Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi- itihas ९ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

                   ९ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन



पुढील संकल्पना स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)
(१) अभिलेखागार.

उत्तर : (१) प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे 'अभिलेखागार' होय. (२) जे दस्तऐवज संग्रहालये वा ग्रंथालये यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारांमध्ये केले जाते. (३) हे दस्तऐवज शासनाला, संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिक- दृष्ट्या ग्रंथालये आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते. (४) अभिलेखागारांतील कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात.

--------------------------------------------------------------------------

(२) कोश.
 उत्तर : (१) शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय. (२) कोशवाङ्मयात ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केलेली असते. (३) शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे 'कोश' होय. (४) अचूकपणा, वस्तुनिष्ठता व अद्ययावतता हे कोशवाङ्मयाचे गुणविशेष आहेत. (५) उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे, हे कोशवाङ्मयाचे उद्दिष्ट असते. कोशात सत्याला व वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाजजीवनाचा आरसा असतात.
--------------------------------------------------------------------------

(३) शब्दकोश.
 उत्तर : (१) शब्दांच्या अर्थाच्या कोशाला 'शब्दकोश' असे म्हणतात. (२) वाचकांना शब्दांचा अर्थ सहजपणे समजावा व त्यांच्या शब्दांचा संग्रह वाढावा, या उद्देशाने शब्दकोशांची निर्मिती केली जाते.. (३) शब्दकोशात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती या बाबी दिलेल्या असतात. (४) शब्दकोश हे एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी अशा तिन्ही प्रकारचे असतात. (५) सर्वसंग्राहक शब्दकोश, परिभाषाकोश, विशिष्ट शब्दकोश, व्युत्पत्तिकोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी वाकप्रचार संग्रह कोश असे शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार आहेत.
--------------------------------------------------------------------------

(४) विश्वकोश.
उत्तर : (१) 'विश्वकोश' म्हणजे असा ग्रंथ की, ज्यात विश्वातील सर्व ज्ञान विषयानुरूप साररूपात एकत्र केलेले असते. (२) विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे एक मुख्य साधन मानले जाते. (३) विश्वकोशातील माहिती संशोधनपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते. (४) विश्वकोशाचे सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषययावरचे असे दोन प्रकार पडतात. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश असे विश्वकोश हे सर्वसंग्राहक कोश होत. तर भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश असे विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले विश्वकोश हे विशिष्ट विषयपर कोशात मोडतात.

--------------------------------------------------------------------------

(५) सूची वाड्मय.
 उत्तर : (१) 'सूची' म्हणजे यादी. सूची वाड्मयात ग्रंथाच्या अखेरीस विशिष्ट विषयावरील किंवा विशिष्ट कालखंडातील ग्रंथ, घटना, स्थळे, व्यक्ती, कागदपत्रे यांची सूची वा यादी दिलेली असते. (२) ही सूची बहुधा अकारविल्हे असते, त्यामुळे वाचकाला ती सहजतेने उपयोगी पडते. (३) ऐतिहासिक साधनांच्या सूचिग्रंथात विशिष्ट कालखंडातील व्यक्तींची नावे, शिलालेख, ताम्रपट, नाणी इत्यादींची यादी दिलेली असते. (४) वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेली 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' किंवा शंकर गणेश दाते यांनी तयार केलेली 'मराठी नियतकालिकांची सूची' असे सूची वाङ्मय प्रसिद्ध आहे. (५) सूचिग्रंथ हे इतिहासाच्या अभ्यासकाला ऐतिहासिक साधने म्हणून फार उपयोगी पडतात.

--------------------------------------------------------------------------
(६) चरित्रकोश.
 उत्तर : (१) समाजातील सर्व घटकांसाठी ज्या व्यक्तींचे कार्य प्रेरणादायी ठरले, अशा व्यक्तींची समग्र चरित्रे ज्या कोशात संग्रहित केलेली असतात, त्या कोशाला 'चरित्रकोश' असे म्हणतात. (२) चरित्रकोशातील माहितीमुळे अभ्यासकाला ऐतिहासिक काळातील आणि पौराणिक काळातील समाजबांधणी आणि सामाजिक संबंध कसे होते, हे कळते. (३) इतिहास संशोधकालाही चरित्रकोश उपयुक्त ठरतात. (४) एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर चरित्रकोश निर्मितीला सुरुवात झाली. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश हा र. भा. गोडबोले यांचा कोश भारतातील सर्व प्रादेशिक भाषांतील पहिला चरित्रकोश आहे.

--------------------------------------------------------------------------
(७) संस्कृती कोश.
 उत्तर : (१) एखादया समाजातील वा राष्ट्रातील धर्म, पंथ- उपपंथ, संस्कृती, रूढी, परंपरा यांचे सर्वांगीण वर्णन ज्या कोशात दिलेले असते, त्या कोशाला 'संस्कृती कोश' असे म्हणतात.(२) संस्कृती कोशामुळे विशिष्ट भागावर नांदत असलेल्या संस्कृतीवर प्रकाश पडतो. (३) आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला परिपूर्ण ज्ञान होते. विशिष्ट संस्कृतींमधील रूढी, परंपरा, धार्मिक-सामाजिक विचार, तत्त्वज्ञान, राहणीमान इत्यादींविषयीची माहिती संस्कृती कोशात दिलेली असते. (४) विविध संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना संदर्भ म्हणून संस्कृती कोश उपयुक्त ठरतात.

--------------------------------------------------------------------------

 (१) स्थल कोश. (प्रत्येकी २ गुण)
  उत्तर : (१) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. (२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. (३) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी 'प्राचीन भारतीय स्थलकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारशी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. (४) स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

--------------------------------------------------------------------------

2) विश्वकोश.
उत्तर : (१) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्ह यांनी १९६० साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ स्थापना केली. (२) मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी म विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता. (३) या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० प्रसिद्ध झाले आहेत.. (४) मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत..

--------------------------------------------------------------------------

 (३) संज्ञा कोश.
 उत्तर : (१) कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की, त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंध उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद वजागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. (8) ते संग्रहालय TR (9) नात (२) वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये; म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना 'संज्ञा कोश' असे म्हणतात. (३) संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण उत्तर मध्ये झाले. दर्भ (२) या म्युि येथे ठेव णून खनिजे, नमुने वै नक झाल्या, याचीही माहिती दिलेली असते. (४) म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते.
--------------------------------------------------------------------------

(४) सरस्वती महाल ग्रंथालय,
 उत्तर : (१) सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले. (२) व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. (३) या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. करण्या उ भेटोच्य एक य त्याचा राहिल इंडिय य ती (४) हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले..

--------------------------------------------------------------------------

५) लुव्र संग्रहालय,
 उत्तर : (१) अठराव्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लु संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या. (२) जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची याने रेखाटलेले 'मोनालिसा' चे चित्रही या संग्रहालयात आहे. (३) नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांतून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे. (४) सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे ३ लाख ८० हजारांहून अधिक कलावस्तू आहेत.
 
--------------------------------------------------------------------------

(६) ब्रिटिश संग्रहालय.
उत्तर : (१) अठराव्या शतकात लंडन येथे ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना झाली. (२) सर हॅन्स स्लोअन या निसर्गशास्त्रज्ञाने राजा दुसरा जॉर्ज याला दिलेल्या ७१ हजार वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंत अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने यांचा समावेश आहे. (३) इंग्रजांनी आपल्या जगभरातील वसाहतींमधून आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष या संग्रहालयात ठेवल्याने, येथील वस्तूंची संख्या वाढत जाऊन आजमितीस ही संख्या ८० लाख एवढी झाली आहे.

--------------------------------------------------------------------------
(७) नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी
, उत्तर : (१) अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे इ.स. १८४६ मध्ये 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी' हे संग्रहालय स्थापन झाले. (२) स्मिथसोनियन इन्स्टिटयूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली या म्युझियमचे काम चालते. हे नैसर्गिक इतिहासाचे संग्रहालय आहे. (३) प्राणी, वनस्पती, कीटक यांचे हजारो अवशेष व जीवाश्म येथे ठेवलेले आहेत. मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष ठेवले आहेत. खनिजे, दगड, शंख-शिंपले आणि पुरावस्तू यांचे बारा कोटींहून अधिक नमुने येथे संग्रहित केलेले आहेत. (४) हजारों पुरातत्त्व संशोधक या पुरावस्तूंचा अभ्यास व संशोधन करण्याचे काम येथे करीत असतात.

--------------------------------------------------------------------------
(८) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.
 उत्तर : (१) इंग्लंडचे राजे प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत- भेटीच्या स्मृत्यर्थ मुंबईतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी १९०४ साली एक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. १९०५ साली त्याची पायाभरणी होऊन १९२२ साली संग्रहालयाची इमारत उभी राहिली. संग्रहालयाला 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, ऑफ वेस्टर्न इंडिया' असे नाव देण्यात आले. (२) १९९८ साली या संग्रहालयाचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे झाले. (३) इंडो-गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आला. हे संग्रहालय कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागले आहे. (४) बौद्ध, जैन, हिंदू देवता यांची शिल्पे, नेपाळ, तिबेट आणि भारतात सापडलेल्या धातूंच्या व दगडी मूर्ती, भांडी, शस्त्रे इत्यादी प्राचीन वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. सुमारे पन्नास हजार पुरावस्तू येथे संग्रहित केलेल्या आहेत.
--------------------------------------------------------------------------


(९) भारतीय प्राचीन चरित्रकोश.
 उत्तर : (१) रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ साली 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश' प्रकाशित केला. (२) भारतीय प्रादेशिक भाषांतील हा पहिला चरित्रकोश मानला जातो. (३) या कोशात मनूपासून, महाभारतकालीन अशा प्राचीन व्यक्ती आणि स्थळे यांचे त्यांनी वर्णन केले आहे. (४) भारतवर्षात होऊन गेलेले प्रख्यात लोक, त्यांच्या स्त्रिया व त्यांचा धर्म, देश व त्यांच्या राजधान्या, त्यांतील नदया व पर्वत या पुत्र, सर्वांची माहिती व इतिहास या चरित्र कोशात दिलेला आहे.

--------------------------------------------------------------------------
(१०) भारतीय संस्कृती कोश.
 उत्तर : (१) पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या प्रदीर्घ काळात 'भारतीय संस्कृती कोशा'चे दहा खंड प्रसिद्ध केले. (२) या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास यांची माहिती दिलेली आहे. (३) महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण-उत्सव, पारंपरिक विचार, रूढी-परंपरा या सर्वांची दखल या कोशात घेण्यात आलेली आहे. (४) विविध ललितकला, पारंपरिक वस्तू, सण, देवता यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचकांना, अभ्यासकांना आणि इतिहासलेखनालाही हे कोश उपयुक्त ठरतात.
--------------------------------------------------------------------------

 प्र. ६ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
 (१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

   उत्तर : (१) ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात; तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते. (२) हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. (३) ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात. (४) इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी; म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात.

--------------------------------------------------------------------------

 (२) इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते
 . उत्तर : (१) इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. (२) प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. (३) प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते. (४) या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
--------------------------------------------------------------------------

(३) अभिलेखागारातील विश्वासार्ह मानली जातात. 'कागदपत्रे ऐतिहासिकदृष्टा स्पष्ट करा
 उत्तर : (१) प्राचीन दस्तऐवज, कागदपत्रे, अभिलेखागारांमध्ये ठेवण्यात येतात. या कागदपत्रांचे जतन करणे हे अभिलेखागारांचे काम असते. (२) अभिलेखागारांमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नाही. (३) ही कागदपत्रे सुरक्षित ठेवणे व त्यांत कोणताही बदल न करता ती शासनाला किंवा अधिकृत व्यक्तींना हवी तेव्हा उपलब्ध करून देणे, हे अभिलेखागार व्यवस्थापनाचे काम असते. त्यामुळे अभिलेखागारात ठेवलेली कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात.
 
--------------------------------------------------------------------------

 (४) प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते.
 उत्तर : (१) कोशांमुळे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचून त्याची जिज्ञासापूर्ती होते. (२) कोशांमधून ज्ञान, माहिती व संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. (३) कोश संशोधक व अभ्यासकांना त्यांच्या विषयाचे पूर्वज्ञान व माहिती देतात; त्यामुळे त्यात भर घालण्याची प्रेरणाही कोश देतात. (४) कोशवाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात, म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते..

--------------------------------------------------------------------------
(५) कोशांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात.
 उत्तर : (१) कोशांमध्ये गतकाळातील घटना, व्यक्तींचे क शब्दांचे अर्थ इत्यादी माहिती दिलेली असते. परंतु काळाच्या गतीबरोब ज्ञानाचाही विस्तार होत असतो. (२) नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येऊन नवीन शब्दांची भर पहले (३) नव्याने आलेली माहिती, ज्ञान, संकल्पना यांची भाषेत पडत जाते. (४) नवीन संशोधनामुळे भूतकाळातील घटनांचे संदर्भही बदल्य असतात. हे सर्व बदल, शब्द व माहिती कोशांमध्ये आली नाही. तर ते कालविसंगत ठरतात. म्हणून नव्या ज्ञानाची भर घालून को अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागता किंवा पुरवण्या काढाव्या लागतात.

--------------------------------------------------------------------------
(७) इतिहासाच्या साधनार्थ आपण जतन केले पाहिजे

उत्तर : (१) इतिहासाच्या साधनांच्या आधारेच वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जातो. ल न करता करून देणे. (3) लेखागारात वर्गीक र्ह मानली प्रक्रिय (२) या साधनांचा अन्वयार्थ लावूनच ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला जातो. न त्याची पद्धतीने (३) ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करूनच तत्कालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते. (४) या साधनांच्या आधारेच देशाची वैज्ञानिक, आर्थिक प्रगती कळू शकते. इतिहासाची साधने हा देशाचा ऐतिहासिक ठेवा असल्याने, त्यांचे आपण जतन केले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------

(१) मौखिक साधनांचे जतन व संवर्धन कसे करता येते ? असते.
उत्तर : मौखिक साधन हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. मौखिक साधनांचे जतन व संवर्धन पुढीलप्रकारे करता येते चे कार्य, (१) लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. तीबरोबर (२) मिळालेल्या साहित्याचा अन्वयार्थ लावणे. (३) या साहित्याचे वर्गीकरण करून विश्लेषण करणे. भर पडते. भाषेत पर (४) संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे.

--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा