Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी . 5. वसंतहृदय चैत्र

दहावी मराठी  .  ५. वसंतहृदय चैत्र




 पुढील विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा :

   चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.

      उत्तर : वसंत हा ऋतुचक्रातील पहिला ऋतू. निसर्गातील सर्व जन्मांची, निर्मितीची, सर्जनाची सुरुवात या ऋतूपासूनच होते. त्यामुळेच सणासुदीला नटूनथटून तयार व्हावे, तसा निसर्ग आनंदोत्सवासाठी सिद्ध होतो. वृक्षवेलींवर नवनवी, कोवळी, टवटवीत पालवी पसरते. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा पानापानांतून वाहत असतात. असंख्य फुले आपल्या अंगाखांदयावर अनेक रंग लेवून सादर होतात. मधुर फळे झाडाझाडांवर डोलत असतात. मधुर रसाचा सुगंध वातावरणात भरून राहतो. वसंताच्या या उत्सवाची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये हा उत्सव टिपेला पोहोचतो आणि वैशाखात वसंत पायठतार होत असतो. म्हणजे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.

-----------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

(४) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडांची नावे लिहा: 

 (i) गुलाबी गेंद                             : मधुमालती

(ii) तांबूस रंगाची कोवळी पालवी    : पिंपळ

(iii) दुरंगी फुले                             : घाणेरी

------------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती) 

(१) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा : 

(i) निळसर फुलांचे तुरे            - कडुनिंबाचे झाड

(ii) कडवट उग्र वास               - करंजाचे झाड

(iii) तीन पाकळ्यांचे फूल        - माडाचे झाड

---------------------------

(२) योग्य जोड्या जुळवा : (उत्तर)

  (i) भुरभुरणारे जावळ  - इ) माडाच्या लोंब्या

  (ii) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी- (अ) करंजाची कळी

----------------------------------------------------

(३) पुढील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा :

  1)    शब्द          2)   प्रत्यय  3)  तत्सम वेगळा शब्द

 (i) गुळगुळीत          - ईत           -   करकरीत

(ii) अणकुचीदार    - दार         -  नोकरदार

  ------------------------------------------------------

(२) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.

   उत्तर : आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको. फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे.

       असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. त्याने आम्हांला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ- मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.

------------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

 (१) पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा : 

(i) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.

   -    चित्रलिपी ही खूप बारीक बारीक कलाकुसर असलेले सुंदर चित्र वाटते. मात्र, ही लिपी थोडीशी कळते, पण खूपशी कळतच नाही. अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्ये म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग थोडासा कळतो आणि न कळलेला भाग विराट असतो. विविध सुंदर आकारांतील पक्ष्यांची घरटी निसर्गाच्या या चित्रलिपीचा भाग बनतात. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो. म्हणून लेखिकांना ही घरटी निसर्गाच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे वाटतात. 

------------------------------------------------------  

(ii) माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.

      -   निसर्गाचे विराट रूप आपल्या चिमुकल्या मनात मावतच नाही. तरीही ते विराट रूप न्याहाळण्याची मनाची ओढ नष्ट होत नाही. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यातला आपणही एक घटक असतोच. म्हणून एखादे लोभसवाणे दृश्य, ते चिमुकले असले तरी, मनाला खिळवून ठेवते. त्या चिमुकल्या रूपातही विराट निसर्गाचे, अल्पस्वरूप का होईना, दर्शन घडते. हे अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो. तो अफाट निसर्गाच्या दर्शनाचा आनंद देऊन जातो.

------------------------------------------------------

(२) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

   उत्तर : चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंतऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंतऋतू ऐन भरात आलेला असतो. वसंतऋतूचे उत्फुल्ल दर्शन चैत्रामध्ये घडते. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच. किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

------------------------------------------------------

 (३) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून दया.

   उत्तर : चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी घरातील रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. राज्यनिर्मितीचे रहस्य शोधत बसण्यापेक्षा या चित्रलिपीचे वाचन करण्यातच लेखिकांचे मन रममाण होताना दिसते. आपण वाचन करताना विरामचिन्हांच्या जागी क्षणभर थबकतो. तसेच इथे प्रत्येक घरटे पाहताना विस्मयचकित होतो. निसर्गाचा चमत्कार पाहून अचंबित होतो. निसर्गाच्या इतक्या विलक्षण निर्मितीचे दर्शन घडल्यामुळे आपण आनंदाने मोहरून जातो. आपली नजर पुढे जातच नाही. मन तिथेच काही क्षण रेंगाळत राहते. लेखिकांना ही घरटी म्हणजे विरामचिन्हे वाटतात. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. ही घरटी निसर्गाचे रहस्य कळण्याचा आनंद देतात. अशी ही घरटी आपल्याला गुंगवून ठेवतात. आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेतात, म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.

 ---------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा