Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ मार्च, २०२४

3 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 ३ मार्चप्रार्थना - 

ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्येतिर्गमय....

→ श्लोक 

 मुसलमान सों दोसती, हिंदुअन सों कर प्रीत 'रविदास' जोति सभ राम की, सभ है अपने मीत ।। • रविदास दर्शन “मुसलमान आणि हिंदू या सर्वांसोबत आम्ही मित्रतेनं वागायला पाहिजे आणि सगळ्यांवर प्रेम केले पाहिजे. सगळे एकाच परमात्म्यातून झालेले आहेत. म्हणून सगळे आपले मित्र आहेत आणि कोणीही लहान मोठा नाही. ईश्वराच्या नजरतेत सगळे सारखे आहेत.” 

 

→ चिंतन

वाचन हा आपले व्यक्तिमत्व खुलविणारा आणि आपल्याला ज्ञानी बनविणारा छंद आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग अवांतर वाचनाच्या माध्यमातून करता येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा ज्या गतीने विकास होत आहे, त्या गतीबरोबर आपली गती राखावयाची असेल तर सतत वाचन करून आपण आपले ज्ञान वाढविले पाहिजे. ग्रंथांशी दोस्ती करून नवे विचार समजून घ्यायला हवेत. जर आपण वाचनछंदापासून अलिप्तच राहायचे ठरविले तर आपले अज्ञान दिवसेंदिवस वाढत जाऊन आपण ज्ञानाच्या क्षेत्रात मागासले राहू, आणि तेच अज्ञान आपल्याला मारक ठरेल.


कथाकथन 

- 'शाल आणि श्रीफळ : पुण्यात पेशव्यांच्या दरबारात एक मनुष्य गेला, तो हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तामीळ, तेलगू, गाली, उर्दू, सिधी व मल्याळी अशा एकूण दहा भाषा सारख्याच सहजतेने व अस्खलित बोलू शकतो पेशव्यांना म्हणाला, 'महाराज आपल्या दरबारी असलेले नाना फडणीस यांची चातुर्याबद्दल ख्याती आहे, तेव्हा माझी मातृभाषा कोणती आहे, हे त्यांनी सांगावें' पेशव्यांनी नानांकडे मनार्थक दृष्टीने पाहातच नाना त्या बहुभाष्याला मुद्दाम म्हणाले, हे पाहा. सध्या माझ्यापुढं एवढी कामे आहेत की, तुमच्याकडे लक्ष द्यायला मला नाही, तुम्ही दोन-तीन दिवस पेशव्यांचे पाहुणे म्हणून राहायला तयार असाल, तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन त्या बहुभाषी पाहुण्यानं ती गोष्ट | मान्य करताच, नानांनी त्याची राहाण्या-जेवणाची व्यवस्था अतिशय चांगल्या ठेवण्याच्या सूचना सेवकांना दिल्या, पाहुणा आला, त्याच दिवशी रात्री नानांच्या सूचनेनुसार त्याला असं जड व चमचमीत जेवण वाढलं गेलं, की जेवण होताच आणि मऊशार गाया गिद्यात आडवे होताच, त्याला गाढ झोप लागली. ते पाहून त्याला येणाऱ्या भाषा जाणणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन, नाना त्याच्या खोलीत गेले आणि त्यांनी एका सेवकाला त्याच्या तोंडावर पाणी शिंपडायला सांगितले. पाण्याचा हाबकारा तोंडावर बसताच, गाढ झोपी गेलेल्या त्या पाहुण्याची झोप चाळवली जाऊन अर्धवट गुंगीत 'हे काय? हे काय? अशा अर्थी 'आ शू! आशुं ।' असं म्हणू लागला. त्या बरोबर त्याला चांगला जागा करून नामा म्हणाले, 'पाहुणे, तुमची मातृभाषा गुजराथी आहे. खरं की नाही नागांनी पोजलेल्याक्तीमुळे झालेल्या त्या पाहुण्याने त्यांचे म्हणणे | दिलखुलासपणे मान्य केले आणि बरोबर आणलेली शाल व श्रीफळ त्यांना अर्पण करून, दुसऱ्या दिवशी तिथून प्रयाण केले. ' 


→ सुविचार 

• जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास प्राप्त होतो.

 • सफल व यशस्वी लोक उदार, मोठ्या मनाचे आणि उमेदी असतात. ते कधीही स्वतःबद्दल बढाया मारत नाहीत. 


→ दिनविशेष

 • हरी नारायण आपटे यांचा स्मृतिदिन (१९९९) - हरी नारायण आपटे हे मराठीतील सिध्दहस्त लेखक होते. ८ मार्च १८६४ - रोजी त्यांचा जन्म झाला. ते श्रेष्ठ कांदबरीकार होते. आपल्या लेखनसामर्थ्याने त्यांनी मराठी कांदबरीला नवे वळण दिले. ऐतिहासिक, सामाजिक अशा स्वतंत्र कादंबरीचे जनक म्हणून मराठी साहित्यात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कादंबऱ्यातून महाराष्ट्राचे यधार्थ वर्णन दिसून येते. त्यांनी तहानपणापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांनी लिहिलेल्या कादंबन्या म्हणजे उषःकाल, मी, पण लक्षात कोण घेतो?, यशवंतराव खरे, वज्राघात, गड आला पण सिंह गेला. या कांदबऱ्यांनी मराठी रसिकांना वेडे केले. त्यांचा ध्येयवाद त्यांच्या 'मी' या कांदबरीतून चित्रित झालेला आहे. पण लक्षात कोण घेतो?' या त्यांच्या कांदबरीत तत्कालीन ब्राह्मण स्त्रियांच्या हलारबीचे हृदयद्रावक चित्रण आहे. मराठी साहित्यात या कांदबरीचे स्थान | अनन्यसाधारण आहे. ३ मार्च १९१९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 


+ मूल्ये

+  • राष्ट्रप्रेम, मानवताप्रेम, साहित्यप्रेम.


अन्य घटना

 -• शालिवाहन शक सुरू. -००७८

 • इंग्रज सरकारने माघार घेतल्यामुळे सर्व देशाला चिंतेमध्ये टाकणारे महात्मा गांधीजींचे प्रदीर्घ उपोषण संपुष्टात आले. १९४३ 

 • टेलिफोनचा जनक - ग्रॅहॅम बेल यांचा जन्मदिन - १८३९ 

 • जमशेटजी टाटा - टाटा उद्योगसमूहाचे आद्य प्रवर्तक यांचा जन्मदिन - १८३९ +


 उपक्रम -

  • ह.ना. आपटे यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगा 

  • त्यांच्या कांदबऱ्यातील सुंदर वर्णने विद्यार्थ्यांना वाचून दाखवा

   • जमशेटजी टाटा यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय द्या. 

   • देशातील कोणत्याही टाटा कंपनीला भेट द्या. 


→ समूहगान -

• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... 


→ सामान्यज्ञान

 • स्वीडनमधील एक नाटककार अॅलन अॅकर ल्यूम्ब हे रामायणाचा स्वीडिश भाषेत अनुवाद करीत आहेत. तर संत तुकारामांच्या गाथेचा इंग्रजी अनुवाद प्रथमच मराठीतील कवी दिलीप चित्रे यांनी केला आहे. महाराष्ट्र विशेष

  • पहिली कापड गिरणी - मुंबई 

  • पहिले विद्यापीठ - मुंबई • पहिले जलविद्युत केंद्र - खोपोली 

  • पहिली सैनिक शाळा - सातारा 

  • लहान जिल्हा- मुंबई उपनगर 

  • लहान तालुका- झरीजामणी

   • पहिले मातीचे धरण - गंगापूर 

   • सर्वाधिक तापमान - चंद्रपूर.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा