Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

22 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 22 जून दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू.... 

 

→ श्लोक

 न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्म संगिनाम् । जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन् ॥ 

 (ज्ञानी) पुरुषाने, कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञ लोकांचा बुध्दिभेद करू नये. (त्यांची बुध्दी विचलित करु नये) तर आपण स्वतः योगयुक्त (चित्त संतुलित ठेवून) होऊन सर्व कर्माचे नीट आचरण करीत त्यांच्याकडूनही सर्व कर्मे करवून घ्यावीत. (त्यांनाही प्रेरित करते संस्कार :- विद्वानांनी अनासक्तपणे कर्म करण्याचा उपदेश करण्याऐवजी आपल्या आचरणातून त्यांना अनासक्त राहून कर्म करण्यास प्रेरित करावे. 

 

→ चिंतन

 'समाजाचे पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा, स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी असते.' - लो. टिळक A पुढारी म्हणजे समाजाला पुढे नेणारा, जो पुढे असतो त्याचे मागील लोक अनुकरण करतात. म्हणून पुढे असणाऱ्या नेत्याने आपले वर्तन आदर्श ठेवायला हवे म्हणजे त्याच्या अनुकरणाने समाज आदर्श बनेल. आदर्श वर्तन म्हणजेच सदाचरण, धर्मनिष्ठा आणि त्यागभावना यांचा मिलाफ, असा आदर्श पुढारी ज्या ज्या देशाला लाभला त्या देशाने प्रगती करुन घेतली. मग तो भारत असो की जपान! 'विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.'


→ कथाकथन

 - 'लोकमान्यांचे धैर्योद्वार' : इंग्रजांच्या राजवटीतून देश मुक्त करण्यासाठी भारतभर आपआपल्या परीने प्रयत्न चालू होते. कुठे बाँब होते, कुठे क्रांतिकारकांच्या पिस्तुलांना गोरे अधिकारी बळी पडत होते. कुठे दारुच्या गुत्त्यांवर निरोधन केले जात होते, तर कुठे विदेशी कपडे जाळले जात होते. देशभर चालू झालेल्या या प्रकारामुळे चक्रावून गेलेले ब्रिटिश सरकार जुलूम व अत्याचार यांच्या जात्यात प्रजेला भरडून काढीत होते. अशा स्थितीत ब्रिटिशांनी चालविलेल्या या अत्याचारांवर खरमरीत आगपाखड करणारे 'हे उपाय टिकाऊ नाहीत', 'बाँबगोळ्याचे रहस्य' अशांसारखे जळजळीत अग्रलेख लो. टिळकांनी आपल्या 'केसरी' या वृत्तपत्रात लिहिले. लोकमान्यांवर ब्रिटिश सरकारचा राग होताच. त्याने त्यांना एकदा तुरुंगात टाकले होतेच. आता या अग्रलेखाचे निमित्त काढून ब्रिटिश सरकारने लोकमान्य मुंबईत असताना त्यांना अटक केली व तुरुंगात डांबले. त्यावेळच्या मुंबई राज्याच्या गव्हर्नर जॉन क्लार्कने १३ जुलै १९०८ रोजी त्यांच्यावर विविध आरोपांबद्दल न्यायालयात खटला भरला. मुंबईचे न्या. मू. दावर यांच्यापुढे खटल्याचे कामकाज सुरू झाले. लोकमान्यांनी आपल्यातर्फे वकील न देता, स्वतःच स्वतःची बाजू मांडली. सरकारी वकिलाने लोकमान्यांच्या विविध अपराधांचा पाढा वाचून ते कसे राजद्रोही आहेत हे दाखवून दिले; या उलट लोकमांन्यांनी ५ दिवसात एकून २१ तासांपेक्षाही अधिक बोलून, आपण कसे निर्दोष आहोत, ते मुद्देसूद सांगितले. पण काही झाले तरी ब्रिटिश सत्तेच्या ताब्यातील न्यायालय ते दोन्ही बाजूंचे म्हणणे केवळ रीत म्हणून ऐकून घेऊन ब्रिटिशधार्जिण्या ज्युरींच्या सल्ल्याने न्यायमूर्तींनी लोकमान्यांना त्यांच्या दोन अपराधांकरीता ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा दिली. तर तिसन्या अपराधाकरिता १०००रु. दंड ठोठावला. एचडी जबर शिक्षा ठोठावली असतानाही निश्चल राहिलेल्या त्या निर्भय महापुरुषाला न्या. मू. दावर यांनी विचारले, “दिल्या गेलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे काय? यावर लोकमान्य म्हणाले," न्यायालयानं जरी मला अपराधी ठरविलं असलं, तरी मी अपराधी नाही. एकूण लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी या न्यायालयाच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ अशी एक ईश्वरी शक्ती आहे. मी शिक्षा भोगल्याने, माझ्या देशबांधवांमध्ये या परकीय सत्तेविषयीचा असंतोष वाढीला लागून स्वातंत्र्याची घटका जवळ यावी, यासाठी या सत्तेने तुम्हाला मला शिक्षा देण्याची बुध्दी दिलेली असते." लोकमान्यांचे हे धैर्योद्रार ऐकून, न्यायाधीशासहित सर्व थक्क झाले. फुटत 


→ सुविचार 

जेथे जोन व नेट आहे आणि राष्ट्रातील प्रत्येक स्वी पुरुष एकजूट होऊन देशासाठी परमावधीचा त्याग करण्यास तयार आहेत -> तेथे विययश्री नेहमीच धावत येते' दिनविशेष - 

• इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी जन्मदिन १८०५ : मॅझीनी हा इटलीतील राष्ट्रवादाचा जनक मानला जातो. 'राष्ट्रवाद हाव धर्म होय' अशी त्रिकवण त्याने तुकडे-तुकडे झालेल्या इटलीला दिली. जुलमी सत्ताधीशांमुळे जनतेचे जीवन असह्य होत चालले होते. या जुलमाला विरोध करण्यासाठी कार्बोनेरी नामक सशस्त्र गुप्त संघटना निर्माण झाली. मॅझिनी या संस्थेचा सक्रीय सभासद होता. त्याच्या भावनाप्रधान राष्ट्रवादी लेखांनी त्याने इटलीच्या जनतेला प्रेरित केले. राष्ट्राच्या दुर्देवी परिस्थितीची सूचक अशी काळी फीत तो आपल्या दंडावर लावी. इटलीतून त्याच्या चळवळीमुळे त्याला हदपार करण्यात आले तेव्हा तो पॅरिसला गेला. तिथे त्याने 'यंग इटली' नावाची क्रांतिकारी संघटना स्थापना केली. गॅरिबाल्डीसारखे जहाल देशभक्त त्याच्या झेंडयाखाली एकत्र आले. इटलीची एकीकरण चळवळ यशस्वी होण्यासाठी मॅझिनीने चारित्र्य, शिक्षण, स्वार्थत्याग या गोष्टींवर भर दिला. राष्ट्रीय ऐक्य, उच्चार विचार स्वातंत्र्य व परकीयांपासून मुक्तता या मंत्राचा घोष त्याने सतत केला. लंडनला जाऊन तो तेथील कायमचा रहिवासी झाला व शेवटपर्यंत तेथूनच त्याने आपल्या राष्ट्रीय चळवळीची सूत्रे हलविली. १८७० साली इटली स्वतंत्र होऊन एक राष्ट्र बनले. या एकीकरण कार्यात मॅझिनीचा सिंहाचा वाटा आहे. 


→ मूल्ये

 स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता, कर्तव्यदक्षता.

 

 → अन्य घटना

  • पेशव्यांना वकील-इ-मुतालिक पदवी अर्पण - १७९२ • देशभक्त दामोदर हरी चाफेकर यांनी चार्ल्स रॅंडवर गोळ्या झाडल्या - १८९७ • लो. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा. १९०८ महानुभाव वाङ्मयाचे विद्वान व नामवंत साहित्यिक डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म १९०८ • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीचें निधन १९५३ महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर ३० टक्के जागा राखीव १९९४ • दक्षिणायनास प्रारंभ कर्क संक्रमण 

  

उपक्रम

• मॅझिनी या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील विचार निवडून फळ्यावर लिहा. • वेगवेगळ्या देशांच्या पराक्रमी देशभक्तांची माहिती जमवून एक हस्तलिखित तयार करा.


समूहगान

 • दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए.... 


सामान्यज्ञान

नेहमीच्या वापरातील धातूपेक्षा सोने जास्त जड आहे. पाऱ्यामध्ये ते तरंगते. १०६३ अंश सेल्सिअस तापमानाला ते वितळून त्याचा रस होतो; तर २९७० अंशाला सोने उकळू लागून त्याची वाफ होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा