Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी. 4. उत्तमलक्षण

दहावी मराठी.   ४. उत्तमलक्षणकृती १ : (आकलन कृती) 

 (१) आकृत्या पूर्ण करा : 

 (i) संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी -

(१) - अपकीर्ती सांडावी.

(२) - सत्कीर्ती वाढवावी.

(३) - सत्याची वाट दृढ धरावी

-------------------------- ------------

 (ii) कधीही करू नयेत अशा गोष्टी - 

     - पुण्यमार्ग सोडू नये.

     - पैज किंवा होड लावू नये.

     - कुणावरही आपले बोझे लादू नये.

     - असत्याचा अभिमान बाळगू नये.

----------------------------

■ पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी, ते लिहा : 


            गोष्टी                          दक्षता


   (i) आळस          -    आळसात सुख मानू नये

      

  (ii) परपीडा         -     परपीडा करू नये.

     

  (iii) सत्यमार्ग       -      सत्यमार्ग सोडू नये.

---------------------------------

■ तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.

  गुण  : (i) मी रोज व्यायाम करतो. 

          (ii) मी खोटे बोलत नाही. 

          (iii) मी आईला कामात मदत करतो.

दोष : (i) मला चटकन राग येतो. 

       (ii) मी ताटात अन्न टाकतो. 

       (iii) माझे अक्षर चांगले नाही.

---------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 ■ 'सभेमध्ये लाजों नये । बाष्कळपणे बोलों नये । या ओळीतील विचार स्पष्ट करा.

     उत्तर : 'उत्तमलक्षण' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.

          मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात - सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. 

    उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

--------------------------------------

■ 'अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥' या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

     उत्तर : संत रामदासांनी 'उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे. 

     संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा.. ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.

--------------------------------------

(३)'आळसें सुख मानू नये,' या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

 उत्तर : 'उत्तमलक्षण' या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.

           'आळस' हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. 'आळसे कार्यभाग नासतो।' या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात 'आळस हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये, आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्यअंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात. 

---------------------------------

■ 'जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । 

    पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।'

   उत्तर :  आशयसौंदर्य: 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.

    काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात- लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

    भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये' अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

--------------------------------

 दहावी मराठी

1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा