Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

18 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 18 जून दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये.....

 

 → श्लोक

  नियंतकुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । शरीर यात्रापि च ते न प्रसिधदयेदकर्मणाः॥

   श्रीमद् भगवद्गीता वार : हे अर्जुना ! तुझे नेमलेले कर्म तू कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणेच श्रेष्ठ आहे आणि कर्म न केल्याने तुझे जीवन देखील नीट चालणार नाही. संस्कार :- मनुष्याने जीवनात कर्म करणे आवश्यक आहे. 

  

→ चिंतन स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही. - म. गांधी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जगातल्या अनेक देशांना झगडावे लागले आहे. आपल्यावर लादलेली गुलामीची बंधने झुगारून देण्यासाठी अनेक ठिकाणी क्रांती झाली. या सर्व ठिकाणी स्वतंत्रतादेवीच्या चरणावर प्राणाचा हार चढविला गेला. जीवावर उदार होऊन हजारो पुढे सरसावले तेव्हा इटली स्वतंत्र झाला. हजारोंनी छातीवर गोळ्या झेलल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याची पहाट दिसली. आपल्या स्वातंत्र्याच्या इमारतीचा पायादेखील अशाच कडव्या देशभक्तांच्या अस्थींनी बांधला आहे हे आपण विसरता कामा नये.


कथाकथन

 - 'ससोबांची रंगपंचमी' :- एका जंगलामध्ये ससा आणि कोल्हा राहत होता. दोघांची घरे ही एकमेकांपासून खूपच दूर होती. परंतु दोघांची दोस्ती होती. जो काही कार्यक्रम असेल तो दोघांनी मिळून साजरा करावयाचा. फिरायला जाणे, जेवण करणे इ. त्यांच्या दोस्तीमध्ये त्या दोघांच्या सदस्यांनी कधीही बवळाढवळ केली नाही. एके दिवशी कोल्हयाने सशाला पार्टीला येण्याचे आमंत्रण दिले. सशाने आपल्या आईकडून पार्टीला जाण्यासाठी परवानगी घेतली आणि ससा थोडयाच वेळात कोल्हयाकडे आला. तेव्हा कोल्हा आपल्या घरात हिरवा रंग करत बसला होता. सशाने हा प्रकार पाहिला आणि त्याने कोल्हयाला विचारते, 'हा कोणता पदार्थ आहे? गोड आहे का? 'कोल्हा धूर्त होता. त्याने काहीही सांगितले नाही. 'जाऊ दे रे समजेल तुला सगळं' अशी उडवाउडवीची उत्तरे देवून म्हणाला, 'आज आपण त्या डोंगराच्या बाजूला फिरायला जाऊ' सखा मनात घाबरला. तो म्हणाला, 'नको, नको त्या बाजूला मला शिकाऱ्यांची भिती वाटते. शिवाय माझ्या आईने मला जाताना बजावून सांगितले की शिकाऱ्यांपासून सावध रहा.' पण कोल्हा कशाचं ऐकतोय? तो म्हणाला, 'घत भित्र्या, मी असताना तुला कशाची भिती? 'असं म्हणून तो सशाला बळजबरीने घेऊन गेला. फिरून आल्यावर सशाच्या जीवात जीव आला. खूप लांब फिरल्यामुळे तो दमला होता. त्याला खूप भूक लागली होती. घरी आल्याबरोबर दोघेही जेवायला बसले. गप्पा मारता मारता कोल्हा उठला आणि त्या पातेल्यात हिरवा रंग केला होता ते पातेले घेऊन आला. सशाने विचारले, 'काय आहे रे त्या पातेल्यात? 'आज रंगपंचमी आहे. तुझ्या अंगावर मी रंग उडविणार आहे.' कोल्हा म्हणाला. ससा घाबरला. तो गयावया करू लागला. 'माझ्या पांढऱ्या शुभ्र अंगावर रंग टाकून माझा रंग कृपया खराब करू नकोस.' अशी विनंती करू लागला. पण कोल्हा कशाचे ऐकतोय? त्याने सशाच्या अंगावर रंग टाकून पांढऱ्या शुभ्र सशाला हिरवागार करून टाकला. ससा खूपच रागावला. एवढी केविलवाणी विनंती करून देखील प्रिय मित्र कोल्हयाने आपले म्हणणे ऐकले नाही याचा सशाला राग आला. दोघांचे खूप भांडण झाले. ससा त्याला वाटेल ते टाकून बोलला. शेवटी सशाने कोल्हयाशी मैत्री तोडली आणि तेथून तडक घरचा रस्ता धरला. ससा रस्त्याने जात असताना एकदा | शिकाऱ्यांच्या नजरेस पडला. परंतु सशाचे मन ठिकाणावर नसल्याने त्याच्या नजरेस तो शिकारी पडू नाही. शिकाऱ्याने सशावर नेम धरला आणि गोळी सशाच्या जवळून जमिनीला चाटून पुढे गेली व ससा वाचला. या हल्ल्याने ससा खूप घाबरला आणि जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुळत सुटला. तो शिकारी देखील तेवढ्याच वेगाने सशाचा पाठलाग करू लागला. ससा पळून पळून खूप मज आता आपले मरण निश्चित आहे, हे त्याने जाणले. शेवटी | कडेला गवत वाढले होते त्या ठिकाणी तो डोळे झाकून गप्प बसला. बंदुकीचे तर होतो असे आवाज येत होते. शिकाऱ्याला ससा कोठेच दिसेना. पळत | पळत शिकारी आपल्या हातातील बंदूक घेऊन सशाजवळ उभा राहीला. शिकाऱ्याच्या बुटाचा स्पर्श सशाला होत होता. शिकारी स्वतःशीच पुटपुटला. 'कहा गया साला?' सशाने भीतीपोटी श्वासदेखली रोखून धरला. कुठल्याही प्रकारची सलचाल त्याने केली नाही. थोड्या वेळाने तो शिकारी जोराने धापा टाकीत तेथून निघून गेला. जेव्हा सशाने डोळे उघडले तेव्हा तो शिकारी फारच दूर निघून गेलेला दिसत होता. आपला जीव वाचला याचा सशाला आनंद झाला. आपण केवळ हिरव्या रंगामुळे आज वाचलो हे सशाच्या लक्षात आले. आपल्या घरी परत न जाता तसाच तो कोल्ह्याकडे गेला. ससा आपल्याकडे परत येत | असल्याचे पाहून कोल्हा आश्चर्यचकित झाला. परंतु कोल्हा न बोलता फक्त पाहत राहीला. ससा कोल्ह्याजवळ आला आणि स्वतःचा जीव कसा वाचला याचे वर्णन सांगितले. दोघांनीही आपले भांडण विसरून परत आपली मैत्री पक्की केली. अशा रितीने ससोबांची रंगपंचमी कोल्ह्याच्या चांगल्याच पथ्यावर पडली. 


→ सुविचार .

 'मृत्यूची भीती टाकून दिल्ली की अस्वस्थता व काळजी सावलीलाही उभी राहत नाही.'


→ दिनविशेष 

 • झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन - १८५८ : भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नर-नारींनी आपले प्राण ओवाळून टाकले त्यात हिरकणीप्रमाणे सदैव चमकत राहणारी स्त्री म्हणजे झाशीची राणी होय. तिचे लहानपणापासूनचे मर्दानी खेळ बघूनच अनेकांनी तिच्या दैदीप्यमान भविष्याचे अंदाज वर्तविले आणि या वीरस्त्रीने ते खरे करून दाखविले. स्वतःचा पुत्र दुर्देवाने मरण पावल्यानंतर राणीने दामोदर हा मुलगा दत्तक घेतला. १८५३ मध्ये पती गंगाधररावांचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रज सरकारने दत्तकाचा वारसहक्क नाकारून संस्थान खालसा केले. इंग्रजांनी झाशीचा कब्जा मागितला तेव्हा राणीने तपस्विनीचा अवतार टाकून तेजस्वीनीचा आवतार धारण केला. 'मेरी झाँसी नही दूँगी' अशी गर्जना करून तिने १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतली. या स्वातंत्र्ययुध्दाची ती खरी स्फूर्तिदेवता ठरली. इंग्रजांची फळी फोडून राणीने काल्पी आणि ग्वाल्हेर दोन्ही ठिकाणी विजय मिळविला. पण हातघाईच्या लढाईत तिचा घोडा अडला. कॅ. स्मिथ आणि ह्यू रोज पाठीशी लागलेले होते. अशा अवस्थेत महिला सेनापती झलकारी बाईने राणी लक्ष्मीबाईला विश्वासू | | सैनिका सोबत मौरी दरवाजा (भांडेरी फाटक) बिदूर या मार्गे सुरक्षित स्थळी 


→ मूल्ये -

 • स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, निर्भयता, राष्ट्रप्रेम. पाठवून दिले.


 → अन्य घटना

  • रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा स्मृतिदिन - १९३६ 


→ उपक्रम - 

• 'रे हिंदबांधवा थांब या स्थळी ' - भा. रा. तांबे आणि 'खूब लडी मर्दानी' - कविता पाठ करा 

• १८५७ चा इतिहास या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील झाशीच्या राणीचे व भवानीशंकर, परीक्षित हरि, चीखेल लाल वर्मा, माताप्रसाद, मोहनदास नैमिशराय व मैथिली शरण गुप्त यांचे 'वीरांगणा झालकारी बाई' पुस्तके मिळवा व वाचा.


 समूहगान 

• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ... → सामान्यज्ञान 

• माणसाला श्वासोच्छ्वासासाठी प्रत्येक वीस मिनिटांसाठी १ हजार घनफूट शुध्द हवेची आवश्यकता असते

. • माणसाच्या नाडीचे ठोके साधारणतः प्रत्येक मिनिटाला ७८ पडतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा