागी होता. २०१४ पासून पुन्हा हा पक्ष केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत सहभागी आहे.
--------------------------------------------------------------------
(क) शिरोमणी अकाली दल,
उत्तर : (१) १९२० मध्ये पंजाब राज्यात शिरोमणी दलाची स्थापना झाली. (२) पंजाबमधील हा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. (३) धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास हा प्राधान्य देतो. (४) पंजाबमध्ये हा पक्ष अनेक वर्षे सत्तेत होता. केंद्रातील एनडीए सरकारसोबत तो सध्या सत्तेत सहभागी आहे.
----------------------------------------------------------------------

 (८) द्रविड मुन्नेत्र कळघम.
 उत्तर : (१) तमिळनाडूतील जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे १९४४ मध्ये जस्टीस पार्टी द्रविड कळघम असे राजकीय पक्षात रूपांतर झाले. (२) १९४९ मध्ये या पार्टीतून एक गट फुटून त्याने द्रविड मुन्ने कळघम हा पक्ष स्थापन केला. १९७२ मध्ये त्यातील एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. (३) तमिळ अस्मिता जोपसण्याचे काम या प्रादेशिक पक्षाने केले. (४) सामान्य जनतेच्या हितासाठी या पक्षाने अनेक योजना राबवल्या आहेत. सर्व स्तरांवरील मतदारांचा पाठिंबा या पक्षाला मिळाल्याने दीर्घकाळ तो तमिळनाडूच्या व काही काळ केंद्रा आघाडीतही सत्तेत होता.
--------------------------------------------------------------------------
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्र. (प्रत्येकी २ गुण) भारतीय
 * (१) राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

 * उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे- (१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.. (२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. (३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो. (४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. (५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
-------------------------------------------------------------------------
 * (२) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत ?
 * उत्तर : भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले- (१) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. (२) १९७७ साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.

---------------------------------------------------------------------------
(३) 'पक्षाचा जनाधार कशास म्हणतात ?
 उत्तर : (१) प्रत्येक पक्ष विशिष्ट विचारसरणी स्वीका स्थापन होत असतो. (२) सार्वजनिक प्रश्नांबाबतही राजकीय पक्ष विशिष्ट भूमिका के असतात. (३) आपली विचारसरणी आणि सामाजिक प्रश्नांबाबतची भूमि हे पक्ष विविध कार्यक्रमांतून लोकांपर्यंत नेत असतात. (४) त्यांची भूमिका व विचारसरणी योग्य वाटली तरच लोक पक्षांना पाठिंबा देतात. या पाठिंब्यालाच 'पक्षाचा जनाधार' म्हणतात.
---------------------------------------------------------------------------
 (४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा
 . उत्तर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत- (१) धर्मनिरपेक्षता आणि सर्वांगीण विकास साधणे. (२) दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी स हक्क आणि व्यापक समाजकल्याण हे उद्दिष्ट गाठणे. (३) लोकशाही समाजवाद अस्तित्वात आणणे. (४) आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांज विश्वास.
---------------------------------------------------------------------------
(५) भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करा
उत्तर : १९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाची भूमिका (१) प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे जतन करणे, (२) बलशाली व वैभवसंपन्न असा भारत निर्माण करणे, (३) देशाच्या आर्थिक सुधारणांवर भर देऊन भारताचा विकास करणे.
---------------------------------------------------------------------------

(६) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची धोरणे स्पष्ट करा.
उत्तर : १९६२ साली स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पुढील धोरणे आहेत- (१) धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. (२) समाजवादी सत्ता प्रस्थापित करणे, हे या पक्षाचे ध्येय आहे. (३) कामगार, शेतकरी, शेतमजूर या कष्टकऱ्यांच्या हितांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. (४) साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे.
-------------------------------------------------------------------
(७) बहुजन समाज पक्ष कोणत्या उद्दिष्टांनी स्थापन झाला ? 
उत्तर : बहुजन समाज पक्ष पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थापन झाला- (१) समाजवादी विचारसरणी अस्तित्वात आणणे. (२) बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे. (३) दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य या बहुजन समाजांचे हित साधणे.
---------------------------------------------------------------------
(२) प्रादेशिक पक्ष कोणत्या बाबतीत आग्रही असतात ?
 उत्तर : प्रादेशिक पक्ष पुढील बाबतींत आग्रही असतात- (१) आपल्या प्रदेशातील समस्यांना प्राधान्य दिले जाऊन प्रदेशाचा विकास व्हावा. (२) प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या जाव्यात. (३) प्रदेशाची सत्ता त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. (४) प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशातील रहिवाशांनाच अग्रक्रम व प्राधान्य दयावे
--------------------------------------------------------------------------
. (१) प्रादेशिक पक्षांच्या स्वरूपात कोणते महत्त्वपूर्ण बदल दिसतात ?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळापासून अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक याच्या स्वरूपात पुढील बदल झालेले दिसतात- (1) स्वातंत्र्योत्तर काळात प्रादेशिक अस्मितांमधून द्रविडस्थान, वॉलस्थान यांसारख्या फुटीर चळवळी होऊन स्वतंत्र देश निर्माण प्रयत्न प्रादेशिक पक्षांकडून झाले.(२) त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिका बदलून स्वतंत्र राज्यांऐवजी राज्याला अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. (३) त्यानंतरच्या काळात आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या राज्यातील रहिवाशांना राज्यात व केंद्रात सत्ता मिळावी, अशी भूमिका प्रादेशिक पक्ष घेऊ लागले. (४) ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांनी फुटीरतेची मागणी सोडून आत्ता स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली आहे. येथील प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय प्रवाहात येऊ लागले आहेत.
-----------------------------------------------------------------------
(१०) आसाम गण परिषदेची उद्दिष्टे लिहा.
 उत्तर : १९८५ साली स्थापन झालेल्या आसाम गण परिषदेची पुढील उद्दिष्टे आहेत (१) आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे. (२) आसामच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. (३) आसामातील निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. (४) आसामच्या सर्वांगीण विकासासाठी १९८५ साली सरकारशी वाटाघाटी करून 'आसाम करार' करण्यात आला.
---------------------------------------------

(११) प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत ?
उत्तर : प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष लागू केले आहेत- (१) लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६ टक्के मते आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक किंवा (२) विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान ३ टक्के जागा किंवा विधानसभेत किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक आहे.
---------------------------------------------

 (१२) राजकीय पक्ष कोणती कामे करतात ?
 उत्तर : राजकीय पक्ष पुढील कामे करतात- (१) आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात. (२) सत्ता मिळाल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. (३) जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे व योजना जनतेपर्यंत नेतात. (४) शासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात.
---------------------------------------------
आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल?
• उत्तर : आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, त्याविरोधात विरोधी पक्षनेता म्हणून मी पुढील बाबी करीन- (१) सभागृहात सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरीन. सरकारच्या कामातील त्रुटी, सरकारचे दुर्लक्ष या बाबी दाखवून देईन.. (२) आरोग्य क्षेत्रात सरकारने काय केले नाही व काय करायला पाहिजे याबाबत वृत्तपत्रांतून लेख लिहून लोकांना जागृत करीन. (३) वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देऊन सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढीन. (४) जनतेला जागृत करण्यासाठी सभांचे, मोर्चाचे आयोजन करून जनआंदोलन उभारीन.
----------------------------------------------------------------------

आधुनिक काळात विहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल ?
 उत्तर : पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर पुढील बाबी केल्या पाहिजेत असे मला वाटते- (१) सर्व राजकीय पक्ष कायदयाने रद्द करावेत. (२) राज्यकारभाराबाबत लोकांनीच निर्णय घ्यावेत व त्यासाठी लोकशिक्षण करावे. (३) निर्णय घेण्यासाठी लोकांची क्षमता वाढवावी व त्यासाठी त्यांना राजकीय शिक्षण द्यावे. (४) समाजाचा आणि जे नेतृत्व करू पाहतात त्यांचा नैतिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे. (५) प्रत्यक्ष लोकशाही पद्धत आणावी, त्यासाठी लोकशाहीस आवश्यक असणारा मानवी स्वभाव तयार होणे आवश्यक आहे. (६) लोकसमित्या स्थापन कराव्यात. (७) शासनव्यवस्थेत विकेंद्रीकरणावर भर द्यावा. या सर्व बाबी करणे वाटते तेवढे सोपे नसून व्यावहारिकही नाही.
---------------------------------------------------------------------------
  • वर्तमानपत्रातील या बातम्यांवरून काय समजले ? 
(अ) सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार!
  • उत्तर : (१) सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.(२) विरोधी पक्ष जागृत आहेत व ते सामाजिक प्रश्न सोडवण्या आपापले मतभेद विसरून एकत्र आले आहेत. (३) सत्ताधारी पक्षाची अडवणूक करून सामाजिक प्रश्न सो हे विरोधी पक्षांचे कामच असते. (४) ते काम हे पक्ष एकत्रितपणे करीत असल्याचे या बातमीतून जाणवते. (ब) सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. उत्तर : (१) आपला पक्ष सामान्य जनतेत लोकप्रिय व्हावा व त्याचा प्रभाव खोलवर रुजावा म्हणून प्रत्येक पक्ष विविध मार्गांनी प्रयत्न करीत असतो. (२) ग्रामीण भागात प्रसारमाध्यमे मर्यादित असल्याने त्या जनतेशी थेट संवाद साधणे हा सत्ताधारी पक्षाचा यामागे एक हेतू असावा. (३) ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाने संवादयात्रांचे आयोजन केल्याचे जाणवते. सामान्य जनतेच्या अडचणी, भावना व मते समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असते. सत्ताधारी पक्षच हा संवाद साधत असल्याने, लोकांमध्येही सरकारबद्दल विश्वास निर्माण होतो. (४) सत्ताधारी पक्ष आपली कर्तव्ये योग्य तऱ्हेने पार पाडत असल्याचे या बातमीवरून जाणवते. सरकार आपल्याबाबतीत संवेदनशील आहे, या जाणिवेतून जनतेत सरकारविषयी विश्वसनीयता वाढीस लागेल.

-----------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा