Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,६ वस्तू (कविता)

                               वस्तू                              



वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नाही कदाचित, पण तत्या मन असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड आनंदी होतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान दयावा त्यांना. वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून नंतरच्या काळातही. निष्कासित न होण्याची हमी दया. वस्तूंनाही  स्वच्छ राहण्याची आवड असते, हे हातांना लक्षात ठेवा. वस्तूंना जपावे, लाड करावे त्यापुढे. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा.

कवितेचा भावार्थ :

वस्तू कशा हाताळाव्या व कशा जपाव्यात, हे सांगताना कवी म्हणतात - कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. (वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो.) कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. (वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात.) खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा दयावा, बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान दयावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. (त्यांना तुमच्याबरोबरच राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाहीत.) फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन दया. (त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते.) वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जिवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत. (एखाद्या लहान गोजिरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे.) कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप दयायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. 


प्रश्न. पुढील कवितेच्या सूचनांनुसार कृती करा : 

कृती १ : (आकलन कृती) 


*(१) आकृत्या पूर्ण करा :

 (1) वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये 

१)सेवक असतात

2)स्वच्छता आवडते

3)माणसासारखे लाडावणे


2) वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी-आपला स्नेह

उत्तर-जीव ,मन

(२)(i) नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा -कृतज्ञतापूर्ण निरोपाचा

(ii) शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क -


 (३) (i) वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की वस्तू प्रचंड सुखावतात. 

(ii) आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही, याची वस्तूंना हमी दयावी.


कृती-2

आकृती पूर्ण करा

(१) कवींनी वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप 

वस्तू खावतात, वस्तू सेवक असतात. लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. 


(२) कारणे लिहा

 (i) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत; कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. 

(ii) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.


 (३)योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

 (i) वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते. 

(ii) वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी दया.


कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

(१) वस्तूंनाही असते आवड तुमचा दृष्टिकोन सांगा. स्वच्छ राहण्याची' याबाबत 

उत्तर : द. भा. पामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात. हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूता परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखादया लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांपोंचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे', म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची' या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे. *(२) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली, ते लिहा. नमुना उत्तर : माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली, त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोप्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वया गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी घडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले. ०(३) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल, ते सांगा. उत्तर : आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. स मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्यान मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित मातो विखुरली गेली. मी सोवतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले.तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू! तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विदघार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात- असे समजावून सांगितले तो मला 'सॉरी' म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.


 रसग्रहण 

 प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा : 'वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.' 

उत्तर : आशयसौंदर्य : 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे. 

काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

 भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.


(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २३)

 कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा

कंदील : फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?

विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज विजेरी उरली नाही.

कंदील : असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.

 विजेरी : ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.

 कंदील : हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो! 

विजेरी : तू तर उगाच मिणमिणता. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कसा लखलखतो मी! कंदील : अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो. तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.

विजेरी : तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस! कंदील : माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे. आता तुझी गरज नाही. विजेरी : हो. पण काळ बदलला. कंदील : असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा