Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,३.आजी कुटुंबाचं आगळ

          आजी कुटुंबाचं आगळमाझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राह्यचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गांेदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवाकाका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न्चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न्ग्लास घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणनू सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचाकुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिलाती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न्आमची आई जेवायला वाढा यचीकिंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसताबसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असाे की धान्यनिवडायचं असो, सगळ्या िमळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पाव्हायच्या. सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. 


वरील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा

कृती एक
१)विधाने पूर्ण करा
(१) (i) स्वत:च्या कपाळावरचे गोंदण दिसू नये, म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे.
(ii) वर्ष-दीड वर्षाने जन्मणाऱ्या वासरांमध्ये एकाआड एक खोंड नक्की असे, म्हणून दावणीला कायम कपिलीचे बैल असत.
(i) सुनांनी चहा करून पिऊ नये, म्हणून ढाळजेतून सोप्या येऊन आजी सक्त पहारा करायची.

पुढील मुद्द्याच्या आधारे आजीचे चित्र रेखाटा:
(२) (i) आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
(ii) आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.
(iii) आजीचे सौंदर्य : आजीचे वय आता सत्तर वर्षांचे होते. उन्हापावसामुळे आजीची त्वचा रापली होती. पण तिचा मूळ गोरा वर्ण लपत नव्हता. तिचे दात मोत्यांसारखे चमकत होते. विशाल कान व धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा आला नव्हता.

(iv) आजीचे राहणीमान त्या काळात इकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.


(३) चूक की बरोबर सांगा :
(i) राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची.
(ii) आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते.
(iii) सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची.
(३) (i) बरोबर (ii) बरोबर (iii) चूक.


कृती २:
विधाने पूर्ण करा
(१) (i) मुलांनी भरपूर खावे-प्यावे व त्यांची आबाळ होऊ नये, म्हणून आजी त्यांना धपाटे घालून घालून खायला घाली.
(ii) प्रत्येक सुनेला प्रत्येक काम आलेच पाहिजे असा आजीचा आग्रह होता, म्हणून ती रोटेशनप्रमाणे काम बदलत जाई.
(iii) मुलांना दूध प्यायला देण्याबाबत सुना आपपरभाव करतील अशी भीती आजीला वाटे, म्हणून ती मुलांना गोठ्यातच दूध प्यायला लावी.

(२) पुढीलपैकी चुकीची वाक्ये दुरुस्त करून बरोबर वाक्ये व दुरुस्त केलेली वाक्ये पुन्हा लिहा :
(i) दुपारची कामे आटोपून आजी ढाळजेत यायची.
(ii) गाईने पान्हा सोडला की वासराला सोडायचे.
(ii) आजीच्या घरी एक गावरान गाय होती.
उत्तर-
(२) (i) दुपारच्या कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची.
(ii) गाईने पान्हा सोडला की वासराला धरून ठेवायचे.
(iii) आजीच्या घरी एक गावरान गाय होती.


कृती ३ : (स्वमत / अभिव्यक्ती)

*(१) आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं, या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा
उत्तर : आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपार पर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी दाळजेत यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्र सारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

(२) तुलना करा/साम्य लिहा
आगळ : वाड्याचे संरक्षक कवच आजी : कुटुंबाचे संरक्षक कवच
उत्तर : हा उतारा वाचत असताना प्रश्न पडतो की, आजीला आगळेची उपमा दयावी की आगळेला आजीची उपमा दयावी. मुळात आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा दार उघडताना ती भिंतीत आरपार ढकलावी लागे आणि दार बंद करताना, भिंतीत ढकललेली आगळ घडीला घरून ओढावी लागे हे खूप ताकदीचे व अवघड काम होते. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते प्रस्तुत उताऱ्यातील आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबातील सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते .

(३) आगळ लावण्याची/टाकण्याची पद्धत समजावून सांगा.
उत्तर : आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता. त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कड़ी बसले होते. त्या कडीला करून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते. दरवाज्याच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिं्तींत दोन कोनाडे केलेले असतात. त्यांपैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जाईल इतका खोल असतो. कहीला धरून आगळ कोनाड्यात पूर्ण ढकलली की दरवाजा उघडता येतो. दरवाजे बंद करते वेळी, कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरुन ओतून बाहेर काढली जाते आणि ते टोक दुसऱ्या भिंतीच्या कोन्यात अडकवले जाते. अशा तऱ्हेने आगळ बसवली की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही.

(४) दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पक कृती सांगा.
उत्तर : कधी कधी बैठ्या खेळांऐवजी मुले वेगवेगळ्या कल्पक कृती करीत असत. एखाद्या वेळी सरपणातली लाकडे काढून विटीदांडू किंवा भोवरे तयार करीत बसत. भिंगऱ्या तयार करण्यासाठी घेतलेला लाकडाचा तुकडा दगडावर घासून घासून त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करीत. हे मोठे कष्टाचे काम असे. चुलीची काजळी लागून लागून काळ्या कुळकुळीत बनलेल्या खापऱ्या पाटीवर घासून घासून पाठीला काळा कुळकुळीत रंग आणण्याचा प्रयत्न करीत बसत. बैलगाड्या बनवण्यासाठी ज्वारीची ताटे वापरीत. लाल माती आणून बैल बनवत बसत. गोल आकाराचे गोटे जमवून ते सर्व बाजूंनी दगडावर घासून घासून त्याने छान गोल आकार दयायचा प्रयत्न करीत बसत. अशा अनेक कल्पक कृती करण्यात मुले दंग होत.

(५) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर : या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तीवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.
या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचा अर्थ कुटुंबातील सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

(६) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर : ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

२ टिप्पण्या: