Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २६ जून, २०२४

जून २६, २०२४

27 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 27 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

मंगलनाम तुझे सतत गाऊ दे.... 


श्लोक 

प्रकाशं च प्रवृतिंच मोहमेव च पाण्डव । न व्देष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानी कांक्षति || उदासीनवदासीनो गुणैयों न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेंगते ॥ समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्म संस्तुतिः ॥ मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्चते ॥ श्रीमद्भगवतगीता 

- जय जिजाऊ प्रकाश, प्रवृत्ति आणि मोह (म्हणजे अनुक्रमे सत्व, रज व तम या गुणांची कार्ये किंवा फले) प्राप्त झाली तरी त्यांचा जो व्देष करीत नाही. आणि प्राप्त न झाली तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, (कर्म फलाबद्दल) जो उदासीनसारखा राहणारा, सत्व, रज व तम हे गुण ज्याला विचलित करीत नाहीत, गुण (आपापले काम करीत आहेत एवढेच मानून जो स्थिर राहतो, विचलित होत नाही, म्हणजे विकार पावत नाही, जो सुखदुःखांना समान समजतो, जो स्वस्थ म्हणजे आपल्याच स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर झाला, माती, दगड व सोने यांच्याकडे जो समान दृष्टीने पाहतो, प्रिय व अप्रिय, आपली स्तुती ही ज्याला समसमान वाटतात, सदा धैर्याने युक्त ज्याला मान व अपमान मित्र व शत्रुपक्ष तुल्य म्हणजे एकसारखे, आणि (प्रकृति सर्व करते असे समजल्यामुळे) त्याने सर्व सकाम कर्माचा त्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हणतात. 



→ चिंतन 

'धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात.' धैर्यवान लोकांच्या जीवनाचे एकच ध्येय असते व ते म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होणे. अन्यायाच्या अंधारात मशाल होऊन घुसणे, घरातल्या थोड्याशा अंधाराला दूर करण्यासाठी दिवा लावता येतो पण, त्यापेक्षा भयंकर अंधार दूर करायचा तर पाजळती मशाल हवी. मशाल उलटी धरली तरी ज्वाळा वरच झेपावते त्याप्रमाणे धैर्यवान लोकांना कितीही प्रतिकार झाला तरी त्यांचे धैर्य कधीही खालावत नाही. ते सदैव तळपतच राहते.



कथाकथन

 'लोभी शेतकरी' : रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एकदा त्याला राजाकडून असे वचन मिळालं की तो एका दिवसात - | जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होइल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचं. दुसन्या | दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली; कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी | चालत राहिला; कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती. दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथं सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होतं. जास्तीत जास्त जमीन | मिळवायच्या लोभामुळे तो आता दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरु केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडं होतं. सूर्यास्त जवळ येऊ लागता तमा तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला, त्याला श्वास घेता येईना. तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या | ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली. त्याला पुरण्यात आलं त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली.



सुविचार -

 • 'श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत हाल 

 • 'जुलमाने विचार भरत नाहीत, उलट ते सुदृढ होत राहतात - झिनी 

 

→ दिनविशेष -

• 'शिवराम परांजपे यांचा जन्मदिन - १८६४ : शि.म.परांजपे यांना त्यांच्या नावापेक्षा लोकांनी क राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व फर्डे वक्ते होते. महाराष्ट्रात 'काळ' या वृत्तपत्राद्वारे देशाभिमानाची धगधगती ज्योत त्यांनी जनमानसात पेटवली | शुध्द स्वातंत्र्याचे प्रतिपादक म्हणून त्यांनी 'काळ' या वृत्तपत्रातून आपला ठसा उमटविला. काळमधील लेख इतके प्रक्षोभक असत की इंग्रज सरकार ते जात करीत असे. त्यांचे निवडक लेख 'काळातील निवडक लेख' या नावाने प्रसिध्द आहेत. मानाजीराव हे नाटक, विंध्याचल गोविंदाची गोष्ट या काय आणि 'मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास' हा ग्रंथ असे त्यांचे सकस साहित्य आहे. ब्रिटिश सरकारने 'काळ' वृत्तपत्रावर जामीनकीची कुऱ्हाड चालवून ते बंद पाडल्यामुळे या प्रतिभावंताची प्रतिभा कुस्करली गेली. पुढे त्यांनी 'स्वराज्य' वृत्तपत्र | काढले पण त्यात काळाचा आवेश आणि आग नव्हती. लो. टिळकांच्या निधनानंतर म. गांधींच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यात ते मनापासून रमले नाहीत. १९२९ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. नंतर प्रकृती खालावत गेली व २७ सप्टेंबर १९२९ साली ते कालगत झाले. काळातील तेजस्वी निबंधाचे जनक म्हणून त्यांची कीती मात्र काळावर मात करून अजरामर झाली आहे. 


→ मूल्ये 

• स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, बंधुता, निर्भयता. 


→ अन्य घटना

 • शूर मराठा सेनापती धनाजी जाधव स्मृतिदिन - १७१०. 

 • महाराजा रणजीतसिंहाचे निधन - १८३९ 

 • अंधत्वावर मात करून महान कर्तृत्व गाजवणारी अमेरिकन महिला हेलन केलर हिचा जन्म १८८०

 

 → उपक्रम

 • महाराष्ट्रातील वेगवेगळी वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या दाखवणारा तक्ता तयार करा..

  

 

→ समूहगान 

• बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या.... 

 

→ सामान्यज्ञान 

• सर्वात मोठा खंड - आशिया.

 • सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड. 

• सर्वात मोठा सागर - पॅसिफिक. 

• सर्वात मोठे वाळवंट • सर्वात सहारा

. • (ER) सर्वात लांब नदी मोठा ग्रह- ज्युपिटर (गुरु) नाईल.

मंगळवार, २५ जून, २०२४

जून २५, २०२४

26 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 26 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो....


श्लोक -

 आयुः सत्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विकप्रियाः ॥ कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्ण रुक्ष विदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ।। याययामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ 

 - श्रीमद्भगवतगीता  सात्विक मनुष्यांना, आयुष्य वाढविणारे, सत्वशुद्धि करणारे, बल आरोग्य, सुख आणि तृप्ति देणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे आणि मनाला आनंद देणारे आहार आवडतात. राजस मनुष्यांना कडु, आंबट, खारट, अति उष्ण, तिखट, रुक्ष म्हणजे शुष्क आणि दाहकारक असे हे दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारे आहार, प्रिय असतात. तामस मनुष्यांना, तीन तासांपूर्वी शिजवलेले बेचव, दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र अन्न आवडणारे असते. 

 

→ चिंतन

 'वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवतो.' कुठल्याही गोष्टीत काळजीपूर्वक काम करणे जरुरीचे असते. बेजबाबदारपणाने वागल्याने आपले भरून न येण्याइतके नुकसान होते. जर अंगातील कपडा थोडासा फाटलेला असला तर त्याला एक टाका घातला नाही तर मग तो कपडा अधिक फाटत जातो आणि दहा टाके घालायची वेळ येते. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्याकडे असेच काळजीपूर्वक लक्ष दिले तर नंतर तो वाईट मार्गाला लागल्याचे दुःख त्यांना भोगावे लागत नाही.


कथाकथन

 - 'छत्रपती शाहू महाराज' : (सर्व सद्गुणांचा उपासक) छत्रपती शाहू महाराज आणि भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले .तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेती. २६ जुलै १९०२ बहुजनांसाठी शाहू महाराजनांनी आरक्षण लागू केले. २८ वर्षाचा कालावधी त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविला. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक थंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरिबांचा, दीनदलितांचा राजा होता. विद्वानांचा चाहता होता. कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्याने क्षात्रजगद्गुरूचे धर्मपीठ स्थापन किले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठीपद निर्माण केले. बलुतेपद्धती नष्ट केली. पूर्वाश्रमीकाच्या गुन्हेगारांना मुक्त केले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. तळगाळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परत आले तेव्हा या दलित विद्वानाच्या भेटीसाठी उत्सुक असलेला हा राजा परळला सिमेंटच्या चाळीत त्यांना भेटायला गेला. कोल्हापुरात बोलवून त्यांचा त्यांनी मोठा सत्कार केला. त्याचे व्यक्तिमत्त्व लोकोत्तर होते. कलाप्रेम अगाध होते. माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाल गंधर्व, बाबूराव पेंटर, गोविंदराव टेंबे, भालजी पेंढारकर, केशवराव भोसले, अब्दुली करीम खाँ, शंकरराव सरनाईक अशा गुणसंपदेचा मेळा कोल्हापुरात महाराजांनी निर्माण केला. त्यांच्या सर सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंब्रीज विद्यापीठाने घेतली. त्यांना एल. एल. डी. ही सन्माननीय पदवी बहाल केली. राजाचे नाव जगभर झाले. ६ मे १९२२ हा स्मृतिदिन. 

 

→ सुविचार-

• शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनविणारे, असे शिक्षण आपल्याला हवे शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झाल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतात.


दिनविशेष 

- • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन -: जगात जसजशी भौतिक सुखाची रेलचेल झाली तसतसे माणसाचे मन अधिकाधिक सुखाकडे धाव घेऊ लागले. एकीकडे पैसे मिळवण्याची लालसा वाढली, तर दुसरीकडे सुखाचा उपभोग विकृत पध्दतीने घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. या विकृतीच्या विख्यात सापडलेल्या जगातील अनेक तरुणांची सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था जिवापाड परिश्रम करीत आहेत. वेगवेगळ्या शहरात केल्या जाणाऱ्या अशा अंमली पदार्थ निषेध प्रयत्नातून २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ निषेध दिन म्हणून पाळला जाण्याची कल्पना पुढे आली. या दिवशी सरकारी तसेच खाजगी संख्या, ज्या व्यसनमुक्तीचे काम करीत आहेत. वेगवेगळी पथनाट्ये, समूहनाट्ये, समूहगीते अशा माध्यमातून लोकांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावीपणे समजावून सांगतात व त्यांना दारू, चरस गांजा, ब्राऊन शुगर अशा अंमली पदार्थांच्या भयानक आकर्षणापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. पुण्यात येरवड्यानजीक चालविली जाणारी 'मुक्तांगण' ही संस्था डॉ. अनिता अवचट यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे समाजोपयोगी काम अनेक वर्षे करीत आहे. 


मूल्ये

 बंधुता, समता, निर्भयता

 • राजर्षी शाहु महाराज जयंती - १८७४ 


→ अन्य घटना राजर्षी शाहू महाराज जयंती १८७४

 • बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म १८८८. रसायन शास्त्रज्ञ डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे निधन - १९४४. युनोची स्थापना - १९४५. पुणे महापालिकेला कारभार मराठी भाषेतून करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली गेली - १९५८.

  • पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन - १९६८. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली १९७५. 

  • एअर इंडियाचे बोइंग विमान गौरीशंकर कोसळले - १९८२. 


→ उपक्रम

 आपल्या आसपासच्या वस्त्यांमधून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम दाखवणारी पथनाट्ये सादर करा. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी अशा प्रकारचे एक छोटेसे नाटक सादर करा. 


→ समूहगान 

ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा... 



→ सामान्य ज्ञान 

• सूर्य मंदिर कोणार्क(ओरिसा). 

• गुलाबी शहर जयपूर (राजस्थान). अफू अफूच्या झाडांना आलेल्या कच्च्या बोंडांना पाडलेल्या चिरांतून पाझरलेल्या व वाळून घट्ट झालेल्या रसाला 'अफू' म्हणतात. हा एक मादक विषारी पदार्थ आहे. नशेसाठी अफू सेवन केल्यावर पुनः पुन्हा तिची इच्छा होऊन मनुष्य व्यसनात गुरफटला जातो.

सोमवार, २४ जून, २०२४

जून २४, २०२४

25 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 25 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपुले घर.... 

 

→ श्लोक

 - वंदे मातरम् । सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम । सस्यशामलाम् । मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभ्रज्योत्स्नां - पुलकीत - यामिनीम् । फुल्लकुसुमितद्रुमदल - शोभिनीम् ॥ चार : सुहासिनीं, सुमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय 

 - हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जलांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृध्द बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधीत वाऱ्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही चंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस; आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस. हे माते. तुला आम्ही वंदन करतो. 

 

→ चिंतन 

- 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' जय- जिजाऊ ( जय सावित्री स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्. माझ्या मातृभूमीला माझे वंदन असो. वेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी. 



→ कथाकथन 

- 'आपल्यावरून जग ओळखावे' सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका लढाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा त्यापैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनांस विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलप्रमाणे राबवीत असे. धनी देईल ते खावयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे. काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे, असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोमिला. पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच. त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाव धाव रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस !" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला. तेव्हा त्याने त्याला विकत घेतले. आणि उलट त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले. हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. 'काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का बरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी, तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत सबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मला पहावेना, म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले. 



→ सुविचार

 • सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी

  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही- अब्राहम लिंकन

   • दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांची माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.


दिनविशेष - 

• 'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन - १८३८ बंकिमचंद्र चटनी ते राष्ट्रगीताचे जनक म्हणून. बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एकम प्रसिध्द होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी | होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी 'बंगदर्शन' हे बंगाली नियतकालीक सुरु केले. प्रे राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे उपल आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले. शुद्ध भाषा व बोली भाषा यांचा सुंदर संगम करून किमान वे वळण लावले व सामर्थ प्राप्त करुन दिले. आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या. बंगाली साहित्यात विनोदही बकिमचंद्रांनीच आणला. 'कमलकांतेर दातेर मधील विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिध्द आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती.एप्रिल १८९४)


→ मूल्ये 

स्वाधीनता, कर्तव्यदक्षता.


अन्य घटना

 इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारताने विश्वचषक जिंकला - १९८३. 

 

→ उपक्रम

 • सुप्रसिध्द बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा.


> समूहगान -

 • जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा... 

 

→ सामान्यज्ञान -

 • राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज.

 •  वि.वा.शिरवाडकर - कुसुमाग्रज. 

 • कृष्णाजी केशव दामले - केशवसुत.

 •  प्रल्हाद केशव -अत्रे केशवकुमार.

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी.

 • नारायण मुरलीधर गुप्ते बी.

रविवार, २३ जून, २०२४

जून २३, २०२४

24 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 24 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

- ऐ मातृभूमि तेरे परणों में सिर नवाउँ..... 


→ श्लोक 

शंभो दमस्तपः शीचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानविज्ञानमास्तिक्यं ब्रम्हकर्म स्वभावजम् ॥ शौर्य तेजो मृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् । दानमौश्वरभावश्च क्षात्रकर्म स्वभावजम्।। कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्मत्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्थापि स्वभावजम् ॥ 

- श्रीमद्भगवद्गीता मनाची शांती, इंद्रियनिग्रह, पवित्रता, सहिष्णुता, सरळपणा किंवा सत्यनिष्ठा, अध्यात्मज्ञान, विविधज्ञान श्रध्दा या गुणांनी युक्त अशी ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे असतात. पराक्रम, तेजस्विता, धैर्य किंवा मनाचा दृढनिश्चय, युध्दातून पळून न जाणे, दान,, औदार्य आणि प्रजेचे नेतृत्व हे "क्षत्रियाच्या कर्माचे गुण आहेत; हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म होय. तर शेतकी, गुरे बाळगणे, व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म होय. आणि तसेच दुसऱ्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.



 → चिंतन

  प्रयत्न करा यश मागे येईलच. - महर्षी कर्वे आपल्या संस्कृतीने नेहमीच कर्माचे महत्त्व सांगितले आहे. कर्म म्हणजे काम किंवा प्रयत्न. प्रयत्न करत राहणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करणाऱ्याला त्याचे योग्य ते फळ जरूर मिळते. आजवर जगाला आधुनिक युगात येईपर्यंत जे साहाय्य लाभले असे निरंतर प्रयत्न करणाऱ्या माणसांकडूनच ! अशा संशोधकांनी सतत प्रयत्न करुन नवे शोध लावले. अथक प्रयत्न करून कलाकारांनी यशाचे उंच मजले गाठले. भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, शिल्पकार करमरकर हे अशा प्रयत्नशील माणसांपैकी काही, ज्यांच्या अपार प्रयत्नांवर प्रसन्न होऊन यशश्रीने त्यांना माळ  



→ कथाकथन 'चारित्र्य' सचोटी, निस्वार्थीपणा, आत्मभान, निश्चित मत, धैर्य, निष्ठा आणि आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य. - | उत्तम चारित्र्यसंपन्न प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची अनेक वैशिष्टये सांगता येतात. • असे लोक कुठेही उठून दिसतात. असे लोक कोणत्याही प्रसंगात आपला तोल क्यू देत नाहीत. शांत, आश्वासक, आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण परंतु संयमित असं त्यांचं वर्तन असत.

 •या लोकांचा | आत्मविश्वास जबरदस्त असतो. पण, त्यात उद्धटपणा नसतो. हे लोक दुसऱ्याच्या भावना समजवून घेतात. • असे लोक सबबी सांगत बसत नाहीत. असे लोक सभ्य असतात. शिष्टाचार पाळतात. त्यासाठी अनेक छोटे-मोठे त्याग करायला तयार असतात. 

 • हे लोक आपल्या आधीच्या चुकांपासून घडे | घेवून त्या चुका सुधारतात.

  • असे लोक संपत्ती किंवा जन्मजात वारसा अशा गोष्टींची पर्वा करीत नाहीत. 

  • असे लोक कधीही दुसऱ्याचे वाटोळे करुन स्वतःचा फायदा करुन घेत नाही. असे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहातात. असे लोक सामान्यांप्रमाणे राहूनही प्रतिष्ठितांच्यात सहज वावरतात. असे लोक ढोंगी वा दांभिक नसतात. असे लोक मृदुभाषी व प्रेमळ असतात. हसतमुख असतात. जुलमाविरुद्ध उभे राहण्यास ते सदैव सिध्द असतात. • हे म्हणजे तुमच्या कामगिरीला विजय प्राप्त करुन देणारा सुवर्णस्पर्श. हे लोक किमया करून दाखवतात. हे लोक सहज ओळखता येतात, पण त्यांची व्याख्या करणं अवघड असतं. हे लोक लीलया जबाबदाऱ्या स्वीकारतात. हे लोक म्हणजे मूर्तिमंत नम्रपणा. असे लोक जय आणि पराजय या दोहोंनाही सारख्याच उमदेपणानं सामोरे जातात.

   • हे लोक नावलौकिक आणि संपत्ती यांच्या मागे धावत नाहीत. हे लोक म्हणजे शोभेची वस्तू नाही. हे लोक कणखर असतात.

    • तकलादू नसतात. यांच्या व्यक्तिमत्वाची प्रसन्न अनुभूती पूर्णपणे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. हे लोक विनयशील असतात. पण, अगतिक वा दीनवाणे नसतात. हे लोक उच्च अभिरुचीचे असतात. छचोर वा उच्छृंखल नसतात. हे म्हणजे मूर्तिमंत स्वयंशिस्त आणि सौजन्य असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक विजयातही नम्र असतात आणि पराभवातही अविचल व धीरगंभीर असतात. चांगल चारित्र्य म्हणजेच यश असतं. मुलांनो वरील वैशिष्टये अंगी जोपासा व उत्तम चारित्र्यसंपन्न व्हा. सुविचार

     • 'शूर माणसानं नम्र, धनिक माणसानं निगर्वी, ज्ञानी माणसानं शांत, तपस्व्यानं क्षमाशील, धार्मिक माणसानं सज्जन आणि उदार माणसाने विवेकी असणं हे त्यांचं भूषण आहे. तेव्हा सर्व माणसांच्या बाबतीत चरित्र्य किंवा सदाचार हे सर्वश्रेष्ठ भूषण आहे.' (शीलं परं भूषणम्- भर्तृहरि) "चित्र ही हाताची कृती आहे तर चरित्र ही मनाची कृती आहे.' 'आपले काम जवाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे. शेक्सपिअर



दिनविशेष

 • भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा स्मृतिदिन - १९८० : गिरींचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी झाला. ते शाळेत शिकत असतानाच ना. गोखले यांनी राष्ट्रीय निधीची व लो. टिळकांनी पैसा फंडाची योजना सुरु केली होती. या कार्यात छोट्या गिरीने हिरिरीने भाग घेऊन मदत मिळवून दिली. आपल्या मुलाने नामांकित वकील व्हावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना आयर्लंडमधील डब्लिन विद्यापीठात बॅरिस्टर होण्यासाठी धाडले. 'चुकूनही मांसाहार करणार नाही.' हे आईला दिलेले वचन त्यांनी निग्रहाने पाळले. आयर्लंड हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपड करीत होता. तेथील तरुण सशस्त्र उठावाच्या हालचाली करीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर भारतात सुध्दा सशस्त्र उठाव झाला पाहिजे, हे जाणून भारतीय तरुणांनी आयर्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. यात गिरी क्रियाशील कार्यकर्ते होते. बॅरिस्टर होऊन गिरी भारतात परत आले पण त्यांनी फक्त पाचच वर्षे वकिली केली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यानंतर निरनिराळ्या घटक राज्यात मिळून ११ वर्षे ते राज्यपाल होते. १९६७ साली उपराष्ट्रपती पदावर त्यांची निवड झाली. तर १९६९ साली ते राष्ट्रपती झाले. २४ जून १९८० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.


 → मूल्ये 

 स्वाधीनता, समता, बंधुता, निर्भयता. 


→ अन्य घटना

 • राणी दुर्गावतीचे बलिदान - १५६४ 


→ उपक्रम

 • भारताच्या राष्ट्रपतींची नावे व त्यांचा कार्यकाल लिहिलेले तक्ते तयार करा. 


समूहगान -

→ • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का... 


→ सामान्यज्ञान

 भारतातील साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'ज्ञानपीठ पुरस्कार' होय. १९८४ पासून मध्यप्रदेश सरकारने सुगम संगीतासाठी 'लता मंगेशकर' पुरस्कार सुरू केला. भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रत्येक खेळातील उत्कृष्ट खेळाडूस 'अर्जुन पुरस्कार' दिला जातो.

शनिवार, २२ जून, २०२४

जून २२, २०२४

23 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 23 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

असो तुला देवा माझा सदा नमस्कार....


 → श्लोक

  - यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ 

  - श्रीमद्भगवद्गीता जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा -हास होतो, आणि अधर्माचे वर्चस्व होते. त्या त्या वेळी हे भारता! मी स्वतः अवतीर्ण होतो. जग निसर्गाने घडविले. विज्ञानाने जगाला प्रगती दिली तर कलेने त्याला सौंदर्य दिले, प्रसन्नता दिली. कलांच्या आविष्कारने आपले नेहमीचं 

  

→ चिंतन 

कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे. २३ जून वार जीवन देखील रम्य भासू लागते. जेवताना सनईचे गोड स्वर कानी पडले, झोपताना अंगाईचे सूर ऐकू आले आणि पहाटे भूपाळीच्या गोड शब्दांनी डोळे उघडले तर कुणाला प्रसन्न वाटणार नाही? साध्या शब्दातून सांगायचे ते कवितेतून सांगितले तर ते हृदयात पोहोचते आणि त्याला सुरांची जोड दिली तर हृदयात रुजते. कला अशी माणसाला प्रसन्नतेचे वरदान देते.


→ कथाकथन

 'दृढनिश्चयी ध्रुवबाळ' फार पूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या एक होत नाह रुबीन दूसरी होती नावडती, तिचे नाव सुनीती सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम असे होते पण सुनीतीला मात्र दूर राहावे लागे. एके दिवशी काही मुलांबरोबर खेळत असता इतर मुलांनी तुझ्या वडीलांचे नाय काय, असे विचारले. काही तो धावत आईकडे आला व म्हणाला,' आई, माझे बाबा कोण? ते कुठे आहेत? 'ध्रुवाचे हे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली. बाळ, उत्तानपाद राजे जा तुझे वडील.' आईचे बोलणे ऐकताच ध्रुवाला खूप आनंद झाला व आई नको म्हणत असताना तो राजवाड्यात धावत आला. उत्तानपाद राज्य सेवा सिंहासनावर बसला होता. ध्रुवबाळाला पाहून राजाने चटकन त्याला उचलून घेतले व आपल्या मांडीवर बसविले नि तो प्रेमाने फुरवान नागला. इतक्यात सुरुची तेथे आली. राजाने ध्रुवाला मांडीवर बसविले हे तिला आवडले नाही. ती रागाने म्हणाली, 'महाराज, माझ्या उत्तमऐकती या प मांडीवर बसविले? त्याला खाली उतरया.' राजाने तिच्या बोलण्याकडे सक्ष न देता तो प्रवाशी गोड गोड बोलण्यात दंग होता. राजा ऐकत सुरुची अधिकच रागावली व तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. ध्रुवाला फार वाईट वाटले नि तो रडत रडत आपल्या आईको आजा व म्हणाला,' आई, असे का ग झाले?' सुनीतीने ध्रुवाची समजूत घातली. ती म्हणाली, 'बाळ आपण मनापासून देवाची भक्ती केली मजे ते मिळेल यावर ध्रुव म्हणला, 'आई, तो देव आहे तरी कुठे?" सुनीती म्हणाली, बाळ देव खूप लांब अरण्यात असतो.' आईये पोष ध्रुव आईला म्हणाला, 'आई, तर मग मी अरण्यात जाऊन त्या देवाला भेटतो' आई म्हणाली, 'बाळ तू अजून लहान आहेस. अरण्यात सिंह ते तुला त्रास देतील. तू आताच मला सोडून जाऊ नकोस' ध्रुवाने निश्चयाने सांगितले, 'आई, आता मी देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही. तु माझी काळजी करू नकोस.' लागलीच ध्रुव निघाला. तो खूप लांब अरण्यात शिरला नि एका झऱ्याच्या काठी असलेल्या झाडाखाली बसला. इतक्यात सेनानी आले. या लहानग्या मुलाला अरण्यात पाहून त्यांना नवल वाटले. ते ध्रुवाला म्हणाले.' बाळ, तू एकटा या अरण्यात कशाला आलास?' ध्रुवमा देवाला भेटायचे आहे. म्हणून मी देवाची प्रार्थना करण्यासाठी येथे आलो आहे.' नारदमुनींनी देवाची प्रार्थना करण्यासाठी ध्रुवाला एक मंत्र से निघून गेले. ध्रुवाने खूप वर्षे त्या मंत्राचा जप केला, त्याचा दृढ निश्चय नि भक्ती पाहून श्री विष्णुदेव त्याला प्रसन्न झाले नि म्हणाले, बाळ, तुम काय हवे ते माग, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे' ध्रुव बोलला, 'देवा, माझ्या आईला सुखी कर नि मला जेथून कोणी ढकलणार नाही अशी जागा दे तथास्तु" पुढे ध्रुवाने पुष्कळ वर्षे राज्य केले व शेवटी देवाने दिलेल्या जागी तो गेला. मुलांनो, आकाशात उत्तरेकडे जो तारा नेहमी एकाच जागी दिसतो तो ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो. तोच आपला ध्रुवबाळ. बरं का 

 


→ सुविचार 

•'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' 1 • जाती धर्माच्या भिंती ओलांडून पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त कलेत व दृढनिश्चियात आहे.



दिनविशेष - 

• भारतीय नभोवाणीची प्रथम ललकारी - १९२७ : २३ जून १९२७ रोजी संध्याकाळी ६ वा. भारतीय नभोवाणी मुंबईहुन अधिकृतपणे घुमली. याआधी २ वर्षापूर्वीपासून फक्त मुंबई शहराच्या कक्षेत कानाला यंत्र लावूनच कार्यक्रम ऐकू येत. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचाच समावेश कार्यक्रमात असे. ही नभोवाणी खासगी कंपनीच्या मालकीची होती. याच काळात पाश्चिमात्य देशातून रेडिओचा प्रसार झपाट्याने होत होता. हिंदुस्थानी लोकांकडून आपला फायदा होईल, अशा रितीने रंजन, शिक्षण देण्यासाठी रेडिओचे माध्यम उत्तम आहे. याची जाणीव तेव्हा ब्रिटिश राजसत्तेला झाली व त्यानी इंडिया कॅलेंडर केबल्स' ही खासगी कंपनी ताब्यात घेऊन 'इंडियन ब्रॉडकॉस्टिंग' या नावाने २३ जून १९२७ पासून हा सरकारी उद्योग म्हणून चालू केला. लॉर्ड आयर्विन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व नंतर सुप्रसिध्द गायक फैयाझखांचे संगीत मुंबईकरांना ऐकायला मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात नभोवाणीचा विकास झपाट्याने झाला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, परभणी आणि रत्नागिरी अशी नभोवाणी केंद्रे चालविली जात आहेत.


 → मूल्ये

  • कर्तव्यदक्षता, समता, निसर्गप्रेम. 

  

→ अन्य घटना

 • प्लासीची लढाई झाली व बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव होऊन ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली - १७५७ • नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) स्मृतिदिन - १७६१ • राष्ट्रमाता इंदिरा गांधींचे सुपुत्र व युवा नेते संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन - १९८० काँग्रेसचे जेष्ठ नेते व मुंबईचे माजी महापौर स. का. पाटील यांचे निधन - १९८१

 


→ उपक्रम

 • शाळेत एक शालेय नभोवाणी मंडळ स्थापन करा व दर आठवड्याला त्याचा कार्यक्रम करा. यात मागील आठवड्यातल्या बातम्या, एखादी मजेदार, आश्चर्यकारक माहिती व चांगली कामे केलेल्यांची मुलाखत सादर करा. 

 

→ समूहगान 

 • राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम्......


→ सामान्यज्ञान 

 • अरुंडेल रुक्मिणी देवी प्रसिध्द नृत्य कलाकार

  • नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक - 

 

नंदलाल बोस - प्रसिध्द शिल्प कलाकार 

• लता मंगेशकर - सर्वश्रेष्ठ गायिका

 • अरुडेल रुक्मिणी देवी प्रसिध्द नृत्य कलाकार

  • नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक

जून २२, २०२४

22 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 22 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू.... 

 

→ श्लोक

 न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्म संगिनाम् । जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन् ॥ 

 (ज्ञानी) पुरुषाने, कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञ लोकांचा बुध्दिभेद करू नये. (त्यांची बुध्दी विचलित करु नये) तर आपण स्वतः योगयुक्त (चित्त संतुलित ठेवून) होऊन सर्व कर्माचे नीट आचरण करीत त्यांच्याकडूनही सर्व कर्मे करवून घ्यावीत. (त्यांनाही प्रेरित करते संस्कार :- विद्वानांनी अनासक्तपणे कर्म करण्याचा उपदेश करण्याऐवजी आपल्या आचरणातून त्यांना अनासक्त राहून कर्म करण्यास प्रेरित करावे. 

 

→ चिंतन

 'समाजाचे पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा, स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी असते.' - लो. टिळक A पुढारी म्हणजे समाजाला पुढे नेणारा, जो पुढे असतो त्याचे मागील लोक अनुकरण करतात. म्हणून पुढे असणाऱ्या नेत्याने आपले वर्तन आदर्श ठेवायला हवे म्हणजे त्याच्या अनुकरणाने समाज आदर्श बनेल. आदर्श वर्तन म्हणजेच सदाचरण, धर्मनिष्ठा आणि त्यागभावना यांचा मिलाफ, असा आदर्श पुढारी ज्या ज्या देशाला लाभला त्या देशाने प्रगती करुन घेतली. मग तो भारत असो की जपान! 'विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.'


→ कथाकथन

 - 'लोकमान्यांचे धैर्योद्वार' : इंग्रजांच्या राजवटीतून देश मुक्त करण्यासाठी भारतभर आपआपल्या परीने प्रयत्न चालू होते. कुठे बाँब होते, कुठे क्रांतिकारकांच्या पिस्तुलांना गोरे अधिकारी बळी पडत होते. कुठे दारुच्या गुत्त्यांवर निरोधन केले जात होते, तर कुठे विदेशी कपडे जाळले जात होते. देशभर चालू झालेल्या या प्रकारामुळे चक्रावून गेलेले ब्रिटिश सरकार जुलूम व अत्याचार यांच्या जात्यात प्रजेला भरडून काढीत होते. अशा स्थितीत ब्रिटिशांनी चालविलेल्या या अत्याचारांवर खरमरीत आगपाखड करणारे 'हे उपाय टिकाऊ नाहीत', 'बाँबगोळ्याचे रहस्य' अशांसारखे जळजळीत अग्रलेख लो. टिळकांनी आपल्या 'केसरी' या वृत्तपत्रात लिहिले. लोकमान्यांवर ब्रिटिश सरकारचा राग होताच. त्याने त्यांना एकदा तुरुंगात टाकले होतेच. आता या अग्रलेखाचे निमित्त काढून ब्रिटिश सरकारने लोकमान्य मुंबईत असताना त्यांना अटक केली व तुरुंगात डांबले. त्यावेळच्या मुंबई राज्याच्या गव्हर्नर जॉन क्लार्कने १३ जुलै १९०८ रोजी त्यांच्यावर विविध आरोपांबद्दल न्यायालयात खटला भरला. मुंबईचे न्या. मू. दावर यांच्यापुढे खटल्याचे कामकाज सुरू झाले. लोकमान्यांनी आपल्यातर्फे वकील न देता, स्वतःच स्वतःची बाजू मांडली. सरकारी वकिलाने लोकमान्यांच्या विविध अपराधांचा पाढा वाचून ते कसे राजद्रोही आहेत हे दाखवून दिले; या उलट लोकमांन्यांनी ५ दिवसात एकून २१ तासांपेक्षाही अधिक बोलून, आपण कसे निर्दोष आहोत, ते मुद्देसूद सांगितले. पण काही झाले तरी ब्रिटिश सत्तेच्या ताब्यातील न्यायालय ते दोन्ही बाजूंचे म्हणणे केवळ रीत म्हणून ऐकून घेऊन ब्रिटिशधार्जिण्या ज्युरींच्या सल्ल्याने न्यायमूर्तींनी लोकमान्यांना त्यांच्या दोन अपराधांकरीता ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा दिली. तर तिसन्या अपराधाकरिता १०००रु. दंड ठोठावला. एचडी जबर शिक्षा ठोठावली असतानाही निश्चल राहिलेल्या त्या निर्भय महापुरुषाला न्या. मू. दावर यांनी विचारले, “दिल्या गेलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे काय? यावर लोकमान्य म्हणाले," न्यायालयानं जरी मला अपराधी ठरविलं असलं, तरी मी अपराधी नाही. एकूण लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी या न्यायालयाच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ अशी एक ईश्वरी शक्ती आहे. मी शिक्षा भोगल्याने, माझ्या देशबांधवांमध्ये या परकीय सत्तेविषयीचा असंतोष वाढीला लागून स्वातंत्र्याची घटका जवळ यावी, यासाठी या सत्तेने तुम्हाला मला शिक्षा देण्याची बुध्दी दिलेली असते." लोकमान्यांचे हे धैर्योद्रार ऐकून, न्यायाधीशासहित सर्व थक्क झाले. फुटत 


→ सुविचार 

जेथे जोन व नेट आहे आणि राष्ट्रातील प्रत्येक स्वी पुरुष एकजूट होऊन देशासाठी परमावधीचा त्याग करण्यास तयार आहेत -> तेथे विययश्री नेहमीच धावत येते' 



दिनविशेष - 

• इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी जन्मदिन १८०५ : मॅझीनी हा इटलीतील राष्ट्रवादाचा जनक मानला जातो. 'राष्ट्रवाद हाव धर्म होय' अशी त्रिकवण त्याने तुकडे-तुकडे झालेल्या इटलीला दिली. जुलमी सत्ताधीशांमुळे जनतेचे जीवन असह्य होत चालले होते. या जुलमाला विरोध करण्यासाठी कार्बोनेरी नामक सशस्त्र गुप्त संघटना निर्माण झाली. मॅझिनी या संस्थेचा सक्रीय सभासद होता. त्याच्या भावनाप्रधान राष्ट्रवादी लेखांनी त्याने इटलीच्या जनतेला प्रेरित केले. राष्ट्राच्या दुर्देवी परिस्थितीची सूचक अशी काळी फीत तो आपल्या दंडावर लावी. इटलीतून त्याच्या चळवळीमुळे त्याला हदपार करण्यात आले तेव्हा तो पॅरिसला गेला. तिथे त्याने 'यंग इटली' नावाची क्रांतिकारी संघटना स्थापना केली. गॅरिबाल्डीसारखे जहाल देशभक्त त्याच्या झेंडयाखाली एकत्र आले. इटलीची एकीकरण चळवळ यशस्वी होण्यासाठी मॅझिनीने चारित्र्य, शिक्षण, स्वार्थत्याग या गोष्टींवर भर दिला. राष्ट्रीय ऐक्य, उच्चार विचार स्वातंत्र्य व परकीयांपासून मुक्तता या मंत्राचा घोष त्याने सतत केला. लंडनला जाऊन तो तेथील कायमचा रहिवासी झाला व शेवटपर्यंत तेथूनच त्याने आपल्या राष्ट्रीय चळवळीची सूत्रे हलविली. १८७० साली इटली स्वतंत्र होऊन एक राष्ट्र बनले. या एकीकरण कार्यात मॅझिनीचा सिंहाचा वाटा आहे. 


→ मूल्ये

 स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता, कर्तव्यदक्षता.

 

 → अन्य घटना

  • पेशव्यांना वकील-इ-मुतालिक पदवी अर्पण - १७९२ • देशभक्त दामोदर हरी चाफेकर यांनी चार्ल्स रॅंडवर गोळ्या झाडल्या - १८९७ • लो. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा. १९०८ महानुभाव वाङ्मयाचे विद्वान व नामवंत साहित्यिक डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म १९०८ • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीचें निधन १९५३ महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर ३० टक्के जागा राखीव १९९४ • दक्षिणायनास प्रारंभ कर्क संक्रमण 

  

उपक्रम

• मॅझिनी या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील विचार निवडून फळ्यावर लिहा. • वेगवेगळ्या देशांच्या पराक्रमी देशभक्तांची माहिती जमवून एक हस्तलिखित तयार करा.


समूहगान

 • दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए.... 


सामान्यज्ञान

नेहमीच्या वापरातील धातूपेक्षा सोने जास्त जड आहे. पाऱ्यामध्ये ते तरंगते. १०६३ अंश सेल्सिअस तापमानाला ते वितळून त्याचा रस होतो; तर २९७० अंशाला सोने उकळू लागून त्याची वाफ होते.

जून २२, २०२४

21 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 21 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

- प्रार्थना देवा तुला, मिटू देरे बैर वासना.... 


→ श्लोक

 - यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥

 -  श्रीमद्भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कारण (हे पार्था । (अर्जुना) मी जर आळस झटकून (अतन्द्रितः) कर्म चार : करीत राहिलो नाही तर लोकही सर्व प्रकारे माझाच मार्ग अनुसरतील. ते देखील आळशी होऊन कर्म करणार नाहीत. संस्कार :- थोर व्यक्ती आळस सोडून सतत कर्म करीत राहिल्या तर सामान्य जनसुध्दा 

 

→ चिंतन 

- 'हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहीले पाहिजे.' - विनोबा भावे त्याचे अनुकरण करतील. हाताच्या पाच बोटांपैकी कुठलेच बोट दुसऱ्यासारखे नसते. पण तरीही एखादी वस्तू उचलताना ही पाचही बोटे एकत्र येतात. पाचच बोटे पण हजारो कामे करीत असतात. कारण एकत्र आल्यावर ती बोटे राहत नाहीत तर मूठ बनते. ही मूठ सामावूनही घेऊ शकते आणि ठोसा देऊन फेकूनही देऊ शकते. बोटे म्हणजेच माणसे व मूठ म्हणजे संघटना. जी शक्ती एकट्या माणसात नाही ती संघटनेत आहे. कृष्णासह गोपांच्या काठ्या लागल्या तेव्हा गोवर्धन उचलला गेला. संघटनेची शक्ती अपार आहे.


कथाकथन

 - 'उघड सत्य : संगीताची आवड असणारे एक कुटुंब होते. त्या कुटुंबातील एक लहान मूल फारच खेळकर होते. खेळताना ते संगीता वाद्ये ठेवलेल्या खोलीत आले, खोलीत सतार, पखवाज, तबला, बासरी अशी वाद्ये व्यवस्थित ठेवलेली होती. त्या मुलाने सतारीया या पि पखवाजावर बुक्क्याने मारले, तबल्यावर थापडा लगावल्या, समोर अनेक छिद्र असलेली बासरी पडलेली होती. तिला उचलून घेऊन ओटाला लावून पाहिली. काही वेळेने ते मूल तेथून निघून गेले. त्यांनंतर खोलीतील वाद्ये आपसात बोलू लागली. सतार म्हणाली, 'एक लहान मूल माझे कान ओवून गेले, असे का केले?" पखवाज म्हणाला, 'सतार, तू नेहमीच अकडून राहतेस म्हणून तुझे कान ओढले गेले.' सतार म्हणाली 'हे ठीकच झाले. माझा अकडबाजरा कळाला. परंतु तू मार का खाल्लास?" आता बासरी म्हणाली, ' बंधु पखवाज तू ढोल असला तरी आतून पोकळ आहेस आणि हा पोकळपणा बहुमूल्य वस्त्रांनी लपवून ठेवला आहे, तसेच तबल्याचे सुध्दा आहे. तोसुध्दा आतून पोकळच आहे. यासाठी पखबाज दादा तुम्हाला बुक्क्याचा मारा खाया आणि तबले भाऊ तुम्हाला चापटपुऱ्या खाव्या लागल्या,' असे बासरीने म्हटल्याबरोबर तिघेही एकदम तुटून पडताना म्हणाले, 'तुझ्यामधे असे कोणते गुण आहेत की तुझे त्या बालकाने आपल्या ओठाने चुंबन घेतले.' बासरी म्हणाली, 'मी सुध्दा तुमच्या प्रमाणेच पोकळ आहे. एवढेच नव्हेतर मला अनेक छिद्रे आहेत. परंतु मी आपला पोकळपणाच नव्हेतर स्वतःचे स्वरुपच झाकून ठेवले नाही. ते सर्वांनाच सहज दिसते.' 

 

→ सुविचार • ‘सत्य हे सूर्य प्रकाशाइतके उघड आहे. • सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र असले पाहिजे. सत्याचरणाने त्याची विनम्रता वाढत जाते.


 → दिनविशेष

  डॉ. हेडगेवार स्मृतिदिन - १९४० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने विख्यात असलेल्या देशव्यापी संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या एकावन्न वर्षाच्या आयुष्यात डॉ. हेडगेवारांनी आसेतुहिमाचल सान्या भारतभर सर्वांची हृदये एका सूत्रात ओवण्याचे जे काम केले त्याला जगाच्या इतिहासात तोड सापडणे कठीण आहे. डॉक्टरांनी कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन १९१४ मध्ये एल. एम. अँड एस. ही. पदवी मिळवली. नागपूरला येऊन व्यवसाय व सामाजिक कार्य दोन्हीस सुरुवात केली. प्रबळ संघटना नसणे हे या देशाच्या अवनतीचे कारण आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून निश्चयाने रोजच्या रोज एकत्र येणे, राष्ट्रीय विचारांचे चिंतन करणे फार आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले आणि अशा प्रकारचा शिस्तबध्द कार्यक्रम असणारी एक संघटना उभारावी असा संकल्प त्यांनी केला. | १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर अवघ्या पाच स्वयंसेवकांनिशी त्यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची' स्थापना केली. संघटनेसाठी संघटना या प्रमुख तत्वावर आधारित या संघटनेकडे चारित्र्य आणि शुचितेचे आशास्थान म्हणून पाहिले जाते. 

  

→ मूल्ये

 • स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता.



→ अन्य घटना 

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते. 

• कवी भूषण याने 'श्री शिवराजभूषण' हे दीर्घ काव्य पूर्ण केले - १६७४ 

• हिंदी - प्रचार संघाची स्थापना - १९३४ 

• सी. राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले - १९४८ 


→ उपक्रम'

एकी हेच बळ' या कल्पनेवर आधारित कथांच्या लेखनाची स्पर्धा घ्या. • चांगल्या हस्ताक्षराच्या मुलांची संघटना करून टिपण- वह्या, फलकलेखन, तक्ते तयार करणे ही कामे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा. -


> समूहगान - 

• कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा... 


→ सामान्यज्ञान

 - मराठी वाङ्मयातील पहिले

  • पहिली स्त्री कादंबरीकार साळुबाई तांबवेकर 'चंद्रप्रभा विरहवर्णन' - इ.स. १७६९

   • पहिले वृत्तपत्र - 'दर्पण'- संपादक बाळशास्त्री जांभेकर- इ.स. १८३२ 

   • पहिली सामाजिक कादंबरी- 'यमुना पर्यटन'- लेखक बाबा पद्मनजी - इ.स. १८६० शिलालेख शके ९०५ - -

    • पहिले उपलब्ध वाक्य - 'श्री. चावुण्डेरायें करवियले' श्रवणबेळगोळ

     • पहिला ग्रंथ - विवेकसिंधू - लेखक मुकुंदराज - शके १११०

      • पहिला गद्य चरित्रग्रंथ- 'लीला चरित्र' - म्हाईंभट्टांनी या ग्रंथात चक्रधर स्वामींच्या आठवणी समाविष्ट केल्या आहेत. शके १२०० 

      • आद्य कवियत्री महदंबा किंवा महदाइसा

       • पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे-'स्त्री-पुरुष समानता' इ.स. १८८५ 

       • मराठीतील आद्य गीताभाष्य- 'ज्ञानेश्वरी' 

       • मराठी रंगभूमीवरील नाटकालचा पहिला प्रयोग 'सीतास्वयंवर'- इ.स. १८४३ - विष्णुदास भावे यांनी या नाटकाचा प्रयोग घडवून आणला.

जून २२, २०२४

20 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 20 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 सावियेला दीप प्रेमे, तेवता ठेबू चला.....

 

 → श्लोक

  - यत् यत् आचरति श्रेष्ठः तत् तदेव इतरो जनाः। स यत्प्रमाणं कुरुते लोकः तद्नुवर्तते ॥ थोर पुरुष जे जे आचरण करतो ते तेच इतर (सामान्य) लोक आचरीत असतात. तो (थोर) ज्याला प्रमाण मानतो, त्यालाच प्रमाण मानून लोक अनुसरतात. - श्रीमद्भगवतगीता संस्कार :- थोरांचे अनुकरण करावे.

  

 → चिंतन

  'जगात खरे निर्मोही कोण असतील तर ते पक्षी आहेत.' - मारुती चितमपल्ली मानवाच्या आसपास पसरलेला निसर्ग त्याचा खरा गुरु आहे. माणसाला ज्या गोष्टी अंगी बाणणे शक्य नाही त्या निसर्गात सहजपणे आढळतात. स्वार्थापोटी जगात आज भांडणे, युध्दे चालली आहेत. पक्षी मात्र अशा स्वार्थापासून मुक्त आहेत. त्यांना घरट्याचा, पिल्लांचा तसेच अन्नधान्याचा मोह नसतो. जरुर संपली की त्या गोष्टींपासून ते मुक्त होतात. निरपेक्षबुध्दीने आनंदात राहण्याची कला त्यांच्या कडून शिकायला हवी..


कथाकथन

 'सूर्याच्या तेजाने भारतावर राज्य करीत असताना बहुतांश इंग्लिश लोक स्वतःला देव समजत होते, तर भारतीयांना ते माणसेही मानायला तयार नव्हते. म्हणून तर कलकत्त्यातील एका कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवित असता एक इंग्लिश प्राध्यापक भाषणाच्या ओघात म्हणाला, भारतीय लोक कुत्री आहेत. त्याचे ते विधान ऐकून वर्गातले काही विद्यार्थी काहीच झाले नाही असे समजून थंड बसले, काही विद्यार्थी आतल्या आत चरफडले, तर सुभाषचंद्र बोस नावाच्या एका सोळा वर्षाच्या तेजस्वी तरुणाने त्या प्राध्यापकाच्या दिशेने एखाद्या चित्यासारखी झेप घेतली "आम्हा भारतीयांना कुत्रे म्हणतोस?" अशी गर्जना करून त्या गोऱ्या प्राध्यापकाच्या सणसणीत कानफडात दिली. असली घणाघाती चपराक दुसऱ्या गालावर बसू नये म्हणून तो काळाठिक्कर पडलेला गोरा प्राध्यापक सुभाषला म्हणाला, “बाबारे! तुम्ही भारतीय कुत्रे नसून सिंह आहात हे मी आता कबूल करतो, पण माझा गाल अधिक रंगवू नकोस." अत्यंत बुध्दीमान असलेला हा सुभाष पुढे इंग्लंडला जाऊन आय. सी. एस. ची परीक्षा उत्तीर्ण करुन परत स्वदेशी आला. पण, मोठी मानाची सरकारी नोकरी करण्याऐवजी त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निश्चय केला. त्यावेळी भारत अखंड होता. लाहोर शहरात एक प्रचंड सभा होती. सुभाषचंद्र हे त्या सभेचे अध्यक्ष होते. सभा संपल्यावर एक मोठी मिरवणूक निघाली. बंदीहुकूम मोडून काढलेल्या या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीहल्ला सुरु केला. सुभाषबाबूंनाही लाठ्यांचे तडाखे बसू लागले. लोक म्हणाले, “बाबूजी! तुम्ही एका बाजूला चला.” यावर सुभाषबाबू म्हणाले, "का म्हणून? देशभक्तीचे व्रत घेतलेल्या माणसाने लाठ्यांच्या वर्षावाला पुष्पवर्षाव मानले पाहिजे." सुभाषबाबू पुढे भारतीय काँग्रसचे अध्यक्षही झाले. परंतु केवळ अहिंसक चळवळीने भारताला स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे हे ओळखून व इंग्लंड दुसऱ्या महायुध्दात सापडल्याची संधी आपला देश स्वतंत्र करून घ्यायला अनुकूल आहे. हे हेरून त्यांनी नजरकैदेतून निसटून जायचे ठरविले. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन त्यांनी झियाउद्दीन पठाणाच्या वेषात पेशावर गाठले. तिथून काबूल व काबूलहून जर्मनी, जपान इ. देशात जाऊन त्यांनी तिथल्या मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. | आपला देश स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नांना त्या नेत्यांकडून भरीव मदत मिळवून सुभाषबाबू शोनानला गेले. तिथे त्यांनी पूर्व अशियात राहणाऱ्या भारतीयांची एक सभा घेतली. याच सभेत, तिथे राहणारे एक थोर भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि सुभाषबाबूंना तिचे सरसेनापती पद दिले. सुभाषबाबू जिथे जिथे जात तिथे तिथे जमलेल्या भारतीयांना म्हणत, “तुम्ही मला तुमचे रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो," या आझाद हिंद सेनेसाठी तिथल्या भारतीयांनी अपार त्याग केला. सभेपुढे बोलणाऱ्या बाबूजींच्या गळ्यात फुलांचे हार पडत. सभा संपता संपता त्या हारांचा लिलाव होई. एकेका हाराला लोक एक लाखापासून सात लाखापर्यंत रुपये देत. स्त्रीयांसाठीही राणी लक्ष्मीबाई फलटण काढली होती. परंतु तेवढ्यात जर्मनी व जपान या सेनेला साहाय्य करणाऱ्या दोन्हीही राष्ट्रांचा त्यावेळी चालू असलेल्या महायुध्दात पराभव झाला आणि आझाद हिंद सेनेवर माघार घेण्याचा प्रसंग | आला. तरीही काही मार्ग सापडतो का, याचा विचार करण्यासाठी सुभाषबाबू रंगूनहून विमानाने बँकॉकला चालले असता. विमानात बिघाड होऊन ते खाली कोसळले व त्यात या भारतमातेच्या अलौकिक सुपुत्राचे जीवन समाप्त झाले. 


→ सुविचार

 •'अत्याचारांशी झगडण्यासाठीच मनुष्याचे जीवन आहे.' - सुभाषचंद्र बोस 


→ दिनविशेष पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा स्मृतिदिन - १९८७ : सलीम अलींच्या पक्षीअभ्यासाने त्यांना जागतिक स्तरावरले पक्षीशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. पक्षीप्रेमातून पक्षी-निरीक्षण करता करता त्यांची निसर्ग अभ्यासाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. त्यातून निसर्ग-संरक्षण चळवळ जन्माला आली. पक्ष्यांवर प्रेम करताना भारत हा शेतीप्रधान देश आहे याचा विसरही त्यांना कधीही पडला नाही. पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना सजीव साखळीतील एक घटक म्हणूनच त्यांनी पक्ष्यांकडे पाहिले. शेतकऱ्यांचे खरे शत्रू कीटक, पक्षी कीटकांचे भक्षक म्हणून जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगलेच पाहिजे हा त्यांचा दृष्टीकोन केवळ भाबड्या भूतदयेचा नव्हता. लहानग्या सलीमला लहानपणापासून पक्ष्यांचे वेड होते. त्यांच्या संग्रहात खारी, सरडे, पालीही होत्या. सलीमच्या वडीलबंधूंच्या हाताखाली सलीम पशुपक्ष्यांबद्दल खूप शिकला आणि पक्षीशास्त्रज्ञ व्हायचे त्याच्या मनाने घेतले व खरे करुन दाखविलेही. सलीम अलींनी तारुण्यात हा वसा घेतला तेव्हा त्याला समाजमान्यता नव्हतीच. उलट वेडाचारच म्हटले गेले. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणींची झळ त्यांना लागू न देण्यात आणि जीवनावश्यक गरजा मर्यादित ठेवण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्या पत्नी तेहमिनाने आणि वडीलबंधू हमीदभाई यांनी केली. आशियातील प्राणीशास्त्रातील, भारतीय पक्षी निसर्ग संरक्षणविषयक कार्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सलीम अलींना देशात, परदेशातूनही विविध सन्मान मिळाले. भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. 


→ मूल्ये 

• निसर्गप्रेम, भूतदया, विश्वबंधुत्व. 


→ अन्य घटना 

• दाहिर राजाचा वध ७१२ 

• टिळक विद्यापीठाची स्थापना - १९२१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे टोकिओस आगमन - १९४३ महाराष्ट्र राज्यात विद्युत मंडळाची स्थापना - १९६०. • ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व द.पु. करमरकर यांचे निधन - १९९१.


 → उपक्रम • सुंदर पक्षी पाहण्याचा छंद लावून घ्या. त्यांची चित्रे काढा. 


→ समूहगान

 • मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला..... 


सामान्यज्ञान

सर्वात उंच प्राणी जिराफ (आफ्रिका) (६ मीटर) सर्वात वेगवान प्राणी पेरेग्राइन ससाणा (सूर मारतानाचा वेग ताशी ३३० कि.मी.) • मोठा व वजनदार मासा निळा देवमासा (वजन २,००,००० किलोपर्यंत, लांबी २० मीटर)

जून २२, २०२४

19 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 19 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो....


श्लोक - तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर । असक्तो हयाचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ 

श्रीमद्भगवद्गीता वार : यास्तव (म्हणून तस्मात्) तू आसक्तरहित होऊन सतत कर्तव्य कर्म करीत रहा. कारण आसक्त न होता कर्तव्य करणारा मनुष्य श्रेष्ठ स्थान प्राप्त करतो. संस्कार :- आसक्त न होता कर्तव्य कर्म करीत राहावे.


 → चिंतन

  'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी' - मनुष्याला सर्वश्रेष्ठ देणगी मिळाली आहे ती बुध्दीची. या बुध्दीचा उपयोग करून माणसाने अधिकाधिक ज्ञान व विद्या मिळविली पाहिजे. या विधेमुळेच निसर्गात मानवाने सर्वात जास्त प्रगती केली. तो श्रेष्ठ बनला व या साऱ्या विश्वाचा प्रमुख बनला. आपण अशी ही मनुष्याला श्रेष्ठ बनविणारी विद्या मिळवित राहण्यासाठी धडपडले पाहिजे. मनुष्य जीवनभर विद्यार्थी बनून नवनवे ज्ञान ग्रहण करीत राहीला तरच त्याच्या मनुष्यजन्माचे सार्थक आहे. नाहीतर त्याच्यात आणि पशुच्यात अंतर ते काय? विद्यादेवीची उपासना केल्याने ज्ञान मिळते. या ज्ञानाच्या प्रकाशाने आपले अवघे आयुष्य उजळून जाते.


→ कथाकथन

 'खऱ्या कमाईतील यश' फार प्राचीन काळी एक राजा होता. जवळच्याच जंगलात एक गरीब ब्राह्मण राहत असे. त्याला एक मुलगी होती. ती उपवर झाली होती. विवाह करण्यास पैसे नसल्याने पत्नीच्या सल्ल्यानुसार तो ब्राह्मण राजाकडे घन मागण्यास गेला. राजा उदार होता. त्याने दहा हजार रुपये दिले. ब्राह्मण म्हणाला, "हे फारच कमी आहेत." राजाने पुन्हा दहा हजार रुपये दिले. पुन्हा ब्राह्मण म्हणाला," हे फारच कमी आहेत.' असे ४-५ वेळा झाले. शेवटी राजाने संपूर्ण राज्य दिले. तरीसुध्दा ब्राह्मण, "हे फारच कमी आहे" असे म्हणाला. शेवटी दीनवाणे होऊन राजाला म्हणाला, आपण जे शुध्द धन मिळविले, त्यातील थोडे जरी दिले तरी माझ्याकरिता खूप आहे. तेच काम मला द्यावे." राजा म्हणाला, “ मी उद्या सकाळी आपणास असे धन देईन." त्यानंतर राजा रात्री दहा वाजता आपला वेष बदलून शहरात फिरावयास गेला. त्याला दिसले, संपूर्ण नगरातील लोक आपापल्या घरी सुखाने झोप घेत आहेत. परंतु एक लोहार मात्र अजूनही काम करीत आहे. राजा लोहाराजवळ गेला आणि म्हणाला," मी गरीब माणूस आहे. आपणाकडे | मला करण्यास योग्य असेल ते काम द्यावे." लोहार म्हणाला, “माझ्याजवळ एवढे काम आहे. जर तू सकाळपर्यंत हे काम करशील, तर मी तुला चार आणे देईन" राजाने ते काम तर केलेच, याशिवाय अर्धे काम जास्त केले. त्याबद्दल लोहाराने त्याला चार आणे दिले. चार आणे घेऊन राजा घरी आला आणि ठरल्याप्रमाणे ब्राह्मणास दिले. ब्राह्मण सुध्दा संपूर्ण राजपाट सोडून निव्वळ ते चार आणे घेऊन गेला व ते आपल्या पत्नीला दिले. ते पाहताच पत्नीला खूप राग आला. तिने ते चार आणे अंगणात फेकले. दुसऱ्या दिवशी अंगणात चार झाडे उगवली. त्या झाडांना रत्नांची फळे लागली होती. ब्राह्मणाने मुलीचे लग्न केले. तो राज्यातील सर्वात मोठा धनवान झाला. ही बातमी राजाच्या कानावर गेली. संपूर्ण नगर आणि राजा सुध्दा ती झाडे पाहण्यासाठी आला व आश्चर्य | करू लागला. ब्राह्मणाने राजासमोर ती झाडे उपटली व ते चार आणे दाखविले आणि सांगितले, “तुमची राजवट सोडून तुमची हीच इमानदारी आणि | कष्टाची कमाई मागितली होती. खरी कमाई सुरुवातीला फारच थोडी दिसते. परंतु पुढे ती माणसाला सर्व प्रकारचे सुख आणि शांती देत असते." 

 

→ सुविचार-

 • 'कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो.

 ' • 'विद्वानांनी सत्यासत्याचे खरे स्वरुप मांडावे आणि सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करुन आनंदात रहावे.' दयानंद



→ दिनविशेष

 फ्रेंच गणितज्ञ पास्कल जन्मदिन - १६२३ : या प्रसिध्द फ्रेंच गणितज्ञ व तत्वज्ञानी विद्वानाचा जन्म १९ जून १६२३ रोजी क्लेरमॉट फेरान येथे झाला. याचे शिक्षण घरीच झाले. भूमितीवर याने लहानपणीच हुकूमत मिळविती जगतिशास्त्र हा त्याच्या आवडीचा विषय होता. या संतुलनाविषयी त्याचा सिध्दांत प्रसिध्द आहे. 'चलनवलन' या विषयातही त्याची विशेष गती होती. याला धार्मिक जीवनाविषयी देखील आल्या होती. पोर्ट | रॉयल येथील धर्ममठात त्याने बरीच वर्षे चिंतनात व एकांतात घालविली. याचा 'लेटर्स टू ला प्रॉव्हिएन्शल' हा ग्रंथ फ्रेंच साहित्याच्या दृष्टीने विशेष महत्वाचा मानला जातो. 'पान्सिल' हा याचा प्रख्यात ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर ७ वर्षांनी प्रसिध्द झाला. याची शारीरिक स्थिती मात्र फार नाजुक होती. १९ ऑगस्ट १६६२ रोजी त्याचे अकालीच निधन झाले.


→ मूल्ये

 विज्ञाननिष्ठा, कर्तव्यदक्षता.


→ अन्य घटना

 • पुष्टीमार्गाचे प्रसिध्द संस्थापक वल्लभाचार्य यांचे निधन १५३१

  • नेताजी पालकरांचे शुध्दीकरण १६७६ 

  • कृषितज्ज्ञ प्रा. पां. चिं. पाटील जन्मदिन १८७७

   • पेशवाईतील मुत्सद्दी हरिपंत फडके यांचे निधन - १७९४

    • भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म - १९०१


उपक्रम

• गणितातील मजेदार कोडी जमवून एक चिकटवही तयार करा.


समूहगान

 • चला जाऊ या दर्शन करुया अपुल्या भारतमातेचे.


→ सामान्य ज्ञान

 • महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे

  • भिवपुरी

 • कोयना 

 • खोपोली

 •  मिरा 

 •  भाटघर

 •   पोकळी

 •    राधानगरी

  • बेलदरी

जून २२, २०२४

18 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 18 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये.....

 

 → श्लोक

  नियंतकुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । शरीर यात्रापि च ते न प्रसिधदयेदकर्मणाः॥

   श्रीमद् भगवद्गीता वार : हे अर्जुना ! तुझे नेमलेले कर्म तू कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणेच श्रेष्ठ आहे आणि कर्म न केल्याने तुझे जीवन देखील नीट चालणार नाही. संस्कार :- मनुष्याने जीवनात कर्म करणे आवश्यक आहे. 

  

→ चिंतन स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही. - म. गांधी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जगातल्या अनेक देशांना झगडावे लागले आहे. आपल्यावर लादलेली गुलामीची बंधने झुगारून देण्यासाठी अनेक ठिकाणी क्रांती झाली. या सर्व ठिकाणी स्वतंत्रतादेवीच्या चरणावर प्राणाचा हार चढविला गेला. जीवावर उदार होऊन हजारो पुढे सरसावले तेव्हा इटली स्वतंत्र झाला. हजारोंनी छातीवर गोळ्या झेलल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याची पहाट दिसली. आपल्या स्वातंत्र्याच्या इमारतीचा पायादेखील अशाच कडव्या देशभक्तांच्या अस्थींनी बांधला आहे हे आपण विसरता कामा नये.


कथाकथन

 - 'ससोबांची रंगपंचमी' :- एका जंगलामध्ये ससा आणि कोल्हा राहत होता. दोघांची घरे ही एकमेकांपासून खूपच दूर होती. परंतु दोघांची दोस्ती होती. जो काही कार्यक्रम असेल तो दोघांनी मिळून साजरा करावयाचा. फिरायला जाणे, जेवण करणे इ. त्यांच्या दोस्तीमध्ये त्या दोघांच्या सदस्यांनी कधीही बवळाढवळ केली नाही. एके दिवशी कोल्हयाने सशाला पार्टीला येण्याचे आमंत्रण दिले. सशाने आपल्या आईकडून पार्टीला जाण्यासाठी परवानगी घेतली आणि ससा थोडयाच वेळात कोल्हयाकडे आला. तेव्हा कोल्हा आपल्या घरात हिरवा रंग करत बसला होता. सशाने हा प्रकार पाहिला आणि त्याने कोल्हयाला विचारते, 'हा कोणता पदार्थ आहे? गोड आहे का? 'कोल्हा धूर्त होता. त्याने काहीही सांगितले नाही. 'जाऊ दे रे समजेल तुला सगळं' अशी उडवाउडवीची उत्तरे देवून म्हणाला, 'आज आपण त्या डोंगराच्या बाजूला फिरायला जाऊ' सखा मनात घाबरला. तो म्हणाला, 'नको, नको त्या बाजूला मला शिकाऱ्यांची भिती वाटते. शिवाय माझ्या आईने मला जाताना बजावून सांगितले की शिकाऱ्यांपासून सावध रहा.' पण कोल्हा कशाचं ऐकतोय? तो म्हणाला, 'घत भित्र्या, मी असताना तुला कशाची भिती? 'असं म्हणून तो सशाला बळजबरीने घेऊन गेला. फिरून आल्यावर सशाच्या जीवात जीव आला. खूप लांब फिरल्यामुळे तो दमला होता. त्याला खूप भूक लागली होती. घरी आल्याबरोबर दोघेही जेवायला बसले. गप्पा मारता मारता कोल्हा उठला आणि त्या पातेल्यात हिरवा रंग केला होता ते पातेले घेऊन आला. सशाने विचारले, 'काय आहे रे त्या पातेल्यात? 'आज रंगपंचमी आहे. तुझ्या अंगावर मी रंग उडविणार आहे.' कोल्हा म्हणाला. ससा घाबरला. तो गयावया करू लागला. 'माझ्या पांढऱ्या शुभ्र अंगावर रंग टाकून माझा रंग कृपया खराब करू नकोस.' अशी विनंती करू लागला. पण कोल्हा कशाचे ऐकतोय? त्याने सशाच्या अंगावर रंग टाकून पांढऱ्या शुभ्र सशाला हिरवागार करून टाकला. ससा खूपच रागावला. एवढी केविलवाणी विनंती करून देखील प्रिय मित्र कोल्हयाने आपले म्हणणे ऐकले नाही याचा सशाला राग आला. दोघांचे खूप भांडण झाले. ससा त्याला वाटेल ते टाकून बोलला. शेवटी सशाने कोल्हयाशी मैत्री तोडली आणि तेथून तडक घरचा रस्ता धरला. ससा रस्त्याने जात असताना एकदा | शिकाऱ्यांच्या नजरेस पडला. परंतु सशाचे मन ठिकाणावर नसल्याने त्याच्या नजरेस तो शिकारी पडू नाही. शिकाऱ्याने सशावर नेम धरला आणि गोळी सशाच्या जवळून जमिनीला चाटून पुढे गेली व ससा वाचला. या हल्ल्याने ससा खूप घाबरला आणि जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुळत सुटला. तो शिकारी देखील तेवढ्याच वेगाने सशाचा पाठलाग करू लागला. ससा पळून पळून खूप मज आता आपले मरण निश्चित आहे, हे त्याने जाणले. शेवटी | कडेला गवत वाढले होते त्या ठिकाणी तो डोळे झाकून गप्प बसला. बंदुकीचे तर होतो असे आवाज येत होते. शिकाऱ्याला ससा कोठेच दिसेना. पळत | पळत शिकारी आपल्या हातातील बंदूक घेऊन सशाजवळ उभा राहीला. शिकाऱ्याच्या बुटाचा स्पर्श सशाला होत होता. शिकारी स्वतःशीच पुटपुटला. 'कहा गया साला?' सशाने भीतीपोटी श्वासदेखली रोखून धरला. कुठल्याही प्रकारची सलचाल त्याने केली नाही. थोड्या वेळाने तो शिकारी जोराने धापा टाकीत तेथून निघून गेला. जेव्हा सशाने डोळे उघडले तेव्हा तो शिकारी फारच दूर निघून गेलेला दिसत होता. आपला जीव वाचला याचा सशाला आनंद झाला. आपण केवळ हिरव्या रंगामुळे आज वाचलो हे सशाच्या लक्षात आले. आपल्या घरी परत न जाता तसाच तो कोल्ह्याकडे गेला. ससा आपल्याकडे परत येत | असल्याचे पाहून कोल्हा आश्चर्यचकित झाला. परंतु कोल्हा न बोलता फक्त पाहत राहीला. ससा कोल्ह्याजवळ आला आणि स्वतःचा जीव कसा वाचला याचे वर्णन सांगितले. दोघांनीही आपले भांडण विसरून परत आपली मैत्री पक्की केली. अशा रितीने ससोबांची रंगपंचमी कोल्ह्याच्या चांगल्याच पथ्यावर पडली. 


→ सुविचार .

 'मृत्यूची भीती टाकून दिल्ली की अस्वस्थता व काळजी सावलीलाही उभी राहत नाही.'


→ दिनविशेष 

 • झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन - १८५८ : भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नर-नारींनी आपले प्राण ओवाळून टाकले त्यात हिरकणीप्रमाणे सदैव चमकत राहणारी स्त्री म्हणजे झाशीची राणी होय. तिचे लहानपणापासूनचे मर्दानी खेळ बघूनच अनेकांनी तिच्या दैदीप्यमान भविष्याचे अंदाज वर्तविले आणि या वीरस्त्रीने ते खरे करून दाखविले. स्वतःचा पुत्र दुर्देवाने मरण पावल्यानंतर राणीने दामोदर हा मुलगा दत्तक घेतला. १८५३ मध्ये पती गंगाधररावांचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रज सरकारने दत्तकाचा वारसहक्क नाकारून संस्थान खालसा केले. इंग्रजांनी झाशीचा कब्जा मागितला तेव्हा राणीने तपस्विनीचा अवतार टाकून तेजस्वीनीचा आवतार धारण केला. 'मेरी झाँसी नही दूँगी' अशी गर्जना करून तिने १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतली. या स्वातंत्र्ययुध्दाची ती खरी स्फूर्तिदेवता ठरली. इंग्रजांची फळी फोडून राणीने काल्पी आणि ग्वाल्हेर दोन्ही ठिकाणी विजय मिळविला. पण हातघाईच्या लढाईत तिचा घोडा अडला. कॅ. स्मिथ आणि ह्यू रोज पाठीशी लागलेले होते. अशा अवस्थेत महिला सेनापती झलकारी बाईने राणी लक्ष्मीबाईला विश्वासू | | सैनिका सोबत मौरी दरवाजा (भांडेरी फाटक) बिदूर या मार्गे सुरक्षित स्थळी 


→ मूल्ये -

 • स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, निर्भयता, राष्ट्रप्रेम. पाठवून दिले.


 → अन्य घटना

  • रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा स्मृतिदिन - १९३६ 


→ उपक्रम - 

• 'रे हिंदबांधवा थांब या स्थळी ' - भा. रा. तांबे आणि 'खूब लडी मर्दानी' - कविता पाठ करा 

• १८५७ चा इतिहास या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील झाशीच्या राणीचे व भवानीशंकर, परीक्षित हरि, चीखेल लाल वर्मा, माताप्रसाद, मोहनदास नैमिशराय व मैथिली शरण गुप्त यांचे 'वीरांगणा झालकारी बाई' पुस्तके मिळवा व वाचा.


 समूहगान 

• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ... 



→ सामान्यज्ञान 

• माणसाला श्वासोच्छ्वासासाठी प्रत्येक वीस मिनिटांसाठी १ हजार घनफूट शुध्द हवेची आवश्यकता असते

. • माणसाच्या नाडीचे ठोके साधारणतः प्रत्येक मिनिटाला ७८ पडतात.

जून २२, २०२४

17 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 17 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

:राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे खुदा या.....  


→ श्लोक

 - रत्नाकराघौत पदाम् हिमालय किरीटनीम् । ब्रम्ह राजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारतम् ।।

 -  रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पादप्रक्षालन करतो, हिमालय जिचा मुकुट आहे आणि ब्रह्मर्षो - राजर्षी रुपी रत्नांनी जी समृध्द आहे. त्या माझ्या भारतमातेला मी वंदन करतो. 

 

→ चिंतन

 आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. मुलांचा जगातील पहिला गुरु म्हणजे आई. तीच त्याला जगात आणते. तीच जगात जगण्याचा मार्ग दाखविते. ती प्रसंगी वज्रासारखी कठोर होऊन तर कधी सायीहून मऊ होऊन मुलांची मूर्ती घडविते. तिचे मन गंगेसारखे विशाल व हिमालयासारखे घोर असते. कर्तबगार स्त्री आपल्या मुलांना कर्तबगार व्यक्ती म्हणून घडवू शकते. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात जिजाबाईचा मोलाचा वाटा आहे. आईचा महिमा लहानबोर सगळेच वर्णन करतात.



कथाकथन

 सत्य शिव सुंदर जिजाऊ चारशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुल कु. जिजाऊ लखुजी जाधव हिचा जन्म झाला. आईचे नाव म्हाळसाबाई. जिजाऊ है ट्रीपल 'एम' टॉनिक आहे. ते म्हणजे 'मन', 'मनगट आणि मस्तक । कर्तबगार मॉ जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले पाटील यांच्यासोबत झाला. मुलगी जन्माला आली तरी मुलाप्रमाणे तिथे स्वागत करा असे आज | शासनदरबारी सांगण्यात येत आहे. परंतु ४०० वर्षांपूर्वी जिजाऊंच्या जन्माचा आनंद व्यक्त करणाऱ्यांसाठी वडील लखुजी जाधव यांनी हुत्ती वर बसून साखर वाटली. 'आई ही मुलाची पहिली शाळा असते, तर शाळा ही समाजाची आई असते'. गुलाम माता गुलाम मुलांना जन्म देत असते. स्वयंप्रज्ञेची | स्वाभिमानी जिजाऊ आई असली तरी ती 'शिवाजीला' जन्म देते! १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका पराक्रमी व नीतिमान योद्धाचा जन्म झाला. त्याचे नाव 'शिवाजी' ! 'शिव म्हणजे चांगले पवित्र, मंगलमय, जेथे शिव म्हणजे पवित्रता व शुद्ध्या असते, 'सत्य असते' तेथे सुंदरता असते! पती शहाजीला कैदेत ठेवल्यावरही आदिलशाहाला किल्ला परत न करणारी जिजाऊ, शिवाजीचा पहिला मुलगा संभाजीचा मृत्यूनंतर अफजलखानाची भेट घेण्यासाठी शिवाजीला पाठविणारी जिजाऊ, पुरंदरच्या शिगाऊसी प्रका करणारी जिजाऊ, ४०० वर्षापूर्वी स्त्रिया शूद्र व गुलामीचे जीवन जगत असताना मुलाला समोर करून किल्ले लढविणारी लढाऊ बाण्याची जिजाऊ, 'रयतेचे कल्याण करणारी, राज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला घातले' असे शिवाजीनगरी अनुमती नांगर ठेवणाऱ्या आदिलशाहाची भीती न बाळगता जमीन पवित्र असते, ती अशुभ कधीही नसते, असे बजावून तो नांगर हटविणारी जिजाऊ, अशी जिजाऊंची अनेक ऐतहासिक रूपे आहेत. जिजाऊ म्हणजे आदर्श माता, आदर्श पत्नी आणि आदर्श कल्याणकारी राज्यनिर्माती आहे. धर्मग्रंथ व धर्माधि ठेकेदार तेव्हाही होते, आताही आहेत. पण तेव्हा जाचक रूढीपरंपरांमुळे व मनुस्मृतीच्या चौफेर जाचामुळे महिलांचे जीवन दुखी, कष्टी होते त्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात जिजाऊंनी जो निर्भीड बाणा दाखविता ती अस्मितेची तलवारी बनली त्यासी भारतीय तोड नाही. समस्त स्त्रियांना मॉ जिजाऊंचे जीवन कार्य लक्षात येईल व ती स्वातंत्र्याची 'प्राणज्योती' आहे. हे समजेड तेा खचा अर्थाने समाज सत्य, शिव आणि सुंदरतेचा मिलाफ दिसेल. प्रत्येक कुटुंबाला कदाचित वाटत असणार की, शिवाजीसारखा शूर, वीर, कर्तबगार मुलगा जन्माला यावा. परंतु शिवाज जन्माला यायचा असेल तर नुसते शहाजी होऊन भागत नाही. त्यासाठी लागते एक सर्वागसुंदर पण सवयी निनाऊ । 


→ सुविचार: 

माता, मातृभूमी व मातृभाषा सर्वश्रेष्ठ आहे. 

• मातेसारखे छत्र नाही, मातेसारखी गती नाही

. • आईसारखे महान दुसरे नाही. 

• गजगात जे जे सुंदर, सत्य व सर्वोत्तम आहे ते ते । स्विकारा, म्हणजे सर्वच भले होईल ऊर्मिला डाकरे



दिनविशेष • राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन १६७४ : जिजाबाई म्हणजे शिवरायांच्या माथ्यावर या होती एक अत्यंत कर्तृत्वशाली जीवन ती जगली. ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडविला तो शिवाजी या महान स्त्रीने घडविला. महाराष्ट्राच्या तर | इतिहासात आपल्या तेजाने झळाळणारे असे ते एक स्त्री रत्न आहे. निजामशाहीतील एक प्रतिष्ठीत सरदार सिंदखेडाधव यांची ती लहान वयात लग्न होऊन शहाजी भोसले यांची पत्नी झाली. महाराष्ट्रात असलेल्या ओसाड वाळवंट झालेल्या 'पुनवडीत' तिने सोन्याच्या फळाने | भावी स्वराज्याच्या वैभवाची बीजे रोवली. लहानपणापासून तिने शिवबाला आधार दिला आणि तेजही दिले. त्याच्या मनावर रामायण-महाभारताचे आदर्श बिंबविले. तऱ्हेतऱ्हेच्या शस्त्रास्त्रांचे शिक्षण देऊन पराक्रमी बनविले. सज्जनांचा पुरस्कार, दांभिकांचा धिक्कार, दीन दुबळ्यांचा कैवार, भ्रष्टरा करणारी जिजाऊ होती. आपल्या पुत्राचा पराक्रम तिने पाहिला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा असा राज्याभिषेकाचा सोहळा पाहिला अन त मनाने राज्याभिषेकानंतर अवघ्या अकराच दिवसानंतर तिने आपले डोळे मिटले. 


→ मूल्ये

 निर्भयता, स्वाधीनता, कर्तव्यदक्षता. 

 

→ अन्य घटना

 • संत निवृत्तीनाथ यांनी समाधी घेतली- १२९७ 

 • गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन - १८९५

  • स्वातंत्र्यसेनानी कृ. द. धर्माधिकारी ऊर्फ नाना धर्माधिकारी यांचे निधन - १९९३ - 



→ उपक्रम • आपल्या आईचा जन्मदिन आदराने साजरा करा. • मदन पाटिल लिखीत 'जिजाऊ साहेब' कादंबरीचे वाचन करा. • आईची थोरवी सांगणारी वचने व कविता जमवा. हा 


→ समूहगान 

देश माझा याचे भान, जरासे राहू द्यारे..... 


 → सामान्यज्ञान 

• १२३६ मध्ये दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली मुस्लिम महिला रझिया सुलताना. हुमायूननामा या हुमायूनवर लिहिलेल्या पर्शियन भाषेतील ग्रंथाची लेखिका 'बाबरकन्या' 'गुलबदन बेगम' या होत्या

जून २२, २०२४

15 जून दैनंदिन शालेय परिपाठ

      15 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...... १५ जून 


→ श्लोक 

- यः पठति लिखति पश्यति, परिपृच्छति पठितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरवैः नलिनीदलमिव विकाश्यते बुध्दिः । 

-  जो वाचन करतो, लिहितो, पाहतो (निरीक्षण करतो) प्रश्न विचारतो, विद्वानाच्या सहवासात राहतो. त्याची बुध्दी, सूर्याच्या किरणांनी कमळ फुलावे त्याप्रमाणे विकसित होते



. → चिंतन

 दुसऱ्यास सुखाची फुले दिली तरच सुखाचे अत्तर आपणास मिळेल. - आपण जेव्हा दुसऱ्याला सुखी करतो तेव्हा त्याला सुखी झालेले पाहून आपल्या मनालाही एक प्रकारचे दिव्य सुख मिळते. अशा रीतीने विचार करून जर प्रत्येक व्यक्ती वागू लागली, दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपड करू लागली तर जगातील द्वेष, ईर्षा, हेवा-दावा ह्या साऱ्या हीन भावना नष्ट होतील आणि जिकडे तिकडे मांगल्याचे, स्नेहाचे वातावरण पसरेल. हे जाणून घेऊन प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण जे पेरतो तेच उगवते हा मूलमंत्र लक्षात घ्यावा.


कथाकथन 

'जयंत विष्णु नारळीकर : (आध्यात्मिक दृष्टीकोन असलेला भारतीय वैज्ञानिक) पाश्चात्य संशोधकांनी जे शोध लावले त्यामागे व्यापार, यंत्रे, तंत्रज्ञान हाच पाया होता. त्यांचा युध्दसंभार, वसाहतवाद वाढविणे व भांडवलशाही समाजरचनेचा विकास प्रामुख्याने आढळतो. परंतु भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सत्य, अहिंसा आदि जीवनमूल्यांचा 'सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः' अशा 'मंगल भवतु सब्ब मंगलम्' या विश्वकल्याणकारी | भावनेचा अभावानेच साक्षात्कार होतो. श्री. जयंत विष्णु नारळीकर हे आजचे विश्वमान्य संशोधक याच ध्येयवादाने प्रेरित झालेले विख्यात शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडिल विष्णु वासुदेव नारळीकर हे रँग्लर होते. त्यांची आई श्री. कृष्णाजीपंत हुजुरबाजार यांची कन्या - संस्कृत विदुषी आहेत. अशा सुविद्य दांपत्याच्या पोटी ३१ जुलै १९३७ साली श्री. जयंतरावांचा जन्म झाला. जात्याच हुषार आणि सुसंस्कृत, बुद्धिमान, बनारस युनिव्हर्सिटीतून ते १९५८ साली. डी.एस.सी. झाले व त्या नंतर १९६० साली केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी बी. एस. एम. ए., पीएच. डी. असे उच्च शिक्षण घेतले. खगोलशास्त्रातील मानाचे टायसन पारितोषिक त्यांना मिळाले. १९५९ साली गणितशास्त्रात रँग्लर झाले. १९६२ साली स्मिथ्स पारितोषिकाचे मानकरी ठरले. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी हॉईल, बॉडी व बार्निज़ या | शास्त्रज्ञांसमवेत स्थिरस्थिती विश्वाचा सिध्दांत त्यांनी मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिध्दांत सिध्द केला. विश्व स्थिर असले तरी ते आकुंचन प्रसरण पावते; पण एकंदरीने ते विकसनशील आहे, प्रसरण पावत आहे, हा सिध्दांत त्यांनी मांडला. श्री. नारळीकर यांच्या मते, विज्ञानाचा - मनाशी, बुध्दीशी संबंध आहे. विज्ञानातील अनेक सिध्द्धांत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या व विज्ञान लोकप्रिय केले. भारतातील खगोलशास्त्रज्ञांसाठी त्यांनी 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स' या संस्थेची उभारणी केली. अनेक पुरस्कार मिळवूनही नम्र, सौजन्यशील, उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेला हा भारतीय संशोधक अजूनही कार्यरत आहे. 


→ सुविचार

 •'जीवन किती वर्ष जगलात याला महत्व नाही, जीवन कसे जगलात याला महत्व आहे.'- रणजीत देसाई

 • 'सुख ही मनाची आंतरिक अवस्था आहे.'


दिनविशेष -

 • ना. ग. गोरे जन्मदिन - १९०७ : नानासाहेब गोरे एक थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि दिवास्वत होते. विधवेशी विवाह करून समाजाला आदर्श घालून देणारे ते कर्ते सुधारक होते. नानासाहेबांचा जन्म रत्नागिरीतील हिंदळे या गावी झाला. बी. ए. एलएल. बी. पर्यंत शिक्षण पुणे येथे पुरे केले. पुण्यातील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून समाजकार्यास सुरुवात केली. कॉग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. १९६४ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. १९६७-६८ मध्ये पुण्याचे महापौरपदही त्यांनी भूषविले. १९५५ मध्ये झालेल्या गोया विमोचन चळवळीत त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १ मे १९९३ रोजी त्यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झा नानासाहेबांनी विपुल लेखनही केले आहे. 'समाजवादाचा ओनामा' हे त्यांचे पहिले पुस्तक, कारागृहाच्या भिंती', 'डाली', 'शंख आणि शिंपले', 'सीतेचे पोहे', 'गुलबक्षी', 'आव्हान आणि आवाहन', 'ऐरणीवरील प्रश्न' ही त्यांची गाजलेली पुस्तके, कालिदासाच्या मेघदूताचा समचंद अनुवाद, नेहरूंच्या आत्मचरित्राचा अनुवाद प्रसिध्द आहेत. बेडूकवाडी, चिमूताई घर बांधतात ही पुस्तके बालकांसाठी लिहिली. ते उत्तम वक्ते होते. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि |अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये होती. 

 

→ मूल्ये

 स्वाधीनता, समता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, 

 

→ अन्य घटना

 • इंग्लंडच्या इतिहासात गाजलेल्या 'मॅग्नाचार्य' दर जॉन राजाने सही केली- १२१५ शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रेंकलीन यांनी पतंगाच्या साहाय्याने विद्युत प्रवाहाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. १७५२

  • श्री. पांडुरंग विनायक करमरकर यांनी वेणुबाई या विधवेबरोबर जाहीरपणे पुनर्विवाह केला १८६९

   • संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन १९३१ ● बापुसाहेब घोरपडे यांचा जन्मदिन - १९१५

    • श्रीमती अॅनी बेझंट उटकमंड येथे स्थानबध्द १९१७ • जयंत नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणाविषयीचा सिध्दांत मांडला - १९६४ 

    

→ उपक्रम

 • बेडुकवाडी व इतर पुस्तके मिळवून वाचा राष्ट्र सेवा दलाची माहिती करुन घ्या.

 

 समूहगान 

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत, वरी महान..... 

 

→ सामान्यज्ञान 

प. जर्मनीतील पपाळांच्या एका कंपनीने सौरऊर्जेवर चालणारे एक नवीन सीरपडचाळ तयार केले आहे. या घडयाळातील उपकरणे सेकंदाच्या हजाराव्या हिश्शापर्यंत अचूक वेळ दर्शवितात.

जून २२, २०२४

16 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 16 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.... 

 

→ श्लोक

 (दोहे) पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत । 'रविदास' दास प्राधीन सों, कौन करे है प्रीत रविदास दर्शन "पारतंत्र्य हे फार मोठे आहे. एक मोठा अभिशाप आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जी व्यक्ती पराधिन, कोणाची तरी गुलाम आहे. त्याच्याबरोबर कोणी प्रेम करीत नाही. त्याचा सर्वजण तिरस्कार-अपमान करतात आणि त्याला ठोकरतात." म्हणून गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा. 

 


→ चिंतन एखायावर केलेले प्रेम हे त्याच्यासाठी केलेल्या त्यागातून दिसत असते - म. गांधी दुसऱ्याकडून काहीतरी लाभ होईल म्हणून केलेले प्रेम हे स्वार्थी असते. मतलब संपला की, ते आपोआप संपून जाते. परंतु खरं प्रेम हे असं दिखाऊ नसतं तर टिकाऊ असतं. खरं प्रेम करणारा माणूस वेळप्रसंगी त्याग करायलाही मागेपुढे पाहत नाही. आपल्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तिचा जीव हा मोलाचा वाटल्यामुळे प्राणाचेही मोल देणारी माणसे या जगात आहेत. शिवरायांसाठी बाजीप्रभूने प्राण अर्पण केले. तर भारतभूमीसाठी अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले ते यामुळेच.



→ कथाकथन

 - 'अद्भुत गुरुदक्षिणा': एकलव्य गुरु द्रोणाचार्यांकडे येऊन म्हणाला, 'गुरुदेव! मला धनुर्विद्या शिकविण्याची कृपा करावी' गुरुद्रोणाचार्यांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहीले. कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन दिले होते की, मी केवळ राजकुमारांनाच शस्त्रविद्येचे शिक्षण देईन. एकलव्य तर राजकुमार नाही. मग त्याला धनुर्विया कशी काय शिकवू? म्हणून द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, मी तुला धनुर्विद्या शिकवू शकणार नाही.' एकलव्य धरुन निश्चय करुन निघाला होता की, मी फक्त गुरु द्रोणाचार्याकडे शस्त्रविद्या शिकेन. एकलव्य एकांत अरण्यात गेला आणि तेथे त्याने गुरु द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनविली. मूर्तीकडे एकटक पाहत व ध्यान करीत, तिच्याकडून प्रेरणा घेऊन तो धनुर्विद्या शिकू लागला. एकटक पाहण्याने एकाग्रता येते. या जोरावर एकलव्य धनुर्विद्येत तरबेज झाला. एकदा द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव धनुर्विद्येची चाचणी घेण्यासाठी जंगलात आले. त्यांच्या बरोबर एक कुत्रा होता. एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा भुंकला. एकलव्याने कुत्र्याला कोणतीही दुखापत होणार नाही आणि त्याचे भुंकणे बंद होईल अशा पध्दतीने सात बाण तोंडात सोडले. कुत्रा परत गेला. तिथे द्रोणाचार्याबरोबर पांडव आणि कौरव होते. कुत्र्याला पाहून अर्जुनाला वाटले की कुत्र्याला दुखापत न होता तोंडात बाण घुसवले कसे? ही विद्या तर मी देखील जाणत नाही. हे कसे शक्य झाले? तो द्रोणाचार्यांना म्हणाला, ' गुरुदेव, आपण तर म्हणाला होतात की माझ्या बरोबरीचा दुसरा कोणताही धनुर्धर होणार नाही. परंतु ही विद्या तर मला देखील येत नाही' द्रोणाचार्यांनी पुढे जाऊन पाहिले तर तो होता, हिरण्यधनुचा मुलगा एकलव्य! द्रोणाचार्यांनी| विचारले 'मुला ही विद्या तू कोठून शिकलास?" एकलव्य म्हणाला, 'गुरुदेव, आपल्याच कृपेने शिकलो आहे.' गुरु पुढे धर्मसंकट उभे राहिले. एकलव्याची | अलोट श्रध्दा पाहून द्रोणाचार्य म्हणाले, 'माझी मूर्ती डोळ्यासमोर ठेवून तू धनुर्विद्या शिकलास हे खरे पण गुरुदक्षिणेचे काय?' एकलव्य म्हणाला, 'आपण मागाल ती दक्षिणा द्यायला तयार आहे' द्रोणाचार्य म्हणाले, 'तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे!" एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. 

 


→ सुविचार

 आजच्या गुरुद्रोणाचार्यानी एकलव्याला गुरुदक्षिणेत अंगठा मागू नये. अंगठा दिल्यामुळे एकलव्य मात्र धनुर्विद्येचा वापर करु शकता नाही, निष्काम ठरला. • ज्ञान, उपासना, (श्रब्दा) हा एक केवळ वौद्धिक व्यापार नसून ती एक मानवी जीवन उजळून टाकणारी दुर्दम्य प्रेरणा तद्वतच ज्ञानसाधना आणि एक अखंड शोध आहे. • मानव जन्मात सर्वात मोठे महत्त्व, परमोच्च ज्ञान प्राप्तीस द्यावे, याकरिता सदाचरणी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व तपोवृध्द व्यक्तीस 'गुरु' करावे, जीवन सफल सार्थ बनवावे.


दिनविशेष -

 • ३. चित्तरंजन दास स्मृतिदिन - १९२५ : बॅ. चितरंजन दास हे बंगालमधील सुप्रसिध्द वकील, कवी, समाजसेवक, राष्ट्रीय पुढारी आणि प्रसिध्द असे वृत्तपत्रकार होते. इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी मिळवून भारतात परत आल्यावर त्यांनी हायकोर्टात काम सुरु केले. 'वंदे मातरम्' वरील प्रसिद्ध खात्यांनीच चालविता. त्यामुळे त्यांच्या वकिलीची प्रसिध्दी भारतभर पसरली आणि त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून मान्यता मिळाली. १९१५ मध्ये बंगाली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. स्वतःची सर्व संपत्ती त्यांनी मेडिकल कॉलेज व स्त्रियांच्या हॉस्पिटलसाठी दिली. म्हणून लोक त्यांना म्हणून ओला केवळ मरेपर्यंत नव्हे तर मृत्युनंतरही त्यांचे नाव सामाजिक कार्याशी जोडलेले राहिले. कलकत्ता येथील त्यांच्या वाड्याचे हॉस्पिटमध्ये रुपांतर व्हावे, अशी इच्छा त्यांनी म. गांधींजवळ व्यक्त केली होती. म. गांधीजींनी त्यांच्या या इच्छेला मूर्त स्वरुप देण्यासाठी १० लक्ष रुपये जमविले व त्यांच्या हॉस्पिटलच्या रुपाने एक अमर स्मारक उभारून बॅरिस्टर चित्तरंजन दास यांचे नाव अमर केले. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन शहर 

 

→ मूल्ये

 स्वाधीनता, निर्भयता, राष्ट्रप्रेम 


→ अन्य घटना

 • पुणे येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ भव्य पुतळ्याचे ब्रिटीश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते अनावरण १९२८ संपूर्ण जडणघडण भारतात झालेला हा पहिलाच भव्य १४ फुटी पुतळा. भारतातील नावाजलेल्या पुतळ्यांमध्ये याची गणना होते. 

 • व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा या रशियन महिलेने वोस्तोक ६ या यानातून अंतराळप्रवास करून जगातील पहिली अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळविला. - १९६३

 

 → उपक्रम स्फूर्तिदायक देशभक्तीगीतांचा संग्रह करा व पाठ करा. तुम्हाला आवडणान्या नेत्यांच्या चित्रांची चिकटवही तयार करा - 

 

→ समूहगान आओ बच्चो तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की....... 


→ सामान्यज्ञान 

• घोडा माणसाळल्याला किमान सहा हजार वर्षे झाली असावीत. इतिहासात, पुराणात घोड्याचे अनेक उल्लेख येतात. घोडदळ हे राज्याचे महत्त्वाचे अंग मानले जात असे. घोडा ताशी ६०/६५ कि.मी. वेगाने धावू शकतो. घोडा ३५ ते ४० वर्षे जगतो. आयुष्यभरात