Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi- itihas v rajyashastra ४ सामाजिक व राजकीय चळवळी

               ४ सामाजिक व राजकीय चळवळी



पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी २ गुण)
  (१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
   उत्तर : हे विधान बरोबर आहे;

   कारण - (१) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. (२) सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात. (३) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. (४) शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
------------------------------------------------------------------------

 (२) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
 उत्तर : हे विधान चूक आहे

; कारण - - (१) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. (२) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. (३) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
------------------------------------------------------------------------
(३) 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
उत्तर : हे विधान बरोबर आहे;

कारण (१) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. (२) भेसळ वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, 3) वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड दयावे लागते. (३) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६) साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी (ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
------------------------------------------------------------------------

(५) चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाि असतो. आज
हे विधान बरोबर आहे

 कारण - (१) चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले असते. (२) लोकांच्या प्रश्नांशी निगडित असणाऱ्या चळवळीसच लोक देतात. (३) लोकांच्या हिताच्या समस्या निवडून निश्चित कार्यक्रम ठरवून धारे जनसंघटन करण्याची गरज असते. यासाठी कोणतीही वळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो.
 
------------------------------------------------------------------------
(६) डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने जाते.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे;

 कारण (१) राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी - पुनरुज्जीवित केल्या. (२) 'तरुण भारत संघ' ही संघटना स्थापून शेकडो गावांमध्ये म्हणजे मातीचे बंधारे घालून नदया अडवल्या. (३) देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नदया वित करणे अशा मोहिमा राबवल्या. (४) डॉ. राणा यांनी देशभर ११ हजार 'जोहड' बांधले. सतत || वॉ केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना 'भारताचे जलपुरुष' या ओळखले जाते.
------------------------------------------------------------------------

पुढील संकल्पना स्पष्ट करा : (२ गुण)
  चळवळ.
  उत्तर : (१) एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात; तेव्हा तिला 'चळवळ' असे म्हणतात. (२) चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात.. (३) सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठीच चळवळी होतात असे नाही; तर शासनाच्या काही निर्णयांना वा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी होतात. (४) धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता, वाईट प्रथा-परंपरा इत्यादी विविध विषयांतील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात.

-----------------------------------------------------------------------

थोडक्यात दिया लिहा :
(१) आदिवासी चळवळ  प्रारंभापासूनच जंगली 

उत्तर : (१) आदिवासी उदरनिर्वाह करणारा समाज आहे. (२) ब्रिटिशांनी आदिवासीच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोड, संथाळ, मुंडा यांसारख्या आदिवासीनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते. (३) स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. (४) वनजमिनींवरील त्यांचे हक्क, वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत.

------------------------------------------------------------------------
(२) कामगार चळवळ.
 उत्तर : (१) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उदयोग सुरू झाले. या औदयोगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. (२) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. (३) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. (४) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

------------------------------------------------------------------------

(१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा,
उत्तर : (१) पर्यावरणाचा हास ही केवळ भारताचीच नव्हे; तर जागतिक समस्या बनली आहे. (२) पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या. (३) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत. (४) 'चिपको' सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, 'नमामि गंगे' सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, वैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.
------------------------------------------------------------------------
(२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
 उत्तर : (१) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. (२) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. (३) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.. (४) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
 ------------------------------------------------------------------------

(३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री-चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

  उत्तर : स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या (१) स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा. (२) स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे.(३) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. (४) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

------------------------------------------------------------------------

(४) 'चळवळी'ची वैशिष्टये स्पष्ट करा. 

उत्तर : (१) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो. (२) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते.. (३) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते. (४) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात. (५) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीचा निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.
------------------------------------------------------------------------

(५) चळवळींमधून कोणते प्रश्न हाताळले जातात ?
उत्तर : सार्वजनिक प्रश्नांमधून चळवळी उभ्या राहतात. हे प्रश्न सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकतात. (१) नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, स्वातंत्र्य अशा प्रश्नांसाठी राजकीय चळवळी होतात. (२) किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता, रोजगार, स्वदेशीचा वापर अशा आर्थिक प्रश्नांवर चळवळी होतात. (३) समाजातील अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता, भेदभाव अशा सामाजिक प्रश्नांवर चळवळी होतात. (४) भाषेवरील प्रदेशावरील अन्यायाविरोधात, स्वच्छता, पर्यावरण, शुद्धीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती अशा विविध प्रश्नांवरही चळवळी होतात.

------------------------------------------------------------------------
(६) कामगार चळवळीच्या प्रमुख मागण्या कोण आहेत? 

उत्तर : पुढील प्रश्न सोडवले जावेत, या कामगार प्रमुख मागण्या आहेत (१) कंत्राटी कामगार पद्धती व अस्थिर रोजगार.. (२) आर्थिक असुरक्षितता व कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता. (३) कामाचे अमर्याद तास आणि अनारोग्य. (४) कामगार कायदयांचे संरक्षण नसणे.
------------------------------------------------------------------------

(७) स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदललेले उद्देश सांगा.
 उत्तर : (१) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायकारक प्रथा नष्ट करून सुधारणा करणे हा स्त्रियांच्या चळवळीचा व राजकीय चळवळी(२) स्वातंत्र्योत्तर काळात संविधानाने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समानाधिकार दिले. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांना समाजात समान वागणूक दिली जात नव्हती. (३) त्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे, हे स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट बनले. (४) स्त्रियांना माणूस म्हणून दर्जा मिळावा, त्यांना समान हक्क मिळावेत हे स्त्री-चळवळीचे उद्देश आहेत.
------------------------------------------------------------------------

(८) स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्री-विषयक कोणत्या प्रश्नांची दखल घेतली गेली ?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात देशात विविध ठिकाणी झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने पुढील स्त्रीविषयक प्रश्नांची दखल घेतली गेली (१) स्त्रियांचे आरोग्य व त्यांचे शिक्षण. (२) स्त्रियांचे स्वावलंबन व त्यांचे सक्षमीकरण. (३) स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता.. (४) माणूस म्हणून मिळणारा दर्जा व त्यांची प्रतिष्ठा.

------------------------------------------------------------------------
(९) विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हायचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशात कोणत्या सक्रिय चळवळी झाल्या ? 

 उत्तर : विविध कारणांनी विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून कधी अल्पकाळ, तर कधी दीर्घकाळ चळवळी केलेल्या आहेत. (१) 'नर्मदा बचाव आंदोलन' ही सर्वात गाजलेली चळवळ. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांतील धरणग्रस्तांनी ही चळवळ २८ वर्षे चालवली आहे. (२) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबा धरण विस्थापितांनी ३२ वर्षे पुनर्वसनासाठी चळवळ केली. (३) दहशतवादाने विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचा पुनर्वसनासाठीचा लढा आजही चालू आहे. (४) नियोजित मुंबई-नागपूर महामार्ग किंवा पुरंदरमधील नियोजित विमानतळ यामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी आंदोलने केली. देशभर अशी अनेक आंदोलने वा चळवळी चालू असतात. 

------------------------------------------------------------------------

(११) शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाने कोणत्या योजना राबवल्या आहेत ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १४)
उत्तर : शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांपैकी काही योजना पुढीलप्रमाणे - (१) राष्ट्रीय कृषी विकास योजना (२) राष्ट्रीय अन्न संरक्षण व शेती विपणन पायाभूत सुविधा योजना (३) शेती फलोत्पादन योजना (४) एकात्मिक शेती योजना (५) जलयुक्त शिवार योजना (६) इंदिरा गांधी निराधार व शेतमजूर महिला अनुदान योजना (७) भूमिहीन शेतमजूर सबळीकरण व स्वाभिमान योजना (८) पीक विमा योजना इत्यादी. (टीप : या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाठात मजकूर दिलेला नाही.)
------------------------------------------------------------------------

(१२) 'कोणत्याही एक निश्चित विचारसरणी असते 'हे विधान स्पष्ट करा. (चर्चा करा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १२)
 उत्तर : (१) एखादा समाजहिताचा प्रश्न घेऊन चळवळी होत असल्या तरी प्रत्येक चळवळीमागे एक निश्चित विचारसरणी असते. (२) बालविवाह, हुंडा पद्धती अशा प्रथांविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळींमागे सामाजिक विचारांचे भान असते. (३) 'बेटी बचावो, बेटी पढावो', महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यासाठी होणाऱ्या चळवळीमागे सामाजिक समता, अन्यायपीडितेला संरक्षण हा विचार असतो. (४) स्वच्छता अभियान, चिपको आंदोलन, वृक्ष संवर्धन अशा चळवळी पर्यावरण संरक्षणासाठी तसेच मानवसेवा, संरक्षण यासाठीही केल्या जातात. लोकशाही, समता, बंधुत्व, मानवता अशा मूल्यांवर या चळवळींचा विश्वास असतो. अशा रीतीने प्रत्येक चळवळीमागे व्यापक विचारसरणी असते.
------------------------------------------------------------------------

तुमचे मत मांडा: (प्रत्येकी २ गुण)

 (१) विविध चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास स अधिक वाढेल, असे तुम्हांला वाटते का?
उत्तर : (१) विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत समाजात विविध चळवळी होत आलेल्या आहेत. या चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास त्यांचा प्रभाव अधिक वाढेल, असे मला वाटते, (२) सहकार्यामुळे समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठीचे खात्रीलायक उपाय शोधणे सोपे जाईल.. (३) परस्पर सहकार्यामुळे मनुष्यबळ विभागले जाणार नाही. कामाचे विभाजन होऊन श्रमशक्ती वाचेल. चळवळी अधिक प्रभावी परिणाकारक होतील. (४) समस्या याही एकमेकींशी निगडित असतात. एकीतून दुसरी समस्या निर्माण होते. म्हणूनच चळवळींनी परस्परांना सहकार्य करावे.

------------------------------------------------------------------------
 (२) भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्दयांबाबत आहेत ? 
 उत्तर: अनेक कारणांमुळे लोकांचे देशांतर्गत स्थलांतर होत असते. बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन गंच्या चळवळी उभ्या राहतात. त्यातील प्रमुख मुद्दे
 (१) भूमिपुत्रांच्या रोजगारांवर गंडांतर येते
 .(२) जमिनी बळकावल्या जातात.
 (३) जागांच्या किमती वाढतात.
 (४) भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावून घेतले जातात.
  (५) भूमिपुत्रांच्या भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण होते.
  (६) भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारीबरोबरच राजकीय प्रभावी कमी होतो

------------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा