Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,४.उत्तमलक्षण

              उत्तमलक्षण


श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।






कवितेचा भावार्थ:
उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात - श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. । १ ।।
पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. । २ ।। लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।। जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥। काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥ सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥६॥ कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥ स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ॥८।। सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ॥ ९ ॥ अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।

स्वाध्याय:

श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।

(१) (i) आकृत्या पूर्ण करा : |संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
(१) अपकीर्ती सांडावी.
(२) सत्कीर्ती वाढवावी.
(३) सत्याची वाट दृढ धरावी.


ii) कधीही करू नयेत अशा गोष्टी
i)पुण्यमार्ग सोडू नये.
ii)पैज किंवा होड लावू नये.
iii)कुणावरही आपले वोझे लादू नये. iv)असत्याचा अभिमान बाळगू नये.


(२) चौकटी पूर्ण करा :
 (i) संत रामदास सावधान होण्यास सांगतात ते
(ii) संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात
(iii) अंगी बाणावी अशी
(iv) प्रस्तुत ओव्या या ग्रंथामधून घेतल्या आहेत.

२)
i)संत रामदास सावधान होण्यास सांगतात ते -श्रोते
(ii) संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात -उत्तम गुण
(iii) अंगी बाणावी अशी-सर्वज्ञपणाची खूण
 (iv) प्रस्तुत ओव्या या ग्रंथामधून घेतल्या आहेत-श्रीदासबोध

 कृती २ : (आकलन कृती) (१) शब्दजाल पूर्ण करा : (6)
(i) जाऊ खाऊ घेऊ नये
१)वाट विचारल्याशिवाय जाऊ नये.
२)फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. ३)पडलेली वस्तू घेऊ नये.


 (१) (iii) सभेमध्ये हे करू नये.
-१)लाजू नये
-(२) बाष्कळपणे बोलू नये

२)पुढील व्यक्तीशी  कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
तोंडाळ(i) तोंडाळासी भांडू नये
संत-सत्संग खंडू नये


(३) पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी, ते लिहा : गोष्टी
(i) आळस -आळसात सुख मानू नये.
(ii) परपीडा-परपीडा करू नये.
 (iii) सत्यमार्ग -सत्यमार्ग सोडू नये.



 (४)असत्य विधान ओळखा :
 (i) संतसंग सोडू नये.
(ii) अपकार घेऊ नये.
(iii) व्यापकपण सांडू नये.
(iv) खोटेपणाच्या पंथाला जाऊ नये.
उत्तर- असत्य विधान-अपकार घेऊ नये.

(५)तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा
 नमुना उत्तर :
गुण :
(i) मी रोज व्यायाम करतो. (ii) मी खोटे बोलत नाही. (iii) मी आईला कामात मदत करतो.
दोष:
i)मला चटकन राग येतो
ii) मी ताटात अन्न टाकतो.
iii)माझे अक्षर चांगले नाही.


कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'सभेमध्ये लाजों नये। बाप्कळपणे योलों नये" ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर : 'उत्तम लक्षण' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत, त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात - सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी वालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळ पणे बोलू नये उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

 (२) अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची। या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
 उत्तर : संत रामदासांनी 'उत्तमलक्षण' या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे. संत रामदास म्हणतात - लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरले सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे. •


(३) आळसे सुख मानूं नये, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
 उत्तर : उत्तमलक्षण या ओव्यामप्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळम हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे. आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नासतो! या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे पड्विकार जातात. त्यात आळस' हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्यअंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

 पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :
'जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये। पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥
 उत्तर : आशयसौंदर्य : 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे. काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये. भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. 'तोडू नये, जोडू नये, सोडू नये' अशा सोप्या यमक यांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा