Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी 2. बोलतो मराठी....

 मराठी 

   2.  बोलतो मराठी.... 


■ पूर्ण करा :

1)  भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय 

  ● योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे

 ●क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे

---------––-----------–----

2) भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग

   ●- शब्दाचा मूळ अर्थ (वाच्यार्थ)

   ●- मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ (लक्ष्यार्थ)

---------––-----------–---------

3) भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग

  ● - क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे

 ● - मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न      वापरणे

  ●- शब्दकोश वापरणे

---------––-----------–--

■पुढील चौकटी पूर्ण करा : 

(i) हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद - बनवणे

 (ii) मराठी भाषेची श्रीमंती - शब्दप्रयोग

¡¡¡)मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -मारणे

 (iv) मराठी भाषेची खास शैली - वाक्प्रचार

(v) एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम- अर्थाचा अनर्थ

(vi) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे एक साधन  - शब्दकोश

(Vii) भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग - व्युत्पत्ती    शोधणे

(Viii) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - हवा 

--------––-----------–---------

■शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा - 

   ●- भाषेतली गंमत जाणून घेता येते.

   ●-  खूप नवीन माहिती मिळते. 

   ●-  शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, हे कळते. 

   ●-  आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. 

   ● -  शब्द मनात पक्का रुजतो.

-------–--–--------------------

 : (स्वमत / अभिव्यक्ती)

(१) लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा. 

   उत्तर : लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो... माझ्या मराठी भाषेत, अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे. तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध यांसारखे अजरामर ग्रंथ आहेत. उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्या आहेत. कविता आहेत. श्रेष्ठ दर्जाची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे वगैरेंसारख्या हजारो अतिरथी- महारथींचे विचारधन माझ्या मराठीत आहे. माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे. 

-----------------------------

(2) 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थछटा लिहा.

     उत्तर : 'तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की, “तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात. योग्य काय आणि अयोग्य काय, हे ठरवण्याची विवेकबुद्धी तुमच्याकडे आहे. तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल.” बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते. ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते, तेव्हा तिच्या मनातआपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. त्यांच्यासमोर कितीही डोकेफोड केली, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग त्यांना 'तुम्ही शहाणे आहात,' असे ऐकवावे लागते. येथे 'शहाणे' हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही मूर्ख आहात,' असेच म्हणत असतो. 

--------------------------

(४) 'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये,' या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

   उत्तर : परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणाला शंकाही येणार नाही. आता 'केक' या शब्दाचेच पाहा ना. मराठीत या वस्तूसाठी शब्दच नव्हता. अजूनही नाही. कारण ही वस्तू, ही संकल्पना मराठी समाजालाच नवीन होती. त्या नवीन वस्तूसाठी 'केक' हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा स्वीकारणे योग्यच होते. 

     मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना ! अलीकडे "ती पिवळीवाली दया,” “तो पांढरावाला पट्टा दाखवा" अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात.      

वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग' यांत कोणता फरक आहे ? 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना 'पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा ? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'वाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकांचे मत योग्यच आहे.

-----------------------------

■मराठी व्याकरण

◆पुढे दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा : (i) रस्ते (ii) वेळा (iii) भिंती (iv) विहिरी (v) घड्याळे (vi) माणसे. 

उत्तरे : (1) रस्ते - रस्ता. वाक्य : डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे. 

(ii) वेळा - वेळ. 

वाक्य : परीक्षेची वेळ जवळ आली.

 (iii) भिंती- भिंत. 

वाक्य : रंग लावलेली भिंत छान दिसते. 

(iv) विहिरी - विहीर.

 वाक्य : आमची विहीर खूप खोल आहे.

 (v) घड्याळे - घड्याळ.

 वाक्य : बाबांनी मला नवीन घड्याळ आणले.

 (vi) माणसे - माणूस. 

वाक्य : पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही.

-----------------------------

■गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा

● (i) ऐट, डौल, रुबाब, चैन. 

उत्तरे चेन 

●(ii) कपाळ, हस्त, ललाट, भाल.

उत्तर- हस्त 

●(iii) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय.

उत्तर-विनोद

 ●(iv) संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर-कांता

 ●(v) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध 

उत्तर- प्रज्ञा

-----------

■पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

●(i) पसरवलेली खोटी बातमी  : 

उत्तर अफवा 

●(ii) ज्याला मरण नाही असा

उत्तर- अमर 

●(iii) समाजाची सेवा करणारा 

उत्तर-समाजसेवक

●(iv) संपादन करणारा 

उत्तर-संपादक

----------------------------–-

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा