Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी 7. गवताचे पाते

 दहावी मराठी 7. गवताचे पातेकृती १ : (आकलन कृती)

 (१) आकृत्या पूर्ण करा :

(i) पानाची स्वभाववैशिष्ट्ये 

  - पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते.

  - गवतपात्याला क्षुद्र

-------------------------------------------------------------

(ii)  गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह

  - चिमणे

  - चिडखोर बिब्बा

  - क्षुद्र

  - अरसिक

 - चिमुकले

-----------------------------------------------------------------

कृती  : (आकलन कृती)

(२) आकृत्या पूर्ण करा :

   (i)  रूपककथेची वैशिष्ट्ये

 -  रूपककथा आकाराने लहान

  - अर्थघनत्व

  - आशयसमृद्धी

 - सूचकता

- नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरत

 - वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन

       लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.

------------------------------------------------------------

   (ii) गवतपात्याची स्वभाववैशिष्ट्ये

 - निवांत झोपता येणे आणि झोपेत सुखस्वप्ने

      पाहणे हेच सर्वोच्च सुख, गवतपाते मानते.

  - सुखस्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते.

 - चिडखोर.

   - गळणारे पान व गवतपाते यांच्यात एकच जीवनरस

      आहे, हे वास्तव गवतपाते समजून घेत नाही.

------------------------------------------------------------

 कृती: (स्वमत / अभिव्यक्ती) 

(१) 'माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

  उत्तर : माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आमच्या शेजारच्या वासंती काकू त्यांच्या मुलीला सातच्या आत घरात यायला लावतात. "तुम्ही मैत्रिणी कसल्या ग एवढ्या गप्पा मारता " हा त्यांचा प्रश्न असतो. माझी आजी सांगते, "ही वासंती संध्याकाळी मैत्रिणींशी गप्पा मारताना आईने घरी बोलावले की भडकायची!" हे दृश्य सगळ्याच वरांत दिसते. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र है आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. 

-----------------------------------------------------------------------

 (२)   गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते ? 

  उत्तर : मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते : 

      'आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले 44 ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत, आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे, असे वाटते, समोरचा चुकीचा आहे असे वाटते. 

         आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हांला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हांला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. 

------------------------------------------------------------------

 (३) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. 

  उत्तर : हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. 

         पट... पट... पट... 

         त्यांचा तो पट... पट... पट... असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, “अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात ! लागलंबिगलं तर नाही ना?" पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा ? तुला त्रास झाला का रे?" "छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?" " काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना !, काय करणार? "असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!" हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पशनेि! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती! ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला. पटापट जायला हवं एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित! 

-------------------------------------------------------------------------

(४)  पुढे दिलेल्या रूपककथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.  

  उत्तर : संपूर्ण जीवनाचे मर्म सांगणारी रूपककथा आहे ही. लहान रोपट्याला आपण शेजारच्या वृक्षाप्रमाणे उंच, भव्य व्हावे; असे वाटत असते. लहान असल्यामुळे त्याला भव्यता लाभत नाही. दुबळेपणा, क्षुद्रपणा पदरी येतो. मोठेपणाचे सुख लाभत नाही. म्हणून रोपटे शेजारच्या उंच वृक्षाकडे स्वतः मोठे होण्याची इच्छा व्यक्त करते. लहान लहान झाडेसुद्धा सुंदर असतात, हे वास्तव उंच वृक्ष रोपट्याला समजावून सांगू पाहतो. रोपट्याला ते पटत नाही. उंच वाढणे हे सुद्धा सुंदर असते, ही रोपट्याची समजूत असते. वृक्षाला तेवढ्यात कुऱ्हाड घेऊन येणारा लाकूडतोड्या दिसतो. म्हणजे मोठ्या वृक्षाचा मृत्यूच चालून येत होता. उंच व मोठा असल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला होता. रोपाला कोणीही हात लावत नाही. लहानपणातच सुख असते. मोठेपणात यातना असतात, हे येथे लक्षात येते. 

      तसे पाहिले तर रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते, मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते, मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.

---------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा