Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी १८. निर्णय

दहावी मराठी १८.  निर्णय


कृती १ : (आकलन कृती)

आकृत्या पूर्ण करा : 

 हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण

 - प्रमाणिकरण

  - प्रसंगावधान

------------------------------------

    दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये

-  रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात.

  - वागतातही माणसासारखे.

   - त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये

 - सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच हजार रुपये

------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृतों

 रोबोंना काम करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा :

-  (i) चार्जिंग सुरू करणे.

-(ii) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे. 

- (iii)सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे. 

- ((iv) डाव्या खांदयावरील पॉवर स्वीच सुरू करणे.

------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा. 

उत्तर: रोबो हे एक यंत्र आहे. माणूस हा एक मन व हृदय असणारा बुद्धिमान सजीव प्राणी आहे. रोबो सजीव नाही. हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. यंत्र असल्यामुळे ते कामे अचूक, अधिक वेगाने आणि सफाईदारपणे करीत असतात. त्यांच्यात कामचुकारपणा असण्याचा प्रश्न निर्माण होत नव्हता. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.

----------------------------------------------------------

 •  'तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

     उत्तर : मी माझे विचार एका उदाहरणाच्या साहाय्याने सांगतो. एक उच्चशिक्षित दरोडेखोर असतो. तो स्वतःच्या घरातल्या संगणकासमोर बसतो आणि संगणकामार्फत लोकांच्या बँक खात्यांमधून त्यांचे पैसे पळवतो. या दरोडेखोरांना मदत कुणाची होत आहे? त्या संगणकाची, यंत्राची. आता विचार करा. त्या यंत्राच्या जागी माणूस असता तर ? त्या माणसाने त्या दरोडेखोराला मदत केली नसती. म्हणजे आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन- दुर्जन, पाप-पुण्यवान है काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी की मदद करते; म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. 

--------------------------------------------------

•  "माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ ठरतो, 'या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. 

  उत्तर : हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय..

 --------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा