Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi- itihas ८-पर्यटन आणि इतिहास

                    ८-पर्यटन आणि इतिहास

पुढील संकल्पना स्पष्ट करा
: (१) पर्यटन (प्रत्येकी २ गुण) 

उत्तर : (१) दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'पर्यटन' होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे 'पर्यटन' होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. (२) पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. (३) आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधांमुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. विसाव्या शतकात तर पर्यटनाकडे 'आधुनिक उद्योग' म्हणूनच पाहिले जाते. (४) स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला
-----------------------------------------------------------------------

(२) धार्मिक पर्यटन,
 उत्तर : (१) तीर्थयात्रेच्या हेतूने केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटन' होय. धार्मिकस्थळे, यात्रा, उत्सव, धार्मिक संमेलने, नदद्या- सागर यांत स्नान करून पुण्य मिळवणे या कारणांसाठी केलेला प्रवास धार्मिक पर्यटनात मोडतो. (२) हिंदू धर्माच्या उत्थानासाठी शंकराचार्यांनी केलेला प्रवास, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धाने आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला प्रवास, सेंट झेव्हिएर व अन्य ख्रिश्चन अनुयायांनी केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटनच होय. (३) महाराष्ट्रभरातून दरवर्षी पंढरपूर, शिर्डी येथे पदयात्रा करीत दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास म्हणजेही धार्मिक पर्यटनच होय. (४) गुरुनानकदेव, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी, तसेच बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चीनमधून भारतात आलेला श्वांग यांच्या भारतभ्रमणातून धार्मिक पर्यटनच पाहायला मिळते. युआन
 -----------------------------------------------------------------------


(३) वारसा मुशाफिरी (हेरिटेज वॉक).
 उत्तर : (१) ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला 'वारसा मुशाफिरी' (हेरिटेज वॉक) असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालसारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो, त्याला 'हेरिटेज वॉक' असे म्हणतात. (२) इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे, ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते. (३) अनेक हौशी संघटना गडकिल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात. पुणे-मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुशाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. (४) अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात.
-----------------------------------------------------------------------

(४) सांस्कृतिक पर्यटन.
 उत्तर : (१) भारताला विविध ललितकलांचा वारसा लाभलेला आहे. ठिकठिकाणी ललित महोत्सव साजरे होत असतात. या महोत्सवांसाठी केल्या जाणाऱ्या पर्यटनाला 'सांस्कृतिक पर्यटन' असे म्हणतात. (२) ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, एखादया स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास समजून घेण्यासाठी त्या स्थळाला भेट देणे हे सांस्कृतिक पर्यटन होय. (३) दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्यांच्या परंपरा समजून घेण्यासाठी केलेले पर्यटन, विविध भागांतील सण-उत्सवांच्या पद्धती पाहण्यासाठी केलेले पर्यटन हे सांस्कृतिक पर्यटनातच मोडते. (४) अनेक ठिकाणी होणाऱ्या नृत्य, संगीत महोत्सवात भाग घेण्यासाठी किंवा प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी केलेल्या पर्यटनाचा समावेशही संस्कृतिक पर्यटनात होतो.

-----------------------------------------------------------------------

प्र. टिपा लिहा •
(१) पाच परंपरा (प्रत्येकी २ गुण)

 उत्तर : (१) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला, (२) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लागली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते, (३) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत. (४) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
 
-----------------------------------------------------------------------

  (२) मार्को पोलो.
 उत्तर : (१) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. (२) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला. (३) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. (४) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविदधा यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

-----------------------------------------------------------------------
(३) कृषी पर्यटन.
 उत्तर : (१) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय. (२) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. (३) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे. (४) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझाएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.


(५) बता
उत्तर : (१) आजच्या मोरोक्को या देशात टॅन्जियर शहरात फेब्रुवारी १३०४ रोजी इब्न बतुता जन्माला आला. इस्लामी जगतार्थ प्रदीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील तो महान प्रवा होता. (२) एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास न करण्याचे धोरण ठेवून दक्षिण व पश्चिम आफ्रिका, दक्षिण व पूर्व युरोप, मध्य व आग्नेद आशिया आणि भारतीय उपखंड या प्रदेशांत त्याने प्रवास केला. (३) मुहम्मद तुघलकाच्या दरबारी न्यायाधीश म्हणून त्याने काम केले व त्याचा दूत म्हणून तो चीनमध्ये गेला होता.(४) या प्रवासाचे वर्णन त्याने 'रिहला' या पुस्तकात लिहून ठेवले आहे. मध्ययुगाचा इतिहास आणि समाजजीवन समजून घेणाऱ्या अभ्यासकांना बतुताचे हे लेखन उपयोगी पडते. प्रवासाविषयी बतुता आपल्या ग्रंथात म्हणतो की, 'प्रवास तुम्हांला आश्चर्याने मुग्ध करतो व नंतर गोष्टी घडाघडा बोलायला भाग पाडतो. '
----------------------------------------------------------------------

(६) गेरहार्ट मर्केटर..
उत्तर : (१) गेरहार्ट मर्केटर हा डच नकाशाशास्त्रज्ञ होता व भूगोलवेत्ता होता. (२) त्यानेच प्रथम जगाचा नकाशा व पृथ्वीच्या गोलाचे आरेखन केले. भिंतींवर टांगण्याचे मोठे व लहान आकाराचे नकाशे तयार केले.. (३) नकाशासाठी वापरला जाणारा 'Atlas' हा शब्द त्यानेच प्रथम वापरला व तो रूढ झाला. त्याने खगोलशास्त्रीय व वैज्ञानिक उपकरणेही तयार केली. (४) त्याने तयार केलेल्या जगाच्या नकाशांमुळे युरोपातील भू-शोधमोहिमांना गती मिळाली.

-----------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
 (१) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

 उत्तर : (१) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे. (२) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे. (३) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात.. (४) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.
-----------------------------------------------------------------------

  (२) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
  उत्तर : भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे; कारण - (१) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. (२) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. (३) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. (४) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे..
-----------------------------------------------------------------------

(३) 'माझा प्रवास' हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
 उत्तर : (१) विष्णुभट गोडसे यांनी १८५७ च्या दरम्यान महाराष्ट्र ते उत्तरेतील अयोध्यापर्यंत जो जाता-येता प्रवास केला, त्याचे वर्णन 'माझा प्रवास' या प्रवासवर्णनपर पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले आहे. (२) १८५७ साली भारतात ब्रिटिशांविरुद्ध जो पहिला स्वातंत्र्यलढा लढला गेला, तो काळ व त्या घटना विष्णुभटांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यामुळे या लढ्यातील बारीक सारीक घटना त्यांनी टिपल्या होत्या. (३) यांतील अनेक घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. हा स्वातंत्र्यसंग्राम आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील या पुस्तकात त्यांनी मांडले आहेत. (४) एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही या पुस्तकातून आपल्याला समजते. 'माझा प्रवास' हे पुस्तक विष्णुभटांनी अनुभवलेल्या घटनांतून तयार झालेले असल्याने ते तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
 
-----------------------------------------------------------------------
 (४) वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
 उत्तर : (१) भारतात पाश्चात्त्यांच्या वैदयकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. (२) नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकियांना वाटते. (३) भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येतात. (४) योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे, असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
-----------------------------------------------------------------------

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. 

उत्तर : ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना पर्यटक भेटी देतात. या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. (१) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. (२) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात. (३) घोडागाडी, रिक्षावाले अशा वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. (४) पर्यटक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोदयोग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो. थोडक्यात, पर्यटनस्थळे तेथील स्थानिक लोकांच्या उपजीविकेची साधने बनतात.

-----------------------------------------------------------------------
पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा : (प्रत्येकी ३ गुण) 

(१) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?
 उत्तर आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे - (१) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. (२) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. (३) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. (४) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
 
-----------------------------------------------------------------------

 (२) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती कशी होते ?
उत्तर : पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर पुढीलप्रमाणे रोजगारनिर्मिती होते (१) पर्यटनस्थळांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते. (२) पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते, त्यामुळे स्थानिक हस्तोदयोग व कुटीरोद्योगांचा विकास होतो. (३) स्थानिक खाद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो. (४) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात. प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक (गाईड) असे नवे रोजगार निर्माण होतात.
-----------------------------------------------------------------------

 (३) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?
 उत्तर : आपला परिसर कसा आहे, हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात (१) परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत. त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात. (२) समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल. (३) गांडूळ प्रकल्प, शून्य कचरा प्रकल्प, सोलर वीज प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील.
-----------------------------------------------------------------------

(४) बॉमस कुकचे कार्य थोडक्यात लिहा.
 उत्तर : (१) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामुदायिक सहलींचे व्यावसायिक तत्त्वावर आयोजन प्रथम थॉमस कुक याने केले. (२) ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वेने ही सहल नेऊन त्याने यशस्वी केली. त्यानंतर त्याने देशा-विदेशांत अनेक सहली आयोजित केल्या. (३) सहलींसाठी नवेनवे उपक्रम केले. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वी केली. पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. लोकांना परवडेल अशा दरात व सहज सोपा असा प्रवास घडवला. (४) थॉमस कुकच्या प्रयत्नांमुळे आधुनिक पर्यटन सुरू झाले.
-----------------------------------------------------------------------

(५) 'क्रीडा पर्यटन' म्हणजे काय ?
उत्तर : (१) खेळांमध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे 'क्रीडा पर्यटन' होय. विसाव्या शतकात क्रीडा पर्यटन हा नवा प्रकार उदयास आला आहे. (२) स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरत असतात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल व हॉकी स्पर्धा दरवर्षी होतात.. (३) विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होतात. दर चार वर्षांनी विविध देशांत एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या जातात, हिमालयीन कार रॅली, महाराष्ट्र व हिंद केसरी कुस्तीस्पर्धा अशाही स्पर्धा होतात. (४) या स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू, मार्गदर्शक, पंच, स्पर्धांचे आयोजक आणि प्रेक्षक या सर्वांचे होणारे पर्यटन क्रीडा पर्यटनात मोडते.
-----------------------------------------------------------------------

(६) धार्मिक पर्यटनाचे फायदे लिहा.
 उत्तर : तीर्थस्थळांना भेटी देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या धार्मिक पर्यटनाचे पुढील फायदे होतात (१) जगभरात विखुरलेले लोक धार्मिक उत्सवप्रसंगी एकत्र येतात. (२) परस्परांशी आलेल्या संबंधातून त्यांच्यात आपुलकी निर्माण होऊन एकात्मतेची भावना टिकून राहते.. (३) धार्मिक स्थळांना महत्त्व येऊन तेथे लोकोपयोगी कामे केली जातात. (४) अशी स्थळे विकसित झाल्याने स्थानिक व्यवसाय वाढून तेथील लोकांचे राहणीमान सुधारते व तेथील परंपरांचे, संस्कृतीचे जतन होते.
-----------------------------------------------------------------------
(७) महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे कोणती, ते लिहा.
उत्तर : महाराष्ट्रात पुढील पर्यटनस्थळे आहेत. (१) लेणी - अजिंठा, वेरूळ, धारापुरी (एलिफंटा), कार्ले, भाग इत्यादी. (२) प्रार्थनास्थळे - पंढरपूर, शिर्डी, शेगांव, कोल्हापूर, तुळजापूर, पैठण, आळंदी, जेजुरी, नांदेडचे गुरुद्वारा, मुंबईचे माऊंट मेरी चर्च इत्यादी. (३) थंड हवेची ठिकाणे - पाचगणी, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, खंडाळा. (४) धरणे - कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, भंडारदरा इत्यादी. (५) अभयारण्ये - ताडोबा, दाजीपूर, सागरेश्वर इत्यादी. (६) नैसर्गिक - जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले पश्चिम घाटातील कास पठार.

-----------------------------------------------------------------------
(८) पर्यटन वाढावे म्हणून महाराष्ट्रात कोणते प्रयत्न झाले ? 

उत्तर : पर्यटन वाढावे म्हणून महाराष्ट्रात पुढील प्रयत्न झाले (१) महाराष्ट्र सरकारने १९७५ साली 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'ची स्थापना केली. (२) या महामंडळातर्फे राज्यातील ४७ पर्यटनस्थळी पर्यटक निवासांची सोय केली गेली. त्यात चार हजारांहून अधिक पर्यटकांच्या निवासाची सोय होते. (३) सरकार आणि खाजगी व्यावसायिकांनी नव्याने पर्यटनस्थळे निर्माण करून ती विकसित केली किंवा आहेत ती पर्यटनस्थळे विकसित केली. (४) पर्यटक वाढावेत म्हणून पर्यटनस्थळी सोयीसुविधा वाढवल्या. स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या. माहिती पत्रके, अनुबोधपट तयार केले.
-----------------------------------------------------------------------
(२) भिलार गावाला 'पुस्तकांचे गाव' असे का म्हटले जाते ? 

उत्तर : (१) भिलार गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांना वाचता यावीत, यासाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. (२) या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो.. (३) महाराष्ट्र शासनाने वाचकांना आनंद मिळावा म्हणून व वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तके अनेक लोकांच्या घरी ठेवलेली आहेत. म्हणून भिलार गावाला 'पुस्तकांचे गाव' असे म्हटले जाते.
-----------------------------------------------------------------------
(३) पुस्तकांच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत ?
 उत्तर : भिलार येथे गावकऱ्यांच्या घरी ठेवलेल्या पुस्तकांत संतवाङ्मय, बालसाहित्य, कथा-कादंबरी, कविता, आत्मचरित्रे, स्त्री-साहित्य व क्रीडासाहित्य अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.
-----------------------------------------------------------------------

 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण)

  (१) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
 उत्तर : पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत (१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. (२) खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उदयोग, (३) हस्तोदयोग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. (४) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग. (५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. (६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात..
-----------------------------------------------------------------------

(२) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
 
 उत्तर : पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार - (१) ऐतिहासिक पर्यटन पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.(२) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. (३) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
-----------------------------------------------------------------------

(३) वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.
उत्तर : पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात - (१) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात.. (२) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो. (३) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. (४) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. (५) हस्तोद्योग, कुटीरोद्योग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. (६) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. (७) विविध प्रकारचे लोक, भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. (८) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते. (९) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. (१०) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो.
-----------------------------------------------------------------------
(४) पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा
. उत्तर : पर्यटनामागे अनेक हेतू वा प्रेरणा असतात. त्या पुढीलप्रमाणे (१) ऐतिहासिक वास्तू, किल्ले तसेच उत्खननात सापडलेली गावे-शहरे पाहणे... (२) प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, संग्रहालये पाहणे. (३) विविध तीर्थस्थळांना भेटी देणे. (४) समुद्रकिनारे, घनदाट जंगले, हिमशिखरे, नद्यांचे संगम, कासपठारासारखी वैशिष्ट्यपूर्ण पठारे, फ्लॉवर ऑफ व्हॅलीसारख्या दन्य पर्वत अशा निसर्गरम्य स्थळांचा अनुभव व आनंद घेणे. (५) निरनिराळ्या औदयोगिक प्रकल्पांना भेटी देणे. (६) औषधी वनस्पती पाहणे, संशोधन करणे, वैदयकीय उपचार घेणे अशा आरोग्यपूरक कारणांसाठी पर्यटन करणे. (७) फळबागा, शेती संशोधन, शेती प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प आदींसाठी केलेले कृषी पर्यटन. (८) खेळांच्या निमित्ताने केले जाणारे क्रीडा पर्यटन. (९) नृत्य, संगीत, महोत्सव यांत भाग घेणे वा प्रेक्षक म्हणून जाणे हे सांस्कृतिक पर्यटन, (१०) याशिवाय फिल्म फेस्टिव्हल, चित्रपट चित्रीकरण, विज्ञान संमेलने, आंतरराष्ट्रीय परिषदा, संवाद, पुस्तक प्रदर्शने, साहित्य संमेलने इत्यादी निमित्तानेही लोक पर्यटन करीत असतात.
-----------------------------------------------------------------------

(५) ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय पाहिजेत ?
उत्तर : ऐतिहासिक वास्तू या प्राचीन इतिहासाची साधने तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे, म्हणून त्याचे जतन आपण पाहिजे. त्यासाठी पुढील उपाय केले पाहिजेत (१) किल्ले, लेणी इत्यादी वास्तूंत खडकांतून झिरपणाऱ्या पाण्याम वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. (२) वास्तूंवर वाढणारी झाडे-झुडपे वेळीच समूळ नष्ट करावीत (३) उष्णता-दमट हवा यांमुळे वास्तूंची हानी होते. नवीन तंत्रज्ञान वापरून ही हानी टाळावी. (४) समुद्रात किंवा समुद्रालगत असणाऱ्या प्राचीन वास्तूंची खाऱ्या पाण्यामुळे व हवेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजन कराव्यात. (५) पर्यटकांनी या वास्तू कशा स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. (६) वास्तूंवर नावे कोरणे, त्यांची नासधूस करणे असल्या गोष्टी टाळाव्यात. (७) मानवी विध्वंसनापासून वास्तूंचे जतन होण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत. (८) ऐतिहासिक वास्तूंचे जतन का करायचे, याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे. (९) धरणांत किंवा अन्य प्रकल्पांत पाण्याखाली जाणाऱ्या वास्तू वेळीच अन्यत्र हलवाव्यात. (१०) या वास्तूंच्या जतनासाठी शासनाबरोबरच नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी व उदयोजकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत मिळते.

-----------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा